शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करायला आलेले तरुण कपल्स ( स्पेशली #D_Mart मध्ये. ) खूपच हुशार असतात.
त्यांच्या लहान मुलाला.. तिथे असणाऱ्या ट्रॉली मध्ये मस्तपैकी खाली पाय सोडून बसवतात. मॉल मध्ये असणारं एखादं चांगलं खेळणं त्याच्या हातामध्ये खेळायला देऊन, त्याला मस्त नादवतात.. आणि, त्या मोकळ्या ट्रॉली मध्ये तिथे असणारं काहीबाही जड सामान ठेऊन देतात.

मग.. त्या लहान मुलाला तिथेच सोडून, एक बास्केट घेऊन ताबडतोब ते सगळी खरेदी आटोपून येतात. हे सगळं करण्या मागचं कारण, मॉल मधून मुल काही चोरीला जाणार नसतं. आणि त्याला ट्रॉली मध्ये बसवलं असल्याने, ते कुठे हरवणार सुद्धा नसतं. आणि त्याला सोबत काखेवर घेऊन फिरवायचा त्रास सुद्धा वाचणार असतो. मुल रडायला लागल्यावर, कोणीतरी त्याची चौकशी करतच. त्यामुळे ते अगदी बिनधास्त वावरत असतात.
खरेदी करून आल्यावर, मुलाच्या हातातील खेळणं होतं त्या ठिकाणी परत ठेऊन देतात. नको असलेलं ट्रॉली मधील जड सामान, बाजूच्या ट्रॉली मध्ये ठेऊन देतात. आणि खरेदी केलेल्या सामानाचं बिल करून घरी निघून येतात.
आहे की नाही गंमत. ☺️👍
जस्ट किडींग..
No comments:
Post a Comment