मुंबई तशी फार मोठी आहे हो..!
मुंबई फिरणं किंवा जीवाची मुंबई करणं. म्हणजे काही, ते एक दोन दिवसाचं काम नाहीये. मी तर म्हणतो, मुंबई मध्ये राहणाऱ्या कित्तेक लोकांनी सुद्धा अजून नीटशी मुंबई पाहिली नसेल.

काय गर्दी, काय मस्ती, काय कमी, आणि काय जास्ती..!
तसा तर, मी फार फिरस्ता मनुष्य, आजवर मी खूप लांबवर फिरून आलो. पण मी, आजवर मुंबई काही पाहिली नव्हती. तर.. सहज म्हणून काल Rahulभाई आणि अमोल भाईसोबत सपत्नीक सहपरिवार काल मुंबईला धावत पळत जाऊन आलो.
दुपारी सव्वा बारा वाजता, आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या आवारात पोहोचलो. खरं तर, आम्हाला एलिफंटा केव्स पहायच्या होत्या. पण त्यामध्ये, आमचा सगळा दिवस मोडला असता. म्हणून तो मोह आम्ही आवरता घेतला. त्यात अजून एक नवीन गोष्ट समजली, गेटवे पासून अलिबागला सुद्धा बोटी जात असतात. आता पुढच्या वेळी.
अलिबाग - गेटवे ते एलिफंटा असा आमचा कार्यक्रम ठरला आहे.
गेटवे पाहिला, मनुष्य प्राण्याने अस्वच्छ केलेल्या समुद्रात. बोटीत बसून, एक फेरी मारली. मनसोक्त गमती पाहिल्या आणि भरपूर फोटो सुद्धा टिपले.
आणि तिथून पुढे,
राणीचा हार पाहायला गेलो. तर, त्या हाराच्या किनाऱ्यावर.. हार कमी आणि चुम्मा चाटीच जास्ती पाहायला मिळाली. अच्छा है, ज्याची त्याची पसंत. ती मनमोहक दृश्य पाहत आम्ही पुढे निघालो. पोटात कावळे ओरडत होते, म्हणून.."सुखसागर " च्या.. पावभाजी, सॉफ्ट इडली, मसाला पाव आणी खुमासदार पिझ्झाचा मनमुराद आस्वाद घेतला.
तेथून जवळच असणाऱ्या, शहिद स्मारकाला आणि मत्स्यालयाला भेट दिली. हे ठिकाण बाकी खूपच अप्रतिम होतं. कधी न दिसणारा समुद्री पानघोडा मला याठिकाणी पाहायला मिळाला.
आणि हो, आजकाल, फोटो काढताना सर्रास मुली त्यांच्या ओठाचा चंबू कसा करतात. तसे ओठ करणारा एक डुक्कर मासा सुद्धा त्याठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. तिथून पुढे जात असताना वाटेत हाजीअली चा दर्गा दिसला. त्याला दुरूनच प्रणाम करत आम्ही पुढे निघालो.

ते ठिकाण उरकलं, आणि समुद्राच्या कडेने कारमध्ये बसून पुढे निघालो. त्यानंतर..
सर्वांच्या आवडत्या.. सलमान, शाहरुख च्या राहत्या घरी वांद्र्याच्या दिशेने कूच केली. काल नेमका, त्याच भागात किरीस्ताव लोकांचा काहीतरी धार्मिक कार्यक्रम असल्याने. ट्राफिक जाम मध्ये विनाकारन आमचा एक तास वाया गेला. म्हणून मी, प्रभू येशूला दोष दिला नाही बरं का.
सगळीकडे पार्किंगची बोंबाबोंब.. शाहरुख नाही, तर त्याचा बंगला सही. त्याच्या " मन्नत " नावाच्या बंगल्याच्या बाहेर उभे राहून कित्तेक लोकं त्याच्या बंगल्याच्या नावासोबत सेल्फी काढत होते. जान्देव.. तो माणूस कसा का असेना. पण त्याने स्वतःच्या बलबुत्यावर नावलौकिक मिळवलं आहे. आणि, ज्याचा मान त्याला मिळायलाच हवा.
मी जी मुंबई मानतो.. ती खरं तर माझ्या बाळासाहेबांची आहे. त्यांना गरम बियर आवडायची. आणि, गरमा गरम वक्तव्य करून. सगळा माहोल गरम करणारे. तमाम भारतीय जनतेला त्यांचं चाहतं बनवणारं असं ते श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं.
म्हंजे..आमचे हिंदूहृदय सम्राट, यांना तर कधी मला समोरासमोर पहायचा योग आला नाही.
सो.. नाहीच म्हणता, त्यांच्या समाधीला आणि तमाम महाराष्ट्रीयांच्या शक्तिशाली स्थळाला मी मनोभावे भेट दिली. तिथे थोडावेळ नतमस्तक झालो. आणि लगेचच मला जाणवलं..
आहेत, साहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.

आता.. इथून पुढे, खरी कहाणी सुरु होते. कारण, रात्र झाली आहे ना..
मुख्य मुंबई मध्ये माझा एकही नातेवाईक नाही. पण त्याचठिकाणी माझे शेकडो जीवाभावाचे मित्र मैत्रिणी मुंबईमध्ये आहेत. पण एका दिवसात मी काय काय करणार हो..? मित्रांना भेटू कि मुंबई पाहू..? त्यामुळे, माझ्या समस्त मित्रांच्या विनंतीला मान देऊन, आणि नंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये येण्याचा हवाला देऊन. त्यांची कशीबशी मी बोळवण केली. मित्रानो, कृपा करून राग माणू नका.

मुंबई पाहण्याचा शेवटचा विषय होता तो म्हणजे, शिवाजी पार्क जिमखाना..!
थोडं वाईट वाटलं, शिवाजी पार्कमध्ये खेळाडूंसोबतच काही शौकीन दारूबाज सुद्धा त्या मैदानात घसा ओला करत बसले होते. त्यांना कसली भय ना चिंता. नको त्या गोष्टी नजरेआड करत आम्ही पुढे निघालो. संध्याकाळचे सात वाजून गेले होते.
आता, त्याठिकाणी कोणाला भेटावं असा विषय असतो. पण, पण माझ्या रोजच्या पोस्ट वाचून त्यावर जे फक्त कमेंटच करत नाही. तर त्या संभाव्य विषयवार चर्चा करण्यासाठी तत्काळ मला फोन करणारी व्यक्ती म्हणजे..
Nitin Rane भाऊ..
शिवाजी पार्कला जाणं आणि त्यांना न भेटता परत फिरणं म्हणजे. हा फार मोठा अपराध.
राहुल भाईंनी मला त्यांना फोन लावायला सांगितला. मी भाऊंना फोन लावला.
आणि आमच्या स्वागतासाठी भाऊ, शिवाजी पार्क जिमखान्याच्या प्रवेशद्वारात आमची वाट पाहत उभे होते. त्या शिवाजी पार्क जिमखान्यात, बाहेरच्या कोणत्याच व्यक्तींना प्रवेश नसतो. जी लोकं, त्या ठिकाणी आजीवन सभासद आहेत. त्याच व्यक्तींना, आणि त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळींना तिथे प्रवेश दिला जातो. आम्ही, तिघे मित्र तर, नितीन भाऊंच्या गळ्यातील ताईत आहोत. त्याठिकाणी, आम्ही सगळे मस्तपैकी फ्रेश झालो. आणि, मुख्य मुद्य्याला हात घातला. एकीकडे कार्यक्रमाला सुरवात झाली, तर दुसरीकडे भाऊंच्या त्या जिमखान्यात आणि खुद्द बाळासाहेबांनी अनुभवलेल्या आणि भाऊंना माहित असलेले काही भन्नाट किस्से ऐकायचा आम्हाला मोका मिळाला. शिवाजी पार्कमध्ये सभासद असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भाऊ अगदी जवळून ओळखतात. त्यात काही मराठी सिनेअभिनेते सुद्धा आहेत. भाऊ एकदम जबरी माणूस आहे. ते स्वतः तर वजनदार आहेतच. पण, त्या भागात त्यांचं मजबूत वजन सुद्धा आहे. हे मला लगेच समजलं. घसा ओला करता करता, मस्तपैकी..चिकन तंदूर, मटन आणि समुद्री मेजवानीवर आम्ही आडवा हात मारला. जेवणं उरकली,
आणि, मुंबईच्या छोट्या सफरीला अलविदा करून. आम्ही पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण केलं.

No comments:
Post a Comment