नव्वदच्या सुमारास, मित्राच्या बहिणीच्या लग्नाला मी मुंबईला गेलो होतो. मुंबई मधील डोंगरी भागात ते लग्नं होतं, असं अंधुकसं आठवतंय. आम्ही आजच्याला पोहोचलो, आणि लग्न उद्या दुपारचं होतं. आज रात्री, मस्तपैकी नाशिक बाजा आणून एक जोरदार डान्सिंग काम झालं. तिखटाचं जेवण असल्याने, नाचकाम उरकल्यावर सगळे मित्र पोट फुगेपर्यंत जेवली. आणि रात्री सगळ्यांनी मस्त पैकी ताणून दिली.
सकाळी फ्रेश व्हावं म्हणून, तिथे समोरच असणाऱ्या एका हजामाच्या सलूनमध्ये गेलो. तर तिथे वाटेमध्ये, सुटाबुटात असणारा एक व्यक्ती. चक्क फुटपाथवर बसून रस्त्यावरील एका लोकल न्हाव्या कडून दाढी करून घेत असताना मला आढळला. हे सगळं पाहून मी फार अचंबित झालो. आणि माझ्या कामाकरिता, सलूनमध्ये निघून गेलो. आणि तिथे दाढी करून घेतली. दाढी झाल्यावर, तो न्हावी मला म्हणाला.

$ आफ्टर शेव्ह लगाऊ क्या..?
मी नको म्हणालो,
$ क्रीम लगाऊ क्या..?
मी नको म्हणालो,
$ पावडर लगावू क्या..?
मी नको म्हणालो..
कारण, या सगळ्या गोष्टी मी घरी किंवा आमच्या येथील दुकानात सुद्धा करत नसतो. तर तिथे तरी कशाला करा. हा त्यामागील एकमेव उद्देश होता. माझ्या दाढी कामाचे त्याने पन्नास रुपये घेतले.

शेजारच्या खुर्चीवर, माझा एक मित्र सुद्धा दाढी करायला बसला होता. त्याच्या न्हाव्याने सुद्धा त्याला, मला विचारले तेच प्रश्न विचारले. माझ्या मित्राने, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला होकार कळवला. कारण या सगळ्या गोष्टी तो नियमित करत असतो. आणि आमच्या पुणे भागात तर, त्यावेळी अगदी न विचारता न्हाव्या कडून हि सेवा पुरवली जात होती.
ती सुद्धा, फक्त वीस रुपयांमध्ये.
तर.. त्याच्या कामाचे न्हाव्याने ऐंशी रुपये घेतले. आम्ही त्याला असं का म्हणून विचारलं, तर म्हणाला..
ती सुद्धा, फक्त वीस रुपयांमध्ये.
तर.. त्याच्या कामाचे न्हाव्याने ऐंशी रुपये घेतले. आम्ही त्याला असं का म्हणून विचारलं, तर म्हणाला..
क्रीम, पावडर, आफ्टर शेव्हके.. दस-दस अलगसे होते है..!
आता यावर हुज्जत कुठे घालत बसता, असं म्हणून पैसे देऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. आणि जाताना सहजच, त्या पोत्यावर काम करणाऱ्या न्हाव्याला दाढीचे भाव विचारले.
तर.. तो म्हणाला,
तर.. तो म्हणाला,
क्रीम, पावडर, आफ्टर शेव्ह के साथ मिलाके.. बीस रुपय्या..!
दोन्ही दुकानातील न्हावी, युपी वालेच होते. फक्त ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते.
यावर मला लगेच समजून आलं, सुटाबुटात वावरणारा तो व्यक्ती. दाढी करायला इथे पोत्यावर का म्हणून बसला असेल..?
यावर मला लगेच समजून आलं, सुटाबुटात वावरणारा तो व्यक्ती. दाढी करायला इथे पोत्यावर का म्हणून बसला असेल..?
मुंबई मध्ये, या शान शौकीन प्रकारच्या सगळ्या गोष्टी भले महाग असतील. पण जेवण जरा स्वस्तच आहे बरं का. काय विशेषता असेल या विषयाची..? सांगा रे मुंबईकरांनो, तुमच्या इथे असणारे स्वस्त हॉटेल्स त्यांची ठिकाणं, आणि तिथे असणारे कमीतकमी भाव, आणि लाजवाब चव.
हॉटेल संबंधीच्या माहितीसाठी, महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या लोकांनी सुद्धा हातभार लावला तरी चालेल. तेथील जेवणाची खासियत, आणि लाजवाब चव आम्हाला सुद्धा कळूद्यात. या चविष्ट पोस्टवर सर्वांचं स्वागत आहे.
No comments:
Post a Comment