मध्यंतरी.. फेसबुक वरील, एक फारच भयंकर बातमी मला समजली.
एका मित्राचा मला फोन आला होता,
आणि तो.. खूप काकुळतीने मला ती गोष्ट सांगत होता.
म्हणे.. तरुण होतकरू मुलांना, प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढण्याचं एक फार मोठं दुष्टचक्र सध्या फेसबुकवर जोरात सुरु आहे. मला तर वाटतंय, अशा प्रकारचं एखादं कॉल सेंटर वगैरे तरी कोणी सुरु केलं नसावं ना..?
कारण हा मित्र सुद्धा त्या जाळ्यात अलगद अडकला गेला होता. आणि सुदैवाने, किंवा त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून, तो या मोहजालातून सुखरूप बाहेर पडला होता.

बापरे.. त्या मित्राच्या तोंडून हे सगळं ऐकून मी तर अगदी गारच पडलो. नेमकं काय घडत असेल..? हा विचार करत मी त्याला पुढे विचारणा केली.
शुद्ध सदाशिवपेठी भाषेत बोलणाऱ्या या मुलींनी, फेसबुक वरील कितीतरी मुलांना आपल्या गळाला लावलं आहे. त्यात, काही चाळीशी पार केलेली स्त्रीलंपट लोकं सुद्धा अडकली आहेत. आणि त्यातील काही लोकं तर, चक्क माझ्या ओळखीचे सुद्धा आहेत. हे ऐकून मी पुरता हवालदिल झालो.
त्या ज्या कोणी असतील, किंवा.. कदाचित एकच मुलगी असेल..!
त्या सुरवातीला फेसबुकवर तुम्हाला मित्र विनंती पाठवून तुमच्याशी घट्ट मैत्री करतात. त्यांच्या वालवर, त्यांचा स्वतःचा फोटो नसतो. आणि इतर सुद्धा कोणतीच खास ओळख किंवा माहिती नसते. थोडी ओळख झाली कि मग, त्या मुली हळूच.. संभाव्य सेलिब्रिटी सावजाच्या इनबॉक्स मध्ये घुसखोरी करतात. मुलांना वाटतं, मुलीच्या नावाने हा खोटा आयडी असेल. आणि एखादा मुलगा आपल्याशी फ्रॉड करत असेल. म्हणून त्यांना कोणी जास्तीचा भाव देत नसत. पण त्यांचं सारखं सारखं इनबॉक्स मध्ये आल्याने. शेवटी वैतागून माणूस म्हणतोच कि..

तुझा नंबर मिळेल का, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. तुझ्याशी बोलायचं आहे.
त्यावेळी, ती संभाव्य मुलगी त्या मुलाला बिनधास्त आपला मोबाईल नंबर देऊन मोकळी होते. शेवटी हा मुलगा तिला फोन करतो, आणि समोरची व्यक्ती मुलगी असल्याची खातरजमा करतो. आणि, इथून पुढे खरा खेळ सुरु होतो. पूर्वी चायना मोबाईल मध्ये आवाज बदलण्याची सुविधा होती. पण हा त्यातला प्रकार नाही.
ओळख पटल्या नंतर, रोजची फोनाफोनी सुरु होते. मोबाईलवरच एकेमेकांशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. आता.. त्या मुलाला फोन करायची आवश्यकता नसते. ती मुलगीच त्याला फोन करते, आणि हे फोन कॉल चक्क रात्र रात्रभर चालू असतात. फोन करून-करून त्या मुलाला मुलगी अगदी बेचैन करून सोडते. आपल्या प्रेमात त्याला पक्कं वेडं करून टाकते. घरातील दुखद घटना सांगून, त्याच्या हृदयात एक घट्ट स्थान निर्माण करते. पण यामध्ये अजून एक गोष्ट असते. आणि तिथेच खरी संशायची सुई वळवळते..
त्या मोबाईलवर, आपण फोन लावल्यास फोन लागत नाही..!
त्यामुळे, तिच्या मनाला वाटेल तेंव्हा ती आपल्याला फोन लावणार. आपल्याशी हव्या त्या विषयवार बोलत राहणार. त्यात सगळे विषय आले बरं का. आणि आपल्याला कायम त्याच धुनकीत ठेऊन आपलं अभ्यासावरून आणि करियर वरून मन उडवून टाकतात. त्या, समोरच्या व्यक्तीला अगदी वेडं करून टाकतात. आणि ते सावज सुद्धा तिच्या मधुर आवाजात इतकं गुरफटून जातं. कि दिवस रात्र फक्त तिच्या फोनचीच प्रतीक्षा करत झुरत बसतं.
आता झुरायचं तरी कुठवर..? म्हणून, शेवटी तो मुलगा तिला भेटण्याची गळ घालतो. तो फक्त तिचा मधुर आवाज ऐकून असतो. त्याने आद्यपी तिला पाहिलेलं देखील नसतं. आणि आता तर तिला भेटण्यासाठी तो फार बेचैन झालेला असतो. शेवटी या मुली, त्या मुलांना पुण्यात एका विशिष्ट ठिकाणी भेटायला बोलवतात. त्याला दिवसभर एखाद्या ठिकाणी ताटकळत ठेवतात. नंतर फोन करून, मला यायला जमणार नाही असं सांगतात. फोन कट होतो, ते पुन्हा न लागण्यासाठीच. शेवटी त्या मुलांना फारच मनस्ताप होतो, काय करावं ते सुचत नाही. तिच्याशिवाय करमत नाही. आणि तिझा सहवास काही मिळत नाही. अशा द्विधा अवस्थेत सापडलेल्या एका मित्राने वैतागून चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.
खरं तर..त्या संभाव्य मुलांनी, या विषयाची सायबर सेल कडे तक्रार नोंदवायला हवी होती. पण त्यांच्यापैकी कोणीच हे धाडस कोणीही केलं नाही. त्यांच्या मनात कोणती भीती होती. ते त्यांनाच ठाऊक. या विषयाच्या मी जास्ती खोलात गेलो नाही. कारण अशा फंदात मी स्वतः कधीही पडत नाही. पण तुमच्यापैकी कोणी, जर अशा भुलभुलैय्या जाळ्यात सापडला असेल. तर वेळीच सावध व्हा. हा.. करियर बरबाद करणारा " ब्लू व्हेल " सारखाच एक गेम आहे. हा प्रकार ज्या कोणी सुरु केला असेल. त्यामागे त्याचा नक्की काय हेतू असेल, ते मला सांगता येणार नाही. पण आज जे काही घडतंय. ते अतिशय क्रूर आहे. या आभासी माध्यमाचा कोणीही बळी ठरू नका. हे माध्यम जितकं चांगलं आहे. तितकच वाईट देखील आहे..!
No comments:
Post a Comment