#फर्जंद..
मुळात ऐतिहासिक सिनेमे बनवायचं सहसा कोणी धाडस करत नाहीत. कारण असे सिनेमे बनवणं म्हणजे फार कठीण आणि खर्चिक काम असतं. शिवाय, नको ते विषय पाहायला सोकावलेल्या प्रेक्षकांना ऐतिहासिक सिनेमे पाहायला नको वाटतात. हि फार मोठी शोकांतिका आहे.
फर्जंद या सिनेमाचं कथानक, शिवकालीन असल्याने ओघाने त्यात गडकोट दाखवणं आलंच. त्यामुळे अशावेळी, दिग्दर्शकाला स्टुडियोचा आधार घ्यावा लागतो. कारण प्रत्यक्ष गडकोटांवर शुटींग करायला मिळणं तसं दुरापास्तच आहे. त्याकरिता काही सरकारी नियम असतीलच. तरी या सुविधा न मिळता सुद्धा, हा सिनेमा फारच उत्कृष्ट झाला आहे.

शिवाजी महाराजांना.. आपला राज्याभिषेक करण्या अगोदर, पन्हाळा किल्ला स्वराज्यात हवा असतो. त्याशिवाय महाराजांचं स्वराज्य पूर्ण होणार नसतं. आणि त्याच सुमारास पन्हाळगडावरून काही विलक्षण बातम्या सुद्धा हाती येत होत्या. जशा, आदिलशाही मधील काही यवन तेथील मुलीबाळींना कैद करून त्यांच्यावर अत्याचार करत होते. आणि त्यानंतर त्यांना, जंजिर्या मार्गे, गुलाम म्हणून पुढे विकलं जात होतं. त्यामुळे, शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन, तेथील आया बहिणींची मुक्तता करायची होती.
याकरिता.. हि कामगिरी ते एका बहादूर सरदाराकडे देतात. ज्याचं नाव असतं,
#कोंडाजी_फर्जंद. उत्कृष्ट शरीरयष्टी कमावलेला तरणाबांड फर्जंद फारच धाडसी आणि पराक्रमी दाखवला आहे. पन्हाळ गडावर, आदिलशाहीची अडीच हजार सैनिकांची कुमक असते. आणि तो वेढा मोडून काढण्याठी, फर्जंद फक्त साठ मावळे घेऊन पन्हाळ गडावर तुटून पडतो. त्यात त्याला, महाराजांचा गुप्तहेर, बहिर्जी नाईक आणि केशर नावाची एक कलावंतीन मदतीला धावून येतात. आणि सरतेशेवटी, शिवाजी महाराजांच्या साथीने पन्हाळगड फतेह होतो.

हे सर्व कथानक पाहत असताना, आपल्या अंगावर अगदी रोमांच उभा राहतो. उत्कृष्ट संगीत आणि गीतांची साथ लाभलेला हा सिनेमा सिने रसिकांना नक्कीच मंत्रमुग्ध करून जातो. सर्वच कलाकारांनी फार छान भूमिका साकारल्या आहेत.
मराठी मनात आणि मातीत.. आपला शिवकालीन इतिहास सतत तेवत ठेवण्यासाठी. असे सिनेमे फार मोठी कामगिरी बजावून जातात. इतर हिंदी आणि मराठी सिनेमे पाहण्या बरोबरच प्रत्येक मराठी व्यक्तीने, असे ऐतहासिक सिनेमे सुद्धा सहकुटुंब नक्कीच पाहायला हवेत. ज्यामुळे, आपला इतिहास एका पिढीपासून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचवण्याची मुख्य भूमिका बजावून जाईल.

जय भवानी, जय शिवराय..!!
No comments:
Post a Comment