#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- ४ )
=========================
=========================
पंधरा वीस मिनिटात, सरकारी रुग्णवाहिका त्या ओयासिस हॉस्पिटल मधून. आम्हाला कुलुमधील सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. आत नेल्याबरोबर.. मला, एका स्ट्रेचरवर झोपवलं गेलं. तेथील डॉक्टरांनी, माझ्या डोक्याला मलम पट्टी केलेली पाहिली. आणि, वार्ड बॉयला सांगून ते मला थेट वार्ड मध्ये घेऊन निघाले. शेवटी, मलाच त्यांना सांगावं लागलं. कि, माझी जखम खूप खोल आणि मोठी आहे. कदाचित टाके घालावे लागतील. तेंव्हा कुठे, त्यांनी ती जखम खोलून पाहिली.
आणि, अक्षरशः चांभाराणे चप्पल शिवावी, अशा पद्धतीने, भूल न देताच. माझ्या, डोक्याला तिथे उभ्या उभ्याच ओबडधोबड टाके घातले गेले. येवढ्या मोठ्या जखमे पुढे, टाक्यांचे घाव किंवा तिथे होणाऱ्या वेदना मला खूपच किरकोळ वाटत होत्या. त्यामुळे, मी ते सगळं काही अगदी मुकाट्याने सहन केलं.
रुग्णालयातील त्या वार्डमध्ये, पुरेशा खाटा सुद्धा नव्हत्या. काही ठिकाणी तर, एका खाटेवर दोन-दोन रुग्णांना झोपवण्यात आलं होतं. उशांचा तर, तपासच नव्हता. ब्ल्यांकेट तेवडे चांगले होते. पण, त्यांची संख्या सुद्धा पुरेशी नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर होत, तो दिवस कसाबसा सरला. रात्र झाली, माझ्या समोर जेवणाचं ताट आलं. परंतु, मला अन्न काही गोड लागत नव्हतं. कसाबसा, थोडासा डाळभात मी घशाखाली उतरवला.

मी स्वतः, जखमी असल्यामुळे; अपघातात नेमकं कोणा कोणाला काय झालय ? ते, काहीच समजलं नव्हतं. रात्री आमच्या सरांनी आमच्याशी थोडी चर्चा केली. तेंव्हा, त्यांनी आम्हाला सांगितलं. आमच्या पैकी, चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. पैकी, आम्ही सात आठ जन गंभीर जखमी. आणि चार मित्र अत्यवस्थ होते. हे सगळं ऐकून, मला खूप दुखः वाटलं. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका मित्राचं तर, अगदी चारच महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. फार भयानक प्रसंग. त्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला असेल.
विचार करता-करता, मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडा डोळा लागला, कि मला.. दरीमध्ये पडल्याचा भास व्हायचा. झोप अशी काही लागलीच नाही. रात्रभर, फक्त हाच खेळ चालू होता. सकाळ झाली, माझं सगळं अंग ठणका मारत होतं. सरकारीच दवाखाना तो, तिथे सगळं काम अगदी संथ गतीने चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, माझ्या छातीचे आणि पोटाचे एक्सरे काढले गेले. माझ्या डोक्याचं स्क्यान करण्यासाठी, त्या रुग्णालयात काहीच अद्ययावत साधन नव्हतं. त्यामुळे, आवश्यकता असून सुद्धा ते राहूनच गेलं होतं. दुपारी सगळे रिपोर्ट आले, तेंव्हा समजलं.
माझा डावा खांदा, आतील बाजूस मोडला गेला होता. त्यामुळे, मला हात वर करता येत नव्हता. ( हा त्रास मला आजही कायम आहे बरं का.
) कि, जास्ती हालचाल सुद्धा करता येत नव्हती. हे का कमी, म्हणून.. अजून एका गोष्टीची त्यात भर पडली. माझ्या पाच बरगड्या आणि दोन्ही गुढगे सुद्धा कामी आले होते.
विचार करता-करता, मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडा डोळा लागला, कि मला.. दरीमध्ये पडल्याचा भास व्हायचा. झोप अशी काही लागलीच नाही. रात्रभर, फक्त हाच खेळ चालू होता. सकाळ झाली, माझं सगळं अंग ठणका मारत होतं. सरकारीच दवाखाना तो, तिथे सगळं काम अगदी संथ गतीने चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, माझ्या छातीचे आणि पोटाचे एक्सरे काढले गेले. माझ्या डोक्याचं स्क्यान करण्यासाठी, त्या रुग्णालयात काहीच अद्ययावत साधन नव्हतं. त्यामुळे, आवश्यकता असून सुद्धा ते राहूनच गेलं होतं. दुपारी सगळे रिपोर्ट आले, तेंव्हा समजलं.
माझा डावा खांदा, आतील बाजूस मोडला गेला होता. त्यामुळे, मला हात वर करता येत नव्हता. ( हा त्रास मला आजही कायम आहे बरं का.
अपघात झाला त्या दिवशी, काही तासातच पूर्ण पुण्यामध्ये हि बातमी अगदी वार्यासारखी पसरली होती. आमच्या संस्थेमधील, एक शिष्टमंडळ. आणि, काही माननीय आमच्या मदतीकरिता ताबडतोब कुलू कडे विमानाने रवाना झाले. दुसर्या दिवशी, दुपारी बारा वाजेपर्यंत हा सगळा लवाजमा त्या रुग्णालयात येऊन पोहोचला. तेथील, दयनीय परिस्तिथी पाहून, त्यांनी आम्हाला ताबडतोब तेथून हलवण्याचा निर्णय घेतला. इथे, कोणा एकाचं नाव घेणं इष्ट वाटणार नाही. कारण, बर्याच लोकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत त्यामागे होती. आणि, ते सगळं शिष्टमंडळ आमच्या पुढील प्रवासाची तजवीज करण्याकरिता आल्या पाऊली माघारी फिरलं.
अपघात झाल्यापासुनचा, आजचा हा दुसरा दिवस होता. आणि, थोड्याच वेळात आम्हाला एक गोड बातमी मिळाली. उद्या सकाळी, आठ वाजता पुणे महापालिकेने आमच्यासाठी. कुलू ते पुणे एका स्पेशल विमानाची सोय केली आहे. अवघ्या, चार ते पाच तासात आम्ही 'घरी' पुण्यात पोहोचणार होतो. हि कल्पनाच, माझ्या मनाला खूप मोहोरवून गेली. आणि, माझं निम्म दुखः जागेवरच कमी झालं. माझ्या वेदना सुद्धा कुठच्याकुठे पळून गेल्या होत्या. प्रत्येक मित्राला, पुण्याला आपल्या 'माणसात' जाण्याचे वेद लागले होते.
आता थोडं हायसं वाटू लागलं होतं. उद्या घरी जायचं. खरच, आम्ही पुन्हा घरी जाऊ कि नाही..? याची, सुद्धा शास्वती वाटत नव्हती.

त्या दिवशी दुपारपासूनच, तेथील स्थानिक नागरिक आम्हाला भेटायला येऊ लागले.
प्रत्येकाच्या चेहेर्यावर, एक " विस्मयकारक " आश्चर्य पसरलेलं दिसायचं. तेथील लोक गरीब जरी असले. तरी, आम्हाला भेटायला येताना. प्रत्येकाच्या हातात, किमान दोन चार सफरचंद तरी नक्कीच असायचेच. असाच, एक वृद्ध व्यक्ती माझ्यापाशी आला.
त्याने, माझ्या समोर एक सफरचंद धरलं. मी ते, माझ्या हातामध्ये घेतलं.
तो माझ्याकडे पाहून, फक्त होकारार्थी मान हलवत होता.
शेवटी, मीच त्याला विचारलं. जी.. क्या हो गया ?
तो म्हणाला,
कुछ नही बेटा, बडे नसिबवाले हो तुम. यहापर, इतने बडे हाद्सेमे कोई 'जिंदा' नही बचता.
एवढं बोलून, तो मनुष्य मला पहात पुढे निघून गेला.

खरच, आमचं नशीब थोर होतं. आम्हा पन्नास जनामध्ये फक्त चार जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. आणि, आम्ही दहा पंधरा जन गंभीर जखमी. बाकी, सर्व मित्र आश्चर्यकारक रित्या बचावले होते. खरच, तो एक प्रकारचा चमत्कारच असावा. असं, मला तरी वाटतंय.
अपघात स्थळी, धावपळीमध्ये काही मित्रांच्या ब्याग्स गहाळ झाल्या होत्या. तर, काहींचं ब्याग खोलून त्यातील सगळं सामान चोरीला गेलं होतं. आणि, ब्याग व्यवस्थित होत्या. त्यात, माझी सुद्धा एक ब्याग गहाळ झाली होती. त्यात, रोख रक्कम आणि खरेदी केलेल्या इतर सुद्धा, बर्याच वस्तू होत्या. मुख्य म्हणजे माझ्या मोबाईलचा चार्जर सुद्धा त्यातच होता.
आणि, तशा पद्धतीचा मोबाईल चार्जर तिथे कोणाकडेच नव्हता. त्यामुळे, मोबाईल बंद ठेऊन, बेटरी पुरवून पुरवून मला तो वापरावा लागत होता.

मृत्युमुखी पडलेल्या या चार मित्रांचे मृतदेह कुलूहून चंडीगडला पाठवण्यात आले होते. त्या सोबत, चार पाच मित्र सुद्धा गेले होते. मृतदेह पीएम करून शवपेट्यामध्ये व्यवस्थित ठेऊन, ते विमानाने मुंबईला पाठवून देण्यात आले. मुंबईवरून, रुग्नावाहीकेने त्या शवपेट्याना पुण्याला नेण्यात येणार होत्या. या अपघातामध्ये, गाडीचा ड्रायवर आणि क्लीनर सुद्धा आश्चर्यकारक रित्या बचावले होते. त्यांना सुद्धा, फार मार लागला नव्हता.
कारण, " अपघात हा काही ठरवून होत नसतो "
कारण, " अपघात हा काही ठरवून होत नसतो "
जाको राखे साईया, मार सके ना कोय. खूप खरे आहेत हे बोल..!
सकाळी पाच वाजताच.. मला जाग आली. मुखमार्जन करण्याचा प्रश्नच येत नव्हता. माझा पूर्ण चेहेरा सुजला होता. आणि कपाळावरील जखम सुद्धा, अगदी ताजी असल्यामुळे. मी फक्त, डोळ्यांना पाणी लावलं. आणि, चूळ भरली.
निघण्यासाठी अजून बराच अवधी होता. म्हणून, मी खाटेवर निपचित पडून राहिलो. रात्रीच, आमच्यापैकी दोन अत्यवस्थ मित्रांना चंडीगडच्या मोठ्या दवाखान्यात रवाना करण्यात आलं होतं. त्यामुळे, त्यांचा सुद्धा प्रश्न सुटला होता. तितक्यात आमच्या सरांचा आवाज आला.

चला, निघायचं आहे आपल्याला..!
मी बिछान्यावरून उठलो, पुन्हा एकदा सगळ्या मित्रांनी तेथील स्टाफचे आभार मानले. त्यांना, जमेल त्या पद्धतीने त्यांनी आमची सुश्रुषा केली होती. त्यांनी सुद्धा आम्हाला अलविदा केला. आणि, आम्ही तेथून निघालो.
सकाळी सात वाजता, आम्हाला एका मिनी बस मध्ये बसवून कुलूच्या विमान तळापर्यंत नेण्यात आलं. आमच्या दिमतीला, इंडियन एयर लाईन्सचं स्पेशल विमान, तेथे आमची वाट पाहत उभं होतं. खास आमच्याकरिता, कलकत्त्या वरून एक मोकळं विमान कुलू पर्यंतचं भाडं देऊन मागवण्यात आलं होतं. ते हि खास आमच्या करिता.
पुणे महापालिकेचे आभार मानावे तितके कमीच होते.

धन्यवाद, " पुणे महानगर पालिका "
हा माझा, आयुष्यातील पहिला वाहिलाच विमान प्रवास होता. यानंतर, मी बरेचदा विमानाने प्रवास केला. आणि, उभ्या आयुष्यात मला केंव्हाच वाटलं नव्हतं.
कि, अशा जखमी अवस्तेथ मला माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास करावा लागेल.
आयुष्यामधील पहिला विमान प्रवास. हा, नक्कीच आनंददाई असतो. पण माझ्या वाट्याला हा प्रवास अशा पद्धतीने आला होता.
वाईट वाटत होतं, आनंद सुद्धा वाटत होता, सगळे मित्र सोबत नाहीत याचं दुक्ख सुद्धा वाटत होतं. प्रवासाच्या गोड आठवणी डोळ्यासमोर तरळत होत्या. एकत्र मज्जा केलेले क्षण डोळ्यासमोर येत होते. तेच मित्र डोळ्यासमोर पिंगा घालत होते...
बस्स्स... खूप वेदना होत होत्या. पण सांगता कोणाला.?

ज्यांचं कोणीच राहिलं न्हवतं, त्यांनी.. कोणाला सांगायचं ?
ठीक आठ वाजता, आम्ही विमानात पाय ठेवला.
सर्व जखमी.. आणि, वेड्या वाकड्या अवस्थेमधील लोकांना पाहून एयर इंडियाच्या एयर होस्टेस सुद्धा अगदी घाबरून गेल्या होत्या.
थोड्याच वेळात.. विमान, हवेमध्ये झेपावलं. तो अनुभव, खूपच रोमांचकारी होता. गगन भरारी घेत असताना जग खूप छोटं वाटत होतं. सुंदर असे, नजारे पाहायला मिळत होते. अक्षरशः ढग सुद्धा आमच्या विमानाच्या खाली होते. इतक्या उंचावरून आम्ही प्रवास करीत होतो. कौतुक तर वाटणारच, कारण..माझा हा पहिलाच हवाई प्रवास होता नाही का...
नाही म्हणता, चार तासाच्या हवाई प्रवासानंतर ठीक बारा वाजता आम्ही लोहोगाव विमानतळावर "सुखरूप" येऊन पोहोचलो होतो.

विमानतळावर.. बरेच पुणेकर, आणि आप्तेष्ट आमची वाट पाहत उभे होते. आमच्या समोर त्यावेळचे तत्कालीन आयुक्त श्री. प्रवीणसिंग परदेशी साहेब पुणे शहराच्या तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले ताई आणि इतर मान्यवर उभे होते. मी त्यांना, मनापासून हात जोडले. आणि पुढे चालता झालो.
आम्हाला, बाहेरच्या कोणालाही भेटू न देता. थेट, रुग्नावाहीकेमध्ये बसवलं गेलं. आणि गाड्यांचा ताफा रुबी हॉल क्लिनिक मधेच, जाऊन थांबला..
मित्रहो, हा अपघात फारच भयंकर होता.
पण, "देव तारी त्याला कोण मारी." या उक्ती प्रमाणे, मी आश्चर्यकारक रित्या या अपघातातून सही सलामत बचावलो.
बहुतेक,
तुम्हा सर्वांची भेट होणं अजून बाकी होतं. हेच, त्यापाठीमागचं एकमेव कारण असावं, धन्यवाद..

क्रमशः

No comments:
Post a Comment