समुद्र हा माझा फार मोठा जिव्हाळ्याचा विषय, आणि कमकुवत दुवा आहे..!
समुद्राची आवड मला कधी कुठे आणि कशी निर्माण झाली ते माहीत नाही. कदाचित, समुद्राचं आणि माझं काहीतरी जुनं नातं असावं. असं सुद्धा मला कधी-कधी वाटून जातं.
समुद्र भेटीसाठी, आजवर मी महाराष्ट्रातील बराच समुद्री भूभाग पालथा घातला आहे. पण सगळ्याच ठिकाणी मला मानवी गर्दीने अगदी नकोनको करून सोडलं. कुठेही जा, एकांत असा मिळतच नाही.
सुरवातीला मला गोव्याचं खूप वेड लागलं होतं. पण अपुऱ्या माहितीमुळे गोव्यातील नेमक्या गजबजलेल्या ठिकाणी जाऊन आम्ही धडकायचो. तिथे तर सगळी हिप्पी लोकांची गर्दी. त्यात भारतीय लोकांची भाऊगर्दी, आणि शेवटी या गजबजाटात पुन्हा एकदा नको ती निराशा माझ्या पदरी पडायची.
अलिबागला.. मुंबई पुणेकरांची भलीमोठी गर्दी असते. म्हणून, दहाएक वर्षापासून मी दापोली जवळील हर्णे बंदरावर समुद्र भेटीला जाऊ लागलो. सुरवातीला हे ठिकाण म्हणावं असं प्रसिध्द नसल्याने, तिथे बऱ्यापैकी एकांत मिळत होता. पण शेवटी त्या भागात सुद्धा मानवी गर्दी वाढू लागली. आणि पुन्हा एकदा माझ्या हाती घोर निराशा पडली.

समुद्रा विषयी माझी नेहेमीची आवड म्हणजे,
समुद्र अगदी निर्मनुष्य असावा. फक्त तो आणि मी, समुद्रातून वाहणारा खारा वारा अंगाला झोंबून आरपार व्हावा. डोळे बंद करून समुद्राच्या लाटांची गाज कानामध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवावी. अशीच अर्धाएक तास समाधी लागावी. आणि समाधीतून बाहेर येत असताना, हळुवार डोळे उघडताना. समोर पांढरा शुभ्र उधाणलेला समुद्र आपल्या फेसाळलेल्या शुभ्र लाटा, इतस्ततः उधळताना दिसावा.

बरेच दिवस झाले.. हे दृश्य काही माझ्या नजरेस पडत नव्हतं.
पण.. परवा कारवारला गेलो असता. कारवार आणि गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या पोळे ( पोलेम ) बीचवर आमचं जाणं झालं. आणि मला हव्या असलेल्या त्या सगळ्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. उधाणलेला स्वच्छ असा निळाशार आणि अगदी निर्मनुष्य असा समुद्र किनारा. समुद्रात दूरवर डोंगरा सारखं दिसणारं एक छोटसं बेट, समुद्राच्या लाटावर विराजमान झालेली एक मासेमारी करणारी होडी. समुद्री पाखरांचा चिवचिवाट समुद्री तटावर निवांत विसावा घेत पहुडलेली एक होडी. समुद्री वाऱ्याने सळसळनारी नारळाची झाडं. काळ्याशार पाषाणाच्या खोबणीत दडून, एकमेकांच्या बाहुपाशात घट्ट बिलगून गेलेलं प्रेमी युगुल. समुद्रा शेजारी असणारं एक छोटसं रेस्टॉरंट.
रविवारचा दिवस असून सुद्धा अगदी पंधरा वीस व्यक्ती असणारं हे ठिकाण मला आणि माझ्या मनाला फार मोठी भुरळ घालून गेलं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की जाऊन या.

No comments:
Post a Comment