Sunday, 6 September 2015

नुसत्याच मारतेस मला तू थापा,
मी हि खुश असतो ऐकून त्या गप्पा.
गप्पांमध्ये हि असतो एक जिव्हाळा,
का देऊ जगाला मी वेगळाच निर्वाळा.
जखमा बऱ्या होण्याकरिता.
त्यांना सुद्धा चिघळवावं लागतं. त्यांची, खपली काढावी लागते. तेंव्हा कुठे, तो औषध रुपी लेप आपली कामगिरी चोख बजावतो.
नाहीतर,
चकचकीत आणि विनासायास लावलेला वज्रलेप,
हा फक्त...
निर्जीव मूर्त्यांची शोभा वाढवण्यासाठीच कामी येतो.
उमलनार्या त्या कळ्यांना,
मी तरी थांबऊ कसा..?
अंत आता समिप आला,
हे तयांना कळवु कसा..?
कोऱ्या कागदावर जेंव्हा,
छबी मला तव दिसली.
आरशा वरुनी माझा,
विश्वास उडाला आहे.
अवकाळी पावसाच्या, काय वेदना सांगू.
शेत सारं झोडपलं, आता भूक कुणाला मागू.
स्वतःला, मान आणि आदर द्यायला शिकलं पाहिजे. 
घरात आलेले पाहुणे, फक्त, एक-दोन दिवसाचेच असतात. 
आपल्याला, 
त्या घरामध्ये, अंनत काळाकरिता 'वास' करायचा असतो.
बाईने जाड असावं,
मात्र, 'अवजड' मुळीच असू नये,
पुरुषाने पीत असावं,
मात्र, 'पिताड' कधीच असू नये.