काश्मिरी घटना... एक, थरारक सत्यकथा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इसवीसन.. एकोणीसशे एक्यान्नव,
वय वर्ष वीस, तेंव्हा मला नुकतच मिसूरड फुटायला सुरवात झाली होती. माझ्या बापाची इच्छा मोठी, पोराला बाहेर कुठं कामाला लावायचं नाही. त्याला, स्वतःचा व्यवसाय सुरु करून द्यायचा. लैच धोरणी होता माझा बाप. त्या अनुषंगाने, त्यांनी आमच्या इथे खास माझ्यासाठी एका नव्याने तयार होत असलेल्या इमारतीमध्ये एक दुकान खरेदी केलं. आणि मला, त्या दुकानात त्यांनी एक कटलरी व्यवसाय सुरु करून दिला. पण, माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा. मला काही 'मारवाडी' व्यावसायिक होता आलं नाही. आणि, माझा धंदा चौपट झाला.
पण, त्या दोन वर्षाच्या काळामध्ये मला बरच काही शिकायला मिळालं. बरेच अनुभव आले. बऱ्याच चांगल्या वाईट माहित्या मिळाल्या. ज्या आजवर, माझ्या जीवनाची गुरुकिल्ली बनून राहिल्या आहेत. त्यातलं, एक फार मोठं उदाहरण. आणि, मी ऐकलेली थरारक घटना...
कर्नायल अंकल...
एकोणीसशे एक्यान्नव साली, माझ्या दुकानाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर हे निर्वासित काश्मिरी पंडितांचं कुटुंब पुण्यामध्ये राहायला आलं होतं. त्यांचा मुलगा, कोल्हापुरातल्या डी. वाय. पाटील कॉलेज मध्ये मेकेनिकल इंजिनियरईंग च्या शेवटच्या वर्षाला होता. पण, ते सुद्धा आता कायमचेच इथे राहायला आले होते.
गोरा गोमटा, उंचापुरा कर्नायल अंकल, त्यांना साजेशी लालबुंद गालाची त्यांची गोरी गोमटी बायको. आणि, एका पायामध्ये अपंग असलेली त्यांची पंधरा एक वर्षांची लहान मुलगी. असं, त्यांचं छोटंसं आणि मनमिळावू कुटुंब. त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही. आणि, मी कधी त्यांना ते विचारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कर्नायल हे त्यांचं आडनाव..
कर्नायल अंकल..रोज सकाळी, पांढऱ्या रंगाचा थोडासा ढगळ असणारा नेहेरू शर्ट पायजमा घालून. ओठात, विल्स सिगारेट चेतवत माझ्या दुकानापाशी येऊन, उन्हाला उभा राहायचा. कोणाशी ओळख ना पाळख, त्यामुळे बिचारा एकटाच उभा राहायचा. मी चौकस बुद्धीचा माणूस, असे बरेच दिवस गेले. शेवटी, मीच त्यांना आवाज दिला. आणि, बोलायला सुरवात केली.
क्या अंकल.. क्या कर रहे हो, कैसे हो..?
माझ्या ह्या वाक्यासरशी, त्यांच्या चेहेर्यावर जे स्मित झळकलं होतं. ते मी, आजवर विसरू शकत नाही. सिगारेटचा मोठा झुरका घेत, ते माझ्यापाशी आले. आणि, माझे दोन्ही खांदे घट्ट दाबत मला म्हणाले..
कुछ नही... बढीया है.., बोलो, तुम्हारा क्या चल रहा है...!
त्या दिवसापासून, त्यांची आणि माझी अगदी घनिष्ट मैत्री झाली. एकतर, मी गोष्टी वेल्हाळ माणूस. मला सुद्धा, नवनवीन गोष्टीची फार आवड. म्हणून, ते अंकल मला काश्मीर मधल्या काही रंजक गोष्टी सांगायचे. काश्मीर मधील बर्फाचे डोंगर, सफरचंदाच्या बागा, गुलमर्ग, सोनमर्ग, दल सरोवराच्या गोष्टी.. बरच काही सांगायचे. आणि, बोलता-बोलता स्वतः मधेच हरवून जायचे.
एके दिवशी, सहजच मी त्यांना विचारलं..
अंकल.. तिथे इतकं सारं सुंदर निसर्ग सौंदर्य होतं. तर मग, तुम्ही इकडे का आलात..?
माझ्या ह्या वाक्यासरशी, मंद स्मित करत हळुवार त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. आणि, ते मला काश्मीर मध्ये घडलेली हकीकत सांगू लागले..
काश्मीर मध्ये, आमचा खूप मोठा बंगला होता. मी सरकारी नोकर, पी.डब्लू. डी. मध्ये इंजिनियर. मला, महिना पंचवीस हजार रुपये असा घसघशीत पगार होता. आमचं अगदी सुखवस्तू कुटुंब होतं. काश्मीरमध्ये, कायम थंड वातावरण असतं. तरी सुद्धा, मी माझ्या घरी फ्रीज विकत घेतला होता. घरामध्ये, सगळ्या सुखसुविधा होत्या. मुलगा उच्चशिक्षित व्हावा, म्हणून त्याला कोल्हापुरात शिकायला पाठवलं. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं..
आणि अचानक, काश्मीर मधील वातवरण बिघडलं. हिंदू मुस्लीम दंगे भडकू लागले. सुरवातीला मला, त्याचं काहीच सोयरसुतक वाटलं नाही. कारण, आमच्या आजूबाजूला राहणारी सगळी माणसं जातीने मुसलमान जरी असले. तरी, ती खूप चांगली लोकं होती.
पण, एके दिवशी..
रात्री बाराच्या सुमारास, आमच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात थापा पडू लागल्या.
धाड-धाड-धाड-धाड... दरवाजा खोलो..!
घरामध्ये, मी माझी बायको आणि आमची हि अपंग मुलगी. नाही म्हणता, मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. भीत-भीत मी दरवाजा उघडला. दारामध्ये, सात आठ हत्यारबंद व्यक्ती उभे होते. प्रत्येकाने, आपले चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांचे फक्त डोळेच तेवढे उघडे दिसत होते. पहिलं त्यांनी मला दरडावलं. आणि, घर सोडून निघून जाण्याचा आदेश सोडला. मी, खाली मान घालून गप्प उभा होतो. तोच... अचानक माझ्या पायावर, जोरदार लत्ताप्रहार झाला. तसा मी, खाली जमिनीवर कोसळलो. ते सगळे लोक, माझ्यावर अगदी तुटून पडले. जसा काय, मी त्यांचा सात पिढीचा दुश्मन असावा. सगळे मिळून, मला कुत्र्या सारखा तुडवत होते. मी मोठमोठ्याने ओरडत होतो. मदतीची याचना करत होतो. " मुझे मत मारो, तुम्हे अल्लाह का वास्ता है.. " म्हणून, शपत सुद्धा घालत होतो. पण, त्यांच्यावर त्याचा कसलाच परिणाम होत नव्हता. माझ्या मदतीला कोणीच आलं नाही. माझा मार वाचवण्यासाठी, माझी.. बायको, पोरगी मध्ये पडली. तर, त्यांना सुद्धा ते केसं धरून मारत होते. आणि.. चाकू, सुरा, बंदूक दाखवून मोठ मोठ्याने दम भरायचे,
" कल सुबह यहां दिखना नही. नही तो जिंदा गाड देंगे...! "
जवळपास तासभर हा दंगा चालू होता.. आणि, थोड्या वेळाने ते सगळे निघून गेले. रात्रभर, आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पूर्ण रात्र, आम्ही दहशतीखाली काढली..
दुसरा दिवस उजाडला.. सकाळ झाली, आमच्या आजूबाजूला राहणारी सगळी मुस्लीम कुटुंबं होती. त्यात फक्त आम्ही एकटेच काश्मिरी पंडित. थोड्या वेळाने, शेजारील घरातील एक बाई येऊन आम्हाला विचारती झाली.
काल रात्री, तुमच्या घरी काही दंगा वगैरे झाला का..? कोणी आलं होतं का ..?
काय सांगायचं.. आणि, कोणाला सांगायचं..
घराबाहेर पडलो, कामावर निघालो होतो. वाटेत, माझे दोनचार मुस्लीम मित्र मला भेटले.
त्यांनी सुद्धा, मला हाच प्रश्न विचारला. पण काय आहे,
" कापडाने तोंडं कितीही झाकुद्यात हो. त्यांचे डोळे मला सगळं काही सांगत होते..! "
त्यादिवशी माझं सांत्वन करणारे मित्रच, काल रात्री आम्हाला मारायला माझ्या घरी आले होते.
हे सत्य, कोणाला सांगूनही पटणार नाही.. आणि, ते मित्र सुद्धा.. अगदी वेड्याचं सोंग घेऊन मला मदतीचं आश्वासन देत होते. सगळीकडे आराजाकता माजली होती. पोलिसात आमची कोणीही दखल घेत नव्हतं. आमची अगदी ससेहोलपट चालू होती.
आम्ही, पुरते हवालदिल झालो होतो..
हा प्रकार, आमच्याघरी सलग सात दिवस चालू होता. नंतर-नंतर हे हल्लेखोर 'मित्र' आमच्या घरी येण्यागोदर. पहिली, आमच्या घरातील लाईट आणि टेलिफोन कनेक्शन कापलं जायचं.
कि... आम्ही ताबडतोब समजून जायचो. आता, आपल्या छळाला सुरवात होणार आहे. आणि, हतबल होऊन आम्ही त्यांना सामोरे जायचो. खूप मार खाल्ला, सगळं काही अगदी सहनशक्तीच्या पुढे गेलं होतं. पण माझ्या भाबड्या मनाला असं वाटत होतं. कंटाळून, हि लोकं आपला नाद सोडतील.
पण कसंल काय..
शेवटी वैतागून, आम्हीच काश्मीर सोडायचा निर्णय घेतला.
त्या रात्री पुन्हा एकदा... मी त्यांचा भरपूर मार खाल्ला, शेवटी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घरातून बाहेर काढलं. रात्रीची वेळ, हात वर करून त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं, आमच्या पाठीवर बंदुखा रोखल्या गेल्या. शेवटची घटका समीप आली होती.
परंतु... काहीही झालं, तरी ते 'मारेकरी' शेवटी माझे 'मित्रच' होते. त्यांनी, आम्हाला अभय दिलं. नाही मारल्या आम्हाला गोळ्या, अंगावरील कपड्यानिशी आम्ही घर सोडलं. खिशात पैसा म्हणून नव्हता. येवढ्या रात्री आता जायचं कुठे..? हा, फार मोठा प्रश्न होता.
त्या गडध अंधाऱ्या रात्री, माझ्या अपंग मुलीला खांद्यावर घेऊन मी आडमार्गाने मार्गक्रमण करत होतो. माझ्या पाठीमागे माझी बायको येत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते. मागे वळून आम्ही आमच्या घराकडे पाहत होतो. पण, अंधाराशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हतं. मी काश्मीर मधील एवढा मोठा सरकारी अधिकारी. पण, माझ्याच मायभूमीत मी अगदी मातीमोल ठरलो होतो. मी गडी माणूस, रडू तरी कसा..? आणि ते सुद्धा कोणत्या तोंडाने..? तशाने, माझी बायका पोरं पार खचून गेली असती. दुखः गिळून मी पुढे चालत होतो.
चालता-चालता आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. तितक्यात दूरवरून, मला एक गाडी येताना दिसली. जीपच होती ती, मला मरणाचं बिलकुल भयच उरलं नव्हतं. त्यामुळे, मी बिनधास्त उभा राहिलो. ती जीप आमच्या एकदम जवळ आली, आणि करकचून ब्रेक मारून थांबली. माझ्या मनात थोडी धाकधूक होती. पण ती जीप, माझा एक मुस्लीम मित्रच चालवत आला होता.
आज मात्र, त्याचा चेहरा कपड्याने झाकलेला नव्हता. जाऊदेत, पण तो माझ्या मदतीला आला होता. त्यामुळे, त्याच्या विषयीचा माझ्या मनामधील राग थोडा का होईना निवळला होता. मला थोडं हायसं वाटलं. त्याने, मला थोडी सहानुभूती दाखवली. आणि, कशी का होईना काश्मीर मधून बाहेर पडण्यास मला त्याने मदत केली. मजल दरमजल करत, दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास आम्ही जम्मू मध्ये येऊन पोहोचलो.
त्यानंतर, आम्ही सलग दोन वर्ष जम्मूमध्ये काढले. पण, तिथेही मला थोडं असुरक्षित वाटत होतं. त्यामुळे, आम्ही पुण्याला निघून आलो. आता, आमच्या मुलाला पुण्यातील एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्य्यावर नोकरी मिळाली आहे. मला सुद्धा, सरकारकडून घरी बसून पगार मिळत आहे. फक्त, तो पगार घेण्यासाठी मला जम्मूत जावं लागतं. दोन तीन महिन्यांनी जम्मूत जाऊन मी माझा पगार घेऊन येतो. पण, फुकटचा पगार मला नको वाटतो. आणि, इथे दुसरं काही काम सुद्धा मी करू शकत नाही. कारण, माझ्याकडे कोणतंच प्रमाणपत्र नाहीये.
काय करतोस... मी, माझी ओळखच काश्मीर मध्ये ठेवून आलोय..
पण बरं वाटतंय आता इकडे. किमान, रोज उठून मरणाची भीती तरी वाटत नाहीये.
परंतु, तिकडची आठवण काही केल्या जात नाहीये. हे सगळं जेंव्हा थांबेल. तेंव्हा, मी माझ्या गावी, माझ्या बायको मुलांसोबत परत माझ्या काश्मीरला राहायला जाणार आहे..!
दोन वर्षांपूर्वी, पुण्यामध्ये एका दुचाकीच्या अपघातात, कर्नायल अंकल कोमात गेले.
ते.. परत न येण्यासाठीच.
शेवटी, काश्मीरला जाण्याचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नंच राहिलं...!

No comments:
Post a Comment