Thursday, 10 March 2016

आहारशास्त्र सांगतं...
कि.. संपूर्ण दिवसात, किमान तीन लिटर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतं.
त्याकरिता.. सकाळी उठल्याबरोबर, झोपेतून म्हणतोय बरं का मी..!
सहाशे मिली पाणी, मी पीत असतो. आता तुम्ही म्हणाल, हे कसलं आडणीड मोजमाप..? 
आहे.. त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे.
किनले सोड्याची लहान बाटली, हो- हो तीच...जी, पाचशे मिलीवर शंभर मिली मोफत असते.
मी, रोज रात्री कधीतरी.. आणि, रोज सकाळी नित्यनेमाने..
हमखास त्याच बाटलीतील, पाण्याचा किंवा सोड्याचा पिण्याकरिता (?) मी वापर करत असतो.
तर.. मी, अगदी सकाळी अंघोळ करण्यापूर्वी सहाशे मिली पितो. त्यानंतर, नाश्ता.. म्हणजे, माझं जेवणच असतं बरं का. कारण, मी सहसा दुपारी जेवणं टाळतो.
कारण..
तेच हो.. " सकाळी राजा, दुपारी प्रधान आणि रात्री भिकारी..! ( जेवणाच्या बाबतीती )
हे तत्व, मी अगदी तंतोतंत पाळत आलोय बघा...
नाश्ता झाल्यावर, तासाभराने मी पुन्हा एकदा सहाशे मिली पाणी पीत असतो. कामावर जाताना, मी माझ्या सोबत एक लिटरभर पाण्याची बाटली नेत असतो. दिवसभरात ती पाण्याची बाटली संपवून, जादाचं असं माझं एक- दोन ग्लास पाणी पिणं होतच. शिवाय, त्याच्या जोडीला कधीतरी..
नारळपाणी, संत्र्या मोसंबीचा ज्यूस, मसाला ताक किंवा लिंबू सरबत, मी आवर्जून पीत असतो.
शिवाय.. रात्री घरी आल्यावर, संध्याकाळचं जेवण उरकल्यावर तासाभराने..
सहाशे मिली पाणी मी पितो. आणि झोपण्याअगोदर, एक विशिष्ट चूर्ण मिसळून पेलाभर कोमट पाणी मी घेत असतो.
असं, जवळ-जवळ.. दिवसभरात मी तीन ते चार लिटर पाणी नक्कीच पीत असतो.
आणि चुकून... चुकून बरं का..!
मी कधी " घ्यायची " ठरवली. तर, तिच्याबरोबर हि ( म्हणजे सोडा ) सहाशे. आणि, पाणी पाचशे. असं मिळून, एखाद लिटरचा वाढीव कोठा नक्कीच होऊन जातो.
आता मला सांगा, मागणी तेवढा पुरवठा केल्यावर. आपण, किंवा आपलं शरीर कधी आजारी पडेल का..? आणि, आता तर उन्हाळा सुरु झाला आहे. शरीराकडून, पाण्याच्या मागणीत सुद्धा दुप्पट वाढ होतेय. आणि, पुरवठ्यात सुद्धा मी कुठेच कमी पडत नाहीये.
शिवाय.. उन्हाळ्यातील दिवसात संध्याकाळी थंडगार " बियर " ची आठवण सुद्धा नक्की होतेच. पण, रोज रोज नाही बरं का. खिशाला परवडायला नको का..!
शेवटी, 'पाणीच' हो ते...!
" थंडा-थंडा, कुल-कुल...,
बघा बुवा.. उन्हाळ्यात हि खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे.
नाहीतर असं करा, तुम्ही एकदा माझ्यासोबत बसा. मी तुम्हाला, सगळं काही बैजवार शिकवेन, आणि समजावेन सुद्धा. पण एक गोष्ट आहे बरं का...!
मला भेटण्या अगोदर, महिनाअखेर ठरवून येऊ नका. नाहीतर मग, किमान तुमच्या खिशातील पाकीट तरी तेवढं भरगच्च ठेवा.
बरं का...! 

No comments:

Post a Comment