काल.. काही कामानिमित्त, मी बँकेत गेलो होतो.
माझ्यापुढे अजून पाच सहा नंबर होते, त्यामुळे मी सुद्धा त्या लाईनीत लोखंडी खुर्चीवर बसून घेतलं. आणि अचानक माझं समोर लक्ष गेलं..

ती बिचारी काही माझ्या ओळखीची नव्हती.. पण दिसायला, ती कमालीची सुंदर होती. खूप आखीव आणि रेखीव चेहेऱ्याची देणगी तिला प्राप्त झाली होती. पण तिच्या गोऱ्यापान चेहेऱ्यावर मला एकप्रकारची गूढ गंभीरता दिसून येत होती.
साधारण.. तीसच्या आसपास तिचं वय असावं, शेलाट्या बांध्याची ती कोवळी पोर, जीवाला घोर लाऊन तिच्या अंगावरचं बरचसं मास ती केंव्हाच गमावून बसली होती. हे तिला पाहताक्षणीच मला समजून आलं.
गोरा वर्ण, तारुण्यपिटिका रहीत निथळ चेहरा, क्लिपमध्ये हळुवार बांधून घेतलेला केशसंभार, चापून चोपून नेसेलेली अबोली रंगाची साडी, धीरगंभीर पण अगदी शून्यात असणारी तिची नजर.
पण तिच्या चेहेऱ्यावर मला खूपच तणाव दिसत होता. बहुतेक, ती कोणत्यातरी चिंतेने ग्रासली गेली असावी. हे तिच्या डोळ्या खाली असणारे काळे वर्तुळं मला सांगत होते.
मी विचारात बुडालो.. येवढ्या सुंदर विवाहित मुलीला नेमकं कसलं दुखः असेल..? ओळख ना पाळख, आपण तरी तिला कसं विचारणार. तितक्यात मागील लोकांनी मला आवाज दिला.

ओ भाऊ.. जागा मोकळी झाली, जरा पुढे सरका..!
मी त्या बसलेल्या लाईनीतून सरकतच पुढील खुर्चीवर गेलो. आणि काहीच क्षणात, मी वरील प्रसंग विसरून सुद्धा गेलो. माझा नंबर आला, खिडकीत जाऊन मी चेक भरला. आणि माझं बँक पुस्तक सुद्धा एंट्री करून घेतलं. माझं काम उरकलं होतं.. मी जिना उतरून खाली आलो. बाईकला किक मारली आणि घरी निघालो.
रस्त्यावर थोडी वर्दळ होती. त्यामुळे माझ्या बाईकचा वेग अगदीच जेमतेम होता.
आणि समोरच.. ती मगाशी बँकेत दिसलेली विवाहित मुलगी रस्त्यावरून पुढे जात असताना. पाठमोरी आणि ओझरती अशी मला दिसली. तिच्या मागोमाग, एक पाऊन मागे चालत. एक कृश मुलगा सुद्धा, अगदी तिला चिटकून चालत होता. तो तिच्या मागील बाजूस, हाताच्या कोपराला बोटांनी स्पर्श करून तिच्याशी काहीतरी बोलत होता. पण ती बिचारी, कर्णबधिर झाल्यासारखी अगदी निर्विकारपणे पुढे निघाली होती. ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. आपल्याच धुनकीत यंत्रवत अशी ती तशीच पुढे निघाली होती.
थोडासा पुढे होत, मी त्या दोघांच्या अगदी शेजारी आलो. आणि, त्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेलं एक निसटतं वाक्य, माझ्या कानाला शिवून गेलं.

फक्त, पन्नास दे ना..!
बहुतेक ती मुलगी, बँकेतून पैसे काढून आली असावी. पण त्या मुलीचं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. ती बिचारी न ऐकल्या सारखं करत पुढेच निघाली होती. आणि.. आता, पुढेच निघून जायचं आहे म्हणून. एकवार मागे वळून मी त्या मुलाकडे पाहिलं.
अरे बापरे.. तो माझ्या अगदी जवळच्या ओळखीतला मुलगा होता. चांगल्या खात्यापित्या घरचा, लाडात वाढलेला मुलगा. पण दारूच्या व्यसनाने त्याला पुरता पोखरून टाकला होता. दारू पिऊन त्याचा सुजलेला चेहेरा एका क्षणात मला सगळं काही सांगून गेला. आणि नकळत माझं मन, भूतकाळात गेलं.

एकेकाळी हाच मुलगा, दिवाळीत लाखो रुपयाचे फटाके वाजवायचा. खूप शौकीन, त्याचं लग्न सुद्धा अगदी धुमधडाक्यात झालं होतं. नकळतपणे, त्याच्या लग्नाची वरात सुद्धा माझ्या नजरेसमोरून तरळून गेली. आणि दहा वर्षांपूर्वीचा त्या गोबऱ्या आणि सुंदर नवऱ्या मुलीचा चेहेरा सुद्धा माझ्या स्मरणात आला. त्या लग्नाच्या वरातीती, या उभयतांना पाहून पुढे चालून मला आजचा हा वाईट प्रसंग पाहायला मिळेल, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. खरच, दारूचं अती व्यसन फारच वाईट.
काय पाहून एखाद्या मुलाला आपल्या पोटची मुलगी दिली जाते..? हा प्रश्न जर कोणाला विचारला गेला, तर याचं उत्तर काहीच नाही असं यायला हवंय..!
पण त्यावेळी, तिच्या घरच्यांनी त्यांचा वर्तमान पाहिलेला असतो. घरातील डामडौल पाहिलेला असतो. त्या मुलाचं उंची राहणीमान पाहिलेलं असतं. आणि समोर दिसणाऱ्या या एकाच आणि तितक्याच फसव्या विषयावर, आपल्या पोटचा गोळा त्यांच्या स्वाधीन केलेला असतो.

खरच राव.. मुलींचं नशीब फारच वाईट. नवरा चांगला मिळाला नाही. कि बिचारीला जन्मभर कुढत राहावं लागतं. लोकाचं लेकरू आपण घरात घेऊन येतो. त्यावेळी, तिला अगदी सुखात आणि आनंदात ठेवायची सर्व जबाबदारी आपली असते. ती फक्त आपल्याला पाहून, आपल्यावर एक अंधविश्वास ठेऊन, माहेरातील सर्वस्व सोडून सासरी निघून आलेली असते. का म्हणून तिला आपण, या हालापेष्टा भोगायला लावायच्या..?
तिने आपल्याशी लग्नं केलं, यात तिची काही चूक असते का..?

स्वतःच्या बायकोला असे दिवस वाईट दाखवणाऱ्याला, कोणीच आणि कधीच माफ करू शकणार नाही. अशी वागणूक देऊन, काही लोकं बायको नावाच्या स्त्रीचं जीवन अगदी नर्क करून टाकतात.
सगळी व्यसनं हि आपल्याठीच बनवली गेली आहेत. पण तुम्ही तिच्या इतकंही आहारी जाऊ नका. कि आपल्यावर विसंबून असणारं, एक परक्याचं गरीब लेकरू आपलं सर्वस्व गमावून बसेल. त्यामुळे, अशा घटना पाहिल्यावर कधीकधी तर मला असं सुद्धा वाटतं. कि,

मुलींसाठी, लग्न म्हणजे एक प्रकारचा " जुगारच " आहे..!
No comments:
Post a Comment