Saturday, 30 January 2016

महिलांना,
पुरुषांच्या बाबतीत..
चाँईस असतो, परंतु " हव्यास " मुळीच नसते.
आणि..
पुरुषांना,
स्त्रियांच्या बाबतीत..
प्रत्येक स्त्रि, ही त्यांच्या करीता " खासच " असते.

Friday, 29 January 2016

खऱ्याला मरण नाही...!
हा खूप जुना वाक्प्रचार आहे. आणि, तो सर्वमान्य सुद्धा आहे. पण न जाने का, ह्या जीवनाच्या जगरहाटी मध्ये. काही लोकं, खोटं बोलल्या शिवाय जगूच शकत नाही कि काय असं वाटून जातं.
एक खोटं बोललं.. कि, त्याला लपविण्यासाठी. आपल्याला, शंभरदा खोटं बोलावं लागतं. हा सुद्धा, फार जुना वाक्प्रचार आहे. आणि तो सुद्धा तितकाच खरा आहे. इतकं सगळं माहित असून सुद्धा, काही लोकं खोटं बोलणं बिलकुल टाळत नाहीत. नुसते मजल्यावर मजले चढवत असतात. पण मी म्हणतो, खोटं बोलून असं मिळतं तरी काय..? आणि, ते का..?

मित्रांनो, हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे बरं का.. त्यापाठीमागे, नेमकी काय आणि किती ठोस कारणं असू शकतील. ते मला माहित नाही. कारण,
मी स्वतः, कधीही खोटं बोलत नाही. कारण, एकतर खरं बोललेलं ध्यानात ठेवावं लागत नाही. हि फार मोठी जमेची बाजू असते. आणि, खोटं बोललेल्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास ठेवावा लागतो. ते फार अवघड काम आहे.
नाही म्हणता, कधी तरी मला सुद्धा खोटं बोलावं लागतं..कारण, खोटं बोलण्याचे सुद्धा बरेच प्रकार असतात.
उदा.. मी घरी असतो. आणि, माझ्या एखाद्या मित्राला फोनवर मी सांगतो. मी, आज घरी नाहीये. अजून कामावरच आहे. माझ्या या खोटं बोलण्यापाठीमागे, काहीतरी ठोस कारण असतं. असं मी मानतो. आणि ह्या खोटं बोलण्याने माझ्यावर फार मोठं संकट सुद्धा कोसळणार नसतं.
पण काही लोकं.. इतकं भयंकर खोटं बोलतात. कि आपण, त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
उदा.. काय सांगू, सांगायला एक नाही हजार गोष्टी असतात..
पण हे का..? खोटं बोलणं, हा विशिष्ट प्रकारचा आजार वगैरे आहे कि काय..?  
असं सुद्धा, मला कधी-कधी वाटून जातं. किंवा, आपण खोटं बोलतोय हे जनसामान्य जणांच्या ध्यानात आलं. आणि, आपलं बिंग फुटलं. तर, समाजात आपली काय पत राहू शकेल..? 
याचं सुद्धा भान त्या लोकांना होत नसेल का..? पुन्हा एकदा सांगतो.. 

" खऱ्याला मरण नसतं. "

तर मग, आपला बंगला नाही. निवाऱ्या करिता, एक झोपडं सुद्धा त्याहून कधीच कमी नसतं..!
हे सुद्धा, हातावरच्या रेषांइतकंच खरं आणि सफेद असतं..!

तु शिंकलीस तेंव्हा..
तुज, सर्दी झालीच नव्हती मुळी.
साद पोहोचवली होतीस.
त्या, सावळ्या कृष्णाला " गोकुळी "
प्रत्येक थेंबाचा आस्वाद मी घेतला आहे.
बाटली रिकामी तरी जीव तीत गुंतला आहे.
काय अजब मोहिनी घडवली त्या वारुनीने.
मस्त जवानी सुद्धा फिकी पाडली आहे तीने.
चांदने पाहण्यात, रात्र सारी सरली.
चंद्राची ही आता, दिशा कुठे ऊरली.
सोनेरी किरणांनी, नयनांवर केली स्वारी.
माझ्या अतृप्त प्रेमाची, रितच ही न्यारी.

Wednesday, 27 January 2016

माझा एक समवयस्क मित्र...
त्याकाळी, तो भारतीय सैन्यात दाखल झाला होता. त्यापाठीमागचं कारण एकच, सैन्यातील नोकरी म्हणजे बक्कळ पगार. आणि, त्याचबरोबर इतर सुद्धा बऱ्याच सुख सुविधा मिळतात. ( हे त्याचं मत )
मला चांगलं आठवतंय.. आमच्या गावातील एक सदगृहस्थ, मला त्यावेळी म्हणाले होते.
" अरे.. तुला पैसाच कमवायचा असेल. तर, सैन्यात भरती हो. तिथे गेल्यावर, आपल्याला काहीच खर्च नसतो. जेवण खाणं आणि राहणं सगळं तिकडेच अगदी मोफत होतं. आणि, आपला सगळा पैसा तसाच शिलकी पडतो..! "
नाही म्हणता.. मला सुद्धा, सैन्यात भरती होण्याची खूप हौस होती. पैश्याकरिता नाही, तर त्या तरुण वयात, माझ्या मनात एक वेगळच देश प्रेमाचं वारं दौडत होतं. आणि, त्या वेडापायी एकदा तर मी चक्क सैन्यात भरती होण्यासाठी सुद्धा गेलो होतो. पण, माझ्या दुर्दैवाने त्या ठिकाणी माझी 'उंची' मला आड आली..
भरती प्रक्रियेच्या सुरवातीलाच. भला मोठा तरुण जनसमुदाय पाहून..
त्यांनी, त्या मैदानात एक विशिष्ट उंचीची चौकट उभी केली. त्या चौकटीत जो अडकेल, त्यालाच पुढे चाल होती. आणि, दुर्दैवाने नेमका मी त्या चौकटीत अडकलो नाही. माझ्या सोबतच, मुलांनी भरलेलं निम्मं अर्धं मैदान सुद्धा अगदी जागीच रिकामं झालं होतं.
आणि.. त्यावेळी मला, सरळ घरचा रस्ता धरावा लागला होता. कोवळ्या वयात.. माझ्या सारख्या देशप्रेमी मुलाला तो आघात सहन होणारा नव्हता.
" पण.. ना इलाजापुढे काय इलाज..? "
असं म्हणून, पुन्हा फिरून मी कधीही त्या सैन्य भरतीला गेलो नाही.
तर.. तुम्हाला मी माझ्या मिलेट्री मध्ये असणाऱ्या मित्राबरोबर घडलेली एक रंजक कथा ऐकवतो. जो त्याकाळी, सैन्यात भरती झाला होता. आज, तो ही सैन्यातून सेवानिवृत्त म्हणून सुखविलासी जीवन व्यतीत करत आहे..
तर.. त्याकाळी, सैन्यात भरती झाल्यानंतर. त्यांना, रोजच्या परेड आणि सैनिकी विद्या शिकवणे चालू असायचं. जवळ-जवळ वर्षभर त्यांना ह्या हिकमती कराव्या लागल्या. पण, सैन्यात गेलोच आहे. तर, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. म्हणून, तो ते सर्व काही निमूटपणे सहन करत होता. पहाटे पाचला उठणे, स्विमिंग, रनिंग, परेड, आणि.. इतर बऱ्याच कसरती त्यांच्याकडून करून घेतल्या जात असत..
असे बरेच दिवस गेले. आणि, एक दिवशी..सकाळची परेड झाली. नाश्ता पाणी उरकल्यावर, सर्व जवानांना एका लाईनीत उभं केलं गेलं. आणि, त्याच्या कप्तानाने त्यांना आदेश दिला..
" जल्दीसे जाओ, और अपनी-अपनी तलवारे लेकर आओ...! "
तलवार हा शब्द ऐकताच, ह्याच्या अंगातले होते नव्हते तेवढे त्राणच नाहीसे झाले. त्याच्या मनात, नाना प्रकारचे विचार येऊ लागले...
आयला.. हे जर मला सुरवातीला माहिती असतं, कि सैन्यात समोरासमोर तलवारीने सुद्धा लढाई करावी लागत असते. तर, मी कशाला झक मारायला भरती झालो असतो राव. लांबून गोळ्या मारणं ठीक आहे हो. पण हे, तलवारीचं नाटक कोणी काढलं असावं..? जुन्या काळात, हे सगळं ठीक होतं. पण हे काय आता नवीनच..
असा विचार करता-करता, त्याच्या मनपटलावर.. रामायण, महाभारतातील तलवारीचं द्वंद्व युद्ध दिसू लागलं. हा याच्या युद्ध विचारात पूर्ण बुडून गेला होता.. तितक्यात. त्याला त्यांच्या कप्तानाचा आवाज आला.
" तुम क्यो खडे हो..? तुम्हे क्या अलगसे ऑर्डर देणा पडेगा क्या..? "
तेंव्हा कुठे, तो स्वप्नातून सत्यात आला. आणि, इतर जवानांच्या मागोमाग निघून गेला. त्याच्या मनाची काही तयारी होत नव्हती. परंतु तो बळेबळेच, त्या तलवारी ठेवलेल्या खोलीमध्ये गेला..
आणि.. " हसतमुखाने " एक तलवार हातात घेत, तो त्या रुमच्या बाहेर पडला..
कारण, ती तलवार म्हणजे...
गवत कापण्याचं, एक तलवारी सदृश्य अवजार होतं. आणि, आता त्यांना मैदानातील वाढलेलं गाजर गवत कापणी करिता निघायचं होतं..!
संक्रांतीच्या सुरवाती पासूनच...
सर्व महिला मंडळीला, आपापल्यापरीने घरामध्ये हळदीकुंकू समारंभ करायचे वेध लागलेले असतात.
पूर्वी.. माझं स्वतःचं घर नव्हतं. त्यामुळे, मी माझ्या सौ ला मी ह्या कार्यक्रमापासून नेहेमी वंचित ठेवत आलो होतो. पण, दैवकृपेने गत दोन वर्षापासून आमचं सुद्धा स्वतःचं घर झालं. आणि, तेंव्हापासून तिने सुद्धा ह्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला आमच्या घरात नव्याने सुरवात केली.

काय आहे.. फुकाचा मोठेपणा, ना मला आवडतो ना तिला. त्यामुळे, आमची स्वतःची वास्तू झाली. तेंव्हापासून, तिने हा घरगुती समारंभ सुरुवात केला.
काय आहे, " भाड्याचं घर आणि खाली कर..! "
त्यामुळे, तिने पूर्वी अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी टाळल्या होत्या..
तसं पाहायला गेलं तर, मला हा कार्यक्रम बिलकुल आवडतच नाही.. पण काय आहे, महिलांची दांड
गी हौस असते ना. त्यामुळे, मी ह्या सगळ्या गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असतो.

कारण.. ह्या महिला मंडळी, वाटायचं म्हणून हे 'वान' वाटत असतात, किंवा 'लुटत' असतात. त्यात प्रामुख्याने, प्लास्टिकच्या डबड्या-डूबड्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. आणि, ते मला बिलकुल आवडत नाही. कारण, त्या वस्तू काहीच कामाच्या नसतात हो. आणि. महागड्या वस्तू घ्यायला कोणाला परवडत सुद्धा नाही. नुसता.. " पैश्याचा कार आणि नवऱ्याच्या खिशाला भार..! " अगदी अशातला प्रकार असतो तो..
पण, माझी बायको माझ्यासारखीच लैच हुशार हो.. हिवाळ्याच्या सिझन पाहून, तिने समस्त महिलांकरिता. हे.. हिवाळ्यात अंगाला लावायचं "बॉडी लोशन" वान म्हणून लुटायला ( वाटायला ) आणलं आहे.
लुटावं तर असं काही तरी. ज्यामुळे, तमाम महिला सुद्धा खुश. आणि त्याचबरोबर, आमचे पुरुष मंडळी सुद्धा भरपूर खुश..
काय रे.. खरं आहे न माझ्या विवाहित मित्रांनो.. wink emoticon
पण.. तुम्हाला खरं सांगू का..
मला तर वाटतंय, हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला असायला हवा होता..!
त्यामुळे, किमान घरी येणाऱ्या महिलांना आपलं घर आपण किती नीटनेटकं ठेवतो. हे दिसावं, म्हणून.. सगळ्या महिला मंडळी अगदी झाडून कामाला लागलेल्या असतात.
ताई, माई, बाई.. मी जे म्हतोय, ते खरं आहे ना..!


तुम्हाला.. स्त्री आणि पुरुषातलं, खरं आणि निर्व्याज्य प्रेम पहायचं असेल.
तर, तुम्ही एकदा कोणासोबत तरी मिलेट्री केंटीन मध्ये अवश्य जाऊन या. माझ्या एका मित्राबरोबर, माझं त्याठिकाणी नेहेमी जाणं होत असतं. त्यावेळी, बऱ्याच मधुर सुमधुर घटना मला त्या ठिकाणी पाहायला आणि अनुभवायला मिळतात..!
रविवारचा दिवस, नवरा महिन्या भराच्या सुट्टीवर घरी आलेला असतो. आणि, नवीनच लग्न झालेली ती ललना त्याच्या सोबत त्या ठिकाणी खरेदीला आलेली असते.
बऱ्याच दिवसांनी, तिला नवऱ्याचा सहवास लाभलेला असतो. त्यामुळे, ती अगदी रोमांचित झालेली असते. न्हायलेल्या केसांचा दमटपणा अजूनही तसाच असतो. चेहेऱ्यावर चुकून राहिलेला पावडरचा एखादा फटकारा त्याची साक्ष देत असतो. एक विशिष्ट प्रकारची लाली तिच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत असते.
कधी नाही ते बिनधास्त होऊन, त्यांची मनमोकळी खरेदी चालू असते. आजूबाजूच्या गोंगाटाकडे त्यांचं बिलकुल लक्ष नसतं. इतके ते एकमेकात एकरूप झालेले असतात. बोलणं कमी आणि नजरेचे खेळच जास्ती प्रमाणात चालू असतात.
ती.. फेयर एन्ड लवली ची एक क्रीम घेते. आणि, आपल्या बास्केट मध्ये टाकते. त्यावर लाडिक हास्य करत, तो आणखीन एक तीच क्रीम त्या बास्केट मध्ये टाकतो.
ती प्रश्नांकित.. ती डोळ्यानेच खुणावते, दोन-दोन क्रीम काय करायच्यात..? त्यावर, त्याचं लाडीकपणे डोळूयानेच राहूदेत म्हणणं, मला खूप भावतं.
सगळी खरेदी आटोपल्यावर, त्याचं त्या वाईन स्टोअर कडे जाणं होतं. सोबत ती असतेच. वाईन विकत घेण्यापूर्वी, हा तिच्याकडे त्यासाठी परवानगीच्या नजरेने पाहत असतो. आणि, वाईन खरेदी करू नका..! असं म्हणून, ती लाडिक रुसलेली असते. आणि तो, नजरेनेचे तिला जिंकण्याचा, मनवण्याचा प्रयत्न करत असतो. तिचा मात्र फुकाचा नकार चालूच असतो. आणि हलकेच, तिच्या लाडिक नकाराचं प्रेमळ होकारात रुपांतर होतं. त्यावेळेस, त्याला अगदी हिमालय सर केल्याचा फील येतो..
वाह क्या कहेने.. हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला हवं हो. आणि त्याचसोबत, माझ्यासारखी पारखी नजर सुद्धा नक्कीच असायला हवी. तो नजाराच अगदी अप्रतिम असतो.
सीमेवर देशसेवा करणाऱ्या माझ्या फौजी बांधवासाठी हेच काय ते सुख असतं. आणि, त्या विरहिणी पत्नी साठी सुद्धा हि एक फार मोठी पर्वणीच असते.

Thursday, 21 January 2016

रेशमी धुक्यात, मज तुझी चाहुल.
तुझे छमछम, पावलावर पाऊल.
रोमांचीत अंग, थरथरले अधर.
ओठांशी ओठ, गारव्याचा कहर.

Tuesday, 19 January 2016

माझा एक मित्र..
त्याच्या विशीष्ट अशा ठेवनीतल्या बोलीभाषेत.
" वयस्कर "
ह्या शब्दाला, तो " वयस्खोर " असं म्हणायचा.
उदा :- एकदम 'वयस्खोर' माणुस होता त्यो.
संभाषन करतेवेळी..ज्या ज्या वेळी, त्याच्या मुखातुन वयस्खोर हा शब्द बाहेर पडायचा.
त्यावेळेस,
मला विनाकारणच..
तो...कोनाला तरी, " हरामखोर " म्हणतोय आसच वाटायचं.
मी " तिळगुळ " कधीच वाटत नसतो..
फक्त,
नवनविन व्हरायट्या " चाखत " असतो.
तिळगुळ द्या, गोग्गोड बोला...!
ज्या कोणत्या मुलींच्या, गोड गुलाबी " ओठावर " तिळ असेल..
त्यांना, संक्रांती मध्ये.. तरुण मुलांसमोर.
" तिळगुळ " घ्या, आणि गोड-गोड बोला.
असं म्हणायला, फार जिवावर येत असेल..
कारण..
आजकालची मुलं फारच डांबरट हो. ते, कोणत्या वाक्याचा कसा अर्थ काढतील..
त्याचा, नेम नाही बघा...!
कोमल काया सुंदर कांती,
नयनांतुन तव बाण बरसती.
घायाळ होन्या ना डगमगती,
तुझ्याच महाला सदा भ्रमंती.
गर्भश्रीमंत व्यक्ती..
" सोनं " परीधान करन्याचा मोह हमखास टाळतातच.
गोर-गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच,
जास्ती प्रमाणात " कावीळ " झालेली आढळते.
मी.. स्वतःला कधीही " वयोवृद्ध " समजणार नाही..
हेच,
माझ्या, तरुणपणाचं 'रहस्य' असेल..!

Monday, 11 January 2016



परवा मी, काही कामाने स्मशानभूमीत गेलो होतो. तसं पाहायला गेलं तर, कामानिमित्त मला आठवड्यातून एकदा तरी त्या ठिकाणी जावच लागतं. नाही म्हणता.. त्या भयाण वातावरणाची, रडारडीची आता मला सवय झाली आहे. पण काहीवेळा, अगदी काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर घडत असतात. त्यावेळी मात्र, माझा सुद्धा अगदी नाईलाज होतो.
परवा.. असंच काहीतरी घडलं..
माझ्या गाडीवर कामाला असणारा सदर सेवक येत आहे. म्हणून, माझ्या गाडीत बसून मी त्याची वाट पाहत होतो. विद्युत दाहिनी समोर, एका प्रेताचे शेवटचे काही क्रियाकर्म चालू होते..
सहज म्हणून माझं लक्ष गेलं. पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं ते कलेवर, फारच कृश दिसत होतं. आणि, विशेष बाब म्हणजे त्याच्या सोबत फक्त चारच जन होते. त्यात, सुद्धा दोन महिला आणि दोन पुरुष. हे चार खांदेकरी आहेत म्हणावे, तर.. त्याला शववाहीकेमधून आणलं होतं..!
जाऊदेत म्हणून.. मी विषय सोडला, आणि पुन्हा एकदा मी पेपर वाचण्यात मग्न झालो.
तोच, आजूबाजूला मला कसली तरी हालचाल जाणवली. पाहतो तर, त्याच प्रेताबरोबर आलेली. अंदाजे.. एक चाळीशीतील महिला, पालिकेने स्मशानभूमीत सुशोभीकरण करण्यासाठी लावलेल्या झाडांची काही फुलं तोडत होती. त्यामुळे, मी सुद्धा त्या महिलेला मुद्दाम हटकलं, आणि तिला म्हणालो..
"काय करताय हो तुम्ही..?
"काही नाही, थोडी फुलं घेतेय..!
"कशाला..?
"शेवटचा विधी चालू आहे. प्रेतावर, दोन फुलं वाहावी म्हणतेय..!
"शेवटचा विधी आहे ना.. मग थोडं दूर चौकात जावा. आणि, एखादा हारच घेऊन या ना..!
"नको हो, फार वेळ होईल..!
शेवटी वैतागून मी त्या महिलेला म्हणालो,
"कोण होते ते तुमचे..?
"माझा " नवरा " होता...! '
बापरे... त्या महिलेच्या ह्या वाक्यासरशी माझ्या अंगावर सरकन काटा आला. पुढील काही एक विचारायची माझ्यात हिंमत राहिली नाही. त्या महिलेकडे दुर्लक्ष करत. मी गपगुमान, माझं तोंड पुन्हा पेपरमध्ये घातलं. आणि, ती महिला त्या प्रेताच्या दिशेने निघून गेली.
मी विचारात पडलो होतो. उभ्या आयुष्यात काय कमवलं राव ह्या माणसाने..? अंत्यसंस्कार करतेवेळी, ह्याला फुलांचा एखादा हार सुद्धा नशिबी न यावा.
पाच एक मिनिटात, विद्युत दाहीनीमध्ये त्याचे अंत्यसंस्कार उरकले गेले. मी, पेपरच वाचत होतो. आणि, माझी समाधी त्या मगासच्या महिलेच्या आवाजाने भंग पावली..
हार आणला असता हो मी..!
पण.. दहा वर्षांपूर्वी, यांनी एका किरकोळ कारणावरून मला कायमचं सोडून दिलं होतं. जिच्याबरोबर हे राहत होते, ती तर आज आलीच नाही. कोठून तरी मला समजलं. आले..
काय करणार..
" सात फेरे घेतले होते मी यांच्या सोबत. शेवटी, कुंकवाचा धनी होता ना माझ्या..! "
त्या महिलेचा प्रत्येक शब्द, विखारी बाणासारखा मला टोचत होता. आणि मी, त्या शब्दांच्या असह्य यातना सहन करत होतो. तिच्या मागील आयुष्यात, ती कशीही आणि कोणाबरोबर का राहत असेना..
परंतु..तिने दाखवलेल्या, त्या मोठेपणाला मी मनोमन सलाम करत होतो..
हे फक्त, एक भारतीय नारीच करू शकते..!

Saturday, 9 January 2016

अकल्पित.. ( शृंगारीक कथा )



सकाळचा.. साधारण, दहा वाजताचा सुमार असावा.
कोवळी उन्हं पसरायला नुकतीच सुरवात झाली होती. हातामध्ये असणारी पिशवी हलवत झुलवत अवखळ चाल करत ती येत होती.
एकदाची ती, आपल्या मुक्काम स्थळी पोहोचली. त्या नेहेमीच्या झाडाखालील सावलीत, तिने आपली बसकण मारली. अंगाला आळोखे पिळोखे देत, तिने एकदा सर्वांग झटकलं..
जादुगाराने, जादूच्या पोतडीतून एक एक वस्तू लीलया बाहेर काढावी. तसा तिने, पिशवीतून सुरवातीला एक प्लास्टिकचा फ्लेक्स बाहेर काढला. त्याला, थोडासा झाडून पुसून घेतला. त्यावर छापील असणाऱ्या नेत्याचं तोंड, जमिनीवर उलट्या बाजूने ठेऊन. तिने तो दोन बाय तीनचा प्लास्टिकचा कागद त्या फुटपाथवर अंथरला. त्या कागदाला, तिने पुन्हा एकवार पुसून काढला. रोजच्या झाडू पोच्यामुळे, त्या पांढऱ्या कागदाला सुद्धा एक मातकट रंग चिटकून बसला होता. तो काही केल्या, जायचं नाव घेत नव्हता.
त्या पाठोपाठ, पिशवीतून दारूच्या काही लहान-सहान रिकाम्या बाटल्या निघायला सुरवात झाली. छोट्या मोठ्या मिळून, साधारण त्या दहाएक बाटल्या असाव्यात. त्या बाटल्यांमध्ये, विशिष्ट प्रकारच्या कसल्याशा रंगीबेरंगी पावडरी होत्या. त्यांच्या आयुर्वेदिक भाषेत, त्याला 'चूर्ण' असं म्हणतात.
त्या.. प्रत्येक कॉटर आणि नव्वद एमेल च्या बाटल्यांना मळकट कपड्याने एकवार हलक्या हाताने पुसून घेत. एक-एक करून, त्यांना प्लास्टिकच्या कागदावर मांडलं.
मागोमाग, त्या पिशवीतून प्लास्टिकच्या एका थैलीत ठेवलेले पाच पन्नास बिबे होते. ते सुद्धा तिने, त्या पथारीवर मांडले. अजून सुद्धा, बरच काही त्या पोतडीतून बाहेर पडलं होतं. आणि आपल्या रोजच्या जागेवर विसावलं होतं.
सगळ्यात शेवटला, पिशवीतून अगरबत्तीचा पुडा आणि काडीपेटी बाहेर पडली. त्या पुड्यातल्या दोन सुवासिक अगरबत्त्या तिने बाहेर काढल्या. आणि, त्या शिलगावल्या. समोरच्या पथारीवर तिने त्या अगरबत्त्या एकवार ओवाळून घेतल्या. आणि, दोन दगडाच्या चिमटीमध्ये त्या अगरबत्त्या अडकवल्या गेल्या. अगरबत्त्याचा मंद सुवास, आजूबाजूला दरवळू लागला. तितक्यात.. किटलीतून चहा घेऊन एक बारकं पोरगं आलं,
आणि तिला म्हणाला...
"नाजुका... चाहा दिऊ का कसं..?
"दे कि रे... सकाळपासून मला सुद्धा चहाची खूपच तल्लफ होत होती. आज घरून निघायला, मला खूपच उशीर झाला. म्हणून, चहा न घेताच मी आज घराबाहेर पडले आहे.
दे बाबा, एक चहा दे मला...
नाजुका...
इयत्ता दहावी पर्यंत शिकलेली, उफाड्याची एक पोरसवदा बाई. लांबसडक काळीभोर केशसंपदा लाभलेली नाजुका नावाप्रमाणेच अगदी नाजूक अशी होती. आखीव रेखीव चेहरा आणि अंगा पिंडाने मजबूत आणि टंच भरलेली नाजुका, खूपच आकर्षक अशी दिसत होती. पाहताक्षणी, कोणीही तिच्या प्रेमात काय मोहात पडावं. आसं रुपडं घेऊन ती जन्माला आली होती. पण नशिबाचे भोग म्हणून. आणि, आयुर्वेदाचं थोडं फार जुजबी ज्ञान..? याच्या सहाय्याने, तिने हा व्यवसाय सुरु केला होता.
शून्यात पाहात, नाजुका गरमागरम चहाचे घोट रिचवत होती. चहामुळे, तिला जराशी तरतरी आल्या सारखी वाटत होती. आता, बोहोनीचं गिर्हाईक कधी हाती पडेल. त्याची वाट पाहत ती बसली होती. अगरबत्ती निम्मी जाळून झाली होती. तिची राख, वाऱ्याने इतस्तः उडून गेली होती.
दहाची लोकल आली, तशी रस्त्याला तुडुंब गर्दी उसळली. स्त्री पुरुषांच्या रंगीबेरंगी कपड्यांनी रस्ता अगदी फुलून गेला होता. लोकांच्या, आपसात चाललेल्या गप्पांचा चिवचिवाट आसमंतात विरत होता. पण, कोणालाच त्याची काहीच खबरबात लागत नव्हती.
तितक्यात.. भिरभिरनाऱ्या नजरेच्या एका चुकार मुलाकडे नाजुकाची नजर गेली. 
ए पोरा... इकडं ये, तोंडावर किती फोड्या उठ्ल्यात तुझ्या. ये तुला चांगलं औषध देते. अरे ये कि हिकडं. येवढा का पोरीवाणी लाजायला लागलायेस..?
नको, नको... मला औषध नकोये. आता पर्यंत मी बरेच इलाज करून थकलो आहे. माझा भरपूर पैसा सुद्धा खर्च झाला आहे. पण इलाज म्हणून काही झाला नाही..
अरे बस कि... कोणत्या गावावरून आलास..?
मी इथला नाही, बाहेर गावाचा आहे..! काही कामासाठी इथे आलो होतो..
बरं, ते जाऊदे...
आरे तसं नाही... तोंडावर उठत्यात, त्या.. जवानीच्या फोड्या असत्यात. त्याला त्या पद्धतीचंच औषध द्यावं लागतंय. डॉक्टर कडं त्याचा गुण नसतोय. त्याला, झाड पाल्याचं औषधच काम करतंय. अंगात उष्णता वाढली. कि, ती तोंडावाटं बाहेर पडतीया. चुलीवर पाणी गरम करायला ठेवल्यावर त्याची वाफ कुठं जातीय..? वरच ना... तसच आपल्या शरीराचं बी आसतंय. तोंडावर डोक्यावर फोड्या येत्यात. ह्या वयात सगळ्यांना येत्यात असल्या फोड्या. बोलता-बोलता, शरीराची विशिष्ट हालचाल करत. तिने, आपल्या खांद्यावरील पदर किंचितसा खाली पाडला. त्याचबरोबर, तिच्या गोऱ्यापान डेरेदार वक्षस्थलाचं दर्शन घडू लागलं. कंचुकितुन अर्धवट डोकावनारी तिच्या वक्षाची लोभस चंद्रकोर आता कही त्या मुलाला जागचं उठू देणार नव्हती.
तुला अजून एक विचारू का..?
हो विचारा कि...
तुझं लग्न झालंय का..? नाय म्हणजे, खरं काय ते सांग. विनाकारण लाजू नकोस..!
लग्नाचा विषय निघाल्यावर पोरगं एकदम लाजून गेलं. आणि, गालातल्या गालात हसत नाही म्हणायला लागलं.
मग.. कधी बाहेर बियेर गेला होता का..?
नाजुकाच्या ह्या प्रश्ना सरशी, ते पोरगं आणखीनच लाजून गेलं. आणि म्हणालं,
हो... एकदा गेलो होतो.
एवढी देखणी बाई आपल्याशी 'तसल्या' विषयवार इतक्या मन मोकळेपणाने बोलत आहे. ते पाहून, तो मुलगा सुद्धा भलताच चेकाळला.
मग.... काय-काय केलंस..?
आता मात्र, त्याच्या चेहेऱ्यावर लाली चढली होती. वातावरण भलतंच गरम झालं होतं.
काय नाय.. आपलं तेच...!
आरे, लाजतोस काय. किती वेळ चाललास.. ?
कुठलं काय, अवघ्या दोन मिनिटात मोकळा झालो मी..!
" आपल्याकडं आहे ना, जास्ती वेळ चालायचं औषध सुद्धा आहे..! "
तोंडावरील फोड्यांचा विषय, कोणत्या वळणावर आला होता. याचा त्या मुलाला काहीच तपास लागला नाही. नाजुका फासे टाकत गेली. आणि, तो मुलगा अलगद तिच्या जाळ्यात ओढला जात होता. तिच्या लाडिक बोलण्याने. तो, पूर्णपणे संमोहित झाला होता. तिच्या कामुक बोलण्यामुळे, त्याच्या अंगात कामवासना जागृत झाली होती.
त्या दोघांमध्ये, आता वयाचं अंतर उरलं नव्हतं. त्यांच्यामध्ये, एक प्रकारचा मोकळेपणा आला होता. त्यामुळे, तो मुलगा सुद्धा लाज सोडून तिच्याशी घडाघडा बोलत होता..
आणि, तो नाजुकाला म्हणाला..
तुझ्याकडं असणाऱ्या औषधानं, कितीवेळ चालतोय माणूस..?
चालतोय कि... चांगला अर्धा तासभर चालतोय..!
पण, खरं असतंय का ते औषध..? आणि, त्याचा असर होईलच याची काय ग्यारंटी..?
असर कसा होत नाय..? मी काय आजची विकाय लागेलेय काय ते औषध...!
ते औषध घ्यायला, कितीतरी लोकं लांब लांबून येत्यात माझ्याकडं..
नाय पण.. नाहीच चाललं तर..?
तुला.. औषध वापरून बघायचय का..?
हो.. पण, कसं काय..?
मी हाय कि तुझ्यासमोर..!
नाजुकाच्या " मी हाय कि तुझ्यासमोर " ह्या वाक्क्या सरशी. त्याची अक्कल कामच करायची बंद झाली. फार मोठं विषयांतर झालं होतं, चक्क त्या औषध देणाऱ्या बाईनेच त्याला होकार कळवला होता. एवढी सुंदर उफाड्याची बाई हातातून जाऊ देईल तो तरुणच कसला.
बरं.. किती होतील त्या औषधाचे..?
दोनशे रुपय,
आणि तुझे..?
काय मोल करशील माझा..?
आता तू बोल कि.. तुझ्या मनात काय आहे. ते तरी कळूदेत मला.
हजार रुपय घेते मी.. माणूस जास्ती चालतंय, तासभर काही सोडत नाय.
काही, कमी जास्ती..
कसलं कमी आणि जास्ती घेऊन बसलास, सगळ्या अंगाचा चोळवटा होऊन बसतोय. सोप्पं काम नव्हं ते. आणि, लाडिकपणे त्याला म्हणाली..
तुला बी हायेच कि त्यातली माहिती.
ठीक आहे, चल आवर लवकर..! पण जायचं कुठं..? मी हिताला नाही, बाहेर गावावरून आलो आहे.
त्याची काळजी तू करू नकोस, मी तुला योग्य ठिकाणी घेऊन जाईन..
सौदा पक्का झाला होता. दोनशे रुपये हातात पडताच. नाजुकाने, कसलीशी पुडी त्या मुलाच्या हातात दिली. पिशवीतून पाण्याची बाटली काढली. आणि त्याच्या हातात दिली. त्या पुडीत असणारी पावडर त्या तरुणाने तोंडात टाकली. आणि वरून थोडसं पाणी पिलं.
नाजुकाने आपली पथारी जागेवरच सोडली, रोडला उभी राहून तिने एका रिक्षाला हात केला. रिक्षाने करकचून ब्रेक मारला. दोघेही त्या रिक्षात बसले, नाजुकाने रिक्षा वाल्याला सांगितलं.
आनंद लॉजला घ्या...!
रिक्षाचा मीटर खळकण वाजला... आणि, टर्रर्रर्र sssss करत ती रिक्षा आपल्या मार्गी लागली.
थोड्याच अवधीत.. आनंद लॉज नावाच्या बिल्डींग खाली ती रिक्षा थांबली. रिक्षाचे पन्नास रुपये झाले होते. ते त्याने चुकते केले..
आणि ते दोघे, सोबतच चालत-चालत त्या लॉज मध्ये प्रवेशित झाले. नेहेमीच्या ओळखीतला लॉज असल्यामुळे, नाजुकाच्या एका इशाऱ्यावर आता पता न विचारता लॉज मालकाने रूमची चावी तिच्या स्वाधीन केली. नाजुकाच्या सराईत पावलांनी अंधाऱ्या मार्गाने पुढे कूच केलं. आणि, तिच्या पाठोपाठ हा गडी सुद्धा चालू लागला.
रुमचं कुलूप उघडलं गेलं. आणि ते दोघेही रूम मध्ये प्रवेशित झाले. अधीर झालेल्या त्या मुलाने, एका क्षणात, नाजुकाला आपल्या कवेत ओढून घेतलं. त्याचे ओठ थरथरत होते, तो भलताच कामुक झाला होता. त्याच्या ह्या धसमुसळेपणाला लाडिक नकार देत. कशीबशी त्याच्या कवेतून आपली सुटका करून घेत. नाजुका त्याला म्हणाली..
जरा थांब कि, असली काय घाई लागली आहे तुला..?
नाही... आता राहवत नाहीये मला, वातवरण नुकतच कुठे तापत होतं..
तितक्यात, दरवाजाची कडी वाजली...
मेडम, रूम का भाडां.. सेठने बुलाया है, वो बाहर जाने वाले है.. उनको आनेमे देर लगेगी..
रूम बॉय च्या आवाजाला होकार देत,
हां, नीचे आ रही हुं मैं.. म्हणत..नाजूका त्या मुलाला म्हणाली..
बरं एक काम कर, माझ्या 'कामाचे' आणि लॉज भाड्याचे पैसे माझ्याकडे दे. तू खाली गेलास, तर तुझ्याकडून जास्ती पैसे घेतील. माझं, रोजचं येणं जाणं आहे. त्यामुळे, मला इथे कमी पैसे लागतात. तुझेच दोन पैसे वाचतील.. त्याला सुद्धा, हा फायद्याचा सौदा मंजूर झाला होता.
दे.. तेराशे रुपये दे, मी अशी गेले आणि अशी आले. तोवर तू तयारी करून ठेव.
असं म्हणत, लाडीकपणे तिने त्याच्या केसात हात फिरवला. चेकाळून, त्याने सुद्धा त्याच्या पाकिटातून हजाराची एक आणि शंभराच्या तीन करकरीत नोटा बाहेर काढल्या. आणि, तिच्या हातात दिल्या. लाडिक ठुमका मारत.. पैसे घेत, ती रुमच्या बाहेर पडली.  
नाजुकाच्या मदमस्त स्पर्शामुळे तो खूपच चेतावला गेला होता. कधी एकदा ती येतेय आणि कधी एकदा मी तिच्यावर आरूढ होतोय. अगदी असं झालं होतं त्याला. कपडे काढून, पूर्ण तयारीनीशी तो रूम मध्ये बसला होता. आता फक्त, तिच्या येण्याचीच वाट होती..
बराच वेळ झाला, पण नाजूका काही वर येईना. काही विपरीत तरी घडलं नसावं ना..? या भीतीने, त्याचा घसा कोरडा पडला होता. त्याच्या मनात, नाना विचारांनी गोंधळ घातला होता. एकतर आपण ह्या गावातले नाही, काही गडबड झाली तर..? ह्या विचाराने तो भयभीत झाला होता. काढलेले कपडे, त्याने पुन्हा आपल्या अंगावर चढवले. आणि, तो रुमच्या बाहेर पडला. भीत-भीत जिन्याच्या पायऱ्या उतरत तो खाली आला. कौंटर वर मगाशी होता तोच मुलगा बसला होता. त्याने त्या मुलाला विचारलं...
काही गडबड झालीये का..?
कसली गडबड..?
माझ्याबरोबर आलेली ती बाई, खाली रूमचे पैसे द्यायला आली होती, ती कुठे आहे..?
ती तर, तेंव्हाच बाहेर गेलीय...!
त्या मुलाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच, त्याला अगदी गरगरायला लागलं. आपण, पुरते फसवलो गेलो आहोत, याची त्याला पूर्णपणे जाणीव झाली..
नाजुकाने घडवलेलं, हे सगळं काही पूर्वनियोजित प्रकरण होतं. त्यामुळे, त्या लॉज मधील मुलाने सुद्धा, त्याला पैश्याकरिता बिलकुल हटकलं नव्हतं. यातच, तो मुलगा काय समजायचं ते समजून गेला होता. रागारागातच तो मुलगा लॉजच्या बाहेर पडला. अनोळखी भागातून तो रस्त्याने पुढे चालत निघाला होता. थोडं पुढे आल्यावर, त्याला थोड्या वेळापूर्वी रेल्वेतून उतरल्याच्या खाणखुणा स्पष्ट जाणवू लागल्या. आणि मगाशी आपण, नेमके इथेच उतरलो होतो. त्याची, त्याला खात्री झाली. उदास मनाने, तो पुन्हा एकदा त्याच रस्त्याला लागला. काही अंतर चालून गेल्यावर, तो पुन्हा एकदा त्याच वळणावर आला. जिथे नाजुकाने आपला ठिय्या मांडला होता.
आणि, समोर पाहतो तर काय...
त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्या मगासच्या ठिकाणी, नाजुका पुन्हा येऊन बसली होती. तिला पाहताच, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.
पण, बाई माणूस आहे करणार तरी काय..? म्हणून, रागातच तो तिच्यापाशी गेला.
नाजुका, वेड्याचं सोंग वठवत करून सवरून नामानिराळी होत. साधं त्याच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नव्हती.
आणि, आजूबाजूला पाहात चिरक्या आवाजात रागातच तो तिला म्हणाला...
का.. का असं फसवलंस मला..? दे.. माझे पैसे मला परत दे.
कसले पैसे..?
भाडखाव... जातोस का करू कालवा..? बोलवू का लोकांना..? करू का समधा गाव गोळा..?
नुसती बाईची छेड काढतोयस म्हणाले तर, कुत्र्या सारखं मारल पब्लिक तुला. चल निघ इथून.
मोठा आलाय पैसे मागणारा. नाजुकाचा हा भयंकर पवित्रा पाहून..
गपगुमान तोंड झोडल्या सारखं तो मुलगा तेथून चालता झाला. ना कोणाला काही सांगू शकत होता. आणि ना ही, तो पोलिसात तक्रार नोद्वू शकत होता. आणि, सांगायचंच म्हणल्यावर कोणाला सांगणार तरी काय हो..? सांगायला गेलं तर, लोकच त्याला वेड्यात काढतील. आणि तोंडात शेन घालतील. हे तो पक्कं जाणून होता. म्हणून मुकाट्याने त्याने तिथून काढता पाय घेतला. आणि, आलेल्या कामासाठी तो सरळ निघून गेला. तो दूरवर जाईपर्यंत, नाजुका त्याच्याकडे पाहत होती. पण.. त्या पोराची मागे वळून पहायची काही हिंमत झाली नाही.
दोन तासाच्या फरकाने, चहाचा रिकामा ग्लास घेण्यासाठी तो मुलगा आला होता. चहाचा रिकामा ग्लास आणि पैसे घेता-घेता तो नाजुकाला म्हणाला..
झाली का गं तुझी भवानी..?
हो... झाली बाबा, आता निघते जेवायला. दोनची लोकल येईलच इतक्यात..!

~ पंडित पॉटर ~ 
लग्नामध्ये, 
वधु पक्षाकडून देन्यात येनार्या रुखवतामध्ये..
भांड्यांसोबत.. दुसरं, तिसरं.. काही देवो अथवा न देवो.
पन,
तेवढा.. 'दिवान' आणि 'गादी' मात्र आवर्जुन देतात बरं का..!

Tuesday, 5 January 2016

पूर्वी माझ्यासोबत, मन्या नावाचा एक व्यक्ती कामाला होता..
नेहमीप्रमाणे.. त्यादिवशी सुद्धा, तो सकाळी सकाळीच मजबूत 'टाकून' आला होता. आजचा, मला त्याचा जरा वेगळाच मूड दिसत होता.
नेहमीप्रमाणे, नमस्कार करण्याकरिता त्याने मला आवाज दिला..
" नमस्कार साहेब...!
" नमस्कार.. काय म्हणतोस मन्या...!
काय नाय, म्हणलं.. चाखना खाणार है का..?
मी, कामाच्या व्यापात.. त्याच्याकडे लक्ष नसल्या सारखं केलं. थोड्यावेळाने, मान वर करून पाहिलं. तर.. हलत, डुलत तो माझ्या समोरच उभा होता.
त्याच्या समाधाना करिता मी त्याला म्हंटलं..
काय खातोयेस रे चाखना ?
त्यावर.. एकदम जोशात तो मला म्हणाला..
आ sss चाखण्याला, मी साधं-सुधं काही खात नसतोय....!
मी, मनात विचार केला. हा, एवढा रुबाबात बोलतोय. तर मग, चाखण्याला तो नेमकं काय खात असेल...? पाच पन्नास रुपयाची 'हातभट्टी' मारणारा हा माणूस. असा काय मोला महागाचा चाखणा खात असणार आहे...?
शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे ..नेमका काय खात असेल तो ?
माझ्या मनातील कुतूहल जागृत झालं. आणि, माझी उत्सुकता वाढली..!
मी म्हणालो, मन्या बघू काय खातोयेस ते...!
त्याने, खिशातून पावशेर भर काजू असलेली प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली.
ते पाहून मी तर, अवाकच झालो.
पाचशे रुपये किलोची वस्तू.. हा गडी, चाखण्याला खातोय..!
माझ्या घरातील किराणा माल भरताना. महिन्याला, मी जेमतेम हजार ते बाराशे रुपयाचा सुखा मेवा खरेदी करत असतो. आणि, याला चाखण्याला काजू खायला कसे परवडत असतील...?
माझ्या डोक्यात, विचारांची गर्दी सुरु झाली होती.
परंतु मी, त्या विचारांकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि, त्याने समोर धरलेल्या पिशवीमधील काही काजू उचलले. आणि, तोंडात टाकले. त्यामुळे...मन्याला हि बरं वाटलं.
शेवटी, मी त्याला विचारलच...!
तुला चाखण्याला.. काजू खायला कसं काय परवडतं...?
त्यावर तो म्हणाला.. त्याचं काय आहे साहेब. माझ्या घरात, डबेच्या डबे भरून काजू, बदाम, मनुके असत्यात. कशाची म्हणून कमतरता नसती बघा..
माझी बायकू,
" मंगल कार्यालयात "
आचाऱ्याच्या हाताखाली कामाला आसती. रग्गड माल आणत आसती तिथून. कशाचीच कमतरता नसती बघा. तिथं, कसलाच हिशोब नसतोय.
त्याचं, हे वक्तव्य ऐकून. मी, कपाळावर हात मारून घ्यायचाच बाकी राहीलो होतो.. पण शेवटी, मी त्या विषयाला फाटा देत.. मनातल्या मनात जाऊदेत, मरुदेत म्हंटल. आणि, त्याची बोलबच्चन ऐकत-ऐकत,
एक-एक काजू, मी हि घशाखाली उतरवत राहिलो..

Monday, 4 January 2016

पूर्वी विवाह समारंभात...
साखरपुडा, हळदी, आणि नंतर विवाह सोहळा सगळं काही एकाच मांडवात पार पाडलं जायचं. पण हल्ली बरीच मंडळी, लग्न ठरवून झालं. कि, विवाह मुहूर्त येईपर्यंत म्हणा. किंवा, कार्यालयाची तारीख मिळेपर्यंत म्हणा. मुलाची किंवा मुलीची " एडवांस बुकिंग " म्हणून, साखरपुडा करून ठेवतात. काही भागात, याला टिळा सुद्धा म्हंटलं जातं. हि पद्धत म्हणजे, एकप्रकारची गुंतवण असते. परंतु, अशाप्रकारच्या साखरपुडा किंवा टिळा ह्या विषयाला, माझा पुर्णपणे विरोध आहे. विषय फार गंभीर आहे.
तसं पाहायला गेलं तर..
" या साखरपुड्याचे, फायदे कमी आणि तोटेच जास्ती आहेत..! "
१) पाहिली गोष्ट म्हणजे, हल्ली साखरपुडा हा एक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. मुलीच्या वडिलांची ऐपत न पाहता. साखरपुड्याचा जोरदार 'खर्चिक' कार्यक्रम पार पाडला जातो. माझ्या माहिती प्रमाणे, या समारंभात गरीबाची दोन लग्न होतील. ईतका खर्च झालेला असतो. तर काही ठिकाणी हा कार्यक्रम आटोपशीर सुद्धा उरकला जातो. कालच एकाच्या तोंडून ऐकण्यात आलं. मुलाकडच्या लोकांचा निरोप होता. साखरपुडा तारांकित हॉटेलात पार पडला पाहिजे. आणि, आमची दीडहजार माणसं येणार आहेत. मुबलक पैसे असणाऱ्या लोकांना ते जमून जातं. ह्या अशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत..
२ ) साखरपुडा झाल्या नंतर, मुलं काही गप्प बसत नाहीत. त्या कार्यक्रमातच, त्यांची एकमेकाच्या मोबाईल नंबरची देवान घेवाण झालेली असते. आणि, मुला मुलीची लगेच फोनाफोनी सुरु होते. काही दिवसांनी, फोनाफोनीचं भेटीत रुपांतर होतं. नंतर जवळीक वाढू लागते. शरीर स्पर्श होऊ लागतात. आणि चुकून काहीवेळा, लग्नाआधीच दोघांकडून नको ती 'चूक' सुद्धा घडून जाते बरं का.. अशावेळी, दोघांनीही ती घडलेली चूक मान्य करून. पुढील वैवाहिक जीवनात सुखी आणि समाधानी राहायचं ठरवलं. तर, काही हरकत नाही. पण काहीवेळा असं सुद्धा पाहायला मिळालं आहे. मुलगा अचानक पलटी मारतो. आणि म्हणू लागतो.. हिने त्या गोष्टीसाठी मला होकारच कसा दिला..? तिचा तिच्या मनावर ताबा नव्हता का..? मला तर वाटतंय, हि पूर्वीपासून बदफैली असणार आहे. ह्या आणि अशा बऱ्याच कारणावरून सुद्धा, साखरपुडा झालेली बरीच लग्नं मोडलेली मी पाहिली आहेत.
३ ) सिनेमा आणि टीव्ही सिरीयलच्या माऱ्यामुळे, सगळी मुलं मुली अगदी दिवाने झालेले असतात. सिरीयल, सिनेमा मधील तेच भंपक फिल्मी जीवन ते स्वतः अनुभवू इच्छित असतात. फोनाफोनी, फिरणं, धरणं, ह्या गोष्टी सुरु होतात. आणि, हे काही जगापासून लपून राहत नाही. घरातल्यांना सांगून जरी ह्या भेटीगाठी होत असल्या. तरीही, लोकांच्या नजरा काही चांगल्या असतात का..? लग्न होईपर्यंत, हे दोघेही मनाने आणि तनाने स्वच्छ जरी असले. तरी लोकं, खायचं तेवढं शेन खातातच कि. आता काय कोरी राहिलीय का ती..? लग्नाआधी बरीच हजा मजा केली आहे तिने. असं म्हणून मोकळे होतात. यात, मुलाला कोणी दोष देत नाही. हे, प्रत्येक मुलीच्या माता पित्याने लक्षात घेतलं पाहिजे.
४ ) साखरपुड्या नंतर, फिरणं मौज मजा सुरु असते. परंतु,चुकून सुद्धा असं कोणाशीही आणि कधीही घडू नये. पण, दुर्दैवाने हा प्रकार माझ्या पाहण्यात आला आहे, म्हणून सांगतो. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला अवघे दोनचार महिने अवकाश असतो. तोवर मजा म्हणून, यांचं फिरणं धरणं चालू असतं. आणि, दुर्दैवाने त्या मुलाचा अपघाती किंवा कसाही अकस्मात मृत्यू झाला. तर, त्या नियोजित वधुवर फार मोठं आभाळ कोसळतं. तिला, त्या मुलाबरोबर फिरताना बरेच जणांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे, आता तिचं कौमार्य भंग झालं आहे...! या आणि अशा इतर सुद्धा बऱ्याच अफवांना ऊत येतो. आणि, पर्यायाने त्या मुलीचं लग्न रखडतं. तिच्यावर दुहेरी संकटाचा घाला होतो. काहीवेळा, अशा कुमारिकांचं चक्क विधुर पुरुषांशी लग्नं लावण्यात आलेलं मी पाहिलं आहे.
आणि, हे सगळं... फक्त मुलींच्या बाबतीतच घडत असतं, मुलांच्या नाही. त्यामुळे सावधानता म्हणून, " झट मंगनी पट ब्याह " किंवा, विवाह समारंभात एकाच मांडवाखाली सगळे मंगल विधी उरकले जावेत. त्यामुळे, पुढे होणारे दुष्ट परिणाम टाळले जाऊ शकतील..