फेसबुकवर प्रेम जुळून येणं, आता फार सोपं झालंय.
फेसबुक वरील पाच सहा वर्षाच्या सहवासात, इथे जुळून आलेल्या तीन मित्र मैत्रिणींच्या प्रेमविवाहांना मी जातीने हजेरी लावली आहे. आणि, आजही ते सगळे मित्र अगदी गुण्यागोविंदाने संसार करत आहेत.
फेसबुक वरील पाच सहा वर्षाच्या सहवासात, इथे जुळून आलेल्या तीन मित्र मैत्रिणींच्या प्रेमविवाहांना मी जातीने हजेरी लावली आहे. आणि, आजही ते सगळे मित्र अगदी गुण्यागोविंदाने संसार करत आहेत.
प्रेम काही ठरवून होत नसतं. दोन मनं एकत्र जुळून आली. कि कधी एकदा त्या नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. ते कोणालाही सांगता येत नाही. या आभासी म्हणवणाऱ्या माध्यमात, कित्तेक चांगल्या गोष्टी सुद्धा नकळत घडून जात असतात.
नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशा येथील वावराला सुद्धा दोन बाजू आहेत. वरील चांगली बाजू आजवर सर्वांनी पाहिली असेल. पण याच विषयाची दुसरी काळी बाजू सुद्धा फार भयानक आहे.
नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशा येथील वावराला सुद्धा दोन बाजू आहेत. वरील चांगली बाजू आजवर सर्वांनी पाहिली असेल. पण याच विषयाची दुसरी काळी बाजू सुद्धा फार भयानक आहे.
या माध्यमात ओळखी होऊन, कित्तेक मुलांनी मुलींशी प्रेम करून त्यांना लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्याशी फिझीकल रिलेशन ठेऊन. नंतर, त्यांची फसवणूक केली आहे. त्यातील काही गरीब स्वभावाच्या पिडीत मुलींनी, आपल्या अब्रूचा पंचनामा होऊन नये म्हणून, तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करत. घडलेलं ते प्रकरण जागेवर विसरून जाऊन. आपल्या आई वडिलांनी ठरवलेल्या ठिकाणी, त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करून, आज त्या सुखी संसाराच्या मार्गी लागल्या आहेत.
तर काही अतिहुशार मुली, अगदी ठरवून, एखाद्या सुंदर आणि मालदार मुलाशी ओळख वाढवून. काही काळानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात घडवून. प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेत. त्या मुलाशी, स्वसंमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करून. काही काळानंतर, त्याला काही कामासाठी पैशाची मागणी करू लागतात. हि मागणी सुद्धा काही थोडीथोडकी नसते. अगदी चार पाच लाखांच्या घरात पैशांची मागणी केलेली असते. संबंधित मुलाने, पैसे देण्यास नकार दिल्यावर. त्या मुलाला सरळ धमकावून टाकतात.
कि.. तू जर मला पैसे दिले नाहीस, तर मी तुझ्या विरुद्ध रेप केस दाखल करणार आहे..!
वरील सगळं काही, एकमेकांच्या संमतीने जरी घडलं असेल. तरीही हा ससेमिरा तुमच्या पाठीमागे लागू शकतो. रेप केस म्हंटलं कि, भल्या भल्यांची पाचावर धारण बसते. हा विषय म्हणावा इतका सोपा नसतो. कारण भारतातील बरेच कायदे हे महिलांच्या बाजूने झुकलेले आहेत. आणि व्यक्ती एकदा का त्या रेप केसमध्ये फसला, कि त्यांचं आयुष्य बरबाद झालंच म्हणून समजा. त्यामुळे इथे वावरत असताना, तुम्हाला प्रेम अगदी स्वस्तात मिळून जाईल. पण चुकून ते प्रेम फसवं निघालं. तर मात्र तुमचं काही खरं नाही.
म्हणून.. इथे वावरत असताना, कोणावरही अंध विश्वास ठेऊ नका. इथे तुम्हाला जेवढी चांगली लोकं भेटतील. त्यापेक्षा कित्तेक पटीने वाईट लोकं सुद्धा तुम्हाला इथेच मिळून जातील. हल्लीच माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीला, या विषयाचा सामना करावा लागला आहे. नशीब बलवत्तर होतं म्हणून, तो मित्र यातून सहीसलामत बाहेर पडला. नाही म्हणता, त्याला सुद्धा या प्रकरणात तब्बल चार पाच लाखाची फोडणी बसली. पुन्हा एकदा सर्वांना सावध करतो.
या जगात फुकट काहीच मिळत नसतं. आत्ता फुकट मिळत असणाऱ्या तत्सम विषयाची, भविष्यात तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल..!
No comments:
Post a Comment