Wednesday, 30 September 2015

सगळा धंदा झालाय.. व्यवसाय म्हणून काही ऊरलच नाहीये....

२००३ साली, मी माझी स्वतःची बाईक घेतली. त्यावेळी, माझी कामाची वेळ सकाळी सहा वाजताची होती. त्यामुळे, मला घरातून साडेपाचला निघावं लागायचं. 

एके दिवशी सकाळी, मी पिंपरीहून दापोडी पर्यंत पोहोचलो. आणि अचानक, माझ्या बाईकचं मागील चाक पंक्चर झालं. जवळपास कुठे, पंक्चरचं दुकान सुद्धा नव्हतं. एवढ्या पहाटे, नवीन गाडी रोडवर लाऊन जायचं तरी कसं..? माझं काही धाडस होत नव्हतं. 
शेवटी, मी बाईक ढकलत-ढकलत घोले रोडवरील आमच्या ऑफिस पर्यंत नेली. एवढ्या लांबचा प्रवास, गाडी ढकलून आणल्यामुळे. माझ्या अंगात बिलकुल त्राण राहिला नव्हता. 
काम आटोपल्यावर, माझी बाईक पंक्चरच्या दुकानात घेऊन गेलो. 
पंक्चर वाल्याने टायर खोलला, ट्यूब चेक केली. सगळ्या ट्युबची, अक्षरशः चाळण झाली होती. गाडी ढकलत आणल्यामुळे. टायर मध्ये असणारा खिळा, सतत ट्यूबला इथे तीथे टोचत होता. त्यामुळे, ट्युबची पक्की वाट लागली होती. 
तेंव्हा मला समजलं, टायर पंक्चर झाला. कि, पहिलं टायरला चेक करून घ्यायचं. कि त्यामध्ये काही खिळा वगैरे घुसला आहे का..! आणि असेल तर, त्याला बाईकच्या चावीच्या सहाय्याने ताबडतोब काढून टाकायचा. आणि नंतर, गाडी पंक्चर च्या दुकानात घेऊन जायचं. 

नंतर बरेचदा असा प्रसंग आल्यावर, मी वरील क्लुप्ती अमलात आणली. आणि, त्यात सफल सुद्धा झालो. पण, एकदा काय झालं.. 
माझी बाईक पंक्चर झाली. नेहेमीप्रमाणे, टायर मध्ये असणारा खिळा मी काढला. आणि, गाडी पंक्चर च्या दुकानापर्यंत ढकलत नेली. 
झालं.. त्या व्यक्तीने टायर खोलला. ट्यूब चेक केली, तर त्यात सात आठ पंक्चर निघाले. 
मी विचारात पडलो.. हे असं कसं काय झालं असेल..?
शेवटी, तो दुकानवाला म्हणाला..
साहेब.. आठ पंक्चर आहेत. त्यापेक्षा, तुम्ही नवीन ट्युबच टाकून घ्या..! 
कारण, ट्युबच्या खर्चापेक्षा पंक्चर काढून घेणं मला महागात पडणार होतं. 

नंतर असच एकदा, त्या पंक्चरच्या दुकानासमोरून मी जात असताना. आठवण आली म्हणून, सदर कथा मी माझ्या एका मित्राला सांगितली. 
त्यावर, तो मित्र मला म्हणाला... 
अरे, तुला माहित नाही का..? हा, त्या लोकांचा धंदा आहे. 
गाडी पंक्चर काढण्याकरिता आली. कि टायर खोलताना, ते ट्यूबला आपल्या नकळत असे काही चिमटे देतात. कि ती ट्यूब, किमान पाच सहा ठिकाणी पंक्चर होते. पर्यायाने, आपल्याला नवीन ट्यूब घ्यावी लागते. आणि, ती ट्यूब सुद्धा काही ब्रांडेड नसते. पन्नास साठ रुपयाची ट्यूब, ते आपल्याला दीडशे रुपयाला खपवतात. 
काय सांगावं राव, ऐकावं ते नवलच..

मध्यंतरी, काही पंक्चर व्यवसायिक बाईकच्या डिक्कीला होल पाडून. त्यातून चांभारी खिळे संपूर्ण रस्त्यावर त्यांच्या दुकाना पर्यंत पेरायचे. असं सुद्धा, माझ्या वाचनात आलं होतं. 

रस्ते चांगले झालेत. त्यामुळे, हल्ली गाड्या सुद्धा सहसा पंक्चर होत नाहीयेत. शेवटी, त्या पंक्चर वाल्यांच्या पोटाचा सुद्धा प्रश्न आहे. 
नेमकं चुकतंय कोणाचं..? 
अचानक गाड्या पंक्चर झाल्याने, एखाद्याच्या धंद्यात बरकत येऊ शकते. तर दुसरीकडे, वेळेवर न पोहोचल्यामुळे एखाद्याच्या आयुष्याची भाकरी त्याची नोकरी सुद्धा हातची जाऊ शकते. किंवा, अन्य कोणत्याही घटना घडू शकतात.
आणि, अशा कित्तेक गोष्टी घडू शकतात. ज्यामुळे, होणारं नुकसान हे कधीही भरून येण्यासारखं नसतं.
सदर घटना, फार गंभीर आहे. यात, नेमकी चूक कोणाची...? 

Friday, 25 September 2015


हल्ली.. बहुतेक मुलींच्या पेहेरावामध्ये..
सर्वसाधारपणे..
कुर्ता आणि नव्याने आलेली स्कीन टाईट लेगीस परिधान केलेलीच पाहायला मिळते.
तरी सुद्धा, अधूनमधून एखाद अर्धी मुलगी,
कुर्ता आणि जुन्या पद्धतीचा ढगळ लेहेंगा परिधान केलेली आढळतेच.
अशावेळेस..
ती मुलगी, मला खूपच मागास वाटू लागते..

Thursday, 24 September 2015


आमच्याबरोबर, बाहेरगावचा एक नवीन मुलगा कामाला लागला आहे. गरीब आहे बिचारा, कशीबशी गुजराण करत असतो.
त्याचा मोठा भाऊ, गावी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असतो. एकंदरीत चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे..
परवा.. गावावरून त्याच्या मोठ्या भावाचा त्याला फोन आला.
त्या दोघांच्या गावाकडील विषयावर थोड्या गप्पागोष्टी झाल्या. आणि तिकडून, फोनवर त्याच्या भावाने त्याला काहीतरी सांगितलं. 
फोनवर, त्याच्या भावाला मधेच थांबवत माझ्याकडे पाहत मला तो म्हणाला..

" साहाब भाईने नयी गाडी लिया...! "
त्याच्याकडे, इथे साधी सायकल सुद्धा नाहीये. त्याला काही काम पडल्यास, तो इतर मित्रांची सायकल घेऊन जात असतो. त्यामुळे, त्याला आनंद होणं स्वाभाविकच होतं, खुश होऊन.
मी सुद्धा हाताने लाईक करत, हसून त्याचं स्वागत केलं.
इकडून लगेच त्याचा दुसरा प्रश्न,
" कौनसी..?
तिकडून त्याचा भाऊ, त्याला काय बोलला काय माहिती. पण ते ऐकून, तो अगदी गडबडा लोळून हसत होता. नेमका काय प्रकार घडला आहे. ते मात्र मला काही समजेना.
शेवटी, हसत-हसत तो त्याच्या भावाला म्हणाला.
" चलो, रखते है...! "
आणि पुन्हा एकदा, त्याचं खळखळून हसणं सुरु झालं. त्याचं हसू पुरं झाल्यावर मी त्याला विचारलं.
" क्या हुवा रे, क्यू इतना हस रहा था..? "
तर म्हणाला..
भाई को पुछा, कौनसी गाडी लिया..?
तो, उन्हे बोला..
" हातगाडी "

तु देखनी आहेस..
तर,
माझ्याकडे पन..
सुंदर ' लेखनी ' आहे..

Monday, 21 September 2015


ह्या.. उमललेल्या फुलांनो, तुम्ही सुद्धा कधी तरी कळ्याच होता.
हे, ज्ञात आहे का तुम्हाला ?

मीच होतो तो रखवाला..
त्यामुळे, 
तुम्हास फुलांचा 'दर्जा' मिळाला.

Sunday, 20 September 2015


भर चौकात...
एखादा पुरुष नागडा झाला. तर, त्याला पाहून लोकं नाकं मुरडून पुढे निघून जातील.
आणि, दुर्दैवाने..
तेच कृत्य, 
एखाद्या महिलेने केलं तर...?
हे कृत्य, तिने का आणि कशासाठी केलं असावं..? याचा, सारासार विचार न करता.
त्याठिकाणी, तिला पाहणारी हजारो लोकं जमा होतील.
हेच, आयुष्याचं फार मोठं गमक आहे.

नागडं कोणी व्हावं..?

हे सुद्धा, समाजच ठरवत असतो..!

Friday, 18 September 2015


तुझ्या आठवणीची गणितं सुटता सुटत नव्हती.
केवळ नाईलाज म्हणून इतिहासाकडे वळलो.

पुन्हा तुझाच इतिहास आठवून तुझ्यामध्येच रमलो.
या न त्या कारणाने मी मात्र "ऐतिहासिक" ठरलो. 

Wednesday, 16 September 2015

उष्ण श्वासाने तुझ्या,
काय गुपित उलघडले.
निर्जीव ह्या देहामध्ये,
नव्याने प्राण फुंकले.

Monday, 14 September 2015

मध्यंतरी टीव्हीवर, 

डिस्कवरी चेनल पाहत होतो. त्यावेळी, नेमका अकबर बादशहाचा विषय चालू होता. त्याने बांधलेल्या, फतेहपुर सिक्री ह्या किल्ल्याची माहिती सांगत आणि दाखवत होते. कसला जबरदस्त किल्ला, आणि काय त्याची अफलातून माहिती...व्वा,
हि माहिती देत असताना, तो निवेदक म्हणाला...

अकबर बादशाहाच्या.. एकूण, तीनशे पट्टराण्या होत्या. आणि वर, पाच हजार लग्नाच्या बायका सुद्धा होत्या. शिवाय, ह्या प्रत्येकी बरोबर त्यांच्या सेवेसाठी एक दासी नेमलेली होती. त्याउपर, यांच्यावर देखरेख करण्याकरिता. काही किन्नर ( छक्के ) लोकं सुद्धा नियुक्त केले गेले होते..

आता... डिस्कवरी चानल वाल्यांनी हि माहिती पुरवली आहे. म्हणजे, त्यात खोट तर नक्कीच नसणार आहे..
दहा बारा दिवस झाले, मी विचार करतोय...!

" त्या अकबर बादशाहने, येवढ्या साऱ्या पत्न्यांना कसं काय हेंडल केलं असेल...? "

खरं सांगायचं म्हणजे, हल्लीच्या प्रगत जमान्यात सुद्धा एक बायको सांभाळता-सांभाळता अगदी नाकीनऊ होतंय. 

तर मग, त्या पुराणकाळात...! 

मानलं पाहिजे राव, त्या राजे लोकांच्या धाडसाला...!

Thursday, 10 September 2015


फोटोमध्ये दिसणारी.. कामुक, मादकता.
हि फक्त, 
स्त्रियांच्या नजरेतच शोभून दिसते.
चुकून,
पुरुषांनी असा लटका प्रयत्न केलाच.
तर, तो फोटो पाहून.

विनाकारण, तो दारू पिल्या सारखा फील येतो.

Wednesday, 9 September 2015


काल, माझ्या गाडीमध्ये....
चार-पाच बिगारी सेवक बसले होते. काही कामाने, आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. त्यांच्या कसल्या तरी विषयवार गप्पा चालू होत्या. त्या पाच कामगारांमधील, एकाच्या पायाला कसली तरी जखम झाली होती. आणि, त्या जखमेवर आता खपली धरू लागली होती.
बऱ्याच दिवसांची ओली जखम, आत्ता कुठे तरी ठीक होऊ लागली होती. त्यामुळे, तो कामगार त्या जखमेला खूपच जपत होता. त्यात, त्या जखमेची खपली थोडी वर आली होती. आणि, ती खपली नेमकी कुठे ना कुठे अडकून जखम पुन्हा चिघळू पाहत होती..
त्यावर, गाडीत बसलेले काही मित्र त्याला सल्ला देत होते...
पहिला :- अरे... अजून, पाच सहा दिवस सुट्टी टाक. ते पाय नीट झाल्यावर कामावर ये..!
दुसरा :- एक काम कर, नेलकटर ने ती खपली कापून टाक. सेफ्टिक पण होणार नाही. आणि, जखमेला धक्का पण लागणार नाही...!
तिसरा :- तू जखम उघडी ठेवू नको रे...!
चौथा :- त्याला "लोकमान्य" तेल लाव. एका हाप्त्यात दुख बरं व्हईल....!
चौथ्याने, हा ईलाज सांगितल्या बरोबर. सगळे जन, त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
शेवटी, त्यातील एक जन त्याला म्हणालाच...!
अरे.. कसलं लोकमान्य तेल..? काही पण सांगतोस काय...!
मी फक्त, यांची गंमत ऐकत आणि पाहत होतो. त्याला काय म्हणायचं होतं, ते मला समजलं होतं. पण नेमका, तो ठराविक शब्द त्याला उच्चारता येत नव्हता. शेवटी, मलाच त्यांच्या शंकेचं निरसन करावं लागलं.
त्या कामगाराला... " लुकमान ए हयात " तेल म्हणायचं होतं. पण, तो त्याला 'लोकमान्य' तेल म्हणत होता.
बाय द वे... लुकमान ए हयात, हे युनानी तेल बऱ्याच व्याधींवर उपकारक आहे.
कॉलेजमध्ये असताना...
आमच्या वर्गात, एक खूपच सुंदर मुलगी होती. माझे बरेच मित्र तिच्या पाठीमागे लागले होते. अनायसे, त्यात मी सुद्धा आलोच. पण, ती मुलगी काय कोणाला भिक घालतच नव्हती. आणि कोणी मुलगा, तिला भिडायचं धाडस सुद्धा करत नव्हता..
कारण.. ती चुकून नाही म्हणाली. तर, अपमान कोण सहन करणार..
दिवसामागून दिवस जात होते...

एके दिवशी, ती मुलगी एका मुलाच्या बाईकवर बसून कॉलेजमध्ये आली. आणि नेमके, आम्हीच त्याला साक्षीदार ठरलो.
सगळ्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरु झाली.
कोणी म्हणतंय, अरे तिचा भाऊ असेल.. तर कोणी म्हणतंय, तिच्या ओळखीतला असेल. तर कोणी काय. तर कोणी काय...नुसतीच बिनकामाची चर्चा चालू होती.
बराच वेळ, ते दोघे तिथेच बोलत उभे होते. त्यावरून, मला थोडा अंदाज आला होता.
नंतर-नंतर मात्र हे नित्याचंच झालं..
शेवटी, एके दिवशी... मी आणि आमचा चमू थेट त्या मुलालाच जाऊन भिडलो. त्याने सुद्धा, त्याच्या प्रेमाची प्रांजळ कबुली दिली. आणि म्हणाला,
आमचं लग्न ठरलं आहे...
ओठावर वरवरचं उसनं हसू आणून, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. पण आम्ही, मनातून मात्र खूप जळफटत होतो.
शेवटी आम्ही, त्या मुलाला त्याचं नाव विचारलं.
त्याचं नाव, 'दिलीप' होतं..
काही नाहीतर, किमान लाडिक त्रासच द्यायचा... ह्या उद्देशाने. आम्ही मुलं, ती मुलगी आमच्या समोर आल्यावर हे गाणं म्हणत असू..
जा मुली जा... 'दिल्या' घरी तू सुखी राहा.


फेस्बुकी..

नित्य असावे फेबुवरती,
राग, लोभ कुणी धरू नये.
हौश्या नवश्यांची हि दौलत,
'बाजार' ह्याला म्हणू नये.
सुंदर आहे बरं हि आवड,
ह्याला, 'व्यसन' म्हणू नये.
राग, राग हा असतो दिनभर,
ईथे तो 'कित्ता' गिरवू नये.
संदेश खोक्या मध्ये कोणी,
वात्रट 'गप्पा' करू नये.
मी मोठा आणि हा तर छोटा,
असे म्हणून, कुणाला 'टाळू' नये.
नवीन आलेली मित्र विनंती,
कोणी कधीही 'लाथाडू' नये.
मैत्रीणीना फार जपावे,
घरका 'माल' समजू नये.
मैत्री असावी सर्वांशी पण,
'लगट' कोणाशी करू नये.
मैत्रीची हि अखंड सरिता,
खंड ह्यामध्ये पडू नये.

दुखः आभाळा एवढं असतं.
आणि, सुख....
फक्त,
दोन बोटांच्या चिमटीत मावण्या इतकंच.

ह्या चीनी लोकांची नावं सुद्धा किती अजब असतात नाही.
एकतर... त्यांची भाषा ती ठोकळ्या ठोकळ्या सारखी असते. आणि त्यात, हि त्यांची असली चित्र विचित्र नावं.
आता... त्यांच्या राष्ट्र्पतीचंच नाव पहा ना..
क्षी जीन पिंग...
पण त्या नावांत सुद्धा एक प्रकारची गम्मत दडलेली आहे..
हि नावं, उच्चारायला इतकी सोप्पी असतात. कि,
आपला भारतीय आम मनुष्य हि नावं तोंडाने तर उच्चारू शकतोच.
त्याचप्रमाणे....
तो हि नावं, त्याच्या...
पार्श्वभागाने सुद्धा उच्चारू शकतो.
पांग, पुंग, पिंग... 

वाहनाचा 'पिकअप' कितीही मोठा असुध्यात.
ट्राफिक जाम झाल्यावर.
त्याचा 'शून्य' उपयोग असतो.

इथे झाडाच्या पाणांना सुद्धा, मिळतो सोन्याचा मान.
गोडवे किती गाऊ ह्या संस्कृतीचे, त्याचे मला ना भान.
असा हा हरित निसर्गसंपन्न माझा, भारत देश महान.

पेरेल ते उगवेल, हा सृष्टीचा नियम आहे...
पण ते चागलं, भरगच्च उगवेल याची मात्र शाश्वती देता येत नसते.
हे... तुम्हालाही मान्य असावं..!
तसच, लिखाणाचं सुद्धा आहे....
हे सर्वस्वी... आपल्या लिखाणावर अवलंबून असतं.
आपण जे लिहितो, त्याचे सुद्धा बरेच अर्थ होत असतात.
कारण, हि मराठी भाषा आहे. वळवावी तशी वळते..
मनात शंका. तर, नक्कीच बसतो दणका. 

कवीला तर, काट्यात सुद्धा 'सौंदर्य' दिसत असतं.
जे, इतरांच्या डोळ्यात मात्र खूपच 'सलत' असतं.

हृदय कोरून पाहिले, ना श्वास हि मिळाला.
रक्त विविक्षित गाठी, त्याही कोरड्याच होत्या.
पटवू कसे "मनाला" तू तर शरीराचा राजा.
तो हि प्रश्नांकित होऊन विचारे ह्या शरीराला.
तू आहेस का रे, संग माझ्या..?
नीज..

निजण्यासाठी मऊ गादी नको,
पण, उबदार कूस तरी मिळूदे.
नीज येवो अथवा न येवो,
मलमली साथ मात्र राहूदे.
झोपेत खुबसुरत,रंगीबिरंगी,
स्वप्न येवो अथवा न येवो.
पण, हि नाहीतर.. किमान,
'ती' तरी स्वप्नात येऊदे.
स्वप्नात, मी काही घोटाळा करणार नाही.
कारण मी, अट्टल 'लफडेबाज' नाही.
असं... मला वाटत आहे..
त्यात, माझी मुळीच चूक नाही.
चुका तर होतच असतात,
झाल्याच तर, त्या माझ्याच हाताने होऊदेत.
तू जर, चुकून ह्या चुका केल्यास
तर मी समजेन...
हा... निव्वळ योगायोग आहे.

निर्जीव देहाला..
धरणी गिळो वा अग्नी जाळो.
शेवटी फक्त,
विल्हेवाटच लावायची असते.

ओले दवबिंदू मज मोत्यासमान भासे.
पानांची काय कथा, त्यासम सारेच आपुले.
धुंद का होतो मोगरा, त्या दवबिंदू प्रमाणे.
क्षणिक जीवनाची भ्रांत, त्या दोघांनाच का रे.

दुखः व्यक्त केल्याने, ते हलकं होतं असं म्हणतात.
ते, खोटं नाही.
पण, त्याकरिता...
खरोखरच दुक्खी असणं, फार महत्वाचं असतं.
नाहीतर,
काही केल्या काळीज पिळवटत नाही.
तर मग,
दुख्खाच्या खपल्या वगैरे तर, खूप लांबची गोष्ट होऊन बसते..

जंतुसंसर्ग होईल...
म्हणून,


कोणी...
किसिंग करणं बंद करणार आहे का..?

हसावे कि रडावे, ह्याचाही थांगपत्ता नसावा.
प्रेमळ हृदयामध्ये, इतकाही आभास नसावा.

स्त्री.....
समोरून, कितीही सुंदर आणि लावण्यवती दिसत असली.
तरीही...
तिला, मागे वळून पाठमोरं पाहिल्याशिवाय..
व्यक्तीच्या मनामध्ये असणारी,
तिच्याविषयीची सौंदर्य कल्पना, पूर्णत्वास येत नाही..

"काय गं... आलात का फिरून, कसा झाला तुमचा हनिमून..?
"काश्मीरला गेला होतात ना..?
"इकडे मैत्रिणीच्या प्रश्नांची सरबत्ती. आणि, तिचा चेहेरा मात्र लाजलेलाच..
"का गं... काय झालं..?
"काही नाही गं... कारमधून जाता येता पाहिलं तेवढंच काश्मीर...!
"का बरे...?
"आम्ही तिथे गेल्यावर, त्या हॉटेलच्या बाहेर काही पडलोच नाही.
"असं कोणतं पंचतारांकित हॉटेल होतं ते..?
हॉटेल... 'रोजवूड'... 

हम, तलवार भी रखते है,
और, वार भी करते है,
कही, गलत फहमी मे ना रहेना...
अपना समज के छोड देंगे.

मला तप्त करावे, हे तुझे कर्म आहे.
अन,
मी उष्ण व्हावे, हा माझा धर्म आहे.

मला भेटायला आलेला कोणताही व्यक्ती,
स्वतःचा....
"स्व" आणि "मी"
घरी ठेऊन, एक निखळ मित्र म्हणून आलेला असेल..
तर, मला तो फारच आवडतो...!

मुलगा लहानपणी, अभ्यासाच्या 'मागे' लागतो.
किशोरवयात कॉलेजात असताना, मुलींच्या 'मागे' लागतो.
तरुणपणी कमावता झाल्यावर, पैसे कमवण्याच्या 'मागे' लागतो.
एकूण काय,
जो मागे लागतो. तो, मनुष्य प्राणी असतो.

गरीब, अनपड लोकं मटका खेळतात.
तर,
श्रीमंत, हुशार लोकं शेअर मार्केट खेळतात.
'मटका' काय, आणि..'मार्केट' काय.
एक अधिकृत... तर दुसरी, अनाधिकृत जुगारच आहे...!

माजोरड्या श्रीमंताच्या घरी,
एकवेळ..
कुत्रा होऊन राहिलेलं परवडलं.
परंतु,
ड्रायव्हर होऊन, चुकून सुद्धा राहू नये.

मुलींना बाईकवर फिरवणारे..
बरेच 'हिरो' मुलं मी आजवर पाहिले आहेत.
परंतु, जो मुलगा..
मुलींच्या दुचाकीवर, पाठीमागे बसून फिरत असतो.
माझ्या मते, तोच खरा "सुपरहिरो" असतो..

थरथरत्या कोमल अधरांनी,
केलीस मला तु शुभ सांज.
अजुनही मी हिंदोळ्यावर आहे,
अतृप्त,अव्यक्त हंसा प्रमाने..

पाहत होतीस व्याकुळ नजरेने,
तेंव्हा फार दुरावा होता.
आता समिप आलोच आहोत,
तरी ही का तो अबोला..

जेंव्हा एखादी व्यक्ती. आपल्याला, अमुक एक गोष्ट करू नकोस..! 
असं, सांगत असते. 
त्यावेळी, त्या 'नको' पाठीमागचा मूळ उद्देश्य काय आहे..? 
हे, त्या व्यक्तीला विषद करता येणं खूप महत्वाचं असतं. 
नाहीतर अशाने, 
त्या संभाव्य व्यक्तीवरील, आपला विश्वास कायमचा उडून जातो.
आणि.. त्याच्याविषयी, 
आपल्या मनामध्ये एकप्रकारची कटुता निर्माण होते.

बहुत दूर अनवाणी जावे लागले तसे,
पण म्या शोधिले, त्या पावलांचे ठसे.
अत्यंत हळवा झालो त्या उत्कट क्षणी,
समोर फक्त, अथांग सागर होता जनी.

रोजच्या कामाला, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही..
तर...
एक " टाईमपास " म्हणून पाहायला शिका.
सगळं काही..
अलबेल, सुरळीत, समाधानी आणि आनंदी वाटू लागतं.

नसशील पास माझ्या, तर जिने अवघड आहे.
मदनिके तु माझ्या, ह्रुदयाची धडधड आहेस..

श्वासाची बातच निराळी असते,
घ्यावा, तर... जिवन.
न घ्यावा तर,मरन..
परंतु.....
काही व्यक्ती,
ह्यावर सुद्धा विजय मिळवतात..
ते,
अमरत्वाला प्राप्त होतात..!

सभ्यपणे, हाय हेल्लो करणाऱ्या पांढरपेशा मित्रांपेक्षा.
मनामध्ये, कुठलाही आडपडदा न ठेवता.
ए, आयघाल्या....
म्हणून.. जोरदार हाक मारणारा, बालपणीचा लंगोटीयारच.
खूप सरस, आणि जिवाभावाचा वाटतो.

कोणताही व्यक्ती,
हा जन्मजात गुन्हेगार नसतो.
किंवा, गुन्हेगार म्हणूनच जन्माला आलेला नसतो. किंवा, ठरवून कोणीही गुन्हेगार होत नसतो.
काही अंशी,
त्या ठराविक वेळेची परिस्तिथी त्याला कारणीभूत ठरत असते.
आणि,
नकळत घडलेल्या गुन्ह्याचं बीज एकदा का त्या व्यक्तीच्या मनामध्ये रोवलं गेलं.
कि, योग्य वेळ आल्यावर नवीन आणि मोठ्या गुन्ह्याला तो मूर्त रूप देत असतो.
असं करता करता, एके दिवशी अचानक...
तो व्यक्ती, 'गुन्हेगार' म्हणून नावारूपाला येतो.

वातावरणाची वाट लागली,
दिवस नाही रात्र वाटली.
सकाळ झाली कि रात्र दाटली,
समोर दोनच प्रश्न थाटली.
चहाची किटली, कि दारूची बाटली..?

व्यक्तीने सुद्धा, पापडा सारखं वेळ येईल तसं... 
वाकतं, झुकतं, ताठर... 
आणि मुख्य म्हणजे, 'खमंग' आणि 'कुरकुरीत' सुद्धा असलं पाहिजे. 

स्वप्नातल्या फुलांनो, करा पुन्हा सुरवात.
तीच चांदरात.. आणि, मज तोच हवा सुवास.
अशा कातरवेळी, भांबावून जाऊ नकाच कोणी,
पुन्हा एकवार होऊद्या, शुभ्र चांदन्यांची बरसात.

रंगात खेळूनी रंग, सोबत घट्ट दुधाचा भंग,
गोऱ्यापान देहावर, सखीची काचोळी तंग.
गुलाबी समयी, मनाला आवरण्याचा व्यासंग,
करू नये कोणाचा रसभंग, होऊया गर्द रंगारंग. 

अवकाळी पावसाच्या, काय वेदना सांगू.
शेत सारं झोडपलं, आता भूक कुणाला मागू.

बायको.. जाड असली..
कि,
फिरायला जाण्यासाठी, कार बरी वाटते...
नाहीतर, बाईक मस्तच. 

आयला...
ह्या, "दाजी" शब्दाची निर्मिती कोणी केली असावी..?
लैच कापर ( दमदार ) शब्द राव..
बाजारात... कसली क्रेज आहे राव ह्या शब्दाची.
प्रत्येक दाजीवर, त्याच्या बायकोपेक्षा मेहुण्याच जास्ती फिदा असतात.
हल्ली, असच काहीसं चित्र निर्माण केलं जात आहे.
जुन्या काळापासून, ते आजवर लिहिलेली बरीचशी गीतं ऐकून, वाचून ते आपल्या ध्यानात येत असावं...
दाजीबाच्या गाण्यांचा तर, लोक गीतांमध्ये बिलकुल तुटवडाच नाही.
मध्यंतरी.... आमच्या पुणे भागात, गाव वाल्यांच्या जवळ-जवळ प्रत्येक कारच्या पाठीमागील काचेवर. किंवा, बाईकच्या मागील मडगार्डवर, हे वाक्य हमखास वाचायला मिळायचं.
" आलं बया दाजी.."
मला वाटतंय... ह्या 'दाजी' नावाने, तमाम मेहुणी वर्गावर एकप्रकारची सुंदर छाप सोडली असावी. बाकी, बायको मंडळीचं यावर काय म्हणणं आहे.
ते बाकी, मला माहित नाही.
क्योंकी...
हर एक औरत, साली (मेहुणी ) होती है.
और.
हर एक आदमी, दाजी ( जिजा ) भी होता है..

देखणी बायको, दुसऱ्याची.
स्वतःची बायको, स्वतःला ( कालांतराने ) सुंदर दिसत नाही.
ह्या वाक्याचा, शब्दशः तरी असाच अर्थ होतो.
आणि, असं प्रत्येक ( काही, अपवाद सुद्धा असतील ) पुरुष नेहेमी म्हणत असतो.
बहुतेक ह्यालाच...
बायको असून 'शेजारी' असं म्हणत असावेत.

काल, एक दुक्खी मित्र.. माझ्यापाशी, त्याची कैफियत मांडत होता..
विवाहबाह्य संबंध योग्य कि अयोग्य..?
ह्या विषयवार, न बोललेलंच बरं. कारण, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. चांगले वाईट निर्णय घेण्याची क्षमता, प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे, ती चर्चा नकोच..
तर, दहा एक वर्षांपूर्वी...
ह्या मित्राचं सुद्धा, एका सुंदर अशा समवयस्क स्त्री बरोबर सुत जुळलं. सुरवातीचा काळ, अगदी मजेत गेला. आणि, अजून सुद्धा ते दोघे आनंदी आहेत. पण आता, एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे..
त्या स्त्रीला, दोन मुली आहेत. आणि, त्यासुद्धा आता लग्नाच्या वयात आल्या आहेत.
तर, त्या स्त्रीने माझ्या मित्राला अशी गळ घातली आहे...
कि, माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नाचा थोडा फार खर्च तुला सुद्धा उचलावा लागणार आहे..!
एक शब्द सुद्धा न बोलता. गडी, कामाला लागला आहे...
लफडं करणं सोप्पं असतं, पण, ते निस्तरनं महाकठीण काम असतं..

पारखी नजर असेल...
तर, असं दृश्य हमखास पाहायला मिळतं..
नवरा बायकोची एखादी विजोड जोडी ( म्हणजे, बायको सुंदर आणि नवरा ठीकठाक )
मला दिसली.
कि... मी, किंवा तमाम पुरुषांच्या तोंडून ( मनातल्या मनात ) हे वाक्यं बाहेर पडतंच..
आयला... काय 'चिकणी' बायको भेटलीय राव ह्याला. नशीब काढलं बेट्याने..
पण, जर का त्याच ठिकाणी..
याविरुध्द,
म्हणजे.. नवरा खूप सुंदर आहे. आणि, बायको अगदी सो-सो असेल..
त्यावेळी..
तमाम महिलांच्या तोंडून ( मनातल्या मनात ) असं वाक्य बाहेर पडत असेल का.?
काय रे... कुठे फसलास वेड्या...!
( किंवा, आणखी काही.. )

एखाद्या सिंपल मुलीला,
तिच्यापेक्षा लाखपटीने सुंदर दिसणारा मुलगा नवरा म्हणून मिळाला.
कि.. ती, स्वतः तर खूपच मोहरून गेलेली असते.
कारण, असं क्वचितच घडत असतं.
त्यावेळी...
त्या नवऱ्या सोबत फिरत असताना म्हणा. किंवा, कुठे वावरत असताना. ती मुलगी, काहीशी संकुचित वृत्तीने... कावरी बावरी होऊन, वावरताना पाहायला मिळते.
बहुतेक... त्यावेळी तिच्या मनामध्ये, एक प्रकारचा बुजरा पणा आलेला असतो.
आपल्याला, खूपच रूपवान नवरा मिळाला आहे. त्याच्यासमोर, आपण अगदीच सुमार आहोत. असं तिला नेहेमी वाटत असतं.
त्यामुळे... ती, जन माणसामध्ये थोडीशी बुजूनच वागत असते.
त्याउलट,
अगदी सुमार दिसणाऱ्या मुलाला. खूपच रूपवती मुलगी बायको म्हणून मिळाली असेल.
तर मात्र, तो मुलगा कोणाचीही आणि कसलीही तमा न बाळगता.
खूप मोठी लढाई जिंकल्या प्रमाणे, अगदी छाती फुलवून समाजामध्ये वावरत असतो.
त्यावेळी.. त्याच्या मनात, अपराधीपणाची किंचितही भावना नसते.
कि... आपल्याकडे असणारी संपत्ती, किंवा' गुणवत्ता पाहून. ह्या मुलीने आपल्याला होकार कळवला असावा..
लग्न समारंभात किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात. नवरा बायकोच्या विजोड जोड्यांमध्ये हा विरोधाभास, मला... हमखास पाहायला मिळतोच...

जेंव्हा... आपलं, कुठेच मन रमत नसतं..
खूप कंटाळवानं, आणि निरस वाटू लागत असतं.
अशावेळी,
काहीतरी वाचन करून, मन रमवण्यासाठी सोबतीला एखादं पुस्तक सुद्धा नसतं.
तेंव्हा...
वाण्याकडून साखर बांधून आणलेला 'रद्दी' कागद सुद्धा..
कादंबरी पेक्षा, गोड आणि हवाहवासा वाटू लागतो.

शिक्षणामुळे...
व्यक्ती, भरपूर 'हुशार' आणि 'चाणाक्ष' होऊ शकतो,
परंतु,
त्याच्या अंगी, " जन्मजात " असलेला भोळेपणा..
तो, कदापि घालवू शकत नाही.

हाती लागत नसलेल्या,
" प्रत्येक गोष्टीचा "
मणुष्याला फारच त्रागा असतो..

चार चौघामध्ये...
'चाळे' करणारांना शरम वाटत नसेल.
तर..
बघनारांना, का म्हणून दोष द्यावा..?

आकार' चांगला असल्यावर..
'चुकार' पोरींना सुद्धा, वधु संशोधन परीक्षेत..
चिक्कार 'पसंती' मिळते..

बाहेरख्याली झालेल्या, स्त्री किंवा पुरुषा समोर..
तिच्या पतीने, किंवा त्याच्या पत्नीने..
त्यांच्यासमोर,
साक्षात.. प्रेमाचा 'समुद्र' जरी आणून ठेवला.
तरी...
ती किंवा तो...
स्वखुशीने, त्या " नाल्याकडेच " आपली धाव घेत असतात..

स्वतःच्या मालकीची नसलेली..
'बाईक' असो, अथवा 'बाई'
मनुष्य तिला,
'आपली' म्हणून...
कधीही सन्माननीय वागणूक देत नाही..

आभाळाची ठिगळं उसवता यायला हवी होती.
वरून राजालाही हि धरती न्याहाळता आली असती,
आपल्या आशीर्वादाने कशी सुरेख फुलली होती,
काळीभोर माती आणि हिरवीगार सुंदर शेती...

जखड होती कि पकड होती,
ते मला नेमके ठावुक नाही.
जिवाला घोर लागला होता,
तीच होती, कि और कोही..
कळ्या..

कोवळ्या कळ्यांना कधीही तोडू नये,
त्यांनाही उमलण्याच्या 'अधिकार' आहे.
परंतु, हा जमाना अगदी 'लाचार' आहे,
कारण इथे, निव्वळ फुलांचा 'बाजार' आहे.

काही कळ्या मात्र खुडाव्याच लागतात,
पण, त्यांचा हि होतो सुगंधित 'गजरा'
काही कळ्या मात्र, फक्त पाहातच राहाव्यात,
पण, त्यावरही असतात बऱ्याच वाईट 'नजरा'

Monday, 7 September 2015


रात्र होती काळोखी, पण चांदण्याचा सहवास होता.
तापलेला उष्ण दिवस हि, माझ्यासाठी खास होता.

खास असते सर्व काही, हा शांत मनाचा भास होता.
तो दिवस माझाच होता, हा मोकळा विश्वास होता.

तुझ्या बिंदिला पाहुन मी हसलो,
डोळ्यांची तर शपथच होती मला.
गालावरील खळीने दिला थोडा दिलासा.
मधाळ ओठांनी कार्य सिद्दीस नेले..
वार्याच्या झुळूकेवानी,
हल्ली भासतेस तु मजला.
सौंदर्याची काय कल्पना,
जन्मजात आंधळ्याला.

Sunday, 6 September 2015

काय दिवस होते राव ते...

त्यावेळी, मी श्रावण महिना वगैरे काही पाळत नव्हतो. अगदी हरहुन्नरी जीवन जगायचो. जीवनातले ठोकताळे समजायला अजून बराच अवकाश होता. कदाचित त्यामुळेच, मी मनमौजी जीवन व्यतीत करत होतो. त्याकाळी.. तुटपुंज्या कमाईत सुद्धा भरपूर मज्जा करायचो.

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच, बाजारात नव्याने आलेल्या साऊंडच्या भिंतीचं ( डीजे ) तरुणाईला खूपच आकर्षण होतं. त्याकाळी, पिंपरी चिंचवड भागामध्ये छातीत धडकी भरवणारा आवाज ऐकायला मिळायचा नाही. त्यामुळे, आम्ही सगळे मित्र पुण्याला धूम ठोकायचो. एका बाईकवर तीन-तीन जन बसायचो. पोलिसाच्या नजरेशी लपंडाव करत-करत पुण्यात पोहोचायचो.

पुण्यात पोहोचलं, कि पहिला पडाव येरवड्यातील रेड्डीज तंदूर मध्ये. रेड्डी समोरील म्हस्केच्या वाईन शॉप मधून, दोन-चार नंबर वन रमच्या कोटर मागवायच्या. त्याकाळी, सगळे मित्र रेड रमचे निस्सीम भक्त होते. पाच सहा जनात मिळून, मदिरा आणि तंदूरचा फडशा पाडायचा. आणि थेट, रविवार पेठ गाठायची. 

त्याकाळी, रविवार पेठेतील पांगुळ आळीमधील दहीहंडी भलतीच फॉर्म मध्ये असायची. म्हणजे अजून सुद्धा त्या मंडळाने आपला फॉर्म टिकवून ठेवला आहे. माणूस नावाच्या प्राण्यांची भली मोठी गर्दी तिथे जमा झालेली असायची. आणि, तरुणाईला थिरकण्यासाठी स्पेशल मुंबई वरून मागवलेला छातीमध्ये धडकी भरवणारा रॉजरचा महाकाय हेंगीग जॉब असायचा. 

धाड, धाड, धाड... धडकी भरवणाऱ्या संगीतावर कधीही न नाचणाऱ्या व्यक्तींची पावलं सुद्धा अपोआप थिरकायला लागायची. हंडीच्या वरच्या बाजूला छिद्र पाडलेल्या प्लास्टिकच्या भल्या मोठ्या पाईप मधून पाण्याची सतत धार चालू असायची. सगळी मुलं चिंब भिजत देहभान विसरून नाचायची. त्या ठिकाणी दहीहंडी पाहायला आणि नाचायला सतराशे साठ पोरं आलेली असायची. काही किरकोळ अपवाद वगळले तर, नाचताना वाद करण्याचा विषयच येत नव्हता. 
कारण, त्या मंडळातील आडदांड मुलांची सगळीकडे करडी नजर असायची. चुकून, वाद घालणारा कोणी भेटला. कि ती मंडळी त्याला जागेवरच धु-धु धुवायचे. तिथेच त्याचा खेळ खल्लास, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. त्यामुळे, वादावादी काही व्हायची नाही. 

त्या दहीहंडीमध्ये, तास दोन तास थिरकून घ्यायचं. तोवर, नशेचा अंमल थोडा कमी झालेला असायचा. दहीहंडी फुटायची वाट न पाहता. तेथून सुंबाल्या करायचा. आणि पुन्हा एकदा, आमची पावलं रविवार पेठेतील नर्तकी बारच्या दिशेने वळायची. तिथे जाऊन थोडा घसा ओला केला. कि, झिंगत-पिंगत मस्तीमधे पुन्हा एकदा बाईकवर ट्रिपल सीट स्वार व्हायचं. आणि, तडक घरचा रस्ता धरायचा..    
तुला काहीच कसं वाटत नाही गं..?
मी एक पुरुष आहे. तुझा, खूप जवळचा मित्र आहे. पण शेवटी, माझ्या मनात सुद्धा हा विचार आलाच ना..!
मला मान्य आहे. तुझा साता जन्माचा सोबती अकालीच तुला सोडून दूरच्या प्रवासाला कधीही न येण्यासाठी कायमचा निघून गेलाय.
पण... याचा अर्थ हा होत नाही ना.
कि तू, मनाला वाटेल तितक्या पुरुषांशी जवळीक साधशील.
अगं तुला हा खेळ वाटतोय का.? का तू इतके संसार उध्वस्त करायला निघाली आहेस..? त्यांच्यावर कोणत्या जन्मीचा सूड उगावत आहेस..? उद्या त्यांचे संसार उध्वस्त झाले तर तुला आनंद होणार आहे का..?
कि.. तू सुद्धा एक स्त्री आहेस हेच तू विसरून गेली आहेस..?
हाहाहाहा.....!!
अगं हसतेयेस काय..? मी काय तुझ्याशी थट्टा मस्करी करतोय का..? लाज वाटत नाही तुला इतक्या मोठ्याने खिदळतेयेस ते..?
बस्स्स....
झालं तुझं बोलून...!
तू स्वतःला माझा जवळचा मित्र म्हणवतोस ना..? मित्रच म्हणवतोस ना..?
मी तुला कधीतरी 'स्त्री' वाटली आहे का रे..? मग ह्या ना ना शंका कुशंका तुला कशाला हव्या आहेत..? तू माझा खूप मोठा काळजी वाहक आहेस का..? मी कधी तुला कोणत्या गोष्टीचा त्रास दिला आहे..?
आपली निखळ मैत्रीच आहे ना..? मग तू का एवढं मनाला लावून घेतोयेस..?
काळजी वाटते गं मला तुझी,
चुकून, ते पाच नराधम एकाच वेळेस तुझ्यासमोर उभे ठाकले तर तू काय करणार आहेस..?
त्या वेळी होणारी, तुझी त्रेधा तीरपिट आठवून माझा जीव घाबरून जातो गं. तुझ्या शरीराचे लचके तोडतील गं ते. तुला ह्या गोष्टीचं काहीच गांभीर्य वाटत नाहीये का..?
नाही...!
ह्या खेळात, मी आता खूप तरबेज झाले आहे. तुला, त्याची काळजी नसावी.
पण, बरं वाटलं... कोणीतरी माझी काळजी करतंय.
हे बघ, प्राची...
मी तुझ्याकडे नेहेमी एक मित्र म्हणूनच पाहिलं आहे. तुझ्याविषयी, माझ्या मनामध्ये कधीही पाप आलं नाही. आणि, येणार देखील नाही.
इतर लोकांप्रमाणे... मला तुझ्याशी बहिणीचं खोटं नाटं भावनिक नातं जोडायचं नव्हत. म्हणून, गेली पाच वर्ष मी तुझ्याशी अगदी पवित्र नात्याने वागतोय.
तुला काय वाटतंय.. मला संधी आली नव्हती..?
मी कुठे नाही म्हणतेय.. पण, ह्या एकांकी वातावरणात माझा तरी तोल कधी ढासळला आहे का..?
कसा ढासळेल..?
तू त्या अगोदरच फार दूर निघून गेली होतीस. एक म्हणता म्हणता किती मित्रांची प्रेम प्रकरणं तू मला ऐकवलीस. ते तरी तुला आठवत आहे का..?
हो आठवतंय.. सगळं आठवतंय,
माझ्या ह्या दोन कच्च्या बच्च्यांसाठी, मला ते सगळं करावं लागलं.
तुला.. मी संभोग विलासी स्त्री वाटतेय का..? नाही रे... मी अजूनही तितकीच पवित्र आहे.
माझ्या शेवटच्या प्रणयाची ती रात्र मला अजूनही अगदी तशीच आठवतेय. आणि, त्यानंतर त्या निश्चल देहाला दिलेला अग्नी सुद्धा अगदी डोळ्या समोर दिसतोय बघ. मी अजूनही त्याच वणव्यात उभी पेटतेय. स्वतःला जाळून घेतेय. तुला नाही समजायच्या त्या गोष्टी.
नाही रे, मी संभोग विलासी स्त्री नाहीये...
रडू नकोस प्राची...
ऐक...
काय ऐकू आणि कोणाचं ऐकू..?
तुझ्याकडे असणारी गाडी, घर, ऐश्वर्य हे काय तुला फुकट मिळालं आहे..? त्यासाठी, तू काहीतरी किंमत मोजली असशीलच कि. आणि, करून सवरून पुन्हा पवित्र असल्याचा आव आनतेयेस..?
हो.. मोजलीय मी त्याची किंमत...
मुख मैथूनाच्या पुढे मी कुठेही गेले नाहीये..
शी.....
काय बोलतेयेस तू हे.
किती नीच पातळीचं बोलतीयेस. मला तर नुसतं ऐकूनच मळमळायला लागलंय.. !
काय करू..?
तू माझ्या भावना कधी जानल्याच नाहीस. माझे स्पर्श तरी तुला चेतना देत होत्या कि नाही. ते सुद्धा कधी समजलं नाही. माझ्यात कोणती कमतरता होती. त्यामुळे.. तू माझ्यापासून दूर दूर राहत होतास..?
नाही जमलं मला ते. आणि आता जमणार सुद्धा नाही..
का..?
तुझ्यात तरी, काय उरलंय म्हणा आता..?
आणि...ह्या वयात,
मी तरी, उसनं अवसान कोठून आणू...?