#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- ६ )
=========================
=========================
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी,
दुपारपासून तेथील स्थानिक नागरिक आम्हाला भेटायला येऊ लागली. त्यामध्ये, कायम स्मरणात राहणारी एक गोष्ट म्हणजे. आमच्या सोबत, शिक्षक वर्गामध्ये श्री विजय कांबळे नावाचे एक शिक्षक होते. ते बामसेफ संघटनेचे फार मोठे संघटक आणि कार्यकर्ते होते.
सुदैवाने या अपघातात, कांबळे सरांना सुद्धा विशेष मार लागला नव्हता. त्यामुळे, त्यांनी खूप धडपड करून, इतर विषय मार्गी लावले. हे सर्व करत असताना, सरांचा कोणाशी तरी या विषयवार वार्तालाप झाला असावा.
आणि काय आश्चर्य, त्यादिवशी, संध्याकाळी पाचच्या सुमारास कुलू मधील बामसेफचे पाच पन्नास कार्यकर्ते, इस्पितळात आमच्या भेटीला आले. तिथे येऊन त्यांनी आम्हाला खूप धीर दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, काही काळजी नसावी. काही कमी जास्ती वाटलं तर आम्ही आहोत.
त्यामुळे.. आम्हाला सुद्धा थोडा धीर आला. त्या कार्यकर्त्यांनी, आमच्यासाठी खाऊ म्हणून एक विशिष्ट प्रकारचं फळ आणलं होतं. ते फळ, आपल्या कच्च्या हिरव्या टोमेटो सारखं दिसत होतं.
हे फळ, आजवर मी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे, मी मनातल्या मनात म्हणालो.

काय राव.. या लोकांनी आम्हाला द्यायला हे टमाटे का आणले असतील..?
आणि शेवटी, सर्व रुग्णांना ती फळं देता देता, त्या कार्यकर्त्यांनी मला सुद्धा ते दोन टमाटे दिले.
कुतूहल म्हणून, मी लगेच त्या कच्च्या टमाट्याचा चावा घेतला.
आणि काय सांगू, ते फारच अप्रतिम आणि सुमधुर चवीचं फळ होतं. जे आजवर मी कधीच खाल्लं नव्हतं. शेवटी.. त्या फळाचा मला मोह आवरता आला नाही. आणि मी त्या कार्यकर्त्यांना आणखीन दोन फळं मागून घेतली. कारण जेवणापेक्षा हि फळं माझ्या पोटाला खूप आधार आणि ताकत देणारी होती. शिवाय.. मी अंगाने सगळा मोडलो असल्याने, मला शौचाला बसायला सुद्धा जमणार नव्हतं. कारण, त्या इस्पितळात कमोड नव्हते. त्यामुळे, मी तो दिवस आणि रात्र फक्त ती फळं खाऊनच काढला. ते फळ सफरचंद कुळातील होतं, पण फारच चवदार होतं. त्यानंतर आजतागायत, मला ते फळ पुन्हा कधीही खायला मिळालं नाही.
अगदी आस्थेने आमची विचारपूस केली. आणि, अवीट चवीची फळं आम्हाला चाखायला दिल्याबद्दल. कुलू येथील समस्त बामसेफ कार्यकर्त्यांचे पुनश्च हार्दिक आभार.

आमच्यासोबत असणाऱ्या काही मित्रांना जास्तीचा मार बसला नसल्याने. ती सगळे मित्र सुद्धा आमची सुश्रुषा करण्यात व्यस्थ असायचे. आमच्यासोबत, असणाऱ्या घरडे नामक एका शिक्षकांना सुद्धा, फार मार बसला होता. ते खूपच जायबंदी झाले होते. त्यांना बेडवर पडल्या पडल्या, काही हालचाल करावयाची असल्यास.. आमच्या मित्रातील जो दिसले त्याला ते..
उशी सरळ करून दे, अंगावर चादर दे, प्यायला पाणी दे, थोडा पाय उचलून ठेव, पाठीला हात देऊन उठवून बसव. अशी विविध कामं ते सांगत असायचे. मग, त्यांची सुश्रुषा करणारा मित्र त्यांना विचारता व्हायचा.
सर.. तुम्हाला खूप त्रास होतोय का..?
त्यावर ते म्हणायचे.. काय सांगू बाबा, मी सांगू शकत नाही, येवढा त्रास होतोय मला.

मुका होऊन.. आजूबाजूच्या गमती पाहत, मी आला दिवस पुढे रेटत होतो.
कशीबशी ती रात्र सरली.. पहाट झाली, आम्ही सगळे आवराआवर करायला लागलो. सकाळी सात वाजता आम्हाला ते इस्पितळ सोडून विमानतळावर हजर राहायचं होतं.
सकाळचे सात वाजले, आणि आमचा एक खुशमस्कऱ्या मित्र घरडे सरांपाशी गेला. सरांना वेदना होत असल्याने, तो थोडेसे विव्हळत होते. हा आकाश नावाचा मित्र त्यांच्यापाशी गेला आणि त्यांना म्हणाला. सर.. तुम्हाला खूपच त्रास होत आहे का..?
सर म्हणाले, होय रे आकाश खूपच त्रास होतोय मला..!
आकाशने येवढं सगळं ऐकुन घेतलं. आणि तो तसाच पुढे चालता झाला. त्यावेळी, त्याला थांबवत सर म्हणाले. आकाश.. तू मला असं का विचारलस रे..!
त्यावर आकाश म्हणाला.. काही नाही, मगाशी तिथे चर्चा चालू होती. ज्यांना खूप त्रास होतोय, त्यांना इथेच ठेवणार आहे म्हणतात. आणि ते चांगले नीट झाल्यावर, त्यांना पुण्याला नेणार आहेत.

खरं तर.. आकाशने टाकलेला हा एकदम नकली बॉम्ब होता. अशी कोणतीच चर्चा तिथे झाली नव्हती.
पण.. घरडे सरांना, हे सगळं अगदी खरं वाटलं. आणि, सगळ्या वेदना विसरून ते ताडकन त्या बेडवर उठून बसले. आणि त्याला म्हणाले..
नाहीरे, मला इतकाही त्रास होत नाहीये. अगदी ओके आहे मी. काही नाही झालं मला. चला.. निघायची तयारी करा.
शेवटी त्यांच्या मनात सुद्धा भीती होतीच. कि, चुकून आपल्याला इथे ठेवलंच तर काय घ्या..? कारण, जास्ती जखमी झालेल्या मित्रांना त्यावेळी, चंडीगड येथील चांगल्या इस्पितळात हलवण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे सरांना सुद्धा हि गोष्ट खरी वाटून गेली.

अशी विनोदी लोकं, विनोद झाल्यावर स्वतः कधीही हसत नसतात. त्या नियमाला अबाधित राखत, आकाश न हसताच तसाच पुढे निघून गेला.
पण हा प्रसंग पाहून, मला काही माझं हसू आवरता आलं नाही. मला आलेलं ते हसू इतकं भयंकर होतं. कि बेंबीच्या देठापासून हसताना, माझ्या तुटलेल्या बरगड्या दुखू लागल्या, आणि अती हास्य आल्याने माझ्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत होतं. तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे कि नाही ते मला माहित नाही. पण जेंव्हा, आपण अशाप्रकारे हसतो..
त्यावेळी, नकळत आपण रडल्यासारखे सुद्धा दिसतो. आणि, नेमकं या अवतारात मला घरडे सरांनी पाहिलं. आणि त्यांना वाटलं, कि मी रडतोय..
शेवटी, ते मला म्हणालेच.. कुंभार रडू नका, आता काही तासातच आपण पुण्यात पोहोचणार आहोत. त्यावर मी सुद्धा त्यांना म्हणालो.. सर, हे आनंदअश्रू आहेत. तुम्ही जास्ती काळजी करू नका. मी बिलकुल ठीक आहे. प्रसंगावधान राखत, त्यांना बिलकुल कळू न देता. त्या विनोदाचा मी मनसोक्त आस्वाद घेतला होता.
आज मी मनापसून हसत सुद्धा होतो. आणि मनोमन रडत सुद्धा होतो.

अशी विनोदबुद्धी.. आणि असा प्रसंग जीवनात पुन्हा येणे नाही आणि, येऊ सुद्धा नये..!
क्रमशः

No comments:
Post a Comment