Tuesday, 21 July 2015

मार्जार पुराण..

मध्यंतरी, माझ्या एका मित्राला इंग्लिश मांजरांच पिल्लू खरेदी करायचं होतं. त्याने मला, ते मांजर कुठे विकत मिळेल म्हणून विचारलं. मी त्याला, पुणे केंप मधील एका दुकानाचा पत्ता दिला. त्यानंतर, काय झालं.
म्हणजे.. त्याला मांजराचं पिल्लू विकत मिळालं कि नाही. ते मला माहित नव्हतं. म्हणून, परवा.. मी त्याला फोन करून विचारलं.
तर म्हणाला, 
मांजराच्या एका पिल्लाचे पंधरा हजार रुपये सांगत होते. त्या दुकानाचा मालक, एक मुसलमान व्यक्ती होता.
" आम्हाला काही मांजर पाळायचा शौक वगैरे नाहीये. पण, माझी मुलगी खूप हट्ट करतेय. म्हणून, आम्ही इथे आलो आहोत. बघा, योग्य काय ते सांगा. "
सकाळचं पाहिलं ग्राहक आहे. भोवनी ची वेळ, आणि, रमजानचा पवित्र महिना चालू आहे. त्यात, लहान मुलीला हौसेखातर ते पिल्लू हवं आहे.
ह्या विचारच्या गर्तेत तो दुकान मालक सापडला. आणि, अशा शुभ विचाराच्या त्रिवेणी संगमामुळे. त्याने, माझ्या मित्राला ते पिल्लू फक्त सहा हजार रुपयाला देऊ केलं होतं.
हा सगळा वृतांत, मी आमच्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या एका अशिक्षित आणि साध्या भोळ्या महिलेला सांगत होतो.
कारण, तिला सुद्धा खूप मार्जार वेड आहे. तिच्याकडे सुद्धा, तिने एक एक मन्या नावाचा देशी बोका पाळलेला आहे. त्याचं मला ती नेहेमी कौतुक ऐकवत असते.
मांजराची एवढी मोठी किंमत ऐकून ती तर आवाकाच झाली.
आणि, मला म्हणाली.
बया, किती महाग आहे हो..!
आता ते पिल्लू इंग्लिश आहे म्हणल्यावर. त्याच्या संगं आता त्यांना इंग्लिश मधीच बोलाय लागल ना..? तिचा भोळा भाबडा सवाल,
मी म्हणालो, ते का..?
तर म्हणाली, आमचा बोका गावठी हाय ना. त्याला कसं... ए चल रे मन्या, असं म्हणलं. कि लगीच, माझ्या मागं येतोय. गावठी हाय ना त्यो...
तसं, त्या पिल्लाला समजायचं नाय ना, इंग्लिश हाय ना ते..
मी म्हणालो, अहो तसं काही नसतं. त्यांच्याशी, आपण जी भाषा बोलू तीच त्यालाही समजून जाते.
त्यावर ती म्हणाली,
" नाय पण.. ते इंग्लिश हाय ना. त्याच्याबर कशाला मराठी बोलायचं, नाय का..!
त्यावर.. मी हि, हो म्हणालो.
आणि, तिला हे हि सांगायला विसरलो नाही. कि, माझ्या मित्राच्या मुलीला आणि मित्राला सुद्धा इंग्लिश बोलायला येतं. आणि, त्या पिल्लाशी ते नक्कीच इंग्लिशमध्येच बोलत असतील.
तेंव्हा कुठे, तिला जरा हायसं वाटलं..
काही लोकं, खूपच साधी भोळी असतात नाही का..!

Monday, 13 July 2015

व्यथा आणि कथा..

हल्ली डोक्यात बरीच कालवाकालव चालू असते. 

पैकी, काही गोष्टी मी इथे मांडत असतोच. पण, सगळ्याच गोष्टी इथे मांडता येत नाहीत. त्यामुळे, काही गोष्टी इथे न मांडता चार मित्रांमध्ये त्यावर नक्कीच चर्चा करत असतो. त्यावेळी माझा होणारा संताप, माझा एक मित्र चार सहा महिन्यांपासून पाहत होता. पण त्या मित्राने, ते मला कधी जाणवू दिलं नाही. कारण, माझे विषय ऐकले कि त्याला बगल देत तो लगेच दुसऱ्याच विषयवार येऊन थांबत असे. असं बरेचदा घडलं. पण, ते माझ्या काही लक्षात येत नव्हतं. 
शेवटी... आज तोच मला म्हणालाच...!
गेली पाच सहा महिने झाले, मी पाहतोय. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पाहून होणारा तुझा चिडचिडेपणा हल्ली खूपच वाढलाय. असं, तुला वाटत नाही का..? त्या चिडचिडेपणाची झलक हल्ली मला तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट जाणवायला लागलीय. का, आणि कशाला करतोयेस एवढी चिडचिड..? तुझ्या ह्या चिडचिडेपणामुळे, समाजात काही फरक पडणार आहे का..? का उगाच स्वतःला त्रास करून घेतोयेस..? बरेच संत महात्मे खूप काही सांगून गेले आहेत. त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि, आता तुझं कोण ऐकणार आहे..?

माझ्या त्या मित्राच्या बोलण्यात, बरीच सत्यता होती. 
त्यामुळे, कारण नसताना.. मला, डोकेदुखी किंवा इतर त्रास सुद्धा खूप वाढले आहेत. ते फालतू आणि कधीही साध्य न होणारे विचार करणं आता थांबवायचा प्रयत्न करतो.
मोठमोठे संत महात्मे होऊन गेले. त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि आता, तुझं कोण नव्याने ऐकणार आहे..? हे वाक्य माझ्या डोक्यात पक्कं घर करून राहिलं..   
एवढं बोलून, त्या मित्राने मला उपदेशपर एक कथा ऐकवली. 

समुद्राबाहेर असणाऱ्या घनदाट झाडीमध्ये, एक पक्षी वास्तव्याला होता. त्या वातावरणात, तो खूपच आनंदी होता. पण, राहून-राहून त्याला समुद्र सफर करावीशी वाटत असे. काहीतरी नवीन पाहण्याची, किंवा करण्याची त्याला इच्छा होती. एकदा मनाचा हिय्या करून, एका मोठ्या जहाजेमध्ये तो पक्षी उडत उडत जाऊन बसला. जहाजेमध्ये, तो मस्तपैकी इकडून तिकडे विहार करत होता. तिथे, त्याला खाण्यापिण्याची सुद्धा काहीच कमतरता नव्हती. त्या जहाजेमध्ये, त्याचे दोन चार दिवस अगदी मजेत गेले. आणि शेवटी, तो सुद्धा त्या भौतिक सुखाला कंटाळला. आणि, उडत-उडत पुन्हा किनाऱ्याकडे निघाला. 
त्याने, त्या अथांग समुद्रामध्ये बराच वेळ विहार केला. पण, काही केल्या किनारा काही येईना. भयंकर मोठा प्रवास करून, त्याच्या पंखातलं बळ सुद्धा संपलं होतं. 
जास्ती हट्ट केला. तर... आपण, दमछाक होऊन आपण समुद्रात पडू. आणि, एखाद्या मत्स्याचं खाद्य बनू. हे त्याच्या ध्यानात आलं. आणि, तो तडक माघारी फिरला. आणि, पुन्हा त्याच जहाजेवर जाऊन बसला. दोन चार दिवसांनी, खाऊन पिऊन तो पुन्हा ताजा तवाना झाला. आणि, पुन्हा एकदा त्याने दुसऱ्या किनाऱ्याकडे कूच केली.  पुन्हा, तोच प्रकार घडला. टप्प्या टप्प्याने, त्याने चारी दिशांना जाऊन पाहिलं. पण, तो त्यात नाकाम झाला. 

आणि, सरते शेवटी त्याच्या ध्यानात आलं. आपण, इतके श्रम करतोय. त्याचा, काहीएक उपयोग होणार नाहीये. जे चालू आहे, त्याला तसच चालू राहूदेत. 
हि जहाज, ज्या दिवशी ज्या किनाऱ्याला पोहोचेल. तिथेच, आपण आपलं बस्तान मांडूयात. आणि, जमेल तसं राहुयात. 

जे आहे, जसं आहे.. त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे. 

हि कथा ऐकून, मी ह्या निर्णयाला पोहोचलो आहे. कि, काही केल्या हि समाज व्यवस्था म्हणा किंवा इथली लोकं म्हणा बिलकुल बदलणार नाहीयेत. जेंव्हा कधी बदल घडतील ते घडतील. ते तेंव्हा आपण पाहूयात.
त्या पक्षाप्रमाणे, मी सुद्धा आता ठरवलं आहे. जसं आहे, जिथे आहे तिथेच राहुयात. विनाकारण नको ते प्रयोग करण्यात काहीएक अर्थ नाहीये. बघुयात काय होतंय.
नाहीतर, हि म्हण आहेच...

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रेची पूर्वतयारी

प्रत्येक भाविकाने, आवर्जून करावी अशी हि यात्रा आहे. अमरनाथला गेल्यावर 'अमर' ह्या शब्दाचा खर्याने अर्थ कळतो.
ह्यावर्षी, अमरनाथ यात्रेचं पंजीकरण १ मार्च २०१४ ला सुरु झालं आहे. आणि, यात्रा दिनांक २ जुलैला ( आज ) सुरु होणार आहे. आणि, रक्षाबंधन या दिवशी यात्रेची सांगता होते.
हि यात्रा, म्हणावी इतकी सोपी नाहीये. प्रत्येक यात्रेकरूला, ह्या प्रवासाची माहिती असेलच असं नाही. किमान, थोडीफार माहिती जरी मिळाली, तरी भरपूर होतं.
जीवनाचं खरंखुरं सार या यात्रेमध्ये दडलेलं आहे. आणि, इथे मी देत असलेली माहिती प्रत्येक यात्रेकरूला खूप उपयोगी पडेल. याची, मला मनोमन खात्री आहे. हा संदेश, दूरपर्यंत पोहोचावा.
त्याकरिता, हा लेख प्रपंच...
भूकेको अन्न प्यासेको पाणी, जय हो बाबा बर्फानी..
-------------------------------------------------------------
१ ) प्रथम रेल्वेचं आरक्षण करून घ्यावं. त्यानंतर, जम्मू काश्मीर ब्यांक किंवा पंजाब नेशनल ब्यांक इथे जाऊन आपला रजीष्ट्रेशन ( पंजीकरण ) फोम घेऊन यावा. एकाच कागदावर चार ओळख पत्र असलेला हिरवा, नीळा, पिवळा, लाल, रंगाचा छापील पास मिळतो. आपण दर्शनाला जो वार आणि तारीख ठरवतो. त्यानुसार त्या कागदाचे रंग ठरलेले असतात.
त्यानंतर, पुण्यातील ससून किंवा औंध येथील उरो रुग्णालयातून आपलं वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावं. तिथे तुमच्या शरीराच्या संपूर्ण चाचण्या, तपासण्या केल्या जातात. आणि, तुम्ही यात्रेला जाण्यास पात्र असाल. तरच तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जातं. अन्यथा, दिलं जात नाही. हे सोपस्कार पार पडल्याशिवाय, पुढील कोणत्याच गोष्टी होत नाहीत.
मिळालेलं वैद्यकीय प्रमाणपत्र ( फिट सर्टिफिकेट ) सदर बेंकेमध्ये जमा करावं. आणि, आपल्याल्या मिळालेल्या ओळख पत्रावर ( पास ) फोटो चिकटवून त्यावर ब्यांकेतील सदर अधिकार्याची स्वाक्षरी घ्यावी. ( ह्या प्रक्रियेलाच 'पंजीकरण' असं म्हणतात )
हे सोपस्कार पार पाडल्याशिवाय, तुम्हाला यात्रेला जाण्याची अनुमती मिळत नाही. इथून निघतानाच, तुमचं रेल्वे आरक्षण आणि तुम्ही तिथे कधी पोहोचताय याचा ठोकताळा अवश्य करा. तुमच्या ओळख पत्रावर असणार्या ठराविक तारखेलाच तुम्हाला यात्रेला सोडलं जातं. अन्यथा, ती तारीख येयीपर्यंत आपणाला पहेलगाम मधेच थांबावं लागतं.
( उदा. तुम्ही १, तारखेला पुण्यावरून निघताय, तिसर्या दिवशी ( ३, तारीख ) तुम्ही जम्मू मध्ये पोहोचणार. चौथ्या दिवशी ( ४, तारीख ) तुम्ही जम्मूहून पहेलगाम कडे मार्गस्थ होणार. आणि पाचव्या दिवशी ( ५ तारीख ) तुम्ही प्रत्यक्ष यात्रेला निघणार. तुम्हाला, या पाचव्या दिवसाच्या तारखेच पंजीकरण करून घ्यावं लागतं. हे गणित व्यवस्थित लक्षात ठेवा.
त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही.
२ ) पुणे ते जम्मूतावी एक्स्प्रेस संध्याकाळी ५:२० मिनिटांनी पुण्यावरून रवाना होते. ते तिसर्या दिवशी सकाळी दहा ते बारा वाजता. जम्मूला पोहोचते.
३ ) जम्मू स्टेशन पासून, यात्रेकरूंनी भगवती यात्री निवास येथे टेम्पो किंवा बस ने जावं. ह्या तीन चार किमीच्या प्रवासाला साधारण पंचवीस रुपये खर्च येतो.
४ ) भगवती यात्री निवासा लगतच, एका मुंबईतील भाविकाने सुरु केलेल्या लंगर (भंडारा) मध्ये जेवण आणि अंघोळ उरकून पुढील तयारीला लागावे. यात्रेमध्ये, कोणीही छोटा, मोठा नसतो. तिथे सगळे एकसमान असतात. त्यामुळे, आपल्या राहणीमानात थोडा बदल करून मोकळं वागण्याचा प्रयत्न करावा. जेवणासाठी हॉटेल शोधत बसनं हा वेळकाढू आणि खर्चिक प्रकार आहे. कारण, तेथील जेवण हे सरसोच्या तेलात बनवलं जातं. आणि आपणाला ते आवडत नाही. त्यामुळे, पूर्ण यात्रेदरम्यान लंगर मधेच जेवावं. त्यामुळे, जेवणाचा बराच खर्च वाचतो.
५ ) भगवती यात्री निवासा लगतच, सैनिक दलाचं इस्पितळ आणि प्रथमउपचार केंद्र असतं. तब्बेतीचं, काही कमी जास्ती असल्यास. तिथे, त्या शंखेचं निवारण करून पुढील तयारीला लागावे. ती भारत सरकारची मोफत सेवा आहे.
६ ) भगवती यात्री निवास येथे, सरकारी रूम ( हॉल ) भाड्याने मिळतात. किंवा, तिथे असलेल्या मोकळ्या मैदानात उघड्यावर आपण आपल्या पथार्या मांडू शकतो. पण कधी-कधी, अवेळीचा पाऊस आपली तारांबळ उडवू शकतो. त्यामुळे, शक्यतो रूम कशी मिळेल ते पहावं. महत्वाचं म्हणजे, झोप व्हायला हवी.
तत्पूर्वी, जम्मू ते पहेलगाम पर्यंत जाण्याकरिता मिनी बसचं आरक्षण करून घ्यावं. त्याची सोय, भगवती यात्री निवास येथेच केलेली आहे. ( मोठ्या बस करिता ३७५/- रुपये व मिनी बस करिता ५२०/- रुपये प्रत्येकी. असे, मागील दोन वर्षांपूर्वी भाडे होते. ) कारण, त्या ठिकाणावरून पहाटे ३:३० मिनिटांनी पहेलगामला जाण्याकरिता बस निघतात. म्हणजे, पहाटे आपण आपली बस शोधायची. त्यात जाऊन बसायचं. आणि, निवांत झोपायचं. साधारण पहाटे पाचला, सैनिकी बंदोबस्तात यात्रेला सुरवात होते.
७ ) प्रवासा दरम्यान, आपणाला कोणताच खर्च करावा लागत नाही. जागोजागी जेवणाचे लंगर असतात. त्याच बरोबर आपल्या आवडत्या मोबाईलला चार्ज करण्याची सोय सुद्धा भाविकांनी करून ठेवलेली असते. सकाळी जम्मू वरून निघालेली बस. वेड्या वाकड्या दरीमधील रस्ते पार करत-करत, लंगरवर थांबत सायंकाळी सहा, सात वाजेपर्यंत पहेलगामला पोहोचते.
प्रवासाचं जास्ती वर्णन करत नाही. तुम्ही प्रत्यक्षच त्याचा रोमांचित अनुभव घ्या.
८ ) पहेलगाम मध्ये पोहोचल्यावर, मिलेट्री पोस्ट् किंवा प्रायवेट लॉजची व्यवस्था आहे.
समजा :- तुम्ही, आज पहेलगामला पोहोचलात. आणि, तुमच्या दर्शनाची उद्याची तारीख असेल. तरच, तुम्हाला मिलेट्री पोस्ट् मध्ये मुक्काम करायला मिळतो. त्यामुळे, दर्शनाची तारीख पाहूनच जम्मू वरून पहेलगाम कडे कूच करा. मिलेट्री पोस्ट् मध्ये, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असते. प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे एका व्यक्तीला तंबूचा खर्च आकारला जातो. खाजगी लोज मध्ये राहण्यासाठी रुपये १२००/- ते १५००/- मध्ये ( फ़क्त चार जनांसाठी ) लॉज उपलब्ध असतात.
९ ) पहेलगाम येथून, पहाटे चार वाजताच यात्रेकरिता निघावं लागतं. त्यामुळे, आपल्याला अवश्य असणारं सगळं सामान आदल्या दिवशीच ब्याग मध्ये व्यवस्थित भरून ठेवावं. अशाने, सकाळी निघताना गोंधळ होत नाही. पहेलगाम ते चंदनवाडी, हे साधारण अठरा किमीचं अंतर आहे. चंदनवाडीला जाण्यासाठी पहेलगाम वरून सुमो असतात. दोन वर्षांपूर्वी, प्रत्येकी पन्नास रुपयामध्ये आपणाला चंदनवाडी येथे पोहोचवलं जात होतं. किंवा, मिलेट्री पोस्ट् मध्ये राहणाऱ्या यात्रेकरुसाठी मिलेट्रीच्या गाड्यांची मोफत व्यवस्था केलेली असते.
१० ) चंदनवाडीला पोहोचल्यानंतर, लंगर मध्ये थोडा अल्पोपहार उरकावा. यात्रा, तुम्ही पायी करणार असाल. तर, पायी यात्रेला सुरवात करावी. आणि, घोड्यावरून जाणार असाल तर घोडा ठरवून घ्यावा. चंदनवाडी ते पवित्र गुफा हे पस्तीस किमीचं अंतर आहे. जाऊन येऊन सत्तर किमी होतं. एका घोड्याचा सरकारी दर ( दोन वर्षांपूर्वी ) ६५००/- रुपये ( जाऊन, येऊन ) आहे. पण घासाघीस करून २५००/- ३०००/- ३५००/- पर्यंत घोडा मिळून जातो. हे सगळं, तेथे असणार्या गर्दीवर अवलंबून असतं.
११ ) यात्रेला निघताना सोबत, एक जोडी कपडे, स्वेटर, स्कार्फ, टोपी, रेनकोट, कानटोपी, गरम हातमोजे, पायमोजे, सनग्लास, सनस्क्रीम, आवश्यक औषधं गोळ्या, मूव सारख्या पेनकिलर क्रीम, सुकामेवा, विजेरी..इत्यादी वस्तू सोबत असाव्यात.
( तेथील वातावरणाची चौकशी करून एखादं ब्ल्यान्केट सोबत ठेवा. तशी खास आवश्यकता पडत नाही. त्याकरिता, चौकशी महत्वाची. नाहीतर पाठीवरील ओझ्यात विनाकारण वाढ होते. )
आपली यात्रा, आनंदमयी होवो. हीच, भोले चरणी प्रार्थना.. 

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- नऊ.

"अमरनाथाच्या" या पवित्र भूमीवरून, माझा पाय काही निघत नव्हता. परंतु, जाणं तर भागच होतं. पावसाची रिपरिप चालूच होती. तंबूमध्ये पोहोचलो, अंगावर रेनकोट चढवला, पाठीवर ब्याग लादली. आणि, घोड्यांच्या मुक्काम स्थळी पोहोचलो. पुन्हा एकदा, घोड्यावर बसून प्रवासाला सुरवात केली. 
हे निसर्ग सौंदर्य, उभ्या आयुष्यात पुन्हा कधी पाहायला मिळेल कि नाही ? ते, माहित नव्हतं. म्हणून, पुन्हा-पुन्हा त्या निसर्ग सौंदर्याला डोळ्यामध्ये, मनामध्ये आणि क्यामेर्या मध्ये बंधिस्त करत, पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
बरच अंतर कापल्यावर आम्ही 'पंचतरणी' पाशी येऊन पोहोचलो. घोडे मालकांमध्ये, काहीतरी कुजबुज चालू होती. परंतु ते काश्मिरी भाषेत बोलत असल्यामुळे, ते काय बोलत आहेत. ते आम्हाला समजत नव्हतं. आणि, त्यांचा काहीतरी निर्णय झाला. जुन्या घोडे वाल्यानमार्फत, आम्हाला, नवीन घोडे आणि घोडे मालक ठरवून देण्यात आले होते. आता, नवीन घोडे आणि त्यांच्या मालकांबरोबर नव्याने आमचा प्रवास सुरु झाला होता.
तत्पूर्वी, अमरनाथाची कथा तुम्हाला सांगावीशी वाटतेय.
देवांचा देव तोची हा महादेव, म्हणजे शिवशंकर, या भगवान शंकराची तीर्थस्थळे हि बहुदा दुर्गम अशा ठिकाणीच आहेत. कैलास मानसरोवर अन त्या पाठोपाठ श्री अमरनाथ हि दोन्ही तीर्थस्थळे एवढ्या दुर्गम स्थानी आहेत. कि, शिवभक्तांना त्यांच्या पावन दर्शनासाठी खरोखर खडतर' आणि, कठोर अशी साधणारी यात्राच करावी लागते.
अमरनाथ यात्रा, हि जेवढी कष्टप्रद आहे तेवढीच ती स्वर्ग लोकाचा आनंद देणारी सुद्धा आहे. या जन्मी, एकदा तरी काशी यात्रेचं पुण्य घ्यावं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. हि, प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. असं म्हणतात, कि एक हजार काशी यात्रेचं पुण्य आपल्याला, एका अमरनाथ यात्रेमध्ये मिळतं. एवढी हि, परम पुण्यादाई यात्रा आहे.
अशी आख्यायिका आहे कि, भगवान शंकरांनी पार्वती मातेला अमरकथा सांगण्याचे अशावासन दिले होते. हि कथा, त्यांना एकांतात सांगता यावी म्हणून ते हिमालयात गेले. प्रथम त्यांनी, त्यांच्या सोबत असलेल्या नंदीचा ( बैलाचा ) त्याग केला. बैलगांव, याचा अपभ्रंश होऊन ते स्थान पहलगाव झालं. महादेवाने यात्रेला तेथून सुरवात केली. ( सुरवात करणे, म्हणजे हिंदीमधील 'पहल' करणा, सुरवात करणे. ) म्हणून पहलगाम.
पुढे गेल्यावर, त्यांनी कपाळीचे चंदन सोडले, ती चंदनवाडी. येथे नदी किनारी, माता पार्वतीशी रतीक्रीडा करत असताना. माता पार्वतीच्या डोळ्यातील काजळ भगवान शंकरांच्या चेहेर्याला लागलं. तेथील नदीमध्ये, भगवान शंकर आपला चेहेरा धुवत असताना. त्यांच्या, चेहेर्यावरील काजळानं या नदीचं पाणी निळेशार, नीलवर्णी झालं. ते आजतागायत, आहे तसच आहे. तीच हि नीलगंगा म्हणून प्रसिध्द पावली. या नीलगंगेत, स्नान केलं असता ब्रम्हहत्या, आणि गोहत्येच्या पातका पासून मुक्ती प्राप्त होते. पुढे भगवंतांनी, आपल्या गळ्यातील शेषनागाचा त्याग केला. ज्या ठिकाणी, भगवंतांनी आपल्या शेषनागाला सोडलं. ते ठिकाण, शेषनाग म्हणून प्रख्यात झालं. आणखी पुढे गेल्यावर, शंकरांनी आपल्या जटेतील गंगेस येथे उतरण्यास सांगितले. परंतु, गंगा काही ऐकेना. मग, भगवंतांनी रागाने आपल्या जटा सोडून त्या धर्तीवर आपटल्या. तेंव्हा हि गंगा पाच धारांमध्ये प्रवाहित झाली. त्या ठिकाणाला, पंचतरणी म्हणून ओळखलं जातं. तेथून पुढे गेल्यावर, एका निर्जन गुहेत भगवान शंकरांनी पार्वती मातेस अमर कथा सांगण्यास सुरवात केली. परंतु, अमर कथा ऐकता-ऐकता माता पार्वती निद्राधीन झाल्या. त्यावेळेस तेथे असलेल्या दोन कबुतरांनी हि अमर कथा ऐकली. आणि ते अमर झाले.
आज देखिल या गुफेमध्ये भक्तांना या कबुतरांच दर्शन होतं. आणि याच गुफेतील बर्फमय शिवलिंगाच्या पावन दर्शनाने भाविकांचा सर्व थकवा दूर होताच, त्यास अमरत्वाचा अलौकिक आनंद प्राप्त होतो.
प्रवास चालूच होता. आम्ही, पोषपत्री लंगर पर्यंत पोहोचलो होतो. वातावरण अगदी स्वच्छ होतं. पावसाची रिपरिप थांबली होती. अंगावरील रेनकोट आणि गरम वस्त्र काढून ब्याग मध्ये ठेवली. सकाळ पासून पोटामध्ये काहीच अन्न नव्हतं. पोटामध्ये आग पडली होती. लंगर मधील, गोड धोड पदार्थाचा थोडा आस्वाद घेतला. आणि, आम्ही पुढे मार्गक्रमण करायला सुरवात केली.
नवीन घोडे वाल्याला, पंचतरणी मध्ये काय प्रकार घडला होता ? तो विचारला. त्यावर समजलं, कि' दुसर्या दिवशी रमजानच्या पवित्र महिन्याला सुरवात होणार होती. आणि, आमच्या सोबत येणाऱ्या घोडे मालकांना रोजा ( उपवास ) ठेवण्यासाठी त्यांच्या घरी जायचं होतं. परंतु, परतीचे प्रवासी मिळत नव्हते. म्हणून, तेथे वास्तव्यास असणार्या घोडे मालकांकडून आमच्या सवार्या घेऊन परतीच्या प्रवासाला ते निघाले होते. कुतूहल म्हणून, मी त्यांना विचारलं. कि, तुम्हाला या प्रवासाचे किती पैसे मिळाले ? तर, तो घोडेमालक म्हणाला, फक्त पाचशे रुपये मिळाले. एवढ्या कमी पैश्यात तुम्ही यायला कसे तयार झालात ? असं विचारलं असता. तो मला म्हणाला,

कल दिनमे आपको' उन्होने शेषनाग से लिया था ना..! इसलिये, वापसिके कम पैसे हमे दिये गये.

मी त्यांना, जे खरं आहे ते सांगितलं. कि त्यांनी आम्हाला, सकाळी पंचतरणी मधून घेतलं आणि पुन्हा तिथेच सोडलं. आणि, तुमचेच भाऊबंद तुमची कशी फसवणूक आणि पिळवणूक करत आहेत. ते सुद्धा, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. हे सर्व समजून आता काहीच उपयोग नव्हता. कारण, ह्या घोडे मालकांनी जुन्या घोडे मालकांना प्रत्येकी अकराशे रुपये आमच्या समोर मोजून दिले होते. आणि, यांच्या वाट्याला फक्त उरलेले पाचशे रुपयेच येणार होते. रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या पोरा बाळात जाण्याकरिता' आणि त्या, कवडीमोल 'पाचशे' रुपड्या करिता तीस किलोमीटरची पायपीट, त्यांना करावी लागत होती.
वाटेमध्ये पुन्हा एकदा शेषनाग तलाव लागला. त्याचं निळशार पाणी, मनाला मोहिनी घालत होतं. प्रसन्न चित्ताने त्या तलावाला मी हात जोडले. आणि, पुन्हा-पुन्हा मागे वळून पहात राहिलो. या स्वर्गीय ठिकाणी, आपण पुन्हा कधी येऊ कि नाही ? या गोष्टीची सल, मनाला टोचत होती.
पिस्सू टॉपची खतरनाक चढाई तर पहिली होती. आता, उतार अनुभवायचा होता. घोडेमालकाने, एक हाथ माझ्या खांद्याला लावला. आणि, एका हाताने घोड्याला सांभाळत पूर्ण पिस्सू टॉप उतरला.
खाली येताच, नैसर्गिक देणगी लाभलेल्या गोर्या, गुलाबी, गोबऱ्या गालाच्या काश्मिरी ललना नजरेस पडल्या. चंदनवाडी जवळ येऊ लागलं होतं. आणि, पुन्हा एकदा स्वर्गातून पृथ्वीवर पोहोचल्याची जाणीव झाली.
चंदनवाडी मध्ये पोहोचल्यावर त्या घोडेवाल्यांच्या हातामध्ये प्रत्येकी सोळाशे रुपये आम्ही ठेवले. बक्षीस म्हणून, प्रत्येक मित्राने प्रत्येकी शंभर रुपये त्यांच्या हातवार टेकवले. मी माझ्या घोडेमालकाशी गळाभेट केली. येथपर्यंत सुखरूप पोहोचवल्या बद्धल त्याचे आभार मानले. त्याला, रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. आणि, तिथे जवळच उभ्या असलेल्या सुमो मध्ये बसून आम्ही पहलगाम च्या दिशेने निघालो.
भूकेको अन्न प्यासेको को पाणी जय हो बाबा बर्फानी.

समाप्त .....

अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- आठ.

घोडेवाल्याच्या आवाजाने, मी झटकन जागा झालो. दोन्ही बाजूला, अंग कडाकड मोडून घेतलं. आणि, रजईच्या बाहेर पडलो. आकाश स्वच्छ होतं. जो तो, घाई मध्ये दिसत होता. प्रत्येकाला, पवित्र गुफेकडे जाण्याचे वेद लागले होते. 
तंबू मालकाने, बाहेर एका मोठ्या चुलीवर, अंघोळी करिता पहाटे चार वाजता, पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते, अजूनसुद्धा गारेगारच होतं. पाणी गरम झालं नसल्यामुळे, आम्ही अंघोळ करायचा विचार मनातून काढून टाकला. अमरनाथ यात्रेमध्ये शौचालयाची म्हणावी अशी खास सोय नसल्याने. प्रवासादरम्यान मी जेवण करणं टाळत आलो होतो. फक्त सुक्या मेव्यावर मी पोट भरत होतो. त्यामुळे, पोटात काही नसल्याने शौचाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
मुखमार्जन केलं, तोंडावर थंड पाण्याचे दोन चार हबकारे मारले. आणि, स्वच्छ झालो. रस्त्यावर घोडेवाला आमची वाट पाहत उभा होता. रात्री घातलेले कपडे अंगावर तसेच होते. त्यामुळे, तो एक ताप वाचला. ब्यागा उचलल्या, त्या पाठीवर अडकवून आम्ही रस्त्याकडे निघालो. दूर डोंगरावर, दर्शनाला निघालेल्या भाविकांची घोड्यावरील लांबच्या लांब रांग दिसत होती. आम्ही सुद्धा घाई केली. आणि, घोड्यावर बसून प्रवासाला सुरवात केली.
सकाळचे सात वाजले होते. पायवाट पूर्ण जाम झाली होती. त्या उभ्या असलेल्या घोड्यांच्या रांगेमध्ये, आता आमची सुद्धा भर पडली होती. साधारण, पंधरा वीस मिनिटांनी प्रवासाला पुन्हा सुरवात झाली.
आकाशामध्ये, हेलिकोप्टरच्या फेर्या सुरु झाल्या होत्या. पहलगाम आणि बालताल येथून, यात्रेकरूंना हवाई रस्त्या मार्गे पंचतरणी येथे आणण्यास सुरवात झाली होती. दर्याखोर्यातून निघालेलं हेलिकोप्टर, "जुरासिक पार्क" सिनेमाची आठवण करून देत होतं.
पंचतरणी ते पवित्र गुफा, हे एकूण सहा किलोमिटरचं अंतर. चार किलोमीटरची अरुंद पायवाट. तर, दोन किलोमीटर ग्लेशियर ( बर्फातून ) प्रवास.
थोड्याच वेळात, भुरभूर पावसाला सुरवात झाली. पवित्र गुफेकडे जाणारा रस्ता फारच अरुंद होता. जेमतेम चार ते पाच फुटी रस्ता. त्याच रस्त्यावरून घोड्यांच येनं जाणं. आणि, त्याच रस्त्यावरून पायी प्रवास करणारे यात्रेकरू सुद्धा, ये जा करत होते. घोड्यांच्या चेंगराचेंगरीच्या भीतीमुळे काही भाविक पहाडावरील नवीन रस्त्याची निर्मिती करत होते. परंतु, तसं करत असताना त्यांची खूप दमछाक होत होती. पावसामुळे, पायवाटेवर थोडी चिकचिक आणि घसरण तयार झाली होती. त्यामुळे, घोड्यांच्या घसरण्याचं प्रमाण वाढलं होतं. घोडेमालक, आपलं कसब पणाला लावत होते. आणि, यात्रेकरूंना सुखरूप नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. चालून चालून थकलेलं घोडं, फुत्कार्ल्यावर थंडीमुळे त्याच्या नाका तोंडातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. घोडा, दरीकिणाऱ्यावरून जात असताना खोल दरीमध्ये पहायची हिम्मत होत नव्हती. मजल दरमजल करीत, एका मोठ्या डोंगराला वळसा घालून आम्ही पुढे निघालो. आणि दुरूनच, पवित्र गुफा आणि तेथील तंबूच्या गर्दीचं ओघवतं दर्शन झाल.
अजून सुद्धा, दोन-एक किलोमिटरचं अंतर बाकी होतं. जमिनीची जागा, आता बर्फाने घेतली होती. बर्फामध्ये माती मिसळल्यामुळे, पांढर्या शुभ्र बर्फाचा रंग सुद्धा, थोडासा मातकट झाला होता. गुफेपासून साधारण तीन चारशे मिटर अंतरावर आमचे घोडे थांबवले गेले. घोडेमालकांना, चहा पाण्याला पैसे देऊन आम्ही एका तंबूमध्ये गेलो. तिथे, ब्यागा ठेवायची व अंघोळीची व्यवस्था होती. काही छोटे व्यावसायिक, छोट्या ग्यास गिझरवर पन्नास रुपये एक बादली. याप्रमाणे, अंघोळीकरिता पाणी तापवून देत होते. आम्ही, जेथे थांबलो होतो त्या तंबू मालकाने एका मोठ्या ड्रम मध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. अगदी, उकळलेल्या पाण्याच्या बादल्या त्याने आमच्या बाथरूम मध्ये आणून ठेवल्या. उकळलेलं पाणी सुद्धा, पाचच मिनिटात कोमट होत होतं. असा, भयंकर गारठा. पाच बाय पाचच्या प्लास्टिकच्या कापडाने बनवलेल्या बाथरूम मध्ये, गरम पाण्याने आम्ही अंघोळी उरकून घेतल्या. सकाळचे नऊ वाजले होते. नवीन कपडे परिधान केले. पूजेच आणि प्रसादाचं साहित्य घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो. पावसाची भुरभूर चालूच होती. कधी एकदा, त्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतोय, असं झालं होतं. नागव्या पायाने, बर्फावरून चालताना पायाला चांगलाच गारगार चटका बसत होता. सैनिकी गेट पाशी, पुन्हा एकदा सर्वांची तपासणी केली गेली. दगडी पायऱ्या वरून चालत-चालत, आम्ही पवित्र गुफेपाशी जाऊन पोहोचलो.
अमरावती नदी किनारी, खूप उंचावर, हि नैसर्गिक पवित्र गुफा आहे. दीडशे फुट लांब, शंभर फुट रुंद, आणि' ऐंशी फुट उंची असलेली पवित्र गुफा, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडत होती. फक्त, पंजीकरण केलेल्या यात्रेकरूंनाच पहेलगाम किंवा बालताल येथून दर्शनाकरिता सोडण्यात आलं होतं. त्यामुळे, दर्शनाला म्हणावी अशी गर्दी नव्हती. प्रत्येक भाविकाला शिवलिंगाचं निवांत दर्शन घेता येत होतं. पुढे सरकत-सरकत मी, त्या पवित्र शिवलिंगा पर्यंत पोहोचलो. निसर्ग निर्मित पांढर्या शुभ्र बर्फापासून तयार झालेलं स्वयंभू शिवलिंग फारच आकर्षक दिसत होतं. त्याची निर्मिती, हे सुद्धा एक फार मोठं आश्चर्यच म्हणावं लागेल. हे शिवलिंग, अठरा फुटांपर्यंत उंच होत असतं, असं ऐकून होतो. आम्ही गेलो तेंव्हा शिवलिंग जेमतेम चार ते साडेचार फुटांच उरलं होतं. शिवलिंगावर, माझी नजर स्थिर झाली. आतापर्यंत, जाणवत असलेला सगळा थकवा अगदी नाहीसा झाला होता. दर्शनाने मन प्रसन्न झालं. आणि, डोळ्यांनी आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप अलौकिक असा स्वर्गीय आनंद मला प्राप्त झाला होता. गुफेच्या उजव्याबाजूला, शिवलिंग आणि त्या शेजारीच पार्वती मातेचं शक्तीपीठ. हे ठिकाण, पार्वती मातेच्या एक्कावन शक्तीपीठांपैकी एक आहे. डोळे आणि 'मन' भरून शिवलिंगाचं दर्शन घेतलं, धन्य-धन्य झालो. गर्दी नसल्यामुळे, जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटं मी त्या पवित्र गुफेमध्ये शिवलिंगा समोर हात जोडून उभा होता. चारीकडून जय शंभो, जय भोले, हर हर महादेव चा जयकारा चालू होता. अगदी प्रसन्न असं वातावरण निर्माण झालं होतं.
स्वर्ग काय असतो, आणि तो कसा असतो..! ते, याची देहा याची डोळा अनुभवत होतो. मनोभावे.. सुखी, समृद्ध, निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. फेसबुक वरील सर्व मित्रामैत्रिणींचा आणि आप्तेष्टांचा सुद्धा, शंभो महादेवाला नमस्कार सांगितला. मनासारखं दर्शन झालं होतं. इतरांना सुद्धा, दर्शनाचा लाभ घेता यावा. या हेतूने, त्या पवित्र गुफेतून मी बाहेर पडलो. प्रसाद म्हणून मिळालेली दुधाची खीर चाखली. गंगेचं तीर्थ प्राशन केलं.
आणि, मागे वळून 'भोळ्या' शंकराला पुन्हा एकदा नमस्कार केला.
तितक्यात, मला घोडेमालकाचे शब्द आठवले.....
साहब.... दर्शन होणे के बाद, यहासे जल्दी निकलो. मौसमका कुछ भरोसा नही होता.
आणि आम्ही, ताबडतोब तंबूच्या दिशेने निघालो.

क्रमशः 


अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- सात.

घोड्यावरून उतरल्यावर, चालताना पायांना खूप त्रास होत होता. सकाळी, पायी केलेली चढाई, चांगलीच भोवली होती. बसलं तर उठता येत नव्हतं. आणि, उठलं तर बसता येत नव्हतं. एकंदर, अशी अवस्था झाली होती. 
आम्ही पाच जनांकरिता, प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे एक तंबू भाड्याने घेतला. सहा, सात जन आरामशीर झोपतील, असा तंबू होता.
तंबूमध्ये... खाली जमिनीवर प्लास्टिक पेपर त्यावर जाडसर गादी. आणि, अंगावर घेण्यासाठी जाडसर मुलायम रजया ठेवल्या होत्या.
हवेतला गारवा, खूपच वाढला होता. ब्यागेत ठेवलेली सगळी गरम वस्त्रे, एक-एक करून पुन्हा अंगावर चढवली. तरीही गारठा काही कमी होत नव्हता. पायातील बूट काढले, एका कोपर्यात आमच्या ब्यागा ठेवल्या. आणि, आम्ही सगळे जन उब मिळवण्यासाठी रजया मध्ये शिरलो. थंडीमुळे, रजया सुद्धा खूप गारठल्या होत्या. मी तर, अगदी अंगाचं मुटकुळं करून रजई अंगावर घेऊन पडलो होतो. आमची अवस्था पाहून, तंबू मालकाने आमच्या अंगावर आणखीन एक-एक रजया टाकल्या. साधारण, अर्ध्या एक तासाने थोडी उब जाणवू लागली. नको असलेला नैसर्गिक 'एसी' आमची परीक्षा घेत होता. शरीर खूप थकलं होतं. कशाची म्हणून शुध्द राहिली नव्हती. दिवसभराचा थकवा घालवण्याकरिता, साधे हात पाय सुद्धा धुवावेसे वाटत नव्हते. इतकं थंड पाणी आणि, तो असह्य गारठा.
सकाळचं काम आत्ताच उरकून घ्यावं. या उद्देशाने, आमच्या मधील म्होरक्याने तंबू मालकाला पाठवून एका घोड्याच्या मालकाला बोलावून घेतलं. येथील लोक, सेवेकरिता सदैव तत्पर असतात. त्यांना कंटाळा असा नाहीच. तंबूमालक ताबडतोब गेला. आणि, दोन घोडे मालकांना सोबत घेऊनच आला. नाय होय करता, पंचतरणी ते पवित्र गुफा आणि तेथून पुन्हा चंदनवाडी अशा एकूण प्रवासाचे प्रत्येक घोड्यासाठी सोळाशे रुपये प्रमाणे सौदा पक्का झाला. घोडे मालकाने, सकाळी सहा वाजता येण्याचं कबुल केलं. आणि, तो हि त्याच्या राहुटीकडे निघून गेला.
माझं सगळं अंग ठणकत होतं. झोप सुद्धा लागत नव्हती. डोळे बंद, आणि कान उघडे ठेऊन पहुडलो होतो. कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती. चुकून कोणी माझ्याशी बोललाच, तर' मी त्याला, फक्त हुंकार द्यायचो, यापलीकडे काही नाही.
पंचतरणी मध्ये पोहोचल्यावर, आपल्याबरोबर असणार्या व्यक्ती चालताना मागे पुढे व्हायच्या. त्या पंचतरणी पर्यंत पोहोचल्यात कि नाही ? त्याची खातरजमा करण्यासाठी, चौकशी बूथवरील माईक वरून आपल्या मित्रांची नातेवाइकांची काही मंडळी चौकशी करायचे. आणि, त्यांच्याकारिता निरोप ठेवायचे. कि आम्ही, अमुक तमुक नंबरच्या तंबूमध्ये मुक्कामी आहोत. त्यामुळे, चुकामुक होण्याची बिलकुल शक्यता नसायची. आणि, ध्वनी वर्धकावरून निरोप मिळाल्यावर प्रत्येक व्यक्ती सुखरूप आपल्या आप्तेष्टांपर्यंत सुखरूप पोहोचत होता.
रात्र वाढली, तसा थंडीचा कडाका आणखीनच वाढला. आणि, मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. प्रत्येक, तीन श्वासानंतर, मला एक भला मोठा श्वास घ्यावा लागत होता. पंचतरणी मध्ये, सैनिकी दवाखान्याची सुद्धा व्यवस्था केली होती. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे, असा त्रास बर्याच जणांना होतो. त्यामुळे, कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था सुद्धा तिथे केलेली होती.
परंतु, रजई मधून बाहेर पडून दवाखान्या पर्यंत जाण्याईतके त्राण सुद्धा माझ्या अंगात राहिले नव्हते. मनात वाटत होतं,
आपली यात्रा, आता इथेच संपतेय कि काय ?
तहान सुद्धा खूप लागली होती. वाटायचं, कोणीतरी यावं.. आणि, पाण्याची बाटली माझ्या तोंडाला लावावी. पण, सांगणार कोणाला ? आणि, येणार तरी कोण ? थकव्यामुळे, जो तो रजई मध्ये गपगार झाला होता. रात्री आमच्यापैकी कोणीही, पाणी प्यायला उठला नाही. कि, लंगरमध्ये जेवायला सुद्धा गेला नाही.

माझ्या आयुष्यातील, मी अन्न पाण्यावाचून काढलेली ती पहिलीच रात्र असावी.

रात्रभर, मी फक्त देवाचा धावा करत होतो. हि रात्र, माझ्यासाठी काळरात्र ठरतेय कि काय ? अशी, भीती वाटत होती.
कधी एकदा, हि रात्र संपतेय. आणि, दिवस उजाडतोय असं झालं होतं. परंतु, वेळ काही जात नव्हता. विचार करता-करता, माझा' थोडावेळ का होईना डोळा लागला होता.
थोड्यावेळाने, मला पुन्हा जाग आली. असं वाटत होतं, मला झोपून बराच वेळ झाला असावा. बहुतेक.. पहाट झाली असावी, असं वाटत होतं.
कारण, सगळीकडे अगदी सामसूम झालं होतं. झोप येत नसल्यामुळे, आमच्या तंबू मधील एक मित्र उठून बसला होता. जीवाच्या आकांताने, मी त्याला म्हणालो.. किती वाजलेत रे ? तंबूत गेल्यापासूनच, माझ्या तोंडातून बाहेर पडलेलं हे पहिलच वाक्य होतं.
तो म्हणाला, साडेदहा वाजलेत...!
हाय रे माझ्या कर्मा, अजून बराच वेळ जायचा होता. तंबू मधील, लाईट विजवली होती.
हातामध्ये विजेरी घेऊन, तो मित्र लघुशंकेसाठी बाहेर पडला. जवळ-जवळ सगळे यात्रेकरू झोपी गेले होते. पूर्ण पंचतरणी मध्ये फक्त अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. लघुशंकेसाठी गेलेल्या मित्राने, त्याच्या विजेरीचा झोत जसा चालू केला. क्षणार्धात त्याच दिशेने, भारतीय जवानांनी त्यावर मोठ्या विजेचे झोत सोडले. एवढी जबरदस्त, सुरक्षा व्यवस्था. मोठाल्या विजेर्याचे झोत पाहून, तो मित्र खूप घाबरला. आणि, लघुशंका न करताच तो माघारी फिरला. आणि, रजई मध्ये शिरल्यावर त्याने मला हा वृतांत सांगितला. आता, माझ्या अंगात थोडी हुशारी आली होती. थकवा नाहीसा झाला होता. थोडं, बरं वाटत होतं. मनोमन देवाचे आभार मानले. आणि, झोपी गेलो.
अचानक, कसल्याश्या आवाजाने माझी झोप चाळवली. पुन्हा एकदा, लहरी वातावरणाचा फटका... मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. मनामध्ये, नको त्या भीत्या डोकाऊ लागल्या. ज्या ठिकाणी, नेहेमी हिमवर्षाव होत असतो. तिथे, पाऊस सुरु झाला होता. पहाटेचे साडेतीन वाजले होते. आणि.. चमत्कार घडावा तसा, आल्यापावली पाऊस निघून सुद्धा गेला होता.
माझ्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. कारण, इथल्या लहरी वातावरणाचा काल सकाळी अनुभव घेतला होता. तिथून पुढे मात्र, माझा डोळा काही लागलाच नाही, असं मला वाटत होतं. परंतु, सकाळ झाल्यावर माझ्या कानी आवाज पडला.

साहब, छे बज गये उठो अभी...!

आमच्या, नवीन घोडेवाल्याने.. आम्हाला आवाज दिला. तेंव्हा मला समजलं, कि दोन एक तास का होईना. मला, खरोखरच गाढ झोप लागली होती.

क्रमशः 

अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- सहा.

आम्हा सर्व मित्रांचा, घोड्यावरून एकत्रित प्रवास चालू होता. 
रमत गमत बर्फाळलेल्या दर्याखोर्यातून प्रवास करताना खूप मजा वाटत होती. वाटेत, भारतीय सैनिकांची छावणी लागली. त्यांनी, यात्रेकरूंसाठी पिण्याकरिता गरम पाण्याची व्यवस्था केली होती. तिथे लावलेल्या देशभक्ती गीतांनी गर्वाने छाती फुलून आली. गरम पाणी पिऊन, घसा सुद्धा तृप्त झाला. भारतीय सैनिकांना, एक मोठ्ठा "जयहिंद" ठोकून, आम्ही पुढे मार्गक्रमण केलं.
आता पुढील लक्ष होतं. "मह्नुगस" टॉप यालाच "गणेश" टॉप असं सुद्धा म्हणतात. हि चढाई सुद्धा, खूप खडतर अशी होती. परंतु, जो काही त्रास होणार होता. तो, घोड्याला आणि घोडेमालकाला. आम्ही, निवांत बसून प्रवास करणार होतो. मह्नुगस टॉप, समुद्रसपाटीपासून सुमारे १४८०० फुट उंच आहे. अगदी, विरळ अशी हवा. आणि, ऑक्सिजनची अत्यंत कमतरता असलेलं हे ठिकाण. या शिखराहून, अनेक हिमनद्या उगम पावतात. त्यामुळे, अर्थातच हवामान अत्यंत थंड असतं.
प्रवासादरम्यान, मी, थोडं घोडेमालकाशी हितगुज केलं. त्यावर समजलेली माहिती अशी. वर्षातले दोन महिने, त्यांचा घोडे चालवणे हा प्रमुख व्यवसाय असतो. ह्या दोन महिन्यात, सगळा खर्च वजा जाता चाळीस ते पन्नास हजार रुपये यांच्याकडे शिल्लक राहतात. त्यांच्या, कष्टाच्या मानाने हि रक्कम अगदीच अत्यल्प आहे. चंदनवाडी ते पवित्र गुफा आणि, पुन्हा चंदनवाडी. अशा प्रवासाचे सरकारी नियमानुसार ६५००/- रुपये इतकं एका घोड्याचं भाडं आहे. परंतु, एवढी रक्कम त्यांना कोणीच देत नाही. जास्तीत जास्त २२००/- ते २५००/- रुपयांमध्ये हा सौदा पार पडतो. दोन दिवसामध्ये' येऊन जाऊन सत्तर किलोमिटरचं अंतर एका व्यक्तिला पार करावं लागतं. साहजिकच, चालून चालून त्यांची पोटं अगदी खपाटीला गेली आहेत. आणि, गालफाड आत मध्ये. त्यांच्या मेहनतीला सीमाच नव्हती. हि लोकं, अगदी किरकोळ देहयष्टीचे परंतु काटक असतात. हा व्यवसाय करणारा तीस पस्तीस वयाचा व्यक्ती सुद्धा, पन्नाशीतील वाटत होता. त्यांना, मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईमध्ये ते असमाधानी वाटत होते. चर्चा करत असताना, घोडेमालकाचं एक वाक्य, मनाला खूप चटका लाऊन गेलं.
"क्या करे साहब, बिलकुल नही परवडता. लेकीन करणा पडता है." एक सवारीमे, हजार रुपये तो घोडेके खानेमे चले जाते है. लगबग पांचसौ तक हमारा खर्चा होता है. बाकी, क्या बचता है ?
साहब.. डीझल, पेट्रोल कुछ नही लगता...!
खाली, "खून जलता है खून".
त्याची प्रतिक्रिया, खूपच बोलकी होती. परंतु.. त्याला, माझा सुद्धा नाईलाज होता.
बोलता-बोलता, बरच अंतर कापलं गेलं होतं. आणि, पुन्हा एकदा नवीन शिवधून कानी पडली. समोर एक, मोठा लंगर नजरेस पडला. 'पोषपत्री' असं त्या लंगरचं नाव. दिल्लीमधील व्यावसाईक लोकं हा लंगर चालवतात. संपूर्ण प्रवासातील हा एक नंबरचा लंगर. पंचतारांकित हॉटेल मध्ये जे पदार्थ मिळणार नाहीत. ते पदार्थ सुद्धा, या ठिकाणी उपलब्ध होते. या ठिकाणी, अर्ध्या तासाची विश्रांती असते. यात्रेकरू, थोडीफार पोटपूजा करतात. घोडा आणि घोडे मालक, थोडी विश्रांती करतात. याठिकाणी, घोड्याला चारापाणी दिलं जातं. दुपारचे, चार वाजले होते. आता, पुढील प्रवासाला सुरवात करायची होती. मी घोड्यावर स्वार झालो. वाटेत एक झरा लागला. घोडा आणि घोडेमालक, दोघेही त्या वाहणाऱ्या झऱ्यात तोंड घालून एकत्र पाणी पीत होते.
थोडंसं ताजंतवानं झाल्यावर, आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली. आमच्या आजच्या प्रवासातील, आता, शेवटचा टप्पा राहिला होता. "पंचतरणी"... शेषनाग ते पंचतरणी, हे एकूण तेरा किलोमिटरचं अंतर. भैरव पर्वताच्या सानिध्यातील, समुद्रसपाटीपासून ११५०० फुट उंच असलेलं हे ठिकाण. यात्रेकरूंच्या मुक्कामाचं असलेलं हे ठिकाण आहे.
प्रवासाला सुरवात झाली. लंगर मधून आणलेले दोन तीन गोड पदार्थ मी घोडेमालकाला दिले. त्याने ते, खुशीने आपल्या खिशामध्ये ठेवले. घरी गेल्यावर खातो म्हणाला. दूर डोंगरावर, काही मेंढ्या चरत होत्या. आणि, शेजारीच काही राहुट्या सुद्धा होत्या. त्याकडे, हात करत तो म्हणाला. त्या मेंढ्या' आणि, ती राहुटी आमची आहे. यात्रे दरम्यान, दोन महिने आमचं वास्तव्य या खोऱ्यात असतं. अवती भवतीचा, सुंदर नजारा पाहत, घोड्यावर झुलत माझा प्रवास चालू होता. इथून पुढचा प्रवास म्हणावा इतका कठीण नव्हता. दुरूनच' वाहणारी नदी, हिमपर्वत आणि' बऱ्याच रंगीबिरंगी तंबूंची गर्दी दिसली. आजच्या प्रवासातील शेवटचा टप्पा जवळ आला होता. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, आम्ही पंचतरणी मध्ये पोहोचलो. घोडेमालकाला ठरलेल्या रकमेपेक्षा, मी' शंभर रुपये आगाऊ दिले. गडी भलताच खुश झाला. आणि, मला सुद्धा खूप समाधान वाटलं. मी 'शेरा' नामक घोड्याच्या पाठीवर, एक प्रेमळ थाप मारली. इथपर्यंत सुखरूप पोहोचवल्या बद्धल दोघांचे आभार मानले.
आणि, मी तेथून चालता झालो.

क्रमशः 


अमरनाथ यात्रा,२०१३ (प्रवास वर्णन) भाग :- पाच.

घोड्यावरील प्रवास, खरोखरच खूप आनंददायी असा होता. येथील सगळे घोडे मालक दिसायला जवळ-जवळ एकसारखेच. आपल्याबरोबर नेमका कोण होता ? ते ओळखणं, तसं महाकठीण काम. 
माझ्या पाठीवरचं ओझं, घोडे मालकाने त्याच्या पाठीवर लादलं होतं. शेषनाग टापू पर्यंत, अवघ्या अडीचशे रुपयामध्ये हा घोडा मी ठरवला होता. घोड्यावर बसून, सुंदर अशा बर्फाळलेल्या पर्वत रांगांचे हवे तसे फोटो मला टिपता येत होते.
" माझे पाय, मला 'हात' जोडत होते. "
खूप, हायसं वाटत होतं. पुन्हा एकदा, अवघड चढाई सुरु झाली. चालताना, कधी-कधी घोडं घसरायचं' पण, तो घोडे मालक मला आधार देत सावकाश नेत होता. खोल अशा दरी किनारावरून आमचा प्रवास चालू होता. माझ्या समोर चाललेले पाच सहा घोडे सोडून, त्यापुढे, एक खेचर चाललं होतं. त्याच्या पाठीवर, दोन ग्यास सिलेंडर लादले होते. चालताना, त्या खेचराचा अचानक पाय घसरला. आणि, ते खेचर खोल दरीत पडलं. ते दृश्य पाहून, माझी खूपच घबराट झाली. शेवटी, माझा घोडेमालक म्हणाला..
डरो नही, वो खच्चर उपर आ जायेगा. तेंव्हा कुठे, माझ्या जीवात जीव आला.
त्यानंतर, अजून एक वेगळाच प्रकार घडला. माझ्या पुढील घोड्यांच्या रांगेमध्ये, एका घोडीवर महिला बसली होती. आणि, त्यामागील घोड्यावर एक पुरुष बसला होता. घोडीच्या पाठीमागे चालून-चालून, तो घोडा भलताच 'कामोत्सुक' झाला होता. अचानक, त्या घोड्याने उसळी मारली. आणि, त्या घोडीच्या पाठीवर त्याने त्याचे दोन्ही पाय चढवले. तसे, त्या घोड्याचे पाय घोडीवर बसलेल्या त्या महिलेच्या पाठीवर धडकले. आणि, ती महिला त्या घोडीच्या तोंडाच्या बाजूने समोर पडली. आणि, मागील घोड्यावरचा पुरुष मागील बाजूस पडला. खोल अशा दरी वाटेत हा प्रकार घडला होता. त्या दोघांचही, नशीब बलवत्तर होतं. म्हणून, चुकून दरीत कोणी पडलं नव्हतं. सुदैवाने, त्या दोघांनाही जास्ती दुखापत सुद्धा झाली नव्हती. हा प्रकार घडल्या नंतर रागाच्या भरात, त्या घोडे मालकाने त्याच्या घोड्याला भला ठोकला.
तसं पाहिलं तर, त्या घोड्याचा त्यात काहीही दोष नव्हता. अशा दुर्गम भागात, त्या मुक्या जनावरांना दुसरा विरंगुळा तरी काय असावा..?
या प्रकरणाने, मी मात्र पुरता सावध झालो. आणि, माझ्या घोड्यासमोर चाललेला 'घोडा' आहे कि 'घोडी' ? याची, खातरजमा करून घेतली. सुदैवाने, माझ्या पुढे चाललेला 'घोडाच' होता.
शेषनाग टापू, जवळ येत होता. उंचच उंच बर्फाळलेले पर्वत आणखीनच जवळ येत होते. बर्फाच्छदित पर्वातांमुळे हवेमध्ये थंड अशी वार्याची झुळूक येत होती. अगदी 'एसी' मध्ये बसून माझा प्रवास चालला होता.

थंडीचा आणि उन्हाचा, माझ्या चेहेर्याला चांगलाच 'चटका' बसला होता. ते, माझ्या हलगर्जी पणामुळे. मी, चेहेर्यावर कोल्ड्क्रीम, सनस्क्रीम लावण्याचा कंटाळा केला होता. त्यामुळे माझ्या..नाक, गाल, आणि कपाळावरील त्वचा जळाली होती. जे होतं, ते चांगल्या करिताच. असं, म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा न्हवता.
उजव्या बाजूला, खोल दरीमध्ये शेषनाग तलाव नेत्रांना अलौकिक सुख आणि समाधान देत होतं. पुन्हा एकदा, नवीन शिवधून कानी पडली. शेषनाग चेकपोस्ट जवळ आली होती. दुपारचे, सव्वादोन वाजले होते. चेकपोस्ट वरील सैनिक दुरूनच हात हलवत आम्हाला लवकर येण्याचा इशारा करत होते. आम्ही, घोड्याचा वेग थोडा वाढवला. आणि, एकदाची शेषनाग चेकपोस्ट् पार केली. तेंव्हा कुठे, माझा जीव भांड्यात पडला. आणि, पाचच मिनिटात चेकपोस्ट सुद्धा बंद करण्यात आली. मी, घोड्यावरून खाली उतरलो, घोडे मालकाला त्याचे पैसे चुकते केले. माझी ब्याग, पाठीवर अडकवली. आणि, पुढे निघालो. पायांना थोडा आराम मिळाला होता. त्यामुळे, त्यांच्या ठणका अजून वाढल्या होत्या. थोडं अंतर चालून गेल्यावर जवळ-जवळ सगळेच मित्र, समोर उभे असलेले मला दिसले. त्यांना पाहून, माझा आनंद आणखीनच द्विगुणीत झाला. त्या सर्वांनी, आपापले घोडे ठरवले होते. त्यांनी, मला सुद्धा एक नवीन घोडा ठरवून दिला. आणि, आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली.


क्रमशः 


अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- चार.

अमरनाथ यात्रेला निघताना, माझ्या घरच्यांचा आणि मित्र मंडळीचा सुद्धा मला फार विरोध होता. वातावरण खराब आहे. पुढच्यावर्षी जा..! असं, त्याचं म्हणनं होतं. प्रवासाला घरून निघताना, माझी आई तर चक्क माझ्या गळ्यात पडून रडलीच होती.. 
माझ्या मनामध्ये, खूप कालवाकालव होत होती. परंतु, काहीही होऊदेत' पण, यात्रेला जायचच. असा मनाशी मी ठाम निर्धार केला होता. त्यापाठीमागे सुद्धा, दोन कारणं होती. पहिलं म्हणजे, जिवंतपणी स्वर्ग पाहण्याची मनामध्ये अभिलाषा होती. आणि, दुसरी म्हणजे, अतिरेक्यांच्या धमक्यांना घाबरून, देवधर्म सोडून घरात बसनं मला इष्ट वाटत नव्हतं. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये उन, वारा, पाऊस यांचा मारा झेलत, भारतीय सैन्याने आपल्या वाटेकडे डोळे लावलेले असतात. त्याचं एकच म्हणनं असतं.

" तुम्ही यात्रेला या, तुम्हाला सुखरूप यात्रा घडवण्याची जबाबदारी आमची आहे."


आणि, आपण यात्रेला न जाणं म्हणजे; त्यांच्या, सुरक्षा यंत्रणेवर अविश्वास दाखवल्या सारखं मला वाटत होतं. बस, या दोन गोष्टीमुळेच, मला अमरनाथ यात्रेला जाणं भाग पडलं.

पाण्याचे दोन घोट घशाखाली उतरवले. थोडावेळ विश्रांती करून पुन्हा प्रवासाला सुरवात केली. प्रत्येकाच्या चालण्याची क्षमता हि एकसारखी नसते. त्यामुळे, आम्हा पायी जाणार्या सर्व मित्रांची फाटाफूट झाली होती. आणि आता, माझा एकला चला रे... असा, प्रवास चालू होता. काही वयोवृद्ध किंवा 'वजनी' स्त्री पुरुषांना घोड्यावरील प्रवास सुद्धा जमत न्हवता. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या डोल्यांची तिथे व्यवस्था करण्यात आली होती. चार सहा व्यक्ती मिळून, त्या डोलीची वाहतूक करत असत.
डोलीत बसल्यामुळे, मनुष्य पूर्णपणे परावलंबी होतो. त्या प्रवासात, त्याचा त्या डोलीत गप्प बसून राहण्याशिवाय कोणताच सहभाग नसतो. वाहतूक करणाऱ्या त्या चार सहा लोकांवरच त्याचं 'भवितव्य' अवलंबून असतं. डोलीवर बसलेल्या बर्याच महिलांना, मी धाय मोलून रडताना पाहिलं. झुलत जाणारी डोली आणि खोल दऱ्या पाहून त्यांच अक्षरशः वेड पळत होतं. त्या मोठ्याने ओरडत म्हणायच्या,

" भैय्या.. जरा धीरे चलो, मुझे बहोत डर लग रहा है. लगता है मै मर जाऊंगी "

त्यावर, ते डोली चालक, फक्त एकच वाक्य म्हणायचे." बहेनजी.. फिकर मत करणा, हम आराम से पोहोच जायेंगे." त्यांच्या, बोलण्यात आणि चालण्यात तेवढी ताकत सुद्धा होती. कमालीचे कणखर लोकं. त्या महिलांचे, वाक्य ऐकून मी पायी जात असून सुद्धा दचकायचो. आणि, त्या डोली पासून थोडं अंतर ठेऊनच चालायचो.
आता मात्र, माझ्या पायातील बळ सुद्धा संपत चाललं होतं. चढउतार करून पिंडर्ऱ्या जाम झाल्या होत्या. दुपारचे साडेबारा वाजले होते. आता, प्रवासातील दुसर्या मोठ्या चढाईला प्रारंभ झाला होता. त्या टापुचं नाव "शेषनाग"

चंदनवाडी ते शेषनाग, हे एकूण तेरा किलोमीटरच अंतर. समुद्रसपाटीपासून सुमारे १२५०० फुट उंच असं हे ठिकाण. याच ठिकाणी, शेषनाग तलाव आहे. आणि, याच ठिकाणी लीडर नदी सुद्धा उगम पावते. शेषनागची खडतर चढाई करून दुपारी दोन वाजायच्या आत तेथील सैनिकी पोस्ट् ओलांडायची, असा नियम आहे. अन्यथा शेषनाग येथे असणार्या तंबूमध्येच मुक्काम करावा लागतो. शेवटी, त्या अवाढव्य पर्वत रांगांसमोर मी सुद्धा हात टेकले. आणि दूर उभ्या असलेल्या, एका घोडेवाल्याला हाताने इशारा करून बोलावून घेतलं. आणि, घोड्यावर बसून पुढील प्रवासाला सुरवात केली.

क्रमशः

अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- तीन.

यात्रेची सुरवातच, कैलास खेर यांच सुप्रसिध्द गीत.... "बमलहेरी" या शिवगीताने झाली. त्या गीतामध्ये मला एक प्रकारची उर्जाच जाणवली. ते गीत ऐकून, माझं संपूर्ण शरीर रोमांचित झालं होतं. 'बम भोले' म्हणत, आम्ही सुद्धा त्या भक्तिमय वातावरणात एकरूप झालो. 
समोरच.. शिवभक्तांनी लंगरच्या ( भंडारा ) भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. ते शिवभक्त, सर्व यात्रेकरूंना विनम्रपने आणि आग्रहाने चहा नाश्त्याचं आमंत्रण देत होते. एवढं आदरतिथ्य पाहून, मला तर अगदी थक्क व्हायला झालं. कारण, ते सर्व शिवभक्त अगदी 'विनामूल्य' सेवा देत होते. लंगरमध्ये बर्याच गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. त्याच बरोबर, राजमा-भात, भाजी-चपाती असं भरपेट जेवण सुद्धा होतं. आम्हाला पायी प्रवास करायचा होता. आणि, रिकाम्या पोटी प्रवास करू नये. म्हणून, आम्ही थोडी-थोडी दुधाची खीर चाखली. सर्व शिवभक्तांचे, मनोमन आभार मानले. आणि, पुढे निघालो. वाटेमध्ये, पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना, उर्जा मिळावी म्हणून' चोकलेट, गोळ्या, फ्रुटी, सुकामेवा असे बरेच जिन्नस वाटण्यात येत होते. अन्नदान करणाऱ्या भाविकांच कौतुक करावं इतकं कमीच. थोडीफार चोकलेट्स, गोळ्या व सुकामेवा खिशामध्ये कोंबला. आणि, आम्ही पुढे निघालो.
यात्रेसाठी घोड्यावरून प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्या यात्रेकरूंची, तिथे असणाऱ्या घोड्यांच्या मालकाशी देण्याघेण्या वरून घासघीस चालू होती. आणि, जमेल त्या दरामध्ये घोडा ठरवून जो तो पुढे कूच करत होता. घोड्यांचे मालक, आमच्या मागे पुढे येऊन घोडा घेण्यासाठी आम्हाला विनंत्या करत होते. परंतु पायी जायचं खूळ माझ्या डोक्यामध्ये घर करून बसलं होतं. त्यामुळे, मी व माझे चार सहकारी त्या घोडे मालकांपासून कशीबशी सुटका करून घेत पुढे निघालो. बरोबर सकाळी नऊ वाजता, आमच्या पायी प्रवासाला सुरवात झाली.
पहिलीच चढाई, अगदी कठीण अशी होती. त्या टप्प्याच नाव "पिस्सू" टॉप.. चंदनवाडी पासून, साधारण पाच किलोमिटर अंतरावर असणारं हे ठिकाण. अत्यंत अवघड चढण, समुद्रसपाटी पासून साधारण ११५०० फुट उंच असलेल हे ठिकाण. येथे, ऑक्सिजनची खूप कमतरता जाणवते. समोर उभा ठाकलेला पिस्सू टॉप पाहून, माझ्या अंगात कापरंच भरलं. पूर्णपने खडतर' आणि, नागमोडी वळणाचा छातीवर येणारा रस्ता. पिस्सू टॉपचा, असला भयंकर चढ पाहून, आईचं दुध आठवणे, गोट्या कपाळात जाने, अशी साधर्म्य असणारी बरीचशी वाक्य माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली. एक तर, अवघड चढाई. आणि, खोल दरी.... चुकून, कोणी खाली पडलाच तर ..!

एकच शब्द आठवतो, "भयंकर", हो-हो अगदी भयंकर.
मनाची पूर्ण तयारी केली. आणि, प्रत्यक्ष चालायला सुरवात केली. घोड्यावरील यात्रेकरू आणि पायी चालत जाणारे यात्रेकरू या दोहोंसाठी एकच मार्ग असल्यामुळे, पायवाट तुडुंब भरली होती. त्यात, आम्हा पायी चालणाऱ्या व्यक्तींचे खूप हाल व्हायचे. कधी घोडे सरळ आमच्या अंगावर यायचे. तर, कधी घोड्याकडे पाहता-पाहता दगडी पायऱ्या वरून धडपडायला व्हायचं. फारच कठीण आणि खडतर रस्ता. चढाई करत असताना, अक्षरशः घोडे सुद्धा टराटर पादत आणि हागत सुद्धा होते. तिथे पायी चालणाऱ्या माणसाची काय अवस्था होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चालून-चालून माझं अंग गरम झालं. थंडी कुठच्या कुठे पळून गेली होती. सुर्यनारायणाने भयंकर चटके द्यायला सुरवात केली. पुन्हा एकदा लहरी वातावरणाचा फटका बसला. अंगातून, घामाच्या धारा व्हाऊ लागल्या. एक-एक करून अंगावरील सगळी गरम वस्त्र, काढली. आणि, पाठीवरील ब्यागेमध्ये ठेवली. आता, माझ्या पाठीवरील ओझं वाढलं होतं.
पाठीवरील ओझ्याची हमाली करण्यासाठी पीट्टू ( हमाल ) आमची मनधरणी करू लागले. त्यांना... नाही, नको म्हणून जीव अगदी मेटाकुटीला आला होता. शेवटी, मी त्यांना दोन्ही हात जोडले. तेंव्हा कुठे त्यांनी आमचा पिच्छा सोडला. दमत का होईना, पण प्रवास चालू होता. वाटेमध्ये जागोजागी फौजी भाई तैनात असायचे. त्यांना जयहिंद ठोकत आम्ही पुढे निघायचो. चालून-चालून घसा कोरडा पडायचा, तेंव्हा' तोंडामध्ये एखादी गोळी टाक' काजू, मनुका, किंवा बदाम चघळ असं करत आमचा प्रवास चालू होता. चालून-चालून खूप धाप लागत होती. छातीमध्ये हलक्याशा कळा जाणवत होत्या. मनाची, थोडी चलबिचल झाली होती. परंतु, मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. शेवटी, एका मित्राने हार मानली. आणि, आम्हाला सोडून घोडा ठरवून तोही पुढे चालता झाला. आतापर्यंत, पहिल्या टप्प्याच जेमतेम निम्मच अंतर कापलं गेलं होतं...!
शेजारून घोड्यांची आवक-जावक चालूच होती. त्यांच्या टापांचा खडखडाट तो होणारा खडबडीत आवाज खूप छान वाटायचा. घोड्यावरून जाणारी माणसं रुबाबात प्रवास करत होते. परंतु, आपण घोड्यावरून खाली पडू कि काय ? अशी भीतीची झलक, त्यांच्या चेहेर्यावर सुद्धा स्पष्ट जाणवत होती. निम्म्या प्रवासातच माझ्या पायाचं पक्क भजन झालं होतं. अजून, बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. एकदा बसलं, कि पुन्हा उठता येणार नाही. म्हणून, हळू-हळू का होईना माझं चालनं चालूच होत. मजल दरमजल करत पुढे जात असताना. पुन्हा, एका सुरेल अशा शिवगीताची धून कानावर येऊन धडकली. आणि, पिस्सू टॉप संपत आल्याची चाहूल आम्हाला लागली. शेवटचा टप्पा सपाटीचा होता. तो, भराभर सर करीत आम्ही पिस्सू टॉप येथील लंगर पर्यंत पोहोचलो. तब्बल दीड तासामध्ये आम्ही हे अंतर कापलं होतं. आणि, दमलेल्या, थकलेल्या अवस्थेत एकदाचं' आमचं बुड, आम्ही जमिनीला टेकवलं. तेंव्हा कुठे, जरा हायसं वाटलं.

क्रमशः 

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- दोन.


पहाटेची वेळ.. बोचऱ्या थंडीमध्ये, पहाटे तीन वाजता, अगदी कडक पाण्याने न्हाऊन, धुवून घेतलं. आणि, वाफाळलेलं अंग घेऊन बाथरूम च्या बाहेर पडलो. मनोभावे, परमेश्वराला नमन केलं. नवीन पोशाख अंगावर चढवला. त्यावर.. स्वेटर, हातमोजे, माकडटोपी परिधान केली. आणि, नुनुल्या बाळासारखा तयार झालो. रूमच्या बाहेर आलो. हवेमध्ये, भलताच गारवा जाणवत होता. पहलगाम-चंदनवाडी रस्त्यावर, भाड्याने ठरवलेल्या सुमोची वाट पाहत आम्ही उभे होतो. आकाश अगदी स्वच्छ आणि निरभ्र होतं. चांदण्या लुकलुक करत, डोळे मिचकावत जणू काही आम्हाला प्रवासाच्या शुभेच्छाच देत होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अमरनाथाच्या दर्शनासाठी सगळ्यांची मनं आसुसलेली होती. तितक्यात, आमची सुमो आली. आणि, आमच्या मंगलमय प्रवासाला सुरवात झाली.

वेडीवाकडी वळणं घेत, पहिल्या सैनिकी चेकपोस्ट पाशी आमची गाडी येऊन थांबली. रस्त्यावर वाहनांची एकच रांग लागली होती. बरोब्बर नवव्या क्रमांकावर आमची गाडी उभी होती. सैनिकी खाक्या सोबत असल्यामुळे, नियमांची पायमल्ली होत नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा वाहणारी 'लीडर' नदी कर्णमधुर संगीताची साथ करत होती. 
भारतीय सैन्याकडून.. सर्व यात्रेकरूंची, रीतसर तपासणी केली गेली. थंडीपासून बचाव करण्याकरिता, त्या भागातला विशिष्ट प्रकारचा जाड कापडाचा झब्बा परिधान करून सर्व मोटार सारथी एकत्र गप्पा मारत उभे होते. थंडी घालाविण्याकरिता, सिगरेटच्या धुराचे लोट हवेमध्ये सोडत गप्पा मारत ते उभे होते. पहाटेचे चार वाजत आले होते. ठीक साडेचार वाजता, सर्व यात्रेकरूंना सैनिकी बंदोबस्तात यात्रेला रवाना करण्यात येणार होतं. प्रवासाला निघायला अजून अर्धा तास अवकाश होता. माझ्या डोळ्यावर, हलकीशी पेंग येत होती. एखादा डूलका काढावा, म्हणून मी डोळे मिटले. आणि, स्वतःला निद्रादेवीच्या स्वाधीन केलं. ते, कसल्याशा आवाजाने माझी निद्रा भंग पावली.

मुसळधार पाऊस पडायला सुरवात झाली होती. आतापर्यंत दिसणारे, समोरचे बर्फाळलेले अवाढव्य डोंगर, दिसेनासे झाले होते. सगळीकडे धुरकट वातावरण तयार झालं होतं. सुमोच्या समोरील काचेवर आमच्या श्वासांच्या वाफेमुळे एक हलकीशी झालर ओढली गेली होती. त्यावर गडद झालेला पाण्याचा एक-एक थेंब हलकेच ओघळत होता. आणि सुंदर अशी नक्षी त्या काचेवर तयार होत होती.
या भागामध्ये, वातावरण कधी बदलेल याचा नेम नसतो. असं, मी ऐकून होतो. आणि, आज ते याची देहा याची डोळा अनुभवत सुद्धा होतो. मी पुन्हा एकदा पुन्हा डोळे मिटले, आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र, माझा डोळा लागत नव्हता. इतर मित्रांचे कुजुबुजू आवाज कानी पडत होते.

" पावसाचा जोर असाच राहिला. तर, बहुतेक आज यात्रा रद्द होईल..! "

मन, धास्तावलं होतं. पाऊस थांबावा म्हणून, मी मनामध्ये देवाचा धावा करीत होतो. सतत चार तास मुसळधार पाऊस पडत होता. सुमोमध्ये बसून आता चार तास उलटून गेले होते. सकाळी आठ वाजता, पावसाचा जोर थोडा कमी झाला. देवच पावला म्हणायचं. थोडीशी रिपरिप चालू असताना, अचानक पाऊस बंद झाला. पुन्हा एकदा, लहरी वातावरणाचा आम्हाला सुखद धक्का मिळाला. आकाश स्वच्छ झालं, सुर्यानारायनाचं दर्शन झालं नाही. परंतु, त्याचं अस्तित्व मात्र जाणवत होतं. सैनिकी अधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शे-दोनशे गाड्यांचा जत्था, चंदनवाडीकडे रवाना केला. वेडी वाकडी वळणं घेत, अवघ्या अर्ध्या तासामध्ये, आमची गाडी चंदनवाडी पोस्ट् पाशी जाऊन थांबली. चंदनवाडी मध्ये सर्व यात्रेकरूंची पुन्हा एकदा तपासणी केली गेली. आणि आम्ही, अमरनाथ यात्रेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.

क्रमशः 

अमरनाथ यात्रा, २०१३ ( प्रवास वर्णन ) भाग :- एक.



'जेवण' हा, माणसाच्या फार जिव्हाळ्याचा विषय. तर मग, ते जेवण सुद्धा विविध प्रकारचं आलच.
परंतु, बहुतांशी असं पाहण्यात येतं. कि, प्रत्येकाला जेवण हे घरगुतीच हवं असतं.
पण का ? ............
बघा ना, मोठमोठ्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा तशा पाट्या वाचायला मिळतात.
कारण, 'घरगुती' हा विषय आपल्या नसानसात भिनलाय.
आपला गाव, 'महाराष्ट्र' सोडून आपण जेंव्हा बाहेरगावी जातो. तेंव्हा, आपल्याला घरगुती जेवणाची किंमत कळते. शेकडो रुपये खर्च करून सुद्धा मनासारखं, आवडीचं म्हणावं असं जेवण आपल्याला मिळत नाही. 

अमरनाथ यात्रेमध्ये, लंगर ( भंडारा ) या विषयाला फार मोठं महत्व आहे.
अन्नदान करायला, तिथे कोणीच मागे पुढे पाहत नाही.
एखाद्या, श्रीमंत व्यक्तीच्या लग्न समारंभामध्ये सुद्धा मिळणार नाहीत. इतके गोडधोड पदार्थ,त्या लंगर मध्ये असतात.
त्या ठिकाणी, आपल्या महाराष्ट्रामधील सुद्धा एखादा लंगर का असू नये ?
हाच मुद्दा लक्षात घेऊन, अमरनाथ यात्रा जेथून सुरु होते. ते शेवटचं गाव, म्हणजे 'पहलगाम'.
त्या गावामध्ये, आपले मुंबईकर शिवभक्त श्री.विठ्ठल बा. बेलापूरकर ( पेंटर ) यांनी सुद्धा, ओम अमरनाथ सेवा मंडळ ( रजी. ) या मंडळाद्वारे, आपल्या मराठी बांधवांकरिता लंगर सुरु केला आहे. यंदा, त्यांच्या या सेवेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत.
घराबाहेर गेल्यावर, घरगुती जेवणाची चव काय असते, ते इथे समजलं. जेवण अगदी साधं असतं. पुरी,भाजी,वरण,भात आणि एखादा गोड पदार्थ.
परंतु, ते घरगुती असतं. आपल्या माणसांनी बनवलेलं असतं. आणि, आपल्या घरूनच तिथपर्यंत नेलेलं असतं.
त्यांची, हि सेवा पाहून मी तर धन्य झालो.
कोण कोणासाठी करेल का ओ येवढ ?
आणि, ते सुद्धा विनामुल्य. ( अन्नादानाकरिता सढळ हाताने मदत अवश्य करा. )
अशा, व्यासंगी लोकांना भेटल्यावर अगदी नतमस्तक व्हायला होतं.
आपल्या मित्रांपैकी, जर कोणी अमरनाथ यात्रेला जाणार असेल. तर, या ठिकाणी नक्की भेट द्याच.

( कोणी तेथे जाणार असेल, तर' एक दिवस अगोदर फोन वरून त्यांना तशी माहिती द्यावी.)

श्री. विठ्ठल बा. बेलापूरकर ( पेंटर )
स्थळ : पोषवन पार्क समोर, चंदनवाडी रोड, पहलगाम ( अमरनाथ )
अल्पोपहार, निवास, औषधोपचार, ऑक्सिजन पार्लर सुविधा विनामुल्य उपलब्ध.
मोबाईल नंबर. ०९४६९२१८१७४ ( काश्मीर )

भूकेको अन्न, प्यासेको पाणी, जय हो बाबा बर्फानी..


Wednesday, 8 July 2015

दुकान.. ( THE "BODY" SHOP )

क्या गे... तिन, चार दिन होनेको आये... मन सरिखा गिऱ्हाक आराच नई.
हौ ना..क्या होया क्या मालूम. धंदा भौत हीच थंडा पडेलाय. 

आब क्या करे..? 
रुक... आज कूच तो जरूर होईंगा..

रशिदा आणि रेश्मा.. वेश्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेल्या दोन मुलींच्यात संवाद चालू होता. 
तुटपुंज्या कमाई मध्ये, त्यांचं भागत न्हवत. म्हणून, एखाद्या तगड्या गिर्हाईकाची वाट पाहात, त्या एसटी स्टेन्ड च्या आसपास घुटमळत गप्पा मारत थांबल्या होत्या. तोंडात चघळत असलेल्या एकशेवीस ची पिचकारी मारताना सहज त्यांची नजर वळाली.

अचानक, सलीमची नजर यांच्यावर पडली. सलीम, त्या भागातील 'दल्ला' होता.
ह्या दोघींना पाहताच, तो त्यांच्यापाशी येऊन पोहोचला.

क्या री रेश्मा... कैशी है तू..?
क्या बोलनेका बाबा तेरेकू, चार दीनसे कोई हातमेच नही आराय.
क्या बाता कररे...चलो, मेरे साथ आते क्या..? अपुन के पास बहोत तगडा गिर्हाक है..
कहा..?
वो सामनेवाले होटल मे, एक आरबी ठेहेरा है. अच्छा माल देंगा.
बोलो... आते क्या?

आरबी माणूस आहे म्हंटल्या बरोबर, ह्या दोघींचे चेहेरे अगदी उजळून निघाले होते. नोटांची बंडलं, त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागले होते. महिनाभरची कसर निघून जाणार होती. त्या दोघीही, आपापल्या स्वप्नात दंग झाल्या होत्या..

त्यांची तंद्री भंग करत, सलीमने त्यांना आवाज दिला. 
बोलो.... चलते क्या?
दोघींनी, खुशीने आपल्या माना डोलावल्या. आणि, त्या सलीम बरोबर चालत्या झाल्या.

सलीमच्या मनात तर लाडू फुटत होते. त्याच्या मागणीप्रमाणे, त्याला आणि अर्थात अरब्याला हव्या तशा कोवळ्या मुली मिळाल्या होत्या. आणि, ह्या सौद्यात त्याला सुद्धा रग्गड कमिशन मिळणार होतं.

गल्लीबोळातून मार्गक्रमण करीत. हे तिघेही, 'त्या' हॉटेल पाशी येऊन पोहोचले.

त्या दोघींना खालीच थांबवून. सलीम, त्या अरबी व्यक्तीपाशी जाऊन, ठरलेली ठराविक रक्कम घेऊनच खाली आला. 
आपलं कमिशन बाजूला काढून, उरलेली रक्कम त्या दोघींच्या हातात देत. त्यांना तो हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील असणाऱ्या रूम मध्ये घेऊन गेला.
रूम मध्ये, एक गोरापान तरणाबांड अरब त्यांची वाट पाहत थांबला होता. ह्या दोघींना, त्या आरब्याच्या हवाली करून सलीम तेथून चालता झाला.

हॉटेल खाली थांबून, मिळालेलं कमिशन मोजत-मोजत सलीमने एक सिगारेट शिलगावली. सिगारेटचा एक मोठा झुरका ओढत तो पुढे निघाला होता. हॉटेलला वळसा घालून, तो पुढे जाऊ लागला. 
सलीमने ज्या ठिकाणी मुलींना सोडलं होतं. त्या हॉटेलच्या, पहिल्या मजल्यावरील अंतर जमिनी पासून म्हणावं इतकं उंच न्हवत. सलीम, थोडा पुढे गेला. आणि त्याला, त्याच रुमच्या खिडकीमध्ये काहीतरी गडबड होत असल्याचा आवाज त्याच्या कानी पडला.
कानोसा घेण्याकरिता, तो थोडा पुढे सरकला....
तशा, त्या भल्या मोठ्या खिडकीमधून त्या दोन तरुणींनी खाली उड्या मारल्या. खिडकीखाली, वाळूचे मोठ्ठे ढीग आणि पटांगण असल्यामुळे. त्या दोघींना, कसल्याच प्रकारची इजा झाली न्हवती.
जीव मुठीत घेऊन, त्या दोघी सुसाट वेगाने रस्ता फुटेल तशा पळू लागल्या.
काय घडलं असेल..? ह्या भीतीने, सलीम सुद्धा त्यांच्या मागोमाग पळू लागला. काही अंतर कापल्यानंतर, त्या दोघींचा पळण्याचा वेग थोडा मंदावला. धापा टाकत, सलीम सुद्धा त्यांच्या पाशी जाऊन पोहोचला.

फुललेला श्वास सावरत त्याने त्या दोघींना विचारलं.
क्या होया ? क्यू भागे वाहासे ?

एका हाताने थांब म्हणत, थोडा मोठा श्वास घेत त्यातील एक मुलगी म्हणाली.
आरे... हमको कैशे आदमी के पास लेके छोड्या तुने..!

क्यू क्या होया... ?

आरे, कैसा आदमी है वो... उसका 'XX' है के,, थम्सप कि बोतल..?

Tuesday, 7 July 2015

गुंता..

तुला काहीच कसं वाटत नाही गं..?
मी एक पुरुष आहे. तुझा, खूप जवळचा मित्र आहे. पण शेवटी, माझ्या मनात सुद्धा हा विचार आलाच ना..!
मला मान्य आहे. तुझा साता जन्माचा सोबती अकालीच तुला सोडून दूरच्या प्रवासाला कधीही न येण्यासाठी कायमचा निघून गेलाय.
पण... याचा अर्थ हा होत नाही ना.
कि तू, मनाला वाटेल तितक्या पुरुषांशी जवळीक साधशील.
अगं तुला हा खेळ वाटतोय का.? का तू इतके संसार उध्वस्त करायला निघाली आहेस..? त्यांच्यावर कोणत्या जन्मीचा सूड उगावत आहेस..? उद्या त्यांचे संसार उध्वस्त झाले तर तुला आनंद होणार आहे का..?
कि.. तू सुद्धा एक स्त्री आहेस हेच तू विसरून गेली आहेस..?
हाहाहाहा.....!!
अगं हसतेयेस काय..? मी काय तुझ्याशी थट्टा मस्करी करतोय का..? लाज वाटत नाही तुला इतक्या मोठ्याने खिदळतेयेस ते..?
बस्स्स....
झालं तुझं बोलून...!
तू स्वतःला माझा जवळचा मित्र म्हणवतोस ना..? मित्रच म्हणवतोस ना..?
मी तुला कधीतरी 'स्त्री' वाटली आहे का रे..? मग ह्या ना ना शंका कुशंका तुला कशाला हव्या आहेत..? तू माझा खूप मोठा काळजी वाहक आहेस का..? मी कधी तुला कोणत्या गोष्टीचा त्रास दिला आहे..?
आपली निखळ मैत्रीच आहे ना..? मग तू का एवढं मनाला लावून घेतोयेस..?
काळजी वाटते गं मला तुझी,
चुकून, ते पाच नराधम एकाच वेळेस तुझ्यासमोर उभे ठाकले तर तू काय करणार आहेस..?
त्या वेळी होणारी, तुझी त्रेधा तीरपिट आठवून माझा जीव घाबरून जातो गं. तुझ्या शरीराचे लचके तोडतील गं ते. तुला ह्या गोष्टीचं काहीच गांभीर्य वाटत नाहीये का..?
नाही...!
ह्या खेळात, मी आता खूप तरबेज झाले आहे. तुला, त्याची काळजी नसावी.
पण, बरं वाटलं... कोणीतरी माझी काळजी करतंय.
हे बघ, प्राची...
मी तुझ्याकडे नेहेमी एक मित्र म्हणूनच पाहिलं आहे. तुझ्याविषयी, माझ्या मनामध्ये कधीही पाप आलं नाही. आणि, येणार देखील नाही.
इतर लोकांप्रमाणे... मला तुझ्याशी बहिणीचं खोटं नाटं भावनिक नातं जोडायचं नव्हत. म्हणून, गेली पाच वर्ष मी तुझ्याशी अगदी पवित्र नात्याने वागतोय.
तुला काय वाटतंय.. मला संधी आली नव्हती..?
मी कुठे नाही म्हणतेय.. पण, ह्या एकांकी वातावरणात माझा तरी तोल कधी ढासळला आहे का..?
कसा ढासळेल..?
तू त्या अगोदरच फार दूर निघून गेली होतीस. एक म्हणता म्हणता किती मित्रांची प्रेम प्रकरणं तू मला ऐकवलीस. ते तरी तुला आठवत आहे का..?
हो आठवतंय.. सगळं आठवतंय,
माझ्या ह्या दोन कच्च्या बच्च्यांसाठी, मला ते सगळं करावं लागलं.
तुला.. मी संभोग विलासी स्त्री वाटतेय का..? नाही रे... मी अजूनही तितकीच पवित्र आहे.
माझ्या शेवटच्या प्रणयाची ती रात्र मला अजूनही अगदी तशीच आठवतेय. आणि, त्यानंतर त्या निश्चल देहाला दिलेला अग्नी सुद्धा अगदी डोळ्या समोर दिसतोय बघ. मी अजूनही त्याच वणव्यात उभी पेटतेय. स्वतःला जाळून घेतेय. तुला नाही समजायच्या त्या गोष्टी.
नाही रे, मी संभोग विलासी स्त्री नाहीये...
रडू नकोस प्राची...
ऐक...
काय ऐकू आणि कोणाचं ऐकू..?
तुझ्याकडे असणारी गाडी, घर, ऐश्वर्य हे काय तुला फुकट मिळालं आहे..? त्यासाठी, तू काहीतरी किंमत मोजली असशीलच कि. आणि, करून सवरून पुन्हा पवित्र असल्याचा आव आनतेयेस..?
हो.. मोजलीय मी त्याची किंमत...
मुख मैथूनाच्या पुढे मी कुठेही गेले नाहीये..
शी.....
काय बोलतेयेस तू हे.
किती नीच पातळीचं बोलतीयेस. मला तर नुसतं ऐकूनच मळमळायला लागलंय.. !
काय करू..?
तू माझ्या भावना कधी जानल्याच नाहीस. माझे स्पर्श तरी तुला चेतना देत होत्या कि नाही. ते सुद्धा कधी समजलं नाही. माझ्यात कोणती कमतरता होती. त्यामुळे.. तू माझ्यापासून दूर दूर राहत होतास..?
नाही जमलं मला ते. आणि आता जमणार सुद्धा नाही..
का..?
तुझ्यात तरी, काय उरलंय म्हणा आता..?
आणि...ह्या वयात,
मी तरी, उसनं अवसान कोठून आणू...?