संक्रांतीच्या सुरवाती पासूनच...
सर्व महिला मंडळीला, आपापल्यापरीने घरामध्ये हळदीकुंकू समारंभ करायचे वेध लागलेले असतात.
पूर्वी.. माझं स्वतःचं घर नव्हतं. त्यामुळे, मी माझ्या सौ ला मी ह्या कार्यक्रमापासून नेहेमी वंचित ठेवत आलो होतो. पण, दैवकृपेने गत दोन वर्षापासून आमचं सुद्धा स्वतःचं घर झालं. आणि, तेंव्हापासून तिने सुद्धा ह्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला आमच्या घरात नव्याने सुरवात केली.

काय आहे.. फुकाचा मोठेपणा, ना मला आवडतो ना तिला. त्यामुळे, आमची स्वतःची वास्तू झाली. तेंव्हापासून, तिने हा घरगुती समारंभ सुरुवात केला.
काय आहे, " भाड्याचं घर आणि खाली कर..! "
त्यामुळे, तिने पूर्वी अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी टाळल्या होत्या..
तसं पाहायला गेलं तर, मला हा कार्यक्रम बिलकुल आवडतच नाही.. पण काय आहे, महिलांची दांड
गी हौस असते ना. त्यामुळे, मी ह्या सगळ्या गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असतो.काय आहे, " भाड्याचं घर आणि खाली कर..! "
त्यामुळे, तिने पूर्वी अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी टाळल्या होत्या..
तसं पाहायला गेलं तर, मला हा कार्यक्रम बिलकुल आवडतच नाही.. पण काय आहे, महिलांची दांड
कारण.. ह्या महिला मंडळी, वाटायचं म्हणून हे 'वान' वाटत असतात, किंवा 'लुटत' असतात. त्यात प्रामुख्याने, प्लास्टिकच्या डबड्या-डूबड्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. आणि, ते मला बिलकुल आवडत नाही. कारण, त्या वस्तू काहीच कामाच्या नसतात हो. आणि. महागड्या वस्तू घ्यायला कोणाला परवडत सुद्धा नाही. नुसता.. " पैश्याचा कार आणि नवऱ्याच्या खिशाला भार..! " अगदी अशातला प्रकार असतो तो..पण, माझी बायको माझ्यासारखीच लैच हुशार हो.. हिवाळ्याच्या सिझन पाहून, तिने समस्त महिलांकरिता. हे.. हिवाळ्यात अंगाला लावायचं "बॉडी लोशन" वान म्हणून लुटायला ( वाटायला ) आणलं आहे.
लुटावं तर असं काही तरी. ज्यामुळे, तमाम महिला सुद्धा खुश. आणि त्याचबरोबर, आमचे पुरुष मंडळी सुद्धा भरपूर खुश..
काय रे.. खरं आहे न माझ्या विवाहित मित्रांनो.. wink emoticon
पण.. तुम्हाला खरं सांगू का..
मला तर वाटतंय, हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला असायला हवा होता..!
त्यामुळे, किमान घरी येणाऱ्या महिलांना आपलं घर आपण किती नीटनेटकं ठेवतो. हे दिसावं, म्हणून.. सगळ्या महिला मंडळी अगदी झाडून कामाला लागलेल्या असतात.

ताई, माई, बाई.. मी जे म्हतोय, ते खरं आहे ना..!
No comments:
Post a Comment