टक्कल पडणे,
खरं तर हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..
खरं सांगायला गेलं तर, केसाशिवाय माणसाला शोभाच नाही. आणि बाईला तर नाहीच नाही.
पण तरीही.. माझ्यासारख्या काही अभागी लोकांनी काय करावं..?
नाही म्हणता, त्यावर सुद्धा आता बरेच उपाय आले आहेत.
सुरवातीला..
काही व्यक्ती, नकली केसांचा टोप डोक्यावर घालून मिरवत असत. आजही, अशा हौशी व्यक्ती आपल्याला दिसत असतीलच. तर, काही व्यक्तींनी, डोक्यावर केसं येण्यासाठी भरपूर आणि पाण्यासारखा वारेमाप पैसा खर्च केलेला मी स्वतः पाहिला आहे.
फक्त, " शरद पवार साहेब वगळता. "

हल्लीच.. माझ्या ओळखीतल्या एक मुलाने, गुजरातमध्ये कुठल्याशा इस्पितळात जाऊन. केस रोपण करून घेतले आहेत. त्या कामाकरिता, त्याचे दीडदोन लाख रुपये खर्च झाले. पण, त्याच्या उजाड माथ्यावर आता केसांची बर्यापैकी काळसर दाटी झाली आहे.
खुश आहे बिचारा..!
कारण, अजून त्याचं लग्न झालं नाहीये. आणि.. टक्कल असल्यामुळे, किंवा त्याचा स्वभाव काहीसा 'थंड' असल्यामुळे, त्याच्या हाती कोणी लागली नाही.
हा विषय थोडा अलहिदा आहे. आणि एवढ्यातच, त्याचं लग्नं जुळून आलं, आणि, त्याला पसंद पडलेली नवरी मुलगी सुद्धा, अगदी नजर लागावी अशीच आहे.
हि सुद्धा.. एक, फार मोठी जमेची बाजू आहे.

"खरोखर, केसात फार मोठी कशीश आहे..! "
मला स्वतःला..टक्कल पडायला लागल्यावर, सुरवातीला मी थोडेफार खर्चाच्या बाबतीत आटोक्यात असणारे जुजबी उपचार माझ्या डोक्यावर केले.
कारण, आपण काही मालदार पार्टी नाहीये. पण, ते उपचार काही सक्सेस झालं नाही. आणि सुदैवाने, तेंव्हा माझं लग्न सुद्धा झालं होतं.
शेवटी.. मला, टक्कल पडायचं ते पडलंच. आलीया भोगाशी असावे सादर. या उक्तीप्रमाणे, मी सहसा माझं टक्कल लपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. नाही म्हणता, सुरवातीला टक्कल झाकण्यासाठी. मी, डोक्यावर रुमाल बांधायचो. पण नंतर-नंतर त्याचा सुद्धा मला कंटाळा येऊ लागला. त्यामुळे, आता मी माझं बोडकं टक्कल घेऊन निवांत आणि बिनधास्त वावरत असतो. तरी सुद्धा.. माझ्यावर, बरेच मित्र आणि मैत्रीण फिदा असतात. हि फार मोठी जमेची बाजू आहे.
त्याला एकमेव कारण म्हणजे,

" माझी, लाजवाब लेखणी..! "
परवा.. बरेच वर्षांनी माझ्या लहानपणीचा एक थकलेला मित्र मला दिसला.
पूर्वी.. त्याच्या डोक्यावर अगदी भरगच्च अशी कुरुळी केस होती. पण आत्ता पाहतो तर, त्याचं डोक्यावरील रान आता बरच मोकळं झालं होतं.

खरं पाहायला गेलं तर, टक्कल.. हा विषय मला काही खास किंवा जास्तीचा कामाचा वाटत नाही.
म्हणून.. तो मित्र मला भेटल्यावर,
तो कामाला वगैरे कुठे आहे, त्याने घर घेतलं कि नाही, त्याला मुलबाळ आहेत कि नाही.
या सगळ्या सांसारिक चौकशा मी केल्या. हे माझं कामच आहे.
परंतु.. माझं सगळं बोलून झाल्यावर, अगदी चिंताक्रांत चेहेरा करत तो मला म्हणाला..

तुला.. टक्कल कसं काय पडलं..?
बहुतेक.. टक्कल या विषयाने तो बिचारा खूप त्रस्त झाला होता. त्याच्या बोलण्यावरून तरी, असं माझ्या ध्यानात आलं होतं.
मला म्हणाला.. तुमच्या घरात तर कोणाला टक्कल नव्हतं रे..!
मग.. तुला कसं काय टक्कल पडलं..?
मी म्हणालो.. माझ्या मोठ्या भावाला टक्कल आहे. पण, माझ्या वडिलांना मात्र टक्कल नव्हतं. तरी सुद्धा, मला टक्कल पडलं. आता काय करतो बाबा, जे आहे ते आहे..!
मी.. या नको त्या गोष्टीचा जास्ती विचार करत बसत नाही.
माझं बोलून झालं..
तरी, तो बिचारा अजूनही बराच चिंतातूर दिसत होता.

आणि.. शेवटी मी त्याला विचारता झालो.
अरे पण.. लहानपणी तुझी तर अगदी दाट आणि कुरुळी केसं होती. त्यावेळी, चुकून सुद्धा तूला टक्कल पडेल असं मला वाटलं नव्हतं. शिवाय, तुझ्या घरात सुद्धा कोणालाच टक्कल नव्हतं.
तर मग, तुला कसं काय टक्कल पडलं..?
तसा.. एकाएकी त्याचा राग उफाळून आला. आणि तो म्हणाला..
काय सांगू तुला..
आयघाले.. माझे सगळे मामा लोकं टकले आहेत रे..! हा वारसा मला तिकडून मिळाला आहे.
असं म्हणत, त्याने विनाकारणच त्याच्या मामा लोकांना दोनचार शिव्या हासडल्या.
तेंव्हा.. बोळवण म्हणून, त्याची समजूत काढत मी त्याला म्हणालो.
तुझ्या मामा लोकांची इस्टेटची वाटणी झाली का रे..?
तर म्हणाला.. हो, आत्ता गेल्याच वर्षी झाली.
मी म्हणालो.. मग तुझ्या मामा लोकांनी तुझ्या आईला तिच्या वाटणीचा हिस्सा दिला असेलच कि..! आणि, पुढे रेटून लागलीच म्हणालो.
तुमच्या वाट्याला किती जमीन आली..?
तर म्हणाला.. दोन एकर जमीन माझ्या आईच्या वाटणीला आली ..!

मग मी, छद्मीपणे हसत त्याला म्हणालो..
म्हणजे, तुझ्या आईच्या वाटणीला मिळालेली ती सगळी जमीन आता तुझ्याच मालकीची होणार.?
माझ्या प्रश्नार्थक उत्तरवार तो जरा चपापला.
मी म्हणालो, तुला किंवा तुझ्या आईला जमीन मिळाल्यावर तर तू खूप खुश झाला असशील.!
तर मग, तुला टक्कल पडल्यावर मामाला शिव्या कशाला देतोस..?
तुला म्हणून बोलतो. कारण तू माझा लहानपणीचा मित्र आहेस.
एकतर.. तू तुझ्या मामांना तू शिव्या तरी दे. किंवा, त्यांनी आंदन म्हणून तुला किंवा तुझ्या आईला दिलेली जमीन तरी मोठ्या मानाने परत दे.

तेंव्हा मात्र.. गडी भलताच खजील झाला. आणि, मला सॉरी म्हणून पुढे मार्गस्थ झाला.

No comments:
Post a Comment