तसं पाहायला गेलं तर...
कुत्रा.. ह्या प्राण्याविषयी, मला फारसा लळा नाहीये. कारण, एकदा मध्यरात्री मी कामावरून घरी येत असताना. काहीएक कारण नसताना, माझ्या चालत्या सायकलवर. उभ्या-उभ्या, एका भटक्या कुत्र्याने माझ्या पोटरीचा लचका काढला होता. तेंव्हापासून, ह्या जातीवर मी फारच खार खाऊन असतो.
काही वर्षांपूर्वी, मी सुद्धा एक कुत्रा पाळला होता. त्यामुळे, त्याला कुरवाळण्याच्या किंवा दरडावण्याच्या काही क्लुप्त्या मला अवगत आहेत. हा भाग अलहिदा. या गोष्टीचा मला भविष्यात कधीतरी उपयोग होईल असं वाटलं नव्हतं. परंतु, त्याचा मला काल बराच उपयोग झाला.
खरं तर, मला कुत्रा चावल्या पासून मी त्यांना फारच भिऊन असतो. परंतु, कालचा प्रसंग अगदी बाका होता.
रात्री.. साडे अकराची वेळ, मी माझ्या बाईकवर घरी निघालो होतो. घराजवळ वळताना, एका अंधाऱ्या ठिकाणी, चार पाच कुत्र्यांनी एका तरुण मुलीला घेरलं होतं. गुरकून तिच्यावर चाल करू पाहत होते. खरं तर, त्यावेळी मी तिला.. " इतक्या रात्री कुठे फिरतीयेस " म्हणून, दरडावण्याच्या तयारीत होतो. पण, आता तो जमाना राहिला नाही ना. उगाच, " तुम्हाला काय करयचंय " म्हंटली, तर काय घ्या. म्हणून, मी तो शहाणपणा टाळला. ती बिचारी मुलगी, फार घाबरली होती.
पण... तितक्यात माझी एंट्री झाली ना..
ते चार, भटके कुत्रे पाहून नाही म्हणता मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. पण, त्या भयाण अंधाऱ्या रात्री जीवाच्या आकांताने त्या कुत्र्यांच्या अंगावर माझी बाईक घालत मी जोरात हाड-हाड केली, आणि, सोबतीला माझ्या बाईकचा रेस सुद्धा वाढवला. योजना कामी आली होती. लागलीच, त्या कुत्र्यांनी तेथून कलटी मारली.
त्या मुलीला म्हणालो... जा गं बाई पटपट जा घरी..!
ती पोरगी पण, जरा वेडीच होती. माझे धन्यवाद मानायचे राहिले बाजूला. आणि, नुसती खुद्कत खुद्कत पुढे निघून गेली. त्या परिसरातून, ती बरीच दूरवर जाईपर्यंत मी तिथे उभा होतो.
आता.. माझी निघायची वेळ झाली होती.
आणि.. मोठ्ठा आवाज झाला. अचानक, सगळ्या स्ट्रीट लाईट गेल्या....! सगळीकडे काळोख पसरला. थंडीमुळे ,सगळी लोकं आपापल्या घरात गपगार झाली होती. माझ्या तर, काळजात धस्सच झालं.
आता तर, रस्त्यावर 'कुत्रा' सुद्धा नव्हता..
" एक तर ती हसत गेली, आणि अचानक दुसरीकडे लाईट गेली. "
त्यात.. आमच्याच गावातली पोरगी म्हणावी. तर ती माझ्या पाहण्यातली सुद्धा नाही.
पण.. अजून बारा वाजायला थोडासा अवकाश होता. म्हणून, माझ्या थोडा जीवात जीव आला.
चुकून, बाराचा ठोका असता तर... माझाच 'ठोका' गायब झाला असता. घाबऱ्या गुबर्या अवस्थेत तशीच बाईक दामटली. आमची सौ माझी वाट पाहत गेलरीत उभीच होती. तेंव्हा कुठं मला जरा हायसं वाटलं. पण, घरी गेल्यावर झोप लागेपर्यंत मला एकच प्रश्न पडला होता.
वह कौन थी..?

No comments:
Post a Comment