माझ्या मित्राच्या पत्नीने, एका गोंडस बाळाला जन्म दिला.
मित्र, आणि मी अगदी सकाळीच दवाखान्यात हजर झालो. मुलगी झाली होती. पहिली बेटी, आणि धनाची पेटी. त्यामुळे ते दोघेही मला खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते.
माझं सहजच शेजारील बेडवर लक्ष गेलं, तर..शेजारील खाटेवर एक सुंदर दिसणारी पंचविशीतली तरुणी ऍडमिट होती. ती सुद्धा तिथे बाळंतपण करण्यासाठी आली होती. बहुतेक तिची आईच असावी.. ती सुद्धा, तिच्या शेजारीच बसलेली होती. पण त्या दोघींच्या चेहेर्यावर चिंतेची एक विलक्षण छटा मला स्पष्ट जाणवत होती.
मित्र आणि वहिनी दोघे बोलत बसले होते, तोवर मी कँटीन मध्ये जाऊन गरमागरम चहा आणि बिस्किट्स घेऊन आलो. ते वहिनींना खायला दिले. आणि, आम्ही दोघे नाश्ता करण्याकरिता हॉस्पिटलच्या कँटीन मध्ये निघून गेलो.

आमच्या समोरच्याच टेबलवर, कोपर्यामध्ये त्या मुलीची आई सुद्धा नाश्ता करत बसली होती. एका वड्यासोबत दोन पाव घेऊन तेच लाऊन-लाऊन खात होती. बिचारी खूप भुकेलेली दिसत होती. मला काही ते दृश्य पाहावलं नाही. म्हणून त्या मावशी समोर मी एक दुसरा नाश्ता आणून ठेवला. पण त्या काही, तो नाश्ता घ्यायलाच तयार नाही.
मी म्हंटलं, तुमचा मुलगाच देतोय असं समजा. तेंव्हा, कुठे त्यांनी तो नाश्ता घेतला. त्यांचा नाश्ता होईपर्यंत, आम्ही तिथेच थांबलो होता. त्यानंतर त्यांना चहा सुद्धा दिला. चहा घेऊन झाल्यावर मी त्या मावशींना विचारलं.

का हो.. तुम्ही दोघीही माया लेकी मला खूपच उदास दिसताय..?
तेंव्हा त्या मावशी म्हणाल्या. माझी मुलगी दिसायला खूप देखणी आहे. तुम्ही पाहिलंच कि आत्ता तिला. आमची परिस्थिती तशी खूप नाजूक आहे. आमचे मालक माझी मुलगी लहान असतानाच गेले. हि माझी एकुलती एकच, अपार कष्ट करून मी तिला मोठं केलं.
मुलगी देखणी आहे.. म्हणून, चांगलं मोठ्या घरचं स्थळ तिला चालून आलं. माझ्या ऐपतीप्रमाणे मी लग्न लाऊन दिलं. बाकी सगळा खर्च त्यांनीच केला. सगळं काही चांगलं होतं. पण एक गोष्ट वाईट झाली, माझ्या मुलीला पहिल्या दोन मुलीच आहेत. आता, हे तिचं तिसरं बाळंतपण आहे. आणि तिच्या सासरच्या लोकांनी आम्हाला आता दमच दिलाय.

यावेळी मुलगा झाला तर ठीक, नाहीतर.. पोरीला तुमच्याच घरी घेऊन जावा..!
एकवेळ हत्ती पोसता येईल हो, पण जानजवान पोरीला घरात कशी आणि कोणत्या कारणाने ठेऊन घ्यावी.? असं म्हणून ती बिचारी ढसाढसा रडू लागली.
हे सगळं ऐकून, नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओलावल्या. मला खूप वाईट वाटलं. आपला समाज शहाणा तरी कधी होणार..? या विचाराने मी अगदी हवालदिल झालो. शेवटी काय आहे, यात मी सुद्धा त्यांची काहीच मदत किंवा हस्तक्षेप करू शकत नव्हतो. विषय फारच गंभीर होता. आपण काही बोलावं तर, विषयाला संशयाचं एक वेगळच वळण लागलं असतं. माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता.

शिवाय, देवाला प्रार्थना करण्याच्या..!
पाच दिवसांनी काही कामाने माझं पुन्हा एकदा त्या दवाखान्यात जाणं झालं. तेंव्हा, मला तिथे एक गोड बातमी मिळाली. त्या मुलीला 'मुलगा' झाल्याचं मला समजलं. मला तर, अगदी मनापासून आनंद झाला. मावशी सुद्धा त्या दिवशी खूप खुश दिसत होत्या. सगळं सासर सूनबाईचं कोडकौतुक करत होतं. बराच गोतावळा तिथे जमा झाला होता. त्यांना त्यांच्या वंशाचा दिवा मिळाला होता. आणि, या माय लेकीच्या आयुष्याचा दिवा विझता-विझता राहिला होता. बरं झालं, सुटल्या बिचाऱ्या त्या जाचातून..!
No comments:
Post a Comment