Saturday, 7 May 2016

लग्ना अगोदर " सगळ्या प्रकारचा " भरपूर एन्जॉय करणाऱ्या मुलांना. म्हणजे, ह्या एन्जॉय मध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत बरं का. लफडी, झपडी, टवाळक्या, विविध प्रकारची व्यसनं..
शहरातील मुली,मैत्रिणींसोबत फिरण्या धरण्याचा आनंद उपभोगत असतात. त्यामानाने ग्रामीण भागातील मुलींना फारशी मोकळीक नसते. ग्रामीण किंवा शहरी भागातील मुली, व्यसन म्हणून.. फार फारतर, मशेरी ( मिसरी ) लावत असतील. त्यापुढे काही नाही..
पण.. पोरं, तंबाखू पासून जे सुरुवात करतात. ते, संगती प्रमाणे.. पार, बाई बाटली पासून ते थेट गांजा गुटख्या पर्यंत येवून पोहोचतात. आणि, लग्नासाठी मुली बघायला गेल्यावर. ताबडतोब, " निर्व्यसनी " बनतात..
परंतु.. त्यांना सुद्धा, अगदी तशाच प्रकारच्या " डबल दुर्री " करणाऱ्या मुलीच मिळतात बरं का. नको म्हणता, कधी ऐकणार नाही. आरे ला कारे करणार..
आणि.. पर्यायी, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप, म्हणून.
सांच्याला.. भांडी घासताना ती मिसरी लावत असते. तर...जेवण झाल्यावर, हा तंबाखू मळत किंवा सिगरेट फुंकत बसलेला असतो.
त्याउलट..
साळसूद असणारी मुलं.. अशी मुलं सुद्धा असतात बरं का..!
यांना, नेमक्या " चाबर्या " मुली मिळतात. तशा तर, त्या.. खूपच साळसूद असतात.
पण.. " भेटलाय साधा भोळा, तर करा त्याचा गोळा..! "
हा.. अगदी अशातला प्रकार असतो.
त्या मुली, नवऱ्यावर लाख अत्याचार करतील. पण, त्याच्या दुप्पट त्याच्यावर प्रेम सुद्धा करत असतात. त्यामुळे, आपसूकच तो मुलगा उभ्या आयुष्यात कोणतं व्यसन सुद्धा करत नाही. आणि, कोणत्या बाईकडे ढुंकून सुद्धा बघत नाही.
ह्या एकाच बाईने, त्याचं पूर्ण वेड पळवून ठेवलेलं असतं..!

No comments:

Post a Comment