एकदा, हर्णे बंदरावर पिकनिकला गेलो असता..
सकाळी दहा अकरा वाजायच्या सुमारास, आम्ही सात आठ मित्र समुद्रात पोहायला गेलो. त्यादिवशी, वातावरण खराब असल्याने बनाना राईड, बोटिंग वगैरे सगळं काही बंद होतं.
त्यामुळे, समुद्रावर म्हणावी अशी गर्दी दिसत नव्हती. आम्ही सगळे मित्र लाटांशी मनसोक्त खेळत होतो. पांढऱ्या शुभ्र फेसाळलेल्या लाटा अंगावर झेलणे, तर कधी लाटेच्या वरून सूर मारून लाटेला क्रॉस करणे, तर कधी लाटे खाली सूर मारून लाटेचा अडथळा चुकवणे, तर कधी देह निश्चल करून लाटेच्या हळुवार हेलकाव्याने समुद्र किनारी येऊन पडणे. असे विविध प्रकारचे खेळ आम्ही त्याठिकाणी खेळत होतो.
हे खेळ खेळण्यात आम्ही इतके तल्लीन झालो होतो, कि आमच्या आजूबाजूला सुद्धा कोणी समुद्री खेळ खेळत आहेत. हे सुद्धा आम्हाला समजलं नाही.
तर.. आमच्या बाजूला काही अंतरावर पाच सहा मुली आणि महिला अगदी आमच्या सारखेच समुद्री खेळ खेळत होते. त्यांच्या मनात काय शंका आली काय माहिती.
त्या मुली आणि महिला आपसात काहीतरी कुजबुजल्या. आणि, आमच्यापासून फार दूर अंतरावर जाऊन पुन्हा एकदा पाण्यात खेळू लागल्या. त्याच्या अशा वागण्याचा मला फार राग आला होता. हे विनकारण संशयास्पद वागल्या सारखं झालं. मनात खूप राग होता, पण बाई माणसाला आपण विचारू शकत नाही ना. विनाकारण वादाचा मुद्दा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आमच्या खेळत आम्ही पुन्हा एकदा तल्लीन झालो.

थोड्यावेळाने, त्यांच्या सोबत असणाऱ्या पुरुष मंडळींनी त्यांची कार अगदी समुद्रकिनारी आणली. आणि तिथे कार लाऊन ते सुद्धा समुद्रात दंगामस्ती करू लागले. इकडे यांच्या मस्तीला उधान आलं होतं. तर दुसरीकडे समुद्राच्या भरतीला उधान आलं होतं. पण मजामस्ती करण्याच्या नादात ते त्यांच्या काही ध्यानात आलं नाही. भरती चांगलीच रंगात आली होती. आणि बघता बघता समुद्राच्या पाण्यात त्यांच्या कारची चाकं झाकून गेली. तेंव्हा ते त्यांच्या लक्षात आलं..
लगबगीने त्यांच्यातील सारथी मनुष्य कारपाशी गेला. त्याने कार चालू केली, पहिला गियर टाकला आणि तो घाईमध्ये गाडी बाहेर घेऊ लागला. पण कसलं काय, गाडीची चाकं फिरल्या बरोबर ती वाळूत आणखी खाली आणि खोल रुतून बसली. आणि थोड्याच वेळात समुद्राचं पाणी अगदी कारच्या दरवाजा पर्यंत आलं. आता मात्र त्या सगळ्यांची पाचावर धारण बसली होती.
तेंव्हा.. त्यातील एका महिलेने आमच्याकडे मदत मागीतील.
आमची गाडी बाहेर काढायला मदत करा. त्यावर माझे काही मित्र लगेच त्यांच्या मदतीला निघाले. पण वेळीच, मी त्या मित्रांना पुढे जाण्यास मज्जाव केला. आणि त्या महिलेला म्हणालो..
माफ करा, आम्ही तुमची काहीएक मदत करू शकत नाही..!
ती महिला जे काही समजायचं होतं, ते समजून गेली होती. तिने केलेली घोडचूक तिच्या लक्षात आली होती. इकडे भरतीचं पाणी वाढतच चाललं होतं. कारमध्ये थोडंफार पाणी सुद्धा शिरलं होतं. आणि, यांच्या आनंदावर विरझन पडलं होतं.

त्यांना त्रास होतोय, म्हणून मला आनंद वगैरे झाला नव्हता. पण स्वतःला शहाणं समजणार्यांना काही शिक्षा सुद्धा झालीच पाहिजे ना. त्या महिला आमच्या शेजारी पोहत होत्या म्हणजे आम्ही काय लगेच त्यांना धरणार होतो का..? कि लगेच त्यांचा विनयभंग करणार होतो..?
त्यांची गाडी पाण्यात बुडत होती. आणि, आम्ही शांत चित्ताने समुद्राच्या बाहेर निघालो होतो. चालत चालत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. आणि, सर्वप्रथम आमच्या हॉटेल मालकाला समुद्रात घडलेला प्रकार सांगितला. त्याने लगेच, काही तरबेज मुलांना त्यांच्या मदतीला पाठवलं. त्या मुलांनी, काही रक्कम घेऊन त्यांची कार त्यांना समुद्राच्या बाहेर काढून दिली.

योगायोगाने ती लोकं सुद्धा आमच्या बाजूच्या हॉटेलमध्येच उतरले होते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये समोरील बाजूस, नारळाच्या झाडांच्या सावलीत टेबलवर बसून मच्छी फ्रायचा आस्वाद घेत होतो.. तर दुसरीकडे त्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आमच्याकडे पाहून, ती बाई तिझा राग व्यक्त करत होती. पण तिच्या रागाची मला बिलकुल फिकर नव्हती. काहीवेळाने, ती लोकं सुद्धा फ्रेश होऊन आली. आणि अचानक..त्या बाईचा राग उफाळून आला.
आणि ती आम्हाला म्हणाली..
आम्हाला मदत केली असती, तर तुमचं काही बिघडलं असतं का..?
मी तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
पण तेवढ्यात आमचा हॉटेल मालक त्या महिलेला म्हणाला. अहो, बाई हे काय बोलताय तुम्ही..? यांनीच तर मला, तुमची गाडी समुद्रात बुडत असल्याची बातमी दिली. यांनी सांगितलं नसतं, तर.. तुमच्या गाडीने समुद्रात नक्कीच गटांगळ्या खाल्ल्या असत्या. हॉटेल मालकाचं हे वाक्य ऐकून.. ती महिला भलतीच खजील झाली. आणि, आता तर ती दुहेरी चुकीची धनी झाली.

काही व्यक्तींना स्वतःची चूक उमजत नसते, संशयी वृत्तीने ते पछाडले गेले असतात, प्रत्येक व्यक्तीला ते एकाच माळेत ओवू पाहत असतात. हे निव्वळ चुकीचं आहे. मला मान्य आहे, प्रत्येक पावूल मोजून मापून टाकायला हवं. पण ते इतकं हि अंध पणाने नाही. कि ज्यामुळे तुमच्या पायाखालची किंवा कारखालची वाळू सरकली जाईल.
No comments:
Post a Comment