रात्रीचे बारा वाजले होते..
आम्हाला काही लवकर झोप येत नाही. त्यामुळे, माझी बायको आणि मी दोघेही किचनच्या गॅलरी मध्ये गप्पा मारत उभे होतो. तिथे समोरच्या बाजूलाच थोडी चाळकरी लोकांची घरं आहेत.
तर अचानक.. कसल्यातरी आवाजाने आमचं लक्ष विचलित झालं. तर त्या चाळ वजा भागातून, लवंगी फटक्याची छोटी माळ वाजल्याचा आवाज आला. अगदी शुल्लक असा तो आवाज.
फट, फट, फट फट,... तो आवाज आला कधी आणि संपला कधी. आम्हाला तर काहीच समजलं नाही. भयाण शांतता होती, त्यात थडीचे दिवस. सगळीकडे सामसूम झाली होती. आणि, येवढ्या थंडीत त्या लहान मुलाला. आत्ता फटाके वाजवायची कसली हौस आली असेल..?
हा मला पडलेला प्रश्न,
जाऊदेत.. ज्याची त्याची आवड, असं म्हणून आम्ही तो विषय तिथेच सोडून दिला. आणि, झोपायला निघून गेलो.

सकाळी झोपेतून उठल्यावर, ज्या घरातील मुलाने रात्री फटाके वाजवले होते. त्या घरातील महिलेला माझ्या बायकोने सहजच विचारलं.
काय गं.. काल तुझ्या मुलाला येवढ्या रात्री फटाके वाजवायची कशी काय आठवण झाली..?

तर, ती बाई म्हणाली..
तसं नाही ताई, आज त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे ना. मोठी लोकं रात्री बारा वाजता त्यांच्या वाढदिवसाला फटाके वाजवत्यात. तसे, आपल्या बहिणीच्या वाढदिवसाला सुद्धा आपण फटाके वाजवूयात. असं ठरवून, त्याने लवंगी फटक्याची एक छोटी माळ दिवाळीपासून घरात जपून ठेवली होती.
हे असतं जिवाभावाचं प्रेम..!
No comments:
Post a Comment