खऱ्याला मरण नाही...!
हा खूप जुना वाक्प्रचार आहे. आणि, तो सर्वमान्य सुद्धा आहे. पण न जाने का, ह्या जीवनाच्या जगरहाटी मध्ये. काही लोकं, खोटं बोलल्या शिवाय जगूच शकत नाही कि काय असं वाटून जातं.
एक खोटं बोललं.. कि, त्याला लपविण्यासाठी. आपल्याला, शंभरदा खोटं बोलावं लागतं. हा सुद्धा, फार जुना वाक्प्रचार आहे. आणि तो सुद्धा तितकाच खरा आहे. इतकं सगळं माहित असून सुद्धा, काही लोकं खोटं बोलणं बिलकुल टाळत नाहीत. नुसते मजल्यावर मजले चढवत असतात. पण मी म्हणतो, खोटं बोलून असं मिळतं तरी काय..? आणि, ते का..?
मित्रांनो, हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे बरं का.. त्यापाठीमागे, नेमकी काय आणि किती ठोस कारणं असू शकतील. ते मला माहित नाही. कारण,
मी स्वतः, कधीही खोटं बोलत नाही. कारण, एकतर खरं बोललेलं ध्यानात ठेवावं लागत नाही. हि फार मोठी जमेची बाजू असते. आणि, खोटं बोललेल्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास ठेवावा लागतो. ते फार अवघड काम आहे.
नाही म्हणता, कधी तरी मला सुद्धा खोटं बोलावं लागतं..कारण, खोटं बोलण्याचे सुद्धा बरेच प्रकार असतात.
उदा.. मी घरी असतो. आणि, माझ्या एखाद्या मित्राला फोनवर मी सांगतो. मी, आज घरी नाहीये. अजून कामावरच आहे. माझ्या या खोटं बोलण्यापाठीमागे, काहीतरी ठोस कारण असतं. असं मी मानतो. आणि ह्या खोटं बोलण्याने माझ्यावर फार मोठं संकट सुद्धा कोसळणार नसतं.
पण काही लोकं.. इतकं भयंकर खोटं बोलतात. कि आपण, त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
उदा.. काय सांगू, सांगायला एक नाही हजार गोष्टी असतात..
पण हे का..? खोटं बोलणं, हा विशिष्ट प्रकारचा आजार वगैरे आहे कि काय..?
असं सुद्धा, मला कधी-कधी वाटून जातं. किंवा, आपण खोटं बोलतोय हे जनसामान्य जणांच्या ध्यानात आलं. आणि, आपलं बिंग फुटलं. तर, समाजात आपली काय पत राहू शकेल..?
याचं सुद्धा भान त्या लोकांना होत नसेल का..? पुन्हा एकदा सांगतो..
" खऱ्याला मरण नसतं. "
तर मग, आपला बंगला नाही. निवाऱ्या करिता, एक झोपडं सुद्धा त्याहून कधीच कमी नसतं..!
हे सुद्धा, हातावरच्या रेषांइतकंच खरं आणि सफेद असतं..!
खरं आहे ! खर्याला कधीच मरण नसते.
ReplyDeleteखरं आहे ! खर्याला कधीच मरण नसते.
ReplyDelete