Tuesday, 10 October 2017


ऑस्ट्रेलिया मध्ये राहत असणारा माझा एक मित्र, हल्लीच पुन्हा एकदा पुण्यामध्ये स्थलांतरीत झाला आहे. एकदा त्याच्याशी वार्तालाप करत असताना, तो मला म्हणाला..
इथली लोकं अजून आहे तशीच आहेत हो. फक्त विदेशी लोकांचं अनुकरण करत आहेत. पण त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध पैलूंचं आचरण मात्र कोणीच करत नाहीयेत..
विदेशी अनुकरण करून, त्यांनी आपलं राहणीमान नक्कीच उंचावलं आहे. पण, आपली संस्कृती ते साफ विसरून गेले आहेत. असं मला तरी दिसतंय.
आणि म्हणाला.. ऑस्ट्रेलियामध्ये, जवळपास नव्वद टक्के व्यक्ती या नित्यनेमाने प्राणायम आणि योगसाधना करत असतात. खरं पाहायला गेलं तर. आपली संस्कृती ती लोकं जपत आहेत. कारण.. त्यांना त्याचे फायदे माहित पडले आहेत.
शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी, त्यांना या जाती धर्माचा कोणताच अडसर येत नाहीये. उलट, त्यामध्ये अजून नवीन काही करता येईल का. हे ती लोकं पाहत असतात. हे सगळं ऐकून, नाही म्हणता, मला आपली पडती बाजू लगेच समजून आली.
आपल्या.. ओमकारच्या जपामध्ये एवढी मोठी ताकत आहे, कि ती जगातल्या दुसऱ्या कोणत्याच मंत्रोच्चारात तशी ताकत नाहीये. हे तर, आता अगदी जगजाहीर झालं आहे.
आत्ताच मी एक विडियो पाहिला. ज्यामध्ये, विठ्ठल नामाचा जप केला असता. आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. असं त्यांनी सांगितलं.
तालबद्ध स्वरात विठ्ठल नामातील, हा "ठ्ठ " उच्चारताना आपल्या हृदयाकडील स्पंदन आपोआप वाढतात. आणि या नामोच्चाराणे, आपल्या हृदयाची कार्यक्षमता कमालीची वाढते.
हा विठ्ठल नामाचा जप, त्यांनी, त्यांच्याकडे असणाऱ्या काही रुग्णांकडून करून घेतला. आणि त्याचे त्यांना चांगले रिझल्ट मिळाले. सहजच म्हणून, मी सुद्धा हा नामोच्चार करून पाहिला. आणि त्याची दिव्य अनुभूती सुद्धा घेतली. तुम्ही सुद्धा एकदा करून तरी पाहा, तुम्हाला सुद्धा लगेच समजून येईल.
बघा ना.. पंढरीच्या वाऱ्या करणारी लोकं. खूप वयस्कर असतात. पण वारीमध्ये हृदयविकाराचा त्रास होऊन कोणी निधन पावत नाही. कारण त्या वारकऱ्यांच्या मुखात, सदैव विठ्ठल नामाचा जप चालू असतो. हा विषय सुद्धा त्यांनी तिथे आवर्जून मांडला.
आता तुम्ही सुद्धा, या हरिनामाचा जप सुरु करा. आणि, तंदुरुस्त राहा.

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल..!

No comments:

Post a Comment