हिवाळ्यामध्ये, थंडी गारठ्यात...
जिकडे हात लावावा, किंवा पाय ठेवावा. तिकडे सगळीकडे, अगदी गार-गार असतं. नागव्या पायाने फरशीवर चालू वाटत नाही. हात धुवण्याचा विषय तर खूप दूर राहिला, साधा नळ सुद्धा चालू करावासा वाटत नाही.
गोबऱ्या गालावर आपला हात ठेवावा. तर, ते गाल कधीच काश्मीर मध्ये पोहोचलेले असतात. इवलूसं नाक तर, जागेवर आहे कि नाही. ते सुद्धा कळत नाही. कानाच्या पाळीचा तर निव्वळ बर्फच व्हायचा बाकी राहिलेला असतो. हातांनी, एकतर खिशांचा आधार घेतलेला असतो. किंवा, गपगुमान छातीशी घट्ट कवटाळून बसलेले असतात, इतकी भयंकर थंडी असते.
अशा, कडाक्याच्या थंडीमध्ये..
फक्त, 'टाँयलेट' मधुन आपला 'कार्यभाग' उरकून नुकतंच कोनी तरी बाहेर पडलं असेल.
फक्त, 'टाँयलेट' मधुन आपला 'कार्यभाग' उरकून नुकतंच कोनी तरी बाहेर पडलं असेल.
आणि, योगायोगाने आपली तिथे 'एंट्री' झाली.
तर,
तर,
ते " कमोड सिट " तेवढं ऊबदार लागतं बघा..!
No comments:
Post a Comment