गरिबी फार वाईट हो.. त्यावेळी, रोजीरोटीच्या कामासाठी टाटाची कान्वायची गाडी मिळाली नाही. कि मी, बाहेर कोणत्याही आणि कोणाच्याही गाडीवर दोनशे पन्नास रुपये रोजाने बदली कामगार म्हणून कामाला जायचो. आणि ते सुद्धा, मिळेल तितके दिवस जायचो, घराबाहेर राहायचो. ते सुद्धा कोणतीही कुरबुर न करता. खरं तर, त्यावेळी मला झक मारत कामाला जायला लागायचं. कारण, त्यावेळी, दोन जीवांची जबाबदारी माझ्यावर पडली होती. एकतर माझं नवीनच लग्न झालं होतं, आणि वर्षभरातच आमच्या घरात पाळणा हलला होता.
पण.. त्या गोड गोष्टीचं कोणतच कौतुक करत न बसता, मोटार सारथी होत, मला या गावातून त्या गावात भटकंती कारवीच लागायची. क्या करे, पापी पेट का जो सवाल था..!

एकदा मला, एका मित्राची टाटाची नवीन सुमो घेऊन गोव्याला जाण्याची संधी मिळाली.
मनात ठरवलं.. कामाच्या निमित्ताने फिरणं सुद्धा होईल, आणि त्याच निमित्ताने आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुद्धा सुटेल. या निमित्ताने, या क्षेत्रात नवखा असून सुद्धा कोणतीही भीड न ठेवता मी गोव्याला गेलोच.
माझ्यासोबत गोवा फिरायला आलेले प्रवासी सुद्धा अगदी नवखे होते. ते सुद्धा प्रथमच गोव्याला निघाले होते. सावंतवाडी सोडली, महाराष्ट्र संपला आणि मी गोव्यात जाऊन पोहोचलो. अगदी नवखा असल्याने, गोव्यातील रस्ते किंवा तिथले नियम अथवा सिग्नल काही मला माहिती नव्हते. मी रस्ता दिसेल तशी माझी गाडी हाकत पुढे निघालो होतो. माझ्या सोबत असणाऱ्या लोकांना मी गाईड घ्या म्हणून सांगितलं. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. खूपच चेंगट लोकं होते साले..!
आणि, नेमकं एका गर्दीच्या ठिकाणी मला गोव्यातील पोलिसाने अडवलं. सुरवातीला, तो पोलीस माझ्याशी इंग्रजीत बोलला. मी त्याला, मराठी किंवा हिंदीत सांगा असं म्हणालो. तेंव्हा तो पोलीस मला म्हणाला,
कुठे जायचं आहे तुला..?
मी म्हणालो.. मला कळंगुट बीचवर जायचं आहे..!
त्यावर त्या पोलिसाने, इथून नो एन्ट्री आहे असं सांगितलं. आणि सोबतच, त्याठिकाणी जायचा रस्ता कसा आहे. ते सुद्धा व्यवस्थितपणे मला समजावून सांगितलं.

सुरवातीला ज्यावेळी त्या पोलिसाने मला थांबवलं. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, कि आता हा पोलीस आपली सगळी चौकशी करणार. गाडीचे कागदपत्रे बघणार, माझं लायसन तपासणार. आणि हे सगळं करून झाल्यावर एक तर दंड तरी फाडणार. नाहीतर " खावडी " तरी करणार. पण मी जो काही विचार केला होता, त्यापैकी काहीएक घडलं नव्हतं. त्यावेळी तो पोलीस माझ्याशी एवढा सौजन्याने का वागला, कि सांगता सोय नाही.
" पोलीस सुद्धा देव माणूस असतो. "
हे मला.. चक्क वारुणीच्या ( दारूच्या ) गावात गेल्यावर समजावं, हे सुद्धा माझ्यासाठी एक फार मोठं कुतूहल होतं. पण हे सगळं का घडलं असावं..? ते मला त्यावेळी समजलं नाही.
पण काही वर्षानंतर, मला या गोष्टीचा उलघडा झाला.
कि.. गोव्यातील पोलीस, टुरिस्ट लोकांना किंवा त्यांच्या ड्रायव्हर लोकांना जास्तीचा किंवा कोणताही त्रास देत नाहीत. कारण, त्या राज्याची सगळी अर्थव्यवस्था हि टुरिस्ट लोकांवर अवलंबून असते. ते काहीही असो, पण गोव्यात बाकी पोलीस लोकांकडून, त्यावेळी.. किंवा त्यानंतरच्या काळात सुद्धा मला कधीही आणि कसलाही त्रास झाला नाही.

त्यानंतर.. मी एकदा केरळला गेलो असता. तिथे सुद्धा, चुकून माझ्याकडून एक सिग्नल जंप झाला. त्यावेळी.. तिथे हजर असणाऱ्या त्या पोलिसाने, अगदी सौजन्याने मला गाडी बाजूला घ्यायला लावली. माझ्या गाडीचे सगळे कागदपत्रे आणि माझं लायसन तपासलं. माझी चूक अगदी छोटी होती, त्यामुळे मला वाटलं. हा माझ्याकडून पाच पन्नास रुपये घेऊन मला सोडून देईल.
पण तिथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे.. बोली भाषेचा प्रश्न. त्या पोलिसाला खूपच तोडकी मोडकी हिंदी भाषा येत होती. तो मला म्हणाला,

हंड्रेड रुपीस फाईन.. लेकीन छोड देता. फिर नही,
( शंभर रुपये दंड झाला आहे. पण आज मी तुला सोडून देतोय. पुन्हा अशी चूक करू नकोस. )

आणि म्हणाला.. जा, त्या दुकानातून दोन पाण्याच्या बाटल्या घेऊन ये.
लाच घ्यायची नाही. म्हणून, दंड न करता माझ्याकडून त्याने फक्त पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या. कारण, कोणाला मोफत सोडून सुद्धा फायदा नाही. काहीतरी शिक्षा किंवा खर्च झालाच पाहिजे. म्हणजे, दुसऱ्या वेळी तो मनुष्य अशी चूक करणार नाही.
त्यावेळी बाकी, इतर मित्रांकडून सुद्धा केरळच्या बाबतीत मला थोड्याफार प्रमाणात असंच काहीसं ऐकायला मिळालं होतं. कि केरळमधील पोलीस, लाच म्हणून शक्यतो पैसे घेत नाहीत. फारफारतर पाच दहा पाण्याच्या बाटल्या मागवतील, पण पैसे नाहीच. हि साधारण नव्व्याण्णव सालातील घटना आहे. आता तिथे काय चालू असेल, ते मला सुद्धा सांगता येणार नाही.

आणखीन एक गोष्ट.. साऊथ मधील जंगली भागात, पोलिसी त्रास कमी आणि गुंड लोकांचा त्रास फार होता. त्यावेळी, अडमार्गी जंगल भागात, काही गुंड प्रवृत्तीची लोकं एक विशिष्ट थांबा बनवून. येणा जाणाऱ्या गाड्यांकडून टेक्स वसूल करायचे. त्या टेक्सला त्या भागात. " गुंडा टेक्स " असं संबोधलं जायचं. हे सगळं नेमकं कोणाच्या कृपा आशीर्वादाने चालायचं ते माहित नाही. पण अगदी राजरोसपणे चालायचं. एकदा तर, चक्क त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लाऊन सोबतच शिवसेनेचा बोर्ड सुद्धा लावला होता. शेवटी काय आहे, महाराष्ट्रातील माणूस हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आणि त्यांची संघटना पाहून. तो गुंडा टेक्स देऊन पुढे निघून जायचे. बघा ना, आमच्या साहेबांचा वचक किती मोठा होता. आणि त्यांच्या नावाने, लोक कुठेकुठे पोटं भरत होते..!
No comments:
Post a Comment