माझा एक मित्र आहे....
रोज सकाळी कामावर आल्यावर मला तो आवर्जून सांगत असतो.

आज, माझ्या बायकोने मस्तपैकी मटकीची भाजी बनवली होती. भाजीसोबत मी मस्तपैकी दोन चपात्या मुरगळल्या, मस्तपैकी एक दुधाचा ग्लास मारला. आणि, आज डब्याला सुद्धा मटकीची भाजीच आणली आहे. " मस्तपैकी " आणि " मटकी " ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या अगदी जिवाभावाच्या आहेत.
आत्ता मध्यंतरी, आमची दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळी लोकं जेवायला निघून गेली, आणि तो मित्र मला म्हणाला. मला माहिती आहे, तू सकाळीच सगळं जेवणखाण उरकून येत असतोस. पण आता एक काम कर, माझ्याबरोबर हॉटेलमध्ये चल. आणि मला थोडी कंपनी दे.
मी सहजच त्याच्या चेहेऱ्याकडे पाहिलं. तर मला त्याच्या चेहेऱ्यावर टवटवी अशी जाणवली नाही. रोज अगदी प्रसन्न असणारा व्यक्ती आज अशा पडलेल्या चेहेऱ्यात का..? ते बाकी मला समजलं नाही.
बोलता-बोलता आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे त्याने एक व्हेज कटलेटची ऑर्डर दिली. आम्ही दोघांनी मिळून, ते कटलेट संपवलं. त्या खाण्याचं बिल चुकतं करून आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो. आणि तो मित्र मला म्हणाला..

हॉटेलचं खानं मला बिलकुल आवडत नाही, पण काय आहे नाईलाज असल्यावर काही करता येत नाही. मी त्याला म्हणालो, कसला नाईलाज..? काही गडबड वगैरे झाली आहे का..?
तर म्हणाला, गडबड वगैरे काही नाहीये रे. माझी बायको तिच्या वडिलांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला गेली आहे. त्यामुळे, माझ्या पोटाची इथे भलतीच आबाळ होत आहे.
मी त्याला म्हणालो, अरे मग तू सुद्धा वहिनी बरोबर गेला असतास..!
तर म्हणाला, नको रे.. माझ्या मुलांच्या फायनल एक्झाम चालू आहेत. त्यात व्यत्यय यायला नको. आणि अचानक मला आठवलं, त्याची मुलगी तर चक्क वीस वर्षांची आहे. मग हा जेवणाचा डबा न घेता ऑफिसला कसा काय आला..?

म्हणून मी सहजच त्याला म्हणालो, ते सगळं ठीक आहे. तुझी बायको घरात नसल्यावर, तुझी मुलगी स्वयपाक करत नाही का..?
तर म्हणाला.. काय बोलतोस तू, माझ्या मुलीला मी कलेक्टर बनवनार आहे. तिला असली स्वयपाकाची कामं सांगायची का..?
आणि खरं सांगायला गेलं तर माझ्या मुलीला स्वयपाक वगैरे काहीसुद्धा येत नाही. आणि त्याची काही आवश्यकता सुद्धा मला वाटत नाही..!

बापरे.. माझ्या मित्राच्या या उत्तरवार मी अगदी सैरभैर झालो होतो. मुलीच्या जातीला स्वयपाक येऊ नये, यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं. मुलगी लाख शिकेल, अगदी कलेक्टर किंवा कमिशनर सुद्धा होईल. शिक्षणाच्या जोरावर ती लाखो रुपये सुद्धा कमवेल,
पण या सगळ्या कालचक्रा मध्ये आपली विवाहसंस्था फार मोठं काम बजावून जाते. मुलगी एवढी शिकलेली आहे म्हंटल्यावर, तिचा होणारा नवरा सुद्धा अगदी तिच्या तोडीचाच पाहिला जातो. आणि, असे तोडीचे मुलं सुद्धा भरपूर मोठाले पगार घेत असतात. आणि चुकून, जर त्या मुलाला घरच्या जेवणाची आवड असेल तर..? रोजच्या भांडणाला कार सुरु झाला कि नाही..!

ती म्हणणार.. मी पैसे कमावतेय, आणि हा म्हणणार मला पैसे नको. मला तुझ्या हातचं मनासारखं जेवण हवं आहे. कारण, जीवनात आपण जी एवढी धावपळ करत आहोत, ती फक्त आणि फक्त आपल्या पोटाकरिताच चालू असते. आपण जे चांगलं चुंगलं खाऊ, तेच आपल्या सोबत नेऊ. याव्यतिरिक्त आपल्या सोबत काहीच येणार नाहीये.
आणि.. अशी काही प्रकरणं घडली, तर रागारागाने मुलं मुली तडकाफडकी विभक्त सुद्धा होऊ शकतात. पण लग्न म्हणजे काही पायातली चप्पल नाहीये, कि आज काढली आणि उद्या लगेच दुसरी नवीन घेतली. तुम्ही लाखो रुपये जरी कमवत असाल, तरी पैसे खाऊन कोणाचं पोट भरत नसतं. त्याकरिता अन्न हि एकमेव गरज असते.
मुली भरपूर शिकल्या तर त्याचा मला आनंदच आहे. पण त्या मुलींना स्वयंपाक येऊ नये, त्यांच्या घरून त्यांना अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळावं, किंवा त्यांनी स्वयंपाक करायला नकार देणं. हे कितपत योग्य आहे..?
या एकमेव कारणावरून, मी स्वतः दोन घटस्फोट झालेले माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. विशेष म्हणजे, त्या दोन्ही मुली कमवत्या सुद्धा नव्हत्या. परंतु, घरचं चांगलं असल्याने नेहेमीच्या हॉटेलिंग करण्याच्या सवयीमुळे नको त्या विषयाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. आणि मुख्य म्हणजे, या गोष्टीला त्या मुलीच्या आईवडिलांचा सुद्धा दुजोरा होता. हि फार मोठी खेदाची गोष्ट होती.

या माध्यमात सुद्धा मी बऱ्याच अशा महिला पाहिल्या आहेत. कि ज्यांचं खूप मोठं शिक्षण झालं आहे. पण त्या स्वयपाक बनवण्यात सुद्धा तितक्याच वाकबगार आहेत. किंवा, स्वयपाक बनवण्याची त्यांना लाज वाटत नाही. त्या विषयाकडे त्या एक कला म्हणून पाहत असतात.
त्यांचं एकवेळा मला इथे अभिनंदन करू वाटत आहे
वानगीदाखल.. आमच्या Ramaa Atul Nadgauda ताई, कवियत्री आहेत. आणि नाट्य सृष्टीत सुद्धा कार्यरत आहेत. Disha Naik वहिनी पदविका पास आहेत, Sadhana Verma ताई स्वतः एक उद्योजिका आहेत. Anjali Jagannath Dixit ताई तर पेशाने डॉक्टर आहेत. Surekha Kasbe ताई, शिक्षिका आहेत. Ratna Kale Joshi ताई, उच्चशिक्षित एन.आर.आय. आहेत. Dipa Dalvi ताई तर एक नंबर सुगरण आहेत. नम्रता माळी पाटीलत सुद्धा शिक्षिका आहे. Sadhana Revankar ताईच्या घरी तर फार मोठा व्यवसाय आहे. वेळ पडली तर त्या दोन चार बायका घरात कामाला ठेऊ शकतात. Sujata Shembekar S जी सुद्धा फार उच्चशिक्षित आहेत. त्यांनी काही वर्षे मरीन मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. Manisha Kulkarni ताई तर, मुंबई मधील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. शिवाय त्या संगीत विशारद सुद्धा आहेत. पण जेवण बनवण्यात सुद्धा एकदम मास्टर आहेत. आणि आमची Kanchan Nilesh Bhave ताई तर चक्क इंजिनियर आहे.

वरील सर्व महिला, या माझ्या फेसबुक वरील ओळखीतल्या आहेत. आणि या सगळ्याच अगदी उच्चाविध्याविभुशीत सुद्धा आहेत. शिवाय या सगळ्याजनी, गडगंज घरच्या आणि कमवत्या सुद्धा आहेत. मनात आलं तर, स्वयपाक बनवण्यासाठी त्यांच्या घरात त्या एखादी बाई कामाला सुद्धा ठेऊ शकतात. पण त्या तसं करत नाहीत. किंवा त्यांना स्वतःलाच ते आवडत नाही. कारण, घरच्या माणसाला आपल्याच हातचं जेवण असावं. या विषयवार या सगळ्याजणी अगदी ठाम आहेत.
सगळी व्यवसायिक कामं करत असताना, त्या स्वयपाक कामात सुद्धा खूप सुगरणी आहेत. हे मला इथे अगदी अभिमामाने सांगावसं वाटतं.

जास्ती शिकलं म्हणजे, स्वयपाक पाणी करायचा किंवा शिकायचा नसतो. हे साफ चुकीचं आहे, असं मला वाटतं. आणि वर नावं लिहिलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ते सपशेल खोटं ठरवलं आहे, ज्याला खायची आवड आहे, त्याला बनवायची सुद्धा आवड निर्माण होते.
त्याला उदाहरण म्हणजे, मी स्वतः आहे.
मला वेगवेगळे पदार्थ खायला जसे आवडतात. तसे मला निरनिराळे पदार्थ सुद्धा बनवता येतात बरं का. मला फक्त भाकरी बनवायला येत नाही. नाहीतर, मी तुम्हाला हवे ते पदार्थ माझ्या हाताने बनवून खाऊ घालू शकतो. इतकंच काय, तर खुद्द माझ्या बायकोला सुद्धा मी बरेच पदार्थ बनवायला शिकवलं आहे. मी पुरुष असून सुद्धा अशा कामात फार मोठी रुची ठेवत असतो. तर मग, नवतरुण महिलांनी किंवा उच्चशिक्षित मुलींनी तरी या विषयात मागे का असावं..?.
मुलगा कितीही गर्भश्रीमंत असुध्यात, पण तो जर कोणतंही काम न करता घरात बसून तुकडे मोडत असेल. तर हि गोष्ट कोणत्याच महिलेला पटणार नाही. काही अंशी हा विषय सुद्धा अगदी तसाच आहे.

मला, माझ्या त्या मित्राचं बोलणं बिलकुल पटलं नाही. मुलगी कमवती जरी झाली, तर ती फारतर घरामध्ये एखादी स्वयपाकीन बाई कामाला ठेवेल. पण कधीतरी एक विरंगुळा म्हणून किंवा आवड म्हणून तरी स्वयपाक यायलाच हवा असं माझं मत आहे.
कारण, विवाहसंस्थेत प्रेमाचे सगळे मार्ग हे पोटातूनच जात असतात. असं माझं ठाम मत आहे. यावर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा असू शकतात.

पण, बाईच्या जातीला जेवण बनवता आलंच पाहिजे. या मतावर मी अगदी ठाम आहे.
( टीप :- महिला म्हणजे घरगडी आहेत का..? आम्ही फक्त चूल आणि मुल हेच पहायचं का..? अशा आशयाची " विचारसरणी " असणाऱ्या पुरुष आणि महिलांनी, या पोस्टवर बिलकुल फिरकू नये. अपमान केला जाईल..! )
No comments:
Post a Comment