#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- ७ )
========================
काही, उनुत्तरीत प्रश्न..
*************************
२६ सप्टेंबर २००८ साली, हिमाचल प्रदेशमधील कुलू मनाली मधील..
कुलू या गावी, आमच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. गेल्या सहा भागात, तुम्ही ते सगळं काही वाचलं आहे. त्या बसमध्ये, माझ्या सोबत असणारे माझे चार सहकारी जागीच मृत्युमुखी पडले होते. आणि त्या अपघातातून, मी सुद्धा अगदी मरता-मरता वाचलो.
पण, मी वाचलो कसा ? ( वाचलो... याचा मला, नक्कीच आनंद आहे. )
परंतु.. हे कोडं, मला अजून उमगलेलं नाही. नाही म्हणता, ते प्रश्न काही माझा पिच्छा पुरवत नाहीत. पण, कधीतरी ते सुद्धा डोकं वर काढतात..!

त्याकरिता, हा सेपरेट लेखप्रपंच...
१) आमच्या बसला जेंव्हा अपघात झाला. तेंव्हा, मी बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यामुळे, अपघात नेमका का व कसा घडला ? याची मला इत्यंभूत माहिती होती.
१) आमच्या बसला जेंव्हा अपघात झाला. तेंव्हा, मी बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यामुळे, अपघात नेमका का व कसा घडला ? याची मला इत्यंभूत माहिती होती.
२) बस, अपघातग्रस्थ होत असताना. मी, लगेच समजून गेलो होतो. कि, ह्या अपघातातून आपण सहीसलामत वाचू शकत नाही. अनुभवाचे बोल.. कारण, मी सुद्धा एक ड्रायवर आहे.
तरी सुद्धा, त्या भीषण अपघातातून मी वाचलो. हे माझं सुदैव.
३) आमची बस, जेंव्हा दरीमध्ये कोसळली. तेंव्हा, मी स्वतःच्या बचावाकरिता कुठेही आजूबाजूला कोणत्या एंगलला वगैरे पकडण्याचा प्रयत्न केला नाही. ते का ?
ते, मला माहिती नाही. मी अक्षरशः, मृत्यूला सामोरा गेलो होतो.

४) बस दरीमध्ये कोसळत असताना. मी माझे, दोन्ही डोळे पूर्ण मिटून घेतले होते. आणि, अगदी शून्यात गेलो होतो. फक्त एक ते दोन वेळा, मला बसची आदळणारी धडधड जाणवली होती. याव्यतिरिक्त मला कोणत्याच घटनेची कल्पना नाही.
५) त्यानंतर, माझ्या मिटलेल्या डोळ्यासमोर एक गडद काळोख आला. आणि, त्या गडद काळोखामध्ये मला एक चमकदार बिंदू दिसत होता. आणि मी, त्या बिंदूच्या मागे खेचला जात होतो. जसा काही, मी त्याचा अंधाऱ्या हवाई मार्गे पिच्छा करत असावा..
६) त्यानंतर, अचानक त्या बिंदूने त्याचा पुढे जाण्याचा वेग वाढवला. आणि, आम्हा दोघात कमालीचं अंतर पडलं.
७) हे घडत असताना, अचानक तो चमकदार बिंदू माझ्यापासून फार दूर निघून गेला. आणि मला दिसेनासा झाला. तेंव्हा इकडे, खाडकन माझे डोळे उघडले. मी जागा झालो, आणि.. आसपास पाहू लागलो. बसमध्ये, तर कोणीच नव्हतं. फक्त, मी एकटाच जखमी, आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत. बसच्या केबिनमध्ये 'पद्मासन' घातलेल्या स्थिती मध्ये होतो.
८) ती बस, साधारण दीडशे फुट खोल दरीमध्ये कोसळून दरीमधील एका झाडाला टेकून थांबली होती. त्या बसला, रस्त्यापासून दरीमधील दीडशे फुटाच अंतर कापण्याकरिता साधारण अर्ध्या मिनिटाचा किंवा त्यापेक्षा कमी अवधी लागला असावा.
९) तर मग, माझे डोळे उघडले तेंव्हा. त्या बस मध्ये कोणीच कसं नव्हतं..?
अर्ध्या एक मिनिटाच्या अवधीमध्ये, सगळी पन्नासच्या पन्नास लोकं त्या बसच्या बाहेर कशी पडली असतील..?
कि... मी, त्या बसमध्ये बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. ?
जर मी, बेशुद्ध होतो..
अर्ध्या एक मिनिटाच्या अवधीमध्ये, सगळी पन्नासच्या पन्नास लोकं त्या बसच्या बाहेर कशी पडली असतील..?
कि... मी, त्या बसमध्ये बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. ?
जर मी, बेशुद्ध होतो..
तर,
तो तेजस्वी बिंदू मला कुठे घेऊन चालला होता.. ?
मी स्वप्न पाहत होतो का ?
कि मी, खरोखर कुठे तरी जाऊन परत आलो होतो ?
आणि, अचानक त्या तेजस्वी बिंदूने माझी साथ का सोडली. ?
मी स्वप्न पाहत होतो का ?
कि मी, खरोखर कुठे तरी जाऊन परत आलो होतो ?
आणि, अचानक त्या तेजस्वी बिंदूने माझी साथ का सोडली. ?
१०) अपघातामध्ये माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. माझं पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं. शरीरातून बरच रक्त वाहिलं होतं. तशा अवस्थेत सुद्धा, मी तो दीडशे फुटाचा दरी घाट कोणाच्याही मदतीशिवाय चढून वर आलो होतो. तेंव्हा, माझ्या अंगात एवढी शक्ती कोठून आली असेल..?
११) अपघातातील जखमी लोकांना मदत करणं शक्यतो बरेच जन टाळत असतात. पण तशा रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत नव्या कोऱ्या कारमध्ये मला घेऊन जाणारे ते दांपत्य कोण होते..?
त्यांनी मला, इस्पितळात नेऊन पोहोचवलं. आणि, ते तेथून निघून गेले.
आम्हाला, तिथे कोणी आणून सोडलं हे खुद्द तेथील डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हतं.
तर मग, ते दोघे उभयता कोण होते.? आणि, ते डॉक्टरांना न भेटताच तेथून गुपचूप कसे काय निघून गेले..? किंवा तिथे, त्या ठिकाणाहून.. त्यांना जाताना कोणीच कसं पाहिलं नाही..?

खरं तर हा... " श्रद्धा आणि अंधश्रद्धा " असा विषय आहे.
पण त्यावेळी जे काही घडलं, ते चांगल्या साठीच. असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे,
२६ सप्टेंबर हा दिवस, मी माझा " पुनर्जन्म " दिवस म्हणून साजरा करत असतो..!
२६ सप्टेंबर हा दिवस, मी माझा " पुनर्जन्म " दिवस म्हणून साजरा करत असतो..!
समाप्त,

No comments:
Post a Comment