हल्ली.. ब्राह्मण समाजातील तरुण पिढी.
पौरोहित्य ( भिक्षुकी ) करण्यासाठी धजावत नाही. त्याला, कारणं सुद्धा तशीच आहे. भरपूर शिक्षण झाल्यामुळे, आपआपल्या समाजातील पारंपारिक व्यवसाय करायला सर्रास मुलं नको म्हणत म्हणतात. पौरोहित्य करणाऱ्या मुलांशी मुली सुद्धा लग्न करायला नको म्हणतात. हि सत्य परिस्थिती आहे.
कारण, त्यांनी आत्मसात केलेल्या त्या शिक्षणातून, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार असतो.
( यामध्ये प्रामुख्याने.. ब्राम्हनां सोबतच बारा बलुतेदारातील मुलांचा सुद्धा समावेश आहे. काही ठिकाणी, यात अपवाद सुद्धा पाहायला मिळतो. )
शिवाय, पौरोहित्य करणं हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. ते शिक्षण आत्मसात करण्यासाठी विविध प्रकारचे अवघड स्तोत्र मुखोद्गत असावे लागतात. आणि त्याकरिता, मनुष्य अतिहुशार असणं खूप अवश्यक असतं. तसा पाहायला गेलं तर, आज पौरोहित्य सारख्या व्यवसायात बरीच बरकत आहे. सर्रास व्यक्ती.. घरामध्ये पूजा पाठ, होम हवन करत असतातच. शिवाय, सत्यनारायणाची महापूजा म्हणा किंवा लग्न समारंभ म्हणा. भटजी असल्याशिवाय, या विधी पूर्ण होत नाहीत.

तर परवा..
आमच्या एका मित्राचं लग्न होतं. लग्न म्हणजे, तो प्रेमविवाहच होता. पळून जाऊन लग्नं करायचं म्हंटल कि नातेवाईक कमी आणि मित्रमंडळी जास्ती अशातला प्रकार असतो. तर त्यादिवशी सुद्धा, त्या लग्नाकरिता तरणीबांड पाच पन्नास मुलं तिथे हजर होती. नवरा नवरी हॉलमध्ये ताटकळत बसले होते. पण, लग्न लावण्याकरिता भटजी यायचं काही नाव घेत नव्हते.
नेमकं काय झालय..? ते पाहण्यासाठी, आमच्यातील एक मित्र भटजींच्या घरी गेला.
तर, ते भटजी म्हणाले.. मी हे लग्न काही लाऊ शकत नाही..!
मित्र म्हणाला.. काका.. मुलगा, मुलगी दोघेही सज्ञान आहेत. त्यात घाबरण्या सारखं काहीएक कारण नाहीये.
तर भटजी म्हणाले.. मी त्या कारणाने घाबरत नाहीये.
तर.. लग्न कार्यात तरुण आणि टुकार मुलं असली. कि ते, भटजीला तांदळाच्या अक्षता मारून पुरतं बेजार करत असतात. त्यामुळे, या कार्याला मी नकार देत आहे.
शेवटी.. सर्व मुलांना नवरा नवरीपासून, पंधरा वीस फुट अंतरावर उभं करण्याची बोली झाली. आणि अक्षता फेकून मारल्या तर लग्न अर्धवट सोडून निघून जाईल. या बोलीवर ते काका राजी झाले. तेंव्हा कुठे.. गुरुजींनी लग्नाचे सगळे सोपस्कार पार पाडले.

तर दुसऱ्या प्रसंगात..
माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेलो असता. तिथे सुद्धा, नेमका हाच प्रकार चालू होता. अंगाने धष्ट पुष्ट असे पस्तीस चाळीस वर्षांचे ते गुरुजी होते. डोक्यावर ब्राम्हणी टोपी, नेहरू शर्ट, धोतर असा पेहराव त्यांनी केला होता. नवरा नवरी आले. लग्नाला सुरवात करायची होती.
मंगलाष्टका म्हणायला सुरवात झाली. गुरुजींनी, एका हातात अंतरपाट धरला होता. तर, दुसऱ्या हातात मुठभर अक्षता घेतल्या होत्या.
शुभमंगल सावधान.. म्हणून झालं, कि सगळी लोकं वधू वरांवर अक्षतांचा वर्षाव करायचे. पण काही डांबरट मुलं, अगदी नेम धरून त्या भटजींना टार्गेट करायचे. आणि त्यांना, जोरात अक्षता फेकून मारायचे. ते भटजी सुद्धा, एकदम पटाईत होते. ते सुद्धा, ज्या भागातून त्यांच्या अंगावर अक्षता आल्या आहेत. अगदी त्याच भागात, त्यांच्या हातातील अक्षता ते फेकून मारत होते.
एक मंगलाष्टकं संपलं, कि दुसऱ्या " सावधानला " सुद्धा हाच प्रकार घडणार आहे. याची, गुरुजींना खात्री असायची. पण, ती अक्षता मारणारी मुलं सुद्धा फार चाप्टर. एकदा एका ठिकाणावरून अक्षता मारून झाल्या. कि दुसऱ्या वेळी, ते त्यांची जागा बदलायचे.
अक्षता मुखोद्गत असल्याने, गुरुजींची तोंडातून अक्षता म्हणायची लगबग तर दुसरीकडे डोळ्याने त्या मुलांना शोधायची घाई चालू असायची.
पण.. ती मुलं काही त्यांच्या नजरेच्या टप्प्यात यायची नाही. आणि पुन्हा तोच खेळ सुरु व्हायचा. मुलं जितकी चाप्टर होती, तितकेच ते गुरुजी सुद्धा महाहुशार होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या पायाजवळ प्लास्टिकची पिशवी भरून अक्षता ठेवल्या होत्या. प्रत्येक मंगलाष्टके नंतर, त्या पिशवीतील मूठभर अक्षता घेऊन त्या टोळधाडीवर ते अक्षतांचा मारा करायचे. पूर्ण लग्न समारंभा दरम्यान गुरुजी आणि मुलांचा हाच लपाछपीचा खेळ चालू होता. शेवटी एकदाचं लग्न झालं. सगळे विधी पार पडले.
आणि ते गुरुजी घरी जायला निघाले.

तेंव्हा, मी त्या गुरुजींना भेटलो, आणि मगासच्या अक्षता फेकाफेकीच्या लपंडावा बद्धल विचारलं. तर ते म्हणाले, मला आता त्याची सवय पडली आहे हो. यांच्या लग्नात, दुसरा कोणताच ब्राम्हण लग्न लावायला येत नाही. यांच्या पूर्ण समाजाची लग्नं लावायची कामं फक्त माझ्याकडे असतात. आणि त्या लोकांना सुद्धा हा प्रकार माहित आहे. त्यामुळे, यांची लग्नं लावायची कामं मी दोन हजार रुपयाच्या खाली घेत नसतो. हे साधं काम नाहीये हो, अक्षतांचा मार खूप जोरात बसतो.
आता तर.. मला सुद्धा, या प्रकारची सवय पडली आहे.
चुकून दुसऱ्या कोणच्या लग्न कार्यात मी गेलो. आणि, माझ्यावर अक्षतांचा वर्षाव झाला नाही.
तर.. आता, मलाच अगदी चुकल्या सारखं होत असतं.

( टीप :- हि पोस्ट वाचून ब्राम्हण समाजावर टीकात्मक कमेंट करू नये. जागेवर ब्लॉक केलं जाईल. )
No comments:
Post a Comment