यावर्षी होळी न खेळण्याचा संकल्प करणाऱ्या, माझ्या प्रत्येक मित्राला, माझा हा सवाल आहे.
मला मान्य आहे, उभ्या महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष चालू आहे.
काही भागात, मी महाराष्ट्राच्या काही भागात म्हणतोय बरं का..! अगदी, पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध नाहीये. हि वस्तूस्थिती कधीही नाकारता येणार नाहीये. परंतु, ह्या आस्मानी संकटांना सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. आणि, हे काही आजचं आहे का..? दरवर्षीची हि बोंबाबोंब आहे. आणि त्यापासून आपण शिकलो काय..?
तर, काहीच नाही.
मित्रांनो.. आपल्यासाठी, हि फार मोठी दुर्दैवाची बाब आहे बरं का.!
बेसुमार जंगलतोडीमुळे.. आपल्याला हे सगळं पहावं, आणि भोगावं लागत आहे. राज्यातल्या इतर भागांची मला माहिती नाहीये. पण, पुण्यातील हिरव्यागार शेतावर सपाटीकरण करून त्याचं प्लॉटिंग कोणी केलं..? आम्हीच ना.
पुण्यातील हिरव्या भाज्यांचं आगर असणाऱ्या शेतांना, "मगरपट्टा सिटी " आणि "नांदेड सिटी " कोणी बनवलं..? आम्हीच ना.
मी हे जे लिहितोय ते तर, माझ्या प्रत्येक पुणेकर मित्राला मान्य असावंच.
थोड्याफार फरकाने, संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी अशीच परिस्तिथी आहे. जंगलं नामशेष केली, आणि अजूनही होतायेत. हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाहीये.

राजस्थानमध्ये.. आजचा नाही, तर कायमचा पाण्याचा तुटवडा असतो. दुष्काळ हा त्यांच्या पिढ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. भयाण रखरखीत वाळवंटाचे ते पिढीजात धनी आहेत.
तरी सुद्धा.. वर्षानुवर्षे, तिथे होळी किंवा रंगपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जातेच ना..?
वृंदावन, मथुरेमध्ये तर अगदी पंधरा दिवस अगोदर होळीचा उत्सव साजरा केला जातो. जिथे, खर्या अर्थाने पाण्याचा खरा तुटवडा आहे. तिथे, हे सण अगदी आनंदाने साजरे होत असतात. तर मग, आपणच नको तिथे का म्हणून माघार घ्यायची..?

आपण, न चुकता रोजच्या रोज अंघोळ करतोच ना..! तेंव्हा, आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवत नाही का..? ठराविक काळाकरिता, नको ती नाटकं मला बिलकुल मंजूर नाहीयेत. अलहिदा, मला तर हा खेळ मनापासून असा कधीच आवडला नाही. पण.. बायको मुलं, आणि मित्रांच्या आग्रहाखातर मी हा सन साजरा करत असतो. आणि, यात काही चुकीचं आहे असं सुद्धा मला वाटत नाही. आणि..
" होळी, धुळवड किंवा रंगपंचमी दिवशी सुद्धा प्रत्येक जन अंघोळ करणार आहेच ना..! "
कि नाही..?
कि नाही..?
तर मग.. रोजच्या प्रमाणे सकाळी अंघोळ न करता. रंग खेळून झाल्यावर, प्रत्येकाने अंघोळ करावी. आणि, तो खेळण्याचा रंग सुद्धा सुक्का असावा. याची दक्षता प्रत्येकाने घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून आपलं अंग जास्तीचं माखणार नाही. आणि, त्यादिवशी अंघोळीसाठी म्हणून पाण्याचा जास्तीचा अपव्यय सुद्धा होणार नाही. हि दोनेक पथ्य पाळली तर सगळीकडे रंगारंग कार्यक्रम असेल. यात कोणाचंच, बिलकुल दुमत आणि काडीमात्र शंका नसावी..!
नाही हो... अशाने एक-एक करता आपले सगळे सणवार नामशेष होतील. हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे. त्याकरिता, हा रंगीत संगीत लेखप्रपंच.. काही चुकलं असल्यास क्षमस्व.
बुरा ना मानो भाई... होली है..!
" पाण्याचा अपव्यय टाळा. पण, प्रत्येकाने होळी जरूर खेळा..! "
No comments:
Post a Comment