हल्ली डोक्यात बरीच कालवाकालव चालू असते.
पैकी, काही गोष्टी मी इथे मांडत असतोच. पण, सगळ्याच गोष्टी इथे मांडता येत नाहीत. त्यामुळे, काही गोष्टी इथे न मांडता चार मित्रांमध्ये त्यावर नक्कीच चर्चा करत असतो. त्यावेळी माझा होणारा संताप, माझा एक मित्र चार सहा महिन्यांपासून पाहत होता. पण त्या मित्राने, ते मला कधी जाणवू दिलं नाही. कारण, माझे विषय ऐकले कि त्याला बगल देत तो लगेच दुसऱ्याच विषयवार येऊन थांबत असे. असं बरेचदा घडलं. पण, ते माझ्या काही लक्षात येत नव्हतं.
शेवटी... आज तोच मला म्हणालाच...!
गेली पाच सहा महिने झाले, मी पाहतोय. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पाहून होणारा तुझा चिडचिडेपणा हल्ली खूपच वाढलाय. असं, तुला वाटत नाही का..? त्या चिडचिडेपणाची झलक हल्ली मला तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट जाणवायला लागलीय. का, आणि कशाला करतोयेस एवढी चिडचिड..? तुझ्या ह्या चिडचिडेपणामुळे, समाजात काही फरक पडणार आहे का..? का उगाच स्वतःला त्रास करून घेतोयेस..? बरेच संत महात्मे खूप काही सांगून गेले आहेत. त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि, आता तुझं कोण ऐकणार आहे..?
माझ्या त्या मित्राच्या बोलण्यात, बरीच सत्यता होती.
त्यामुळे, कारण नसताना.. मला, डोकेदुखी किंवा इतर त्रास सुद्धा खूप वाढले आहेत. ते फालतू आणि कधीही साध्य न होणारे विचार करणं आता थांबवायचा प्रयत्न करतो.
मोठमोठे संत महात्मे होऊन गेले. त्यांचं कोणी ऐकलं नाही. आणि आता, तुझं कोण नव्याने ऐकणार आहे..? हे वाक्य माझ्या डोक्यात पक्कं घर करून राहिलं..
एवढं बोलून, त्या मित्राने मला उपदेशपर एक कथा ऐकवली.
समुद्राबाहेर असणाऱ्या घनदाट झाडीमध्ये, एक पक्षी वास्तव्याला होता. त्या वातावरणात, तो खूपच आनंदी होता. पण, राहून-राहून त्याला समुद्र सफर करावीशी वाटत असे. काहीतरी नवीन पाहण्याची, किंवा करण्याची त्याला इच्छा होती. एकदा मनाचा हिय्या करून, एका मोठ्या जहाजेमध्ये तो पक्षी उडत उडत जाऊन बसला. जहाजेमध्ये, तो मस्तपैकी इकडून तिकडे विहार करत होता. तिथे, त्याला खाण्यापिण्याची सुद्धा काहीच कमतरता नव्हती. त्या जहाजेमध्ये, त्याचे दोन चार दिवस अगदी मजेत गेले. आणि शेवटी, तो सुद्धा त्या भौतिक सुखाला कंटाळला. आणि, उडत-उडत पुन्हा किनाऱ्याकडे निघाला.
त्याने, त्या अथांग समुद्रामध्ये बराच वेळ विहार केला. पण, काही केल्या किनारा काही येईना. भयंकर मोठा प्रवास करून, त्याच्या पंखातलं बळ सुद्धा संपलं होतं.
जास्ती हट्ट केला. तर... आपण, दमछाक होऊन आपण समुद्रात पडू. आणि, एखाद्या मत्स्याचं खाद्य बनू. हे त्याच्या ध्यानात आलं. आणि, तो तडक माघारी फिरला. आणि, पुन्हा त्याच जहाजेवर जाऊन बसला. दोन चार दिवसांनी, खाऊन पिऊन तो पुन्हा ताजा तवाना झाला. आणि, पुन्हा एकदा त्याने दुसऱ्या किनाऱ्याकडे कूच केली. पुन्हा, तोच प्रकार घडला. टप्प्या टप्प्याने, त्याने चारी दिशांना जाऊन पाहिलं. पण, तो त्यात नाकाम झाला.
आणि, सरते शेवटी त्याच्या ध्यानात आलं. आपण, इतके श्रम करतोय. त्याचा, काहीएक उपयोग होणार नाहीये. जे चालू आहे, त्याला तसच चालू राहूदेत.
हि जहाज, ज्या दिवशी ज्या किनाऱ्याला पोहोचेल. तिथेच, आपण आपलं बस्तान मांडूयात. आणि, जमेल तसं राहुयात.
जे आहे, जसं आहे.. त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे.
हि कथा ऐकून, मी ह्या निर्णयाला पोहोचलो आहे. कि, काही केल्या हि समाज व्यवस्था म्हणा किंवा इथली लोकं म्हणा बिलकुल बदलणार नाहीयेत. जेंव्हा कधी बदल घडतील ते घडतील. ते तेंव्हा आपण पाहूयात.
त्या पक्षाप्रमाणे, मी सुद्धा आता ठरवलं आहे. जसं आहे, जिथे आहे तिथेच राहुयात. विनाकारण नको ते प्रयोग करण्यात काहीएक अर्थ नाहीये. बघुयात काय होतंय.
नाहीतर, हि म्हण आहेच...
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

No comments:
Post a Comment