मध्यंतरी मी एक पोस्ट केली होती. कि आजवर या फुलाची भाजी मला खायला मिळाली नाहीये. त्यानंतर बऱ्याच मित्रांनी मला त्याबाबत विविध सूचना केल्या. हि फुलं कुठे मिळतील किंवा काय, याबाबत मला खूप सारी माहिती मिळाली होती. पण कामाच्या व्यापातून, ती फुलं मला शोधता आली नाही. किंवा मी टाळाटाळ केली असं म्हणा.
पण.. माझ्या काही मित्रांच्या हे पक्कं लक्षात होतं. आणि पंडितजींना आपण हि हादग्याची फुलं घरपोच पोहोचावूया असा काही मित्रांनी मनामध्ये चंगच बांधला होता.
पण.. माझ्या काही मित्रांच्या हे पक्कं लक्षात होतं. आणि पंडितजींना आपण हि हादग्याची फुलं घरपोच पोहोचावूया असा काही मित्रांनी मनामध्ये चंगच बांधला होता.
गेल्या महिन्यात, सकाळी दहाच्या सुमारास अहमदनगर येथे राहत असणारे माझे फेसबुक मित्र, श्री. Vivek Shinde यांनी मला एक मेसेज आणि त्यासोबत त्या फुलांचा एक फोटो मला पाठवला. पंडित भाऊ.. तुमच्यासाठी हि हादग्याची फुलं मी विकत घेतली आहेत. मला तर काही पुण्यात यायला जमणार नाही. पण आत्ता मी नगरच्या एसटी स्थानकापाशी आलो आहे. तिथे कोणाशी तरी ओळख काढून हि फुलं मी तुम्हाला पुण्याला पोहोचवतो.
काय प्रेमळ मित्र मिळालेत मला या माध्यमामुळे. पण काही कारणास्तव, त्यांना ती फुलं माझ्यापर्यंत पाठवता आली नाहीत. पण आठवणीने माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास, नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
काय प्रेमळ मित्र मिळालेत मला या माध्यमामुळे. पण काही कारणास्तव, त्यांना ती फुलं माझ्यापर्यंत पाठवता आली नाहीत. पण आठवणीने माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास, नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
त्यानंतर.. जळगाव येथे राहत असणारे माझे आणखीन एक फेसबुक मित्र. श्री. Vishal Kakane यांनी सुद्धा माझी पोस्ट वाचून ती फुलं घेऊन ठेवली होती. ते सुद्धा मला म्हणाले, भाऊ फुलं घेऊन ठेवली आहेत. आज रात्रीच्या लग्झरी बसने ती फुलं मी पुण्यात पाठवून देतो. तुम्ही ती कलेक्ट करा. पण मी विचार केला. चोवीस तासाचा खंड पडल्यावर, पुण्यात येई पर्यंत ती फुलं कोमेजून जातील. आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरेल. त्यामुळे, या मित्राला सुद्धा मी सांगितलं. कि तुम्ही जास्तीचा त्रास करून घेऊ नका. इथे येई पर्यंत, ती फुलं खराब होतील. ना मला ना तुला. अशातला प्रकार होईल. त्यामुळे या मित्राचे मनपूर्वक आभार मानत तो विषय मी तिथेच संपवला. काही मित्र, खूपच प्रेम करतात राव माझ्यावर.
त्यानंतर.. काल सकाळी, माझ्या आणखीन एक फेसबुक मित्राचा मेसेज आला. त्यांचं नाव आहे, Atul Parkhe भाऊ, तुमच्यासाठी गावावरून मी हादग्याची फुलं आणली आहेत. माझ्या दुकानावर येऊन घेऊन जावा. आता काय बोलावं या मित्र प्रेमाला. हे मित्र माझ्या घरापासून अगदी जवळच राहायला असल्याने. माझ्या मुलाला मी त्यांच्या दुकानात पाठवलं. आणि ती फुलं काल माझ्या घरी आली. अनायसे आज एकादशीच आहे, आता आज या फुलांचा समाचार घेतो. मस्त भजी खाऊन तृप्त होतो.
सांगा ना.. या माध्यमाने मला अजून काय द्यायला हवं आहे..?
अगदी भरून पावलो मी, मित्रांचं प्रेम आणि त्यांची माझ्याबद्धल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या आस्थेला मी मनपूर्वक सलाम करतो.
लव यु फ्रेंड्स..!!



No comments:
Post a Comment