Sunday, 20 March 2016

माझ्या माहितीप्रमाणे,
उभ्या महाराष्ट्रात.. पुणेरी भाषा, ( ती सुद्धा, सदाशिव किंवा नारायण पेठी ) अगदी सुस्पष्ट, सुवाच्य आणि नीटनेटकी अशी मान्यता पावलेली बोली भाषा आहे..!
तरी सुद्धा, पुण्यातील सगळीच लोकं अगदी सुस्पष्ट आणि सुवाच्य असं बोलत असतील. याची ग्वाही मात्र देता येत नाही. बऱ्याच अंशी, काही अस्सल पुणेकर सुद्धा 'तेंव्हा' या शब्दाला 'तवा' असं म्हणताना, तर.. 'कुठे' किंवा 'कोठे' ह्या शब्दाला 'कुठं' असं म्हणताना आढळतात. असे, आणखीन सुद्धा बरेच शब्द जाणकारांच्या स्मरणात असतील.
परंतु.. हाच अस्पष्ट बोलणारा पुणेकर, जेंव्हा एखाद्या ग्रामीण भागात जातो. आणि, तो जेंव्हा तेथील लोकांशी वार्तालाप करू लागतो. त्यावेळी, त्या समोरील व्यक्तीच्या ग्रामीण ढंगाच्या बोलीला उत्तर देत असताना. त्याच्या बोलीभाषेत, एक वेगळ्याच प्रकारचा सुस्पष्टपणा आलेला आढळतो. आणि.. हे सगळं काही ठरवून नाही, तर अगदी अपोआप घडत असतं.
त्याचं शरीरच, त्याला तशा प्रकारच्या सूचना देत असतं. आणि त्याचबरोबर, समोरचा ग्रामीण भागातील मनुष्य सुद्धा. आपल्या नेहेमीच्या बोलीभाषेत थोडासा बदल करून. त्या शहरी व्यक्ती सोबत, शक्य तितकं स्पष्ट आणि सुवाच्च बोलण्याचा प्रयत्न करत असतो. 

No comments:

Post a Comment