#कुलू_मनाली_२००८ ( भाग :- १ )
======================
======================
खालील फोटोमध्ये, ज्यांनी डोक्यावर पांढरा रुमाल घातला आहे.
हे आमच्या, पुणे महापालिकेचे अधिकारी श्री. अरुण खिलारी साहेब आहेत. पूर्वी सुद्धा होते, आणि आजही आहेत. म्हणजे.. आजच्या घडीला आमच्या पुणे मनपा मधील, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात ते वार्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
( विभागीय क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त ) त्यांच्या सोबतच, त्यावेळी त्या टीमचे सदस्य असणारे घरडे साहेब, कांबळे साहेब आणि आमच्या बसचा वाहन चालक सुद्धा दिसत आहे.

२००८ साली घडलेल्या अपघातात. आमच्यासोबत हे साहेब सुद्धा होते. आणि, नशीब बलवत्तर असल्यामुळे, त्यावेळी वरील सर्व अधिकारी आणि खुद्द वाहन चालक सुद्धा या अपघातातून सहीसलामत बचावले गेले.
पूर्वी म्हणजे, त्यावेळी.. आमचे साहेब, पुणे मनपा मध्ये कामगार कल्याण अधिकारी होते.
त्यामुळे अर्थातच, आमच्या कुलू मनाली कामगार प्रशिक्षण वर्गाचे ते सर्वेसर्वा आणि मुख्य संयोजक होते. अतिशय मनमिळाऊ आणि मितभाषी असे आमचे हे साहेब आहेत.
मी स्वतः तरी, आजवर यांना कधीही कोणाशी अरेतुरे, किंवा.. रागारागाने बोललेलं पाहिलं नाहीये. आणि, आज सुद्धा त्यांच्या स्वभावात काडीमात्र बदल घडलेला नाहीये. कारण, आज त्यांची पोस्ट जरी थोडी वाढली किंवा बदलली जरी असली. तरी सुद्धा,
आजही ते " कामगार " कल्याणच पाहत असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
कारण.. आजच्या घडीला, मी त्याच्या हाताखाली काम करत आहे. आणि, त्यामुळेच मी त्यांना अगदी चांगल्याप्रकारे ओळखतो.

तर.. त्या अपघात दरम्यान,
अपघात घडल्यावर.. आम्हा सर्व अपघातग्रस्त व्यक्तींना. कुलू येथील एका सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.
आणि, आमच्यासोबत असणाऱ्या मयत मित्रांना सुद्धा. तिथेच असणाऱ्या, शवागारात ठेवण्यात आलं होतं. पण ते, आम्हाला माहिती नव्हतं. कारण, अपघातात, नेमकं काय घडलं आहे, हे आम्हाला त्यावेळी कळूच दिलं गेलं नव्हतं.

त्यादिवशी.. साधारण, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आमचा अपघात झाला होता. आणि तासाभरातच, हि बातमी स्टार माझा चानलच्या माध्यमातून जगभर पोहोचली होती. नाही म्हणता, आम्हाला त्या सरकारी इस्पितळात दाखल केलं गेलं होतं. सरकारी इस्पितळ म्हणजे, शेवटी सरकारीच ना..!
तर आम्ही, तेथील स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तेथे कसेबसे दाखल झालो. आणि नेमकं, आमचे साहेब आणि मी वेगवेगळ्या बेडवर पण अगदी शेजारी-शेजारी तिथे एडमिट होतो.

मी स्वतः ड्रायव्हर असल्याने.. संपूर्ण प्रवासात, म्हणजे अपघात घडेपर्यंत मी ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसूनच संपूर्ण प्रवास केला होता. हे खुद्द, आमच्या या साहेबांना सुद्धा माहिती आहे.
त्यामुळे अर्थातच, त्या बसच्या ड्रायव्हर आणि क्लीनरशी माझी खासी ओळख झाली होती.

अपघात घडल्यानंतर, तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला..
सकाळी आठ वाजता, आम्हा अपघातग्रस्त व्यक्तींना पुण्याला घेऊन जाण्यासाठी आमच्या पुणे मनपाच्या अधिकारी वर्गाने, आणि त्याकाळी कार्यरत असणाऱ्या प्रवीणसिंह परेदशी नामक आयुक्तांच्या आदेशानुसार.
स्पेशल, एक चार्टर्ड विमान आमच्या दिमितीला खास कोलकाता ते कुल पर्यंत मोकळं मागवलं होतं. आणि तिथून पुढे आम्हाला घेऊन ते विमान पुण्याला येणार होतं. आणि.. हा सगळा खर्च आमच्या पालिकने खास, आम्हा कर्मचारी वर्गासाठी केला होता. जास्तीचं सांगत नाही, यातच सर्व काही आलं. पुणे मनपाच्या या दिव्य कामगिरीसाठी मी स्वतः तरी, त्यांचा अत्यंत आभारी आहे.

तर.. सत्तावीस तारखेच्या रात्री आठ वाजता. आमच्यासोबत त्या अपघातातून बचावेलेले, ड्रायव्हर आणि क्लीनर माझा शोध घेत-घेत मी एडमिट असणाऱ्या वार्ड पर्यंत आले.
ते.. खास कारण म्हणजे,
कारण.. ते दोघे सुद्धा, या अपघातातून सहीसलामत बचावले होते. नाही म्हणता त्यांना सुद्धा दुखापत झाली होती. पण त्यांचा जीव वाचला होता.
आणि, आम्ही उद्या पुण्याला जाणार आहोत. हे सुद्धा, त्यांना समजलं होतं. आणि, त्यांना सुद्धा उद्या इस्पितळातून घरी सोडण्यात येणार होतं.
त्यामुळे, उभ्या जन्मात, आम्ही पुन्हा कधी भेटू किंवा नाही. असं समजून, ते खास मला भेटायला आले होते. ते दोघेही माझ्यासमोर आले. आणि ते, माझ्यासमोर हात जोडून उभे होते,

आणि.. त्या भेटीदरम्यान, तो सरदार ( पंजाबी ) ड्रायव्हर मला म्हणाला..!
सॉरी पाई, ( पंजाबी उच्चार भाई ) मुझसे बहोत बडी भूल हो गयी. हो सके तो मुझे मार कर दो.
त्यावेळी.. मी तर अगदी अत्यवस्थ होतो. कारण.. माझ्या पाच बरगड्या, डावा खांदा, दोन्ही गुडघे फ्रॅक्चर झाले होते.आणि डोक्यावरील ती जीवघेणी जखम मला काहीच सुचू देत नव्हती.
आणि, ह्या सगळ्या व्याधी आजही माझ्यासोबत आहेत. त्यावेळी, मला भेटून झाल्यावर..
माझ्या शेजारच्या खाटेवर असणाऱ्या आमच्या साहेबंना सुद्धा हे दोघे हात जोडून विचारपूस करत त्याची माफी मागत होते.
कारण त्यावेळी, आमच्या साहेबांच्या कंबरेला आणि पाठीला जबरी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती. ते सुद्धा अगदी भयंकर जायबंदी झाले होते. आणि सोबतच, इतर विचारांनी सुद्धा ते खूप त्रस्त होते.
शेवटी, जबाबदारी नावाची गोष्ट. अधिकारी वर्गाला कायम चिटकून असतेच. आणि, ते सुद्धा त्याला आपलं कर्तव्य मानतात. हा खरोखर त्यांच्या मनाचा मोठेपणा मानला गेला पाहिजे.
पण त्यावेळी.. आमचे साहेब खूप रागात होते. कारण, ट्रीपला असणाऱ्या सगळ्या कर्मचारी लोकांची जाबाबदारी त्यांच्यावर होती. आणि नेमकं काय घडलं आहे ते आम्हाला जरी माहित नसलं, तरी ते सगळं काही साहेबांना माहिती होतं.

आणि शेवटी..कधी नाही ते, शेवटी त्यांचा राग उफाळून आलाच..
आणि रागाच्या भरात.. त्यांनी त्या ड्रायव्हरला, रागारागाने बरच आणि खूप काही बोलले.
साहजिक आहे.. काही ठिकाणी, व्यक्ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. कारण.. या साहेबांना तर, पूर्ण टीम हाताळायची होती. आणि, पुण्यात गेल्यावर एक जबाबदार अधिकारी म्हणून. सगळ्या प्रश्नांना तोंड सुद्धा द्यायचं होतं. पण काय आहे...
शेवटी.. अपघात काही ठरवून होत नाही. आणि ते स्वतः सुद्धा अपघातग्रस्त सुद्धा होते.
कदाचित त्यामुळेच, त्याला " अप " " घात " असं म्हंटल गेलं आहे. शेवटी, नियतीपुढे आपण सगळे अगदी हतबल आहोत. हे त्यावेळी, मला पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

क्रमशः

No comments:
Post a Comment