Tuesday, 12 September 2017

टीव्हीवर, नको तसल्या जाहिराती आणि घरगुती वाद घडवणाऱ्या सिरीयल दाखवणारे लोकं, खूप हरामखोर असतात..!
एखाद्या जाहिरातीमध्ये, आपल्या सोबत आई वडिलांना दाखवतील. आणि, आपली आई आपल्याला सांगतेय, असं दाखवत मेसेज देतील..
बघ बाबा.. तुझं स्वतःचं घर सुद्धा असायला हवं. आता हे घर, आपल्याला खूप छोटं पडतंय..!
तुमच्यापैकी कोणीही मला एक गोष्ट सांगा..
आपला बाप, आयुष्यभर मर-मर मरतो. आणि त्याच्या शिलकीतील उर्वरित रकमेत निवारा म्हणून.
वन.बी.एच. के... हा छोटासा फ्ल्याट खरेदी करतो. आणि, त्याच लहानशा घरामध्ये आपलं जीवन व्यतीत होत असतं. तो हे सगळं का करत असतो..?
तर, फक्त आणि फक्त आपल्या कच्च्या बच्च्यांना सोबत घेऊन राहण्यासाठी.
नाही म्हणता, आपली आई सुद्धा, घरातील शिलकी मधून, पै-पै बाजूला काढून ठेवत. तिच्या
नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी नकळत काहीतरी तजवीज करत असते.
तर मग, त्याच घरात राहात असणारी आपली आई, आपल्याला असा सल्ला देऊ शकेल का..?
फारफार तर.. जमल्यास, ती असं म्हणेल..
तुझ्या बाबांनी, आजवर खूप कष्ट केले. आणि अगदी सरते शेवटी आम्ही हे घर घेऊ शकलो. तू जरा यापेक्षा मोठं घर घे, आम्ही घेतलय त्यापेक्षा सुद्धा मोठं.
त्यांना, आणि मला सुद्धा तुझा खूप हेवा वाटेल..!
या नको तसल्या जाहिराती, आणि सिरियल्स..
हि एक फार मोठी कीड आहे. नकळत, आपल्या मुलाबाळांना आपल्या पासून भरकटवन्याचं, ते एक फार मोठं पातक करत आहेत. घरं फोडण्याची कामं करत आहेत.
आणि.. आपल्या धर्मातील रिती रिवाजाला, अप्रत्यक्ष रित्या पायदळी सुद्धा तुडवत आहेत..!
असे विषय पाहणं, आणि त्याचा अंगीकार करणं, तत्काळ बंद केलं पाहिजे.

No comments:

Post a Comment