Wednesday, 30 March 2016

परवा.. माझ्या कामातील एक मित्र..
बाजारात..नव्याने, फेशन म्हणून आलेलं. दोन्ही बाजूने पोकळी असणारं, आणि डोक्यावर टोपीसारखं घालता येणारं कापडी " चिरकुट " खरेदी करण्यासाठी बाजारात निघाला होता. तितक्यात, त्याला त्याच्या एका मित्राने टोकलं. 

"काय रे... कुठे निघाला आहेस..?
"फेशन स्ट्रीटला..!
"का.. काय खरेदी करायचं आहे तुला..?
"अरे.. ते नवीन नाही का आलं. ते डोक्यात टोपी सारखं घालतात ते. परत, तोंड सुद्धा झाकता येतंय त्याने. भारी आयटम आहे राव तो..!

त्या मित्राचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर, तो मित्र त्याला म्हणाला.

"वहिनी लेगीस वापरतात ना..!

खरं तर.. त्याचा हा प्रश्न ऐकून, तो मित्र थोडा चकराऊनच गेला होता. पण, धीर एकवटून तो त्याला हो म्हणाला..आणि, त्याला विचारता झाला.

"तर मग..?

"अरे.. वहिनींची एखादी जुनी लेगीस तुझ्या घरात असेलच कि. तिला, गुडघ्यातून कंबरे पर्यंत कापून घ्यायची. आणि तेच डोक्यात घालायला वापरायचं. दोन्ही एकच असतंय ते..!
 
हे सगळं ऐकणारा, तो मित्र तर अगदी बेशुद्ध पडायचाच बाकी राहिला होता. आणि, हा प्रसंग लिहून मी तर भलताच खुश झालो आहे..! 
कोण व्यक्ती, कशाचा, काय आणि कसा शोध लावेल त्याचा नियम नाही. 
पण त्याचबरोबर, 

" कंबरेचं सोडून, डोक्याला गुंडाळणे हा नेमका काय प्रकार असतो..! "

त्याची.. अनुभूती सुद्धा मला याची देहा मिळाली..!

Monday, 28 March 2016

घडवणारा, हा नेहमी..
चांगलंच घडवण्याचा 'प्रयत्न' करत असतो.
परंतु....
नेमकं, घडायचं काय आहे..?
हे सर्वस्वी,
त्या,घडणाऱ्यावरच 'अवलंबून' असतं..!

Tuesday, 22 March 2016

यावर्षी होळी न खेळण्याचा संकल्प करणाऱ्या, माझ्या प्रत्येक मित्राला, माझा हा सवाल आहे.
मला मान्य आहे, उभ्या महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष चालू आहे.
काही भागात, मी महाराष्ट्राच्या काही भागात म्हणतोय बरं का..! अगदी, पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध नाहीये. हि वस्तूस्थिती कधीही नाकारता येणार नाहीये. परंतु, ह्या आस्मानी संकटांना सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. आणि, हे काही आजचं आहे का..? दरवर्षीची हि बोंबाबोंब आहे. आणि त्यापासून आपण शिकलो काय..?
तर, काहीच नाही.
मित्रांनो.. आपल्यासाठी, हि फार मोठी दुर्दैवाची बाब आहे बरं का.!

बेसुमार जंगलतोडीमुळे.. आपल्याला हे सगळं पहावं, आणि भोगावं लागत आहे. राज्यातल्या इतर भागांची मला माहिती नाहीये. पण, पुण्यातील हिरव्यागार शेतावर सपाटीकरण करून त्याचं प्लॉटिंग कोणी केलं..? आम्हीच ना.
पुण्यातील हिरव्या भाज्यांचं आगर असणाऱ्या शेतांना, "मगरपट्टा सिटी " आणि "नांदेड सिटी " कोणी बनवलं..? आम्हीच ना.
मी हे जे लिहितोय  ते तर, माझ्या प्रत्येक पुणेकर मित्राला मान्य असावंच.
थोड्याफार फरकाने, संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी अशीच परिस्तिथी आहे. जंगलं नामशेष केली, आणि अजूनही होतायेत. हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाहीये. 
राजस्थानमध्ये.. आजचा नाही, तर कायमचा पाण्याचा तुटवडा असतो. दुष्काळ हा त्यांच्या पिढ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो.  भयाण रखरखीत वाळवंटाचे ते पिढीजात धनी आहेत.
तरी सुद्धा.. वर्षानुवर्षे, तिथे होळी किंवा रंगपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जातेच ना..?
वृंदावन, मथुरेमध्ये तर अगदी पंधरा दिवस अगोदर होळीचा उत्सव साजरा केला जातो. जिथे, खर्या अर्थाने पाण्याचा खरा तुटवडा आहे. तिथे, हे सण अगदी आनंदाने साजरे होत असतात. तर मग, आपणच नको तिथे का म्हणून माघार घ्यायची..? 
आपण, न चुकता रोजच्या रोज अंघोळ करतोच ना..! तेंव्हा, आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवत नाही का..?  ठराविक काळाकरिता, नको ती नाटकं मला बिलकुल मंजूर नाहीयेत. अलहिदा, मला तर हा खेळ मनापासून असा कधीच आवडला नाही. पण.. बायको मुलं, आणि मित्रांच्या आग्रहाखातर मी हा सन साजरा करत असतो. आणि, यात काही चुकीचं आहे असं सुद्धा मला वाटत नाही. आणि.. 
" होळी, धुळवड किंवा रंगपंचमी दिवशी सुद्धा प्रत्येक जन अंघोळ करणार आहेच ना..! "
कि नाही..?
तर मग.. रोजच्या प्रमाणे सकाळी अंघोळ न करता. रंग खेळून झाल्यावर, प्रत्येकाने अंघोळ करावी. आणि, तो खेळण्याचा रंग सुद्धा सुक्का असावा. याची दक्षता प्रत्येकाने घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून आपलं अंग जास्तीचं माखणार नाही. आणि, त्यादिवशी अंघोळीसाठी म्हणून पाण्याचा जास्तीचा अपव्यय सुद्धा होणार नाही. हि दोनेक पथ्य पाळली तर सगळीकडे रंगारंग कार्यक्रम असेल. यात कोणाचंच, बिलकुल दुमत आणि काडीमात्र शंका नसावी..!
नाही हो... अशाने एक-एक करता आपले सगळे सणवार नामशेष होतील. हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे. त्याकरिता, हा रंगीत संगीत लेखप्रपंच.. काही चुकलं असल्यास क्षमस्व. 
बुरा ना मानो भाई... होली है..!
" पाण्याचा अपव्यय टाळा. पण, प्रत्येकाने होळी जरूर खेळा..! "

Monday, 21 March 2016

छक्का, तृतीयपंथी, हिजडा..
आणखीन कोणकोणती नावं, यांना समाजाने बहाल केली असतील. ते देवच जाणो. आणि, मनुष्य जमातीमध्ये हा प्रकार नेमका घडतो कसा..?
सुरवातीला माझ्याकरिता हे फार मोठं कोडं होतं. पण अकरावीला असताना, अभ्यास
क्रमात मानसशास्त्र हा विषय घेतल्यानंतर शिक्षणाने मला त्यातील थोडी बहोत जान आली.
स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी.. 
सुरवातीच्या काळात, शालेय अभ्यासक्रमात, व्याकरण शिकत असताना. मला फक्त, ह्या तीन लिंगांचाच परिचय होता. त्यानंतर, कालांतराने
विषमलिंगी आणि " समलिंगी " ह्या नवीन प्रकाराची सुद्धा मला नव्याने आणि लाजवाब माहिती मिळाली.

तर.. ह्या तृतीयपंथी लोकांना छक्का हे नाव नेमकं कशामुळे पडलं असावं..? याच्या, मी खूप शोधात होतो. पण माझ्या आजवरच्या अभ्यासात मला त्याचं समाधानकारक उत्तर काही मिळालं नाहीये.
परंतु.. हिजडा किंवा हिजडे...!
ह्या शब्दाची सुंदर अशी उकल मला एकदा वाचायला मिळाली होती. परंतु त्यात, किती सत्यता होती, किंवा आहे ते मला माहित नाही..
फार वर्षांपूर्वी विदेशात.. तृतीयपंथी लोक, आठवड्यातील ठराविक एका दिवशीच. आपली उपजीविका भागवण्यासाठी घोळक्याने रस्त्यावर उतरत असत. बहुतेक तो वार म्हणजे आपला शुक्रवार असावा, असं पुसटसं आठवतंय. आणि, आठवड्यातील त्या ठराविक दिवशी त्यांना मुबलक बक्षिशी सुद्धा मिळत असे. कारण, हि लोकं इतर दिवशी पैस्या करिता कोणाला त्रास देत नसत. त्यामुळे, तेथील लोकांच्या सुद्धा ते अंगवळणी पडलं होतं.
म्हणून त्या ठराविक दिवसाला विदेशात " हिज डे " म्हणजे, यांचा दिवस असं संबोधत असत. आणि नंतर, ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन " हिजडा " हा शब्द प्रचलित झाला. असं माझ्या वाचनात आलं होतं. मस्त आहे ना ह्या नावाची उकल..!
तर.. समाजा पासून दुर्लक्षित असलेला हा घटक. अर्धांगी पुरुष असून सुद्धा, महिलांसारखा का वागत असेल..? हे मला, आजवर न उलगडलेलं कोडं आहे. सरळ आणि सोप्पा विषय आहे. हि लोकं पुरुषासारखी वागली तर काय फरक पडणार आहे..?
असो.. हा विषय फार गहन आहे. तूर्तास येथेच पूर्णविराम घेऊयात. 

Sunday, 20 March 2016

माझ्या माहितीप्रमाणे,
उभ्या महाराष्ट्रात.. पुणेरी भाषा, ( ती सुद्धा, सदाशिव किंवा नारायण पेठी ) अगदी सुस्पष्ट, सुवाच्य आणि नीटनेटकी अशी मान्यता पावलेली बोली भाषा आहे..!
तरी सुद्धा, पुण्यातील सगळीच लोकं अगदी सुस्पष्ट आणि सुवाच्य असं बोलत असतील. याची ग्वाही मात्र देता येत नाही. बऱ्याच अंशी, काही अस्सल पुणेकर सुद्धा 'तेंव्हा' या शब्दाला 'तवा' असं म्हणताना, तर.. 'कुठे' किंवा 'कोठे' ह्या शब्दाला 'कुठं' असं म्हणताना आढळतात. असे, आणखीन सुद्धा बरेच शब्द जाणकारांच्या स्मरणात असतील.
परंतु.. हाच अस्पष्ट बोलणारा पुणेकर, जेंव्हा एखाद्या ग्रामीण भागात जातो. आणि, तो जेंव्हा तेथील लोकांशी वार्तालाप करू लागतो. त्यावेळी, त्या समोरील व्यक्तीच्या ग्रामीण ढंगाच्या बोलीला उत्तर देत असताना. त्याच्या बोलीभाषेत, एक वेगळ्याच प्रकारचा सुस्पष्टपणा आलेला आढळतो. आणि.. हे सगळं काही ठरवून नाही, तर अगदी अपोआप घडत असतं.
त्याचं शरीरच, त्याला तशा प्रकारच्या सूचना देत असतं. आणि त्याचबरोबर, समोरचा ग्रामीण भागातील मनुष्य सुद्धा. आपल्या नेहेमीच्या बोलीभाषेत थोडासा बदल करून. त्या शहरी व्यक्ती सोबत, शक्य तितकं स्पष्ट आणि सुवाच्च बोलण्याचा प्रयत्न करत असतो. 

Thursday, 17 March 2016

नेता असो किंवा अभिनेता..
हा व्यक्ती,
कितीही खराखुरा, आणि धायमोकलुन जरी रडला.
तरी तो..
" अभिनयच " वाटतो...!

Monday, 14 March 2016

" आठवणी "
हा..
आयुष्य " जगण्यासाठी " मिळालेला..
एक,
सुंदर 'बहाणा' आहे...!
तू नाहीस म्हणून काय झाल..
आता,
या डोळ्यात..
किमान.. 'तुझ्या' आठवणींचे,
अश्रू तरी असतातच..!

Thursday, 10 March 2016

लेगीस परिधान करायची म्हंटल्यावर..

त्या महिलेचा,
तेवढा.. ठसठशीत बांधा सुद्धा असायलाच हवा..

नाहीतर, उगाचच..

सुकलेल्या फांदीवर, कापड गुंडाळल्याचा भास होतो मला..!

आहारशास्त्र सांगतं...
कि.. संपूर्ण दिवसात, किमान तीन लिटर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतं.
त्याकरिता.. सकाळी उठल्याबरोबर, झोपेतून म्हणतोय बरं का मी..!
सहाशे मिली पाणी, मी पीत असतो. आता तुम्ही म्हणाल, हे कसलं आडणीड मोजमाप..? 
आहे.. त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे.
किनले सोड्याची लहान बाटली, हो- हो तीच...जी, पाचशे मिलीवर शंभर मिली मोफत असते.
मी, रोज रात्री कधीतरी.. आणि, रोज सकाळी नित्यनेमाने..
हमखास त्याच बाटलीतील, पाण्याचा किंवा सोड्याचा पिण्याकरिता (?) मी वापर करत असतो.
तर.. मी, अगदी सकाळी अंघोळ करण्यापूर्वी सहाशे मिली पितो. त्यानंतर, नाश्ता.. म्हणजे, माझं जेवणच असतं बरं का. कारण, मी सहसा दुपारी जेवणं टाळतो.
कारण..
तेच हो.. " सकाळी राजा, दुपारी प्रधान आणि रात्री भिकारी..! ( जेवणाच्या बाबतीती )
हे तत्व, मी अगदी तंतोतंत पाळत आलोय बघा...
नाश्ता झाल्यावर, तासाभराने मी पुन्हा एकदा सहाशे मिली पाणी पीत असतो. कामावर जाताना, मी माझ्या सोबत एक लिटरभर पाण्याची बाटली नेत असतो. दिवसभरात ती पाण्याची बाटली संपवून, जादाचं असं माझं एक- दोन ग्लास पाणी पिणं होतच. शिवाय, त्याच्या जोडीला कधीतरी..
नारळपाणी, संत्र्या मोसंबीचा ज्यूस, मसाला ताक किंवा लिंबू सरबत, मी आवर्जून पीत असतो.
शिवाय.. रात्री घरी आल्यावर, संध्याकाळचं जेवण उरकल्यावर तासाभराने..
सहाशे मिली पाणी मी पितो. आणि झोपण्याअगोदर, एक विशिष्ट चूर्ण मिसळून पेलाभर कोमट पाणी मी घेत असतो.
असं, जवळ-जवळ.. दिवसभरात मी तीन ते चार लिटर पाणी नक्कीच पीत असतो.
आणि चुकून... चुकून बरं का..!
मी कधी " घ्यायची " ठरवली. तर, तिच्याबरोबर हि ( म्हणजे सोडा ) सहाशे. आणि, पाणी पाचशे. असं मिळून, एखाद लिटरचा वाढीव कोठा नक्कीच होऊन जातो.
आता मला सांगा, मागणी तेवढा पुरवठा केल्यावर. आपण, किंवा आपलं शरीर कधी आजारी पडेल का..? आणि, आता तर उन्हाळा सुरु झाला आहे. शरीराकडून, पाण्याच्या मागणीत सुद्धा दुप्पट वाढ होतेय. आणि, पुरवठ्यात सुद्धा मी कुठेच कमी पडत नाहीये.
शिवाय.. उन्हाळ्यातील दिवसात संध्याकाळी थंडगार " बियर " ची आठवण सुद्धा नक्की होतेच. पण, रोज रोज नाही बरं का. खिशाला परवडायला नको का..!
शेवटी, 'पाणीच' हो ते...!
" थंडा-थंडा, कुल-कुल...,
बघा बुवा.. उन्हाळ्यात हि खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे.
नाहीतर असं करा, तुम्ही एकदा माझ्यासोबत बसा. मी तुम्हाला, सगळं काही बैजवार शिकवेन, आणि समजावेन सुद्धा. पण एक गोष्ट आहे बरं का...!
मला भेटण्या अगोदर, महिनाअखेर ठरवून येऊ नका. नाहीतर मग, किमान तुमच्या खिशातील पाकीट तरी तेवढं भरगच्च ठेवा.
बरं का...! 

Tuesday, 8 March 2016


( सल..)
========
नव्हताच बांध ज्याला, त्यास पापणी मी म्हणालो.
पोकळी ती अभ्रकाची, त्यास बासुरी मी समजलो.
ओठास चाहूल मोठी, त्या दीर्घ चुंबनाची.
मी बासुरी सवे माझा, जन्म बडवीत गेलो.
विळख्यात ह्या जीवाच्या, रग फार होती मोठी.
मी काबाड कष्ट करुनी, ती खाज जिरवली होती.
तिला पाहुनी ह्या जीवाला, फुटतात लक्ष खुमारे.
तो देह कमनीय होता, हाती चोळले म्या निखारे.
का कोणती परीक्षा, मज द्यावयाची होती.
शुभ्र कांतीवर तिच्या, अक्षता फेकल्या मी हातांनी.
का सांगू हा प्रताप, मी बावळाच शुद्ध न्यारा.
कौला कडे बघोनी, मज नीज लागे पसारा.

~ पंडित ~

आज..
सगळ्या महिलांना शुभेच्छा द्यायच्या नादात.
नेमकं, माझ्या बायकोलाच शुभेच्छा द्यायचं मी विसरून गेलो.
त्यामुळे..
घरी आल्याबरोबर पहिली तिला,
एक, गोड-गोड..
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
क्याडबरी दिली बघा...!

Monday, 7 March 2016

महिला, किती " सहनशील " असतात..!

काही मुलींना, दुर्दैवाने आईच्या उदरातच मारलं जातं. तर काहींना, जिवंतपणी नरकयातना सहन करत सगळं आयुष्य दुखः वेचत कंठावं लागतं. मुलगी म्हणजे, आपल्या खांद्यावर असलेला एक मोठा बोजा आहे. असं समजणारा प्रत्येक पालक.. त्या महिलेचा, मुलीचा, मातेचा फार मोठा गुन्हेगार असतो. असं धाडसी वक्तव्य मी इथे करू इच्छितोय.
स्त्री हि.. क्षणिक काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. हे आपण, प्रत्यक्ष आचरणात कधी आणणार आहोत..? हा, फार मोठा प्रश्न आज आपल्यासमोर आ वासून बसला आहे.

लहानपणी नकळत्या वयात, आपलं बालपण विसरून. तिच्यापेक्षा, फक्त दोनेक वर्षांनी लहान असणाऱ्या भावंडांना आपल्या काखेवर घेऊन खेळवणारी ती लहान बाहुली. मला बालपणीच माता झाल्यासारखी जाणवते. का कोण जाने, पण ती जान तिला उपजतच आलेली असते. तमाम महिला मंडळींना, परमेश्वराने बहाल केलेली ती एक अनोखी देणगीच असावी..
घराला हातभार म्हणून, सकाळी सडा संमार्जन उरकून स्वयपाकघरात आईला मदत करणारी आपली भगिनी. मला तर ती मुलगी, अन्नपूर्णेचा दुसरा अवतारच वाटते. धाकल्या भावंडांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून, आपल्या इच्छा आकांक्षांना तिलांजली वाहत. एखादा प्रायव्हेट जॉब पत्करून, घराची आणि आपल्या लग्नाची आर्थिक धुरा स्वतःच्या खांद्यावर उचलणारी ती मुलगी. मला साक्षात लक्ष्मी मातेच्या रुपात दिसते.
शरमेने, आई वडिलांची मान खाली झुकू नये म्हणून. ते बोट दाखवतील त्या मुलाबरोबर आपला संसार थाटनाऱ्या मुलींच्या अंगी नेमकं कोणतं धाडस असतं..? त्याची मी, आजवर उकल करू शकलो नाहीये. पुढे चालून, तो नवरा मुलगा चांगला निघालाच नाही. तर त्या घडणाऱ्या घटनेला तिलाच दोषी ठरवलं जातं. आणि नाईलाजाने किंवा कर्मधर्मसंयोगाने नशिबाचे भोग म्हणून, कंबर कसून कामाला लागणारी ती मुलगी मला आई सरस्वतीच्या रुपात दिसते.

तर कधी.. तिला मिळालेल्या शापित सौंदर्याला लपवताना. शेकडो स्त्रीलंपट व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून. अगदीच नाईलाज म्हणून, मेटाकुटीला येऊन त्या नराधमाचा संहार करणारी मुलगी मला प्रत्यक्षात दुर्गामातेच्या अवतारात दिसते. तर कधी, नवऱ्याच्या मृत्युपश्चात आपल्या भावनांना मुरड घालत. हयात असेपर्यंत दुःखाचा डोंगर आपल्या शिरावर झेलणाऱ्या मातेकडे पाहताना. माझ्या अश्रूचा बांध फुटून कधी मोकळा होतो. ते, माझं मला सुद्धा समजत नाही.

हे भोग, फक्त स्त्री जातीलाच का..?
हा प्रश्न, मी खुद्द परमेश्वरला सुद्धा विचारू शकत नाही. कारण, परमेश्वराने स्त्री आणि पुरुषाची निर्मिती करत असताना. दोघांच्याही पारड्यात, अगदी भरभरून असं सगळं काही समसमान आणि तोलामोलाचं दिलं होतं. पण समस्त पुरुष जातीने, स्त्रीवर अधिराज्य गाजवून तिला काळाच्या उदरात गाडून टाकलं आहे. आजच्या स्त्रीने, जी काही उंच भरारी घेतली आहे. ती पाहताना, माझा उर अगदी आनंदाने भरून येतो. पण, हा सोनेरी दिवस जेंव्हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येईल. तेंव्हाच, मानव जातीतली हि दरी खऱ्या अर्थाने मिटल्याचा मला मनापासून आनंद होईल..
आई, बहिण, बायको, मुलगी... अशी विविध नाती जपणाऱ्या. नारीच्या उचित सन्मानासाठी, आजचा दिवस जागतिक " महिला दिन " म्हणून आपण साजरा करत असतो. पण मला वाटतंय, हा दिवस आपण रोजच्या रोज आणि अगदी आनंदाने साजरा करायला हवा आहे. कारण, स्त्रीशिवाय आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
" पुरुषाशिवाय स्त्री जरी अधुरी असली. तरी स्त्रीशिवाय हा सगळा संसार अधुरा आणि अपूर्ण आहे. " हे मला, इथे प्रामाणिकपणे सांगावसं वाटतंय..
.
आजच्या ह्या सुंदर दिवशी, इथे असणाऱ्या माझ्या तमाम माता, भगिनींना माझा मनपूर्वक सप्रेम नमस्कार. आणि, पृथ्वीतलावर असणाऱ्या समस्त नारी वर्गाला माझा मानाचा मुजरा आहे..!

बाईक वर बसताना..
काही मुली, मुलांना इतकं चिटकून बसतात.
कि, बस रे बस..
दोघांमधुन, अगदी वारा जाईल तर शपत..
हे दृष्य पाहुन, मला असं वाटतं.
कि..
आता..ती मुलगी त्या मुलाच्या शरीरात घूसतेय कि काय..!
मला वाटतंय...
"परकाया प्रवेश" कि काय, म्हणतात ना. बहुतेक,
त्याची हि पहिली पायरी असावी...!

Thursday, 3 March 2016

सुरवातीच्या काळात..
नव्याने आलेला 'टीव्ही' म्हणजे माझा अगदी आवडता सोबती होता. पण दुर्दैवाने... मला, त्याची खास सोबत मिळत नव्हती.
कारण, तेंव्हा आमच्या घरी टीव्ही नव्हता ना..!

कालांतराने.. आमच्या घरी सुद्धा एक कृष्ण धवल टीव्ही आला. आणि, माझा आवडता सोबती मला मिळाला. तेंव्हा प्रदर्शित होत असणाऱ्या नवनवीन हिंदी मालिका. माझ्या मनाला, खूप भुरळ घालायच्या. कारण, त्या मालिका आठवड्यात फक्त एकदाच लागायच्या. म्हणून, त्या येणाऱ्या नवीन भागाची मी चक्क आठवडाभर चातका सारखी वाट पाहायचो.
त्यानंतर.. 'शांती' नावाची एक नवीन सिरीयल काय आली. आणि, टीव्हीवर रोजच्या रोज मालिकांचा रतीबच सुरु झाला. आणि तेंव्हा, मला सुद्धा.. तो 'टीव्ही' कुठेतरी इडियट बॉक्स वाटू लागला. त्यानंर मात्र, मी टीव्हीकडे साफ दुर्लक्ष केलं..

नाही म्हणता, सुरभी सारखे कार्यक्रम मी आवर्जून पाहायचो. हल्ली मला टीव्ही पाहायला मिळत नाही. किंवा वेळ नसतो म्हणा. कारण, मी 'इथेच' पडीक असतो ना..
तरी सुद्धा, मी वेळात वेळ काढून " इपिक " नावाचा नवीन सुरु झालेला चानल मात्र अगदी हौसेने पाहत असतो बरं का..
मस्तच.. मला हा भरगच्च कार्यक्रम असणारा चानल फारच आवडतो. फारच नवनवीन माहित्या धार्मिक गोष्टी यात दाखवल्या जातात. या चानल मधील माझा आवडता कार्यक्रम म्हणजे..

" राजा रसोई और कहाणीया "

खानं, पिणं हा माझ्या खास आवडीचा विषय आहे. म्हणून, हा कार्यक्रम मला फार आवडतो.
आपण सगळे, महाराष्ट्रीयन जरी असलो.. तरी, रोजच्या नाश्त्यात.. पोहे, उपीट, शिरा याचबरोबर दक्षिणेतील " इडली सांबर " सुद्धा आपल्या, खूपच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. मला तर, ते मद्रासी पद्धतीने बनवलेलं आंबटगोड 'रस्सम' सुद्धा फार आवडतं. पण, ह्या वेगवेगळ्याप्रकारे तयार झालेल्या पदार्थाची नावं का आणि कशामुळे पडली असतील..? ते मात्र, आपल्याला माहीत नसतं.

तर, आज हा इपिक चानल पाहत असताना मला एक भव्य दिव्य माहिती ऐकायला मिळाली. शहाजी महाराज, दक्षिणेत राज्य करत त्या दरबारी चाकरीला होते. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुद्धा दक्षिणेत आपली मोहीम नेली होती. पण, फारच कमी लोकांना हि माहिती असावी..कि संभाजी महाराज सुद्धा दक्षिणेत जाऊन आले होते..!

तर.. त्याकाळी, संभाजी महाराज दक्षिणेत गेले असता. तेथील खानसामा लोकांना प्रश्न पडला. कि येवढा मोठा राजपुत्र, आपल्या दरबारी येत आहे. तर, त्यांचं स्वागत करण्याकरिता आपण कोणता तरी खास पदार्थ बनवला पाहिजे. तर त्यावेळेस, तेथील खानसामा लोकांनी. खास त्यांच्या स्वागतासाठी म्हणून,एक नवीन द्रवपदार्थ बनवला..
आणि, संभाजी महाराजांच्या स्वागताप्रीत्यर्थ त्या नव्याने बनवलेल्या द्रव पदार्थाचं नवीन नामांतर केलं. " सांभार " किंवा सांबर जे, संभाजी महाराजांच्या नावाशी साधर्म्य सांगतं. अशा वेगळ्या पद्धतीने, त्याठिकाणी शंभू राजांचं स्वागत केलं गेलं होतं. हि आम्हा सर्वांकरिता निश्चितच अभिमानाची गोष्ट असावी.

आहे कि नाही मजेशीर आणि आवडती गोष्ट. आपण म्हणत असलेला इडियट टीव्ही कधी-कधी आपल्याला खूप सुंदर माहित्या सुद्धा देऊन जातो बरं का..

Wednesday, 2 March 2016

पोस्टमार्टम..

o हं चला.. आवरा ना आता लवकर...!
- का.. एवढी कसली घाई लागली आहे तुला. आत्ताच तर आलोय आपण. आणि लगेच,
o आवरा हो लवकर, माझ्या घरी लहान मुलीला मी कोणाकडे तरी ठेवून आले आहे.
- अरे व्वा...किती वर्षांची मुलगी आहे तुला.?
o दोन वर्षांची आहे..!
- आणि, तुझे मिस्टर..?
o आहेत, कंपनीत कामाला आहेत ते.
- आगं.. मला एका गोष्टीची कमाल वाटतेय. तुझा येवढा चांगला हसता खेळता संसार असताना, तू हे असले नको ते 'धंदे' का म्हणून करतेयस..?
o हे बघा.. तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा. नको त्या चौकशा कशाला करताय..?
- आगं.. तू दिसायला किती सुंदर आणि सोज्वळ आहेस. तुला पाहून कोणी अशी कल्पना सुद्धा करू शकणार नाही. कि तू हे असलं काम करत असशील. तुला असं वाटत नाही का, कि तुझ्या घरच्यांची तू फसवणू करत आहेस..?
o आणि.. तुम्हाला पाहून कोण म्हणेल, तुम्ही तर चांगल्या घरातले दिसत आहात. तरी सुद्धा बाहेरख्याली पणा करत असाल म्हणून..?
- हाहाहाहा... रागावलीस वाटतं, बरं ते जाउदेत..!
o का..? ते का म्हणून जाऊदेत..? तुमच्या बायकोने तुम्हाला मोकळे पणाचं सर्टिफिकेट दिलं आहे का. बाहेर जावा, आणि तुमच्या मनाला वाट्टेल ते करा..!
- तसं नाहीये गं बाई, पण तू हे जे काही करत आहेस ते बाकी मला पटत नाहीये.
o ठीक आहे... नाही करत, माझे पैसे चुकते करा. मी अशी निघून जाते..
- अरे बापरे, अगं बस गं... तुझ्या नाकावर राग मात्र लगेच येतो बरं का..!
o तसं नाहीये.. रोजच्या त्याच-त्याच प्रश्नांना आता मी खूप कंटाळले आहे. किती लोकांना तेच-तेच आणि पुन्हा-पुन्हा सांगायचं. हे सगळं, ऐकणाराला तर खूप मजा वाटत असते. पण सांगताना, माझं काळीज तीळतीळ तुटत असतं. हे कोणाला समजलं तरच. असली कामं, कोणी हौसेने करत असतं का..?
- बरं जाऊदेत.. एकदा माझ्याकरिता, तू मला ते सगळं सांगच. ए डार्लिंग, सांगतेस ना..!
o काय सांगू... माझं मेलीचं नशीबच फुटकं आहे. नवरा मस्त धडधाकट आहे. पण आता तो माझ्या काहीच कामाचा उरला नाहीये.
- कामाचा नाही..! मग तुला मुलगी कशी झाली..?
o हो..तेवढेच 'त्राण' होते त्याच्या अंगात. नाहीतर, आता तर तो माझ्या काहीच 'कामाचा' उरला नाहीये. माझ्या, मदमस्त जवानीला त्याला स्पर्श सुद्धा करावासा वाटत नाही. ह्या बाबतीत अगदी उदासीन आणि 'कमी' आहे तो..!
- ठीक आहे.. पण त्याकरिता, तुला हाच एकमेव मार्ग उरला होता का..? अजूनही बरेच मार्ग होते. तुझी हौस भागवणारा व्यक्तीच तुला हवा होता ना. तर मग, तुझ्या जाळ्यात तर कोणताही पुरुष अलगद अडकला असता. आणि, तुझा कार्यभाग सुद्धा उरकला असता..!
o हं... मी, ते सुद्धा करून पाहिलं आहे. पण, शेवटी पुरुषच तो. आलाच त्याच्या जातीवर.
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, सुरवातीला मी सुद्धा हाच विचार केला होता..
वर्षभरापूर्वी.. एक तरुण मुलगा माझ्या आयुष्यामध्ये आला होता. तो.. अंगापिंडाने, आणि दिसायला सुद्धा खूपच सुंदर होता. मला, भरपूर आणि हवं तेवढं सुख देत होता. समाधानी ठेवत होता. पण, कालांतराने..
तो सुद्धा, माझ्या शरीराचे लचके तोडायला लागला. माझा, वापर करू लागला. मला ब्लेकमेल करू लागला. माझ्या, मजबुरीचा फायदा उचलू लागला. त्याने तर, माझं जीवनच हराम करून टाकलं होतं. शेवटी वैतागून, त्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी मी ते गावच सोडून दिलं. खूप त्रास झाला मला त्या गोष्टीचा. नालायक मनुष्य कुठला..!
- म्हणून.. इथे आल्यावर, तू हा व्यवसाय स्वीकारलास..?
o हो... असल्या फालतू मुलांच्या जाळ्यात फसण्यापेक्षा. तुमच्या सारखे, हौसेचे आणि नादिक असलेले लोकं मला कधीही चांगलीच वाटतात. तुमच्या सहवासात मला आनंद हि मिळतोय. आणि, सोबतच पैसा सुद्धा मिळतोय. आणि, रोज नवनवीन सहवास सुद्धा. पण, त्या रोजच्या सहवासात एक वेगळंच प्रेम असतं. वासना अशी मुळीच नसते. आज, तुमच्या डोळ्यात सुद्धा मला तेच प्रेम दिसतंय, वासना नाही. चला तर मग, मला तुमचा मोबदला द्यायची वेळ झाली आहे..
.
एवढं बोलून.. तिने, आपल्या केसात रुतलेला चिमटा बाहेर काढला. केसांना, सैल आणि मोकळं उधान दिलं. काचोळीचं करकचलेलं पहिलं बटन तट्ट करून उघडलं गेलं. त्याबरोबर तिच्या गोऱ्यापान देहाचं, त्याला यथोचित दर्शन घडू लागलं. तो हि, बेधुंदपणे हलकेच तिच्या बाहुपाशात विसावला.
आणि, विषयाला पूर्णविराम मिळाला..
तू जर तुझा " रुबाब " सोडला नाहीस.
तर, नाईलाजाने..
मला,
" शबाब " शी मैत्री जोडावी लागेल..!

Tuesday, 1 March 2016

ह्या पृथ्वीतलवार जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती,
उभ्या आयुष्यात एका तरी शिवीचा नक्कीच प्रयोग करत असेल. असं, माझं ठाम मत आहे....
मग त्यात, त्या शिव्या सुद्धा बऱ्याच प्रकारच्या आल्या. महिलांच्या वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या..
अगदी.. मा ते भे पासून सुरु होणारी हि शिव्यांची जंत्री. थेट, महिलांच्या.. हलकट, लोचट या शिव्यांपर्यंत. ते, कमीतकमी गंभीर प्रभाव असणाऱ्या साध्यासुध्या शिव्यांपर्यंत,
म्हणजे.. नालायक, मूर्ख ते हरामखोर..
साधारणपणे 'सभ्य' लोकं, या वरील शिव्यांचा प्रयोग करत असतात. असं माझ्या पाहण्यात आलं आहे..
बाळासाहेबांनी ( ठाकरे ) त्यांच्या एका भाषणातून, जनमानसांना एक खडा सवाल विचारला होता.
शिव्या काय मी बनवल्या आहेत का..? नाही ना, तर मग मी बिनधास्त शिव्या देणार.
आणि काय आहे, त्या शिव्या बनवण्या पाठीमागे काहीतरी हेतू नक्कीच असणार आहे. आणि, कोणतीही वस्तू किंवा शब्द वापरात असला तरच तो टिकून राहतो. नाहीतर, त्याचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. कालांतराने, त्या शब्दांना सुद्धा नक्कीच गंज चढतो. आणि, ते शब्दप्रयोग कालांतराने कालबाह्य होतात. असं सुद्धा, आपल्याला पाहायला मिळतं.
मी सुद्धा आजवर, बऱ्याच शिव्यांचा बिनदिक्कतपणे प्रयोग केला आहे. काही शिव्यांचा उच्चार करताना, मला सुद्धा, काही काळाकरिता एकप्रकारचा आसुरी आनंद मिळत असतो.
बऱ्याचदा, ठराविक एका विशिष्ट परिसरामध्ये माझं जाणं होत असतं. त्याठिकाणी तर, मला अगदी अस्सल ठसकेबाज धाटणीच्या शिव्या ऐकायला मिळतात. कि त्या शिव्या ऐकून, ह्या सुद्धा शिव्या असू शकतील का..? याची फक्त मी कल्पनाच करत असतो. कारण, त्या शिव्या अगदी मोठमोठ्या वाक्क्यामध्ये असतात. भल्या मोठ्या आणि लांबलचक शिव्या, कि त्यातून समोरच्या व्यक्तीला किंवा स्त्रीला जे काही बोलायचं आहे. ते सगळं काही, अधोरेखित होत असतं. ते सुद्धा, चक्क शिव्यांच्या माध्यमातून.
कोल्हापूर सारख्या भागात, रांडीच्या हि अगदी लाडाची शिवी आहे. कि, हि शिवी ज्या व्यक्तीला किंवा मुलाला उद्देशून दिली जाईल. तेंव्हा तो शिवी घेणारा व्यक्ती, नक्कीच सुखावून जात असतो. कारण, रांडेच्या हि आपुलकीची शिवी आहे. आणि, 'आपल्या' माणसांना देण्याकरिताच या शिवीचा सर्रास वापर केला जातो. खोलात विचार करायला गेलं तर, ह्या शिवीचा अर्थ सुद्धा तितकाच गंभीर आहे. पण या ठिकाणी, त्या शिवीचा 'तो' मतितार्थ फारसा खोलवर धरला जात नाही.
एकदा.. एका हिंदी भाषिक व्यक्तीच्या तोंडून, मला एक भयंकर शिवी ऐकायला मिळाली होती.
ती तरुण स्त्री, तोंडभर घुंगट घेऊन आपल्या मुलाला काखेवर घेऊन उभी होती. आणि तितक्यात, त्यांच्या नात्यामधील एक बुजर्ग व्यक्ती त्या स्त्री पाशी आला. आणि लाडाने, त्या मुलाला आपल्याकडे घेताना तो अगदी सहज म्हणून गेला..
आजा रे.. तेरे मैय्या को XX ..!
मी तर, हि शिवी ऐकून अगदी हक्काबक्का झालो होतो. परंतु, हि शिवी देणाऱ्या त्या गृहस्थाला किंवा ती शिवी आपल्याला उद्देशून दिली आहे. हे ऐकणाऱ्या त्या स्त्रीला, याबाबत काहीएक सोयरसुतक नव्हतं. तेंव्हा, त्याठिकाणी मी आपली अस्सल कोल्हापुरी 'रांडेच्या' ह्या शिवीला डोळ्यासमोर ठेवलं. आणि, त्या ठराविक भोजपुरी विषयाला मोडा घातला.
माझ्या माहितीप्रमाणे ह्या जगातली सगळ्यात भयंकर शिवी कोणती असेल.
तर ती म्हणजे.." नीच "
नीच, हा इतका भयंकर शब्दप्रयोग आहे. कि, त्याला मर्यादाच नाहीयेत. जगभरातल्या सगळ्या शिव्यांचा सार ह्या एकाच शिवीमध्ये सामावला गेला आहे. असं, माझं वैयक्तिक मत आहे.
बघा, जमल्यास ह्या शिवीवर तुम्ही सुद्धा एकदा गाढा अभ्यास करा.
ह्या शिवीची महती, तुमच्या ताबडतोब लक्षात येईल.
नीच म्हणजे, त्यात सगळं काही आलं. काहीएक उरत नाही. माझा एक सभ्य मित्र, दुसरी तिसरी कोणतीच शिवी वापरत नाही. पण, त्याचा राग एकदा का पराकोटीला गेला.
कि तो, फक्त एवढंच म्हणतो..
" अगदी 'लास्ट' माणूस आहे तो..! "
लास्ट म्हणजे, त्याला आता कोणतीच उपमा शिल्लक राहिली नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे, 'नीच' म्हणजेच 'लास्ट' आणि, लास्ट म्हणजेच नीच..
हीच जगातील अंतिम आणि एकमेवाद्वितीय शिवी असावी. कि जीचा प्रयोग केल्यावर. समजणारा लगेच आपली पातळी समजून जातो.
नाहीतर.. तोच नीचपणा तो पुढेही तसाच चालू ठेवतो.