पुण्यातील ट्राफिक पोलीस, हा एक.. फार मोठा संशोधनाचा विषय आहे. कधी कधी त्यांचं मला फार कौतुक वाटतं. तर कधी त्यांचा राग सुद्धा येतो. आम्हा सरकारी ड्रायव्हर लोकांचा आणि त्यांचा नेहेमी छत्तीसचा आकडा असतो. मी सरकारी गाडीवर काम करत असताना. नियम तोडल्याने आजवर तीन ते चार वेळा मी दंड भरला आहे.
एकदा एका सिग्नलला, मी नियमाने झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबलो होतो. तर त्या सिग्नलवर असणारा पोलीस माझ्याकडे आला आणि म्हणाला. गाडी जरा पुढे घे, पाठीमागे फार मोठं जाम झालं आहे. मी म्हणालो.. नाही बाबा, तुमच्या सोयीसाठी मी काही नियम मोडणार नाही. एकतर आता समोर केमेरे सुद्धा लावले आहेत. विनाकारण मला त्रास व्हायचा.
तर म्हणाला, का...? मी म्हणालो, अहो तुमची लोकं आमची सरकारी गाडी असून सुद्धा. आमच्याकडून थोडी जरी चूक झाली कि आम्हाला दंड करतात. नको तशी दमदाटी आणि अरे तुरे करतात. मग आम्ही तरी, तुम्हाला का म्हणून सहकार्य करावं..?
तर म्हणाला.. लई शहाणा आहेस, गाडी पुढं घे..!
मी मात्र माझ्या भूमिकेवर बिलकुल ठाम होतो. त्या पोलिसाकडे न पाहताच. मी समोर सिग्नल सुटण्याची वाट पाहू लागलो. मी तिरक्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होतो. तो मनातल्या मनात मला शिव्या देत असावा. तितक्यात हिरवा दिवा लागला, आणि मी सुसाट वेगाने तेथून निघून गेलो. हि लोकं आम्हाला सुद्धा सोडत नाहीत. म्हणून मी त्याला असा त्रास दिला. नाहीतर माझा असा हेकेखोर स्वभाव नाही. आता खाली दिलेलं आणखीन एक भन्नाट उदाहरण पाहा.

मागे नोट बंदीच्या काळात, एकदा मी पोलीस दिसत नाहीये असं पाहून. नको तिथे यु टर्न घेतला. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागून येऊन पोलीस महाशयांनी मला गाडी बाजूला घ्यायला लावली. मी सुद्धा खूप वैतागलेलो आणि घाईत सुद्धा होतो. गाडी बाजूला घेऊन, मी गाडीच्या खाली उतरलो. आणि म्हणालो..
नमस्कार साहेब..!
त्या पोलिसाने मला प्रश्न विचारला..
इथे यु टर्न अलाउड नाहीये.. तुला माहित नाही का..कि पुण्यात नवीन आला आहेस..?
माझं त्या पोलिसाला पहिलं उत्तर होतं. साहेब, मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय. प्लीज तुम्ही मला आरे कारे करू नका. किमान समोरच्या व्यक्तीचं वय बघून तरी बोला..!
नंतर म्हणाला.. गाडी कोणाची आहे..? ( तो विनाकारण वाकड्यात शिरत होता. )
मी म्हणालो, गाडीवर मालकाचं नाव आणि पत्ता लिहिला आहे..!
तो... गाडीवरील नाव वाचत, पुणे महानगरपालिका. बघू, लायसन बघू..?
मी खिशातलं लायसन काढून त्यांना दाखवलं.
लायसन पाहून झाल्यावर तो पोलीस म्हणाला.. दोनशे रुपये दंड भरा..!

तुम्हाला खरोखर सांगतो.. नोट बंदी असल्याने, त्यादिवशी माझ्या खिशात बिलकुल पैसे नव्हते. मी माझ्याकडे असणारं डेबिट कार्ड त्याच्यासमोर धरलं आणि म्हणालो. पैसे नाहीयेत माझ्याकडे, या कार्डमधून तुम्हाला जमेल तसे पैसे कापून घ्या. ( त्यावेळी पोलिसांकडे, पैसे कापून घेण्यासाठी डेबिट मशीन आल्या नव्हत्या. )
यावर तो पोलीस माझ्यावर चिडला नाही, पण म्हणाला.. सरकारी गाडी चालवतो. तुझ्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत. तर, निदान माफी तरी माग. मी सांगून सुद्धा त्याचं आरेकारे चालूच होतं.
मी म्हणालो.. नाही, माझ्याकडून चूक झाली आहे. आणि ती मला मान्य आहे. पण मी तुम्हाला त्यासाठी माफी वगैरे मागणार नाहीये. तुम्हाला पैसे कापून घेता येत नसतील. तर माझ्यावर खटला दाखल करा. मी कोर्टात जाऊन पैसे भरून येईल.
आता बाकी त्या पोलिसाचा पारा खूप चढला होता, आणि शेवटी रागारागात तो मला म्हणाला.

लई शहाणा दिसतोयेस, निघ आता हितून..!
तो मला पुन्हा अरेतुरे बोलला होता, पण यावेळी मी त्याला माफ केलं होतं. कारण मला सुद्धा घरी जायची घाई झाली होती. माझा राग मी मोकळा करून बसलो होतो. आणि पैशापरी माझे पैसे सुद्धा वाचले होते. त्यामुळे, नसता शहाणपणा न करता. मी, माझ्या गाडीला स्टार्टर मारला. आणि तडक आमच्या कोठीमध्ये निघून गेलो.
No comments:
Post a Comment