" उबुंटु "
म्हणजे, आफ्रिकन भाषेत. " मी आहे " कारण " आम्ही आहोत "
आपला चिकना चोपडा मराठी अभिनेता, पुष्कर श्रोत्री. या उबुंटु नावाचा, मराठी सिनेमा तुम्हा आम्हासाठी उद्यापासून मराठी पडद्यावर घेऊन येत आहे.
परंतु, मला एक गोष्ट समजत नाहीये..
परंतु, मला एक गोष्ट समजत नाहीये..
या सिनेमाचं नाव, " उबुंटु " ठेवायलाच हवं होतं का..?
आम्ही आहोत, कारण मी आहे..!
हे नाव सुद्धा, आपल्या मराठी बांधवांना किंवा लोकांना आवडलं नसतं का..?
अमीर खानच्या सिनेमाचं नाव सुद्धा चक्क हिंदीमध्ये " दंगल " होतं राव.
जाम पैसा कमवला कि त्याने. तर मग, आम्हा मराठी लोकांनाच का धाड भरलीय.

साउथ आफ्रिकेमध्ये, नेलसन मंडेला.. यांनी, सर्वप्रथम या विश्वसनीय शब्दाचा उच्चार केला होता. असो, मला त्यांच्या विषयी नितांत आदर आहे. पण विनाकारण, काहीतरी नवीन आणि कोणाला समजणार नाही. असं नावं ठेऊन, आपला सिनेमा हिट होईल. अशी संकल्पना आपल्या मराठी माणसांच्या डोक्यातुन कधी जाईल..?
त्याकरिता, रोजच्या रोज टीवीवर प्रोमो घेऊन, ती उबुंटु टीम सर्वांना याचा अर्थ समजावून सांगत आहेत. खरोखर याची आवश्यकता आहे का हो..?

आपण भारतात राहतोय..
आणि, त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहतोय. आणि, आपली मराठी रंगभूमी किंवा सिनेसृष्टी किती जोमात आहे..?
किमान, एकदा तरी या लोकांनी हा विषय ध्यानात घ्यायला हवाय कि नको..? पूर्वीच्या काळात, मराठी सिनेमे हिंदीमध्ये व अन्य भाषांमध्ये डब केले जायचे. तुम्हाला सुद्धा त्यातील काही सिनेमांची नावं आठवत असतील. पण आता सगळी चक्र उलटी फिरू लागली आहेत. नाही म्हणता, हल्ली नव्याने येणारे काही मराठी चित्रपट सुद्धा अगदी अव्वल दर्जाचे आहेत.

तो बिचारा " महागुरू " त्याबद्दल मी जास्तीचं बोलत नाही.
अजूनही, तो त्याच्या जुन्या जमान्यातच वावरत आहे. अगदी, आम्ही सातपुते नावाचा सिनेमा काढेपर्यंत त्याची मजल गेली. मराठी माणसला किती मुर्खात जमा करताल राव. आम्ही, हिंदी सिनेमे सुद्धा पाहतो. हे तुम्हाला कसं काय समजत नाही..?
हल्लीच, हा विषय खूप गाजला होता. पण मी, त्यावर वाच्यता करू इच्छित नाहीये. आणि, मी चुकून सुद्धा त्यावर एकसुद्धा टिपणी केली नव्हती.

आपल्या हिंदी सिनेमाची सुद्धा तीच बोंब..!
तामिळ ( साउथ मधील ) सिनेमे, हे मूर्ख हिंदी आणि धंदेवाईक दिग्दर्शक लोकं आपल्या राष्ट्रभाषे मध्ये त्यांचे रिमेक करतात. का तर, फक्त आणि फक्त पैशाकरिता.
लाज वाटली पाहिजे राव. एकीकडे त्यांचा तमिळ सिनेमा टीवीवर चालू असतो. आणि त्याच दिवशी त्या रिमेकचा पहिला शो आपल्या थियेटरला असतो. असं कितीतरी वेळा माझ्या पाहण्यात आलं आहे. त्या भागातील सिनेमे, आम्ही डबिंग करून आमच्या महाराष्ट्रात का म्हणून दाखवतो.?
इथे.. कितीतरी नामांकित व्यक्तींनी कित्तेक अजरामर कथा, कादंबऱ्या लिहून ठेवल्या आहेत. त्यात हात घालायला प्रत्येकाला लाज वाटतेय. किंवा, तो पैजेचा विडा उचलायला कोणीही तयार नाहीये. कारण, महाराष्ट्र म्हणजे.. आओ, जावो अपना घर असच झालं आहे ना..!

या.. आणि, नोटा छापून निघून जा.
असो.. विषय थोडा भरकटला आहे, तर या उबुंटु सिनेमाचं मूळ कथानक आहे.
मराठी माध्यमातील शाळांमध्ये होणारी विद्यार्थ्यांची गळती. आणि त्यासाठी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेला आटापिटा. खरोखर हा एक स्तुत्य प्रयोग आहे. काळाची गरज आहे.
पालिकेतील मराठी शाळांमध्ये, विध्यार्थ्यांचा अक्षरशः फार मोठा तुटवडा आहे. इतकी भयंकर परिस्थिती आहे. कि, एका वर्गात, चक्क दोन तीन वर्ग बसवावे लागत आहेत. पहिली. दुसरी आणि तिसरी.. त्यापुढचा विषय तर फार भयाण आहे. विद्यार्थीच मिळत नाहीयेत. म्हणून कितीतरी वर्ग अक्षरशः बंद पडले आहेत. आपल्या पुण्यनगरी मध्ये काही मराठी नामांकित शाळा आहेत.
तिथे सुद्धा अगदी अशीच परिस्थिती आहे.
काही मित्रांना हे खरं वाटणार नाही. परंतु त्या नामांकित शाळांना सुद्धा, हल्ली विध्यार्थी मिळत नाहीयेत. शेवटी, तिथे कामाला असणाऱ्या शिक्षकांच्या सुद्धा पोटाचा प्रश्न आहे ना..!
काम नसल्यावर, ते तरी कोणाला शिवतील..?
त्यामुळे, त्या नामांकित शाळांमधील शिक्षक लोकं सुद्धा, सेटिंग मध्ये पालिकेच्या शाळांबाहेर उभे राहून, तिथे दाखल करायला आलेल्या मुलांच्या पालकांना. त्यांच्या मुलांना, आमच्या शाळेत घाला अशी गळ घालत असतात. आम्ही त्यांना, सगळ्या सुविधा आणि शिक्षण सुद्धा मोफत देऊ. असं आश्वासन सुद्धा ते देत असतात. आणि चक्क विद्यार्थी पळवतात.
मला.. त्या शाळांचा बिलकुल राग नाहीये. कारण, त्या सुद्धा माझ्या मराठी शाळाच आहेत.

पण, मूळ मुद्दा हा आहे. कि हे सगळं का घडतंय..?
त्याउलट.. कोन्व्हेंट शाळांमध्ये, पालकांना अगदी पाय ठेवायला जागा नसते.
याचा वशिला आन, त्याचा वशिला आन. याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. सगळीकडे हीच धावपळ चालू असते. तरी सुद्धा त्यांच्या मुलांचं त्या शाळेत एडमिशन होत नाहीये.
त्याकरिता,
हल्लीच या विषयावरील एक हिंदी सिनेमा सुद्धा येऊन गेला होता बघा. आणि, तो सिनेमा म्हणावा असा खास चालला सुद्धा नाही. कारण अशा सिनेमांना आपल्या इथे कोणी जास्तीचा भाव देत नाही. आम्हाला फक्त बाहुबली आणि चिकणी चमेली हवी असते.
तर, त्या सिनेमाचं नाव होतं.

" हिंदी मिडीयम "
या सिनेमात, जी आहे ती खरी कथा आणि व्यथा दाखवली आहे.
जमल्यास, एकदा हा सिनेमा सुद्धा तुम्ही नक्की पहा. मी त्या सिनेमाचं गुणगान गात नाहीये. पण नाईलाजाने मला सांगावं लागतय. तो सिनेमा तुम्ही एकदा पाहाच..

पण पुष्कर.. तू, एक काम करायला हवं होतस. किमान, मराठी सिनेमाचं नाव, मराठीतच ठेवायला हवं होतस. असो, तुझा सिनेमा अगदी सुपरहिट होवो. त्याचा चांगला संदेश जगभर पोहोचो. त्याने खरोखर एका चांगल्या विषयाला हात घातला आहे. त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत.
No comments:
Post a Comment