Monday, 21 March 2016

छक्का, तृतीयपंथी, हिजडा..
आणखीन कोणकोणती नावं, यांना समाजाने बहाल केली असतील. ते देवच जाणो. आणि, मनुष्य जमातीमध्ये हा प्रकार नेमका घडतो कसा..?
सुरवातीला माझ्याकरिता हे फार मोठं कोडं होतं. पण अकरावीला असताना, अभ्यास
क्रमात मानसशास्त्र हा विषय घेतल्यानंतर शिक्षणाने मला त्यातील थोडी बहोत जान आली.
स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी.. 
सुरवातीच्या काळात, शालेय अभ्यासक्रमात, व्याकरण शिकत असताना. मला फक्त, ह्या तीन लिंगांचाच परिचय होता. त्यानंतर, कालांतराने
विषमलिंगी आणि " समलिंगी " ह्या नवीन प्रकाराची सुद्धा मला नव्याने आणि लाजवाब माहिती मिळाली.

तर.. ह्या तृतीयपंथी लोकांना छक्का हे नाव नेमकं कशामुळे पडलं असावं..? याच्या, मी खूप शोधात होतो. पण माझ्या आजवरच्या अभ्यासात मला त्याचं समाधानकारक उत्तर काही मिळालं नाहीये.
परंतु.. हिजडा किंवा हिजडे...!
ह्या शब्दाची सुंदर अशी उकल मला एकदा वाचायला मिळाली होती. परंतु त्यात, किती सत्यता होती, किंवा आहे ते मला माहित नाही..
फार वर्षांपूर्वी विदेशात.. तृतीयपंथी लोक, आठवड्यातील ठराविक एका दिवशीच. आपली उपजीविका भागवण्यासाठी घोळक्याने रस्त्यावर उतरत असत. बहुतेक तो वार म्हणजे आपला शुक्रवार असावा, असं पुसटसं आठवतंय. आणि, आठवड्यातील त्या ठराविक दिवशी त्यांना मुबलक बक्षिशी सुद्धा मिळत असे. कारण, हि लोकं इतर दिवशी पैस्या करिता कोणाला त्रास देत नसत. त्यामुळे, तेथील लोकांच्या सुद्धा ते अंगवळणी पडलं होतं.
म्हणून त्या ठराविक दिवसाला विदेशात " हिज डे " म्हणजे, यांचा दिवस असं संबोधत असत. आणि नंतर, ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन " हिजडा " हा शब्द प्रचलित झाला. असं माझ्या वाचनात आलं होतं. मस्त आहे ना ह्या नावाची उकल..!
तर.. समाजा पासून दुर्लक्षित असलेला हा घटक. अर्धांगी पुरुष असून सुद्धा, महिलांसारखा का वागत असेल..? हे मला, आजवर न उलगडलेलं कोडं आहे. सरळ आणि सोप्पा विषय आहे. हि लोकं पुरुषासारखी वागली तर काय फरक पडणार आहे..?
असो.. हा विषय फार गहन आहे. तूर्तास येथेच पूर्णविराम घेऊयात. 

No comments:

Post a Comment