अनायसे आज सुट्टीच आहे म्हणून,
परवा.. घरातील काही पेंडिंग कामं उरकून घेण्यासाठी.
आमच्या, पिंपरी-चिंचवड भागात माझी भटकंती चालू होती. त्यादिवशी बरीच छोटीमोठी कामं मी मार्गी लावली. शेवटचं, एक सरकारी काम करण्यासाठी मी एका कार्यालयात गेलो होतो. पण मी स्वतः सरकारी नोकर असून सुद्धा माझं ते काम काही झालं नाही.
आणि, सहजच माझ्या ध्यानात आलं..
त्या सरकारी कार्यालयाच्या खालील बाजूस, पूर्वी माझ्या एका मित्राचं दुकान होतं. तो मित्र आणि मी.. नव्वदच्या सुमारास, एका खाजगी कंपनीत एकत्र कामाला होतो. तो मेनेजर आणि मी सुपरवायझर. त्याला शेवटचं भेटून, आता जवळपास वीस वर्ष होऊन गेली होती.

थोडा गतस्मृतींना उजाळा मिळेल म्हणून, मी अगदी घाईघाईने त्या दुकानापाशी गेलो. आता तो तिथे असेल कि नाही..? कारण, वीस वर्ष होऊन गेली होती ना.
असा विचार करत, तिथे काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मी त्याचं नाव सांगितलं. आणि.. तो कुठे आहे असं विचारलं.
तर तो मुलगा म्हणाला.. आमचे सर, वरच्या ऑफिसमध्ये बसले आहेत.
नाही म्हणता, गड्याने व्यवसायाचा फार मोठा पसारा वाढवला होता. दोनाचे चार दुकानं केली होती. त्या मुलाने मला माझं नाव विचारलं, आणि त्या काचेच्या केबिनमध्ये बसलेल्या माझ्या मित्राला तो निरोप द्यायला निघून गेला. आणि काही क्षणातच तो बाहेर आला. आणि मला, आतमध्ये चला असं त्याने खुणावलं.

मी त्या ऑफिसमध्ये जसा पाय ठेवला, तसं त्याला पाहून मला खूप आनंद झाला. पण त्या मित्राच्या चेहेऱ्यावर आनंदाचे असे कोणतेच भाव दिसत नव्हते. आणि, मला पाहून अगदी थंड प्रतिसाद देत तो म्हणाला..
अरे.. तू आहेस होय, मी विचारात पडलो होतो. पंडित म्हणजे नेमकं कोण असेल..?
माझ्यासाठी हा पहिला झटका होता,
आज जवळपास वीसएक वर्षांनी मी त्याला आणि तो मला भेटत होता. पण, या भेटीचं त्याला विशेष असं कोडकौतुकच वाटलं नव्हतं.
मला त्याने, त्याच्या शेजारी असणाऱ्या एका खुर्चीवर बसायला जागा दिली. आणि, तो पुन्हा त्याच्या कामाला लागला. त्याच्याकडे कामाला असणाऱ्या, आणि त्याच्या समोर बसलेल्या सेल्समन मुलांना, दिवाळी साठीची त्याची जी काही असणार आहेत. ती सगळी टार्गेट तो त्यांना समजावून सांगत होता. यात जवळपास पंधराएक मिनिटं निघून गेली.
त्याच्या समोरील काम आटोपल्यावर, तो मला म्हणाला..

मग, सध्या काय चालू आहे तुझं, अजून तिथेच आहेस का कामाला..?
माझ्या मनात आलं, त्याला म्हणावं कि..
माझ्या मनात आलं, त्याला म्हणावं कि..
" सरकारी नोकऱ्या काय रस्त्यावर पडल्या आहेत का. जे मला तू असा प्रश्न विचारत आहेस..? "
पण, मनातल्या मनातच स्वतःला जाऊदे असं म्हणत. मी सुद्धा, गालातल्या गालात हसून त्याला हो असं म्हणालो.
मग, आमच्या जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
एकमेकांच्या घरच्यांची विचारपूस झाली. मुलं किती आहेत, काय करतात, जुने मित्र कोणी भेटतात कि नाही. यावर बरीच चर्चा झाली. काही कामगार लोकांची आठवण सुद्धा झाली. आमच्या साहेबांची सुद्धा आठवण काढली. स्टाफ मध्ये कामाला असणाऱ्या मुलींची आठवण झाली. पण त्या मुली आता कुठे आहेत. किंवा नाहीत, त्याची काहीच माहिती मिळाली नाही.
दुर्दैवाने.. त्यातील दोनचार कामगारांना तर हा मित्र विसरून सुद्धा गेला होता. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटत होतं. आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना कोणी इतक्या लवकर विसरू शकतं का..? माणसाची मेमरी एवढी कमजोर असू शकते का..?

मी.. त्याच्या ऑफिसमध्येच त्याच्याशी बोलताना अरेतुरे मध्ये संवाद साधत होतो. त्यामुळे, त्याला सर म्हनणारे त्याच्या स्टाफ मधील काही कर्मचारी माझ्याकडे अगदी कुतूहल मिश्रित पाहत होते. त्यांना पाहून मला असं वाटत होतं. कि त्यांना मला विचारावं असं वाटत असेल.
कि.. तुम्ही नेमके कोण आहात..? जे तुम्ही, आमच्या साहेबांना अरेतुरेने बोलत आहात..!
पण त्याने, त्याच्या स्टाफमधील कोणाशीच माझी ओळख करून दिली नाही. कि, आम्ही दोघे पूर्वी एम.आय.डी.सी. मध्ये एकत्र काम करत होतो. आणि..वगैरे, वगैरे..

शेवटी, मला.. ती, न आवडलेली भेट आटोपती घेत. मी, त्या मित्राला त्याचा मोबाईल नंबर मागितला. सोबतच, आणखी दोन जवळच्या मित्रांचे नंबर सुद्धा त्याच्याकडून घेतले.
त्यावर.. तो अगदी सावकाशपणे म्हणाला,
हो ना.. नंबर असल्यावर किमान कधीतरी बोलता तरी येतं. तो हे बोल, मला बोलला तर खरं..

पण माझ्याशी वार्तालाप करण्यासाठी, त्याने माझा मोबाईल नंबर काही घेतलाच नाही..!
असो.. तेवढ्यात, त्याचा शिपाई माझ्यासाठी चहा घेऊन आला.
माझा तो मित्र, आजही चहा पीत नाही. आणि, मला सुद्धा चहाची खास आवड नाही. तरीसुद्धा, बळेच मी तो चहा घेतला. कारण, तो दुक्खी होऊ नये म्हणून.
आणि, निघायचं म्हणून मी त्याला, चल.. येतो असं म्हणालो. त्यावर सुद्धा, त्याची अगदी थंड प्रतिक्रिया, त्याने अगदी हळुवार अशी होकारार्थी मान हलवली.

मी त्याच्या ऑफिसच्या बाहेर पडलो, आणि मनात विचार केला. त्याकाळी एका डब्यात जेवण करणारे आम्ही मित्र. परंतु, वीस वर्षांनी समक्ष भेटल्यावर त्याने येवढा थंड प्रतिसाद दिला.
तर मग, उरलेल्या दोन मित्रांना मी फोनवरून बोलल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल..?
ते मला, ओळखतील कि नाही..?

त्यामुळे, इच्छा असून सुद्धा गेल्या दोनचार दिवसात. मी, त्या मित्रांना अजून फोन सुद्धा केला नाही. बघुयात, माझ्या मनाची तयारी केंव्हा होतेय ते..!
No comments:
Post a Comment