सगळा धंदा झालाय.. व्यवसाय म्हणून काही ऊरलच नाहीये....
२००३ साली, मी माझी स्वतःची बाईक घेतली. त्यावेळी, माझी कामाची वेळ सकाळी सहा वाजताची होती. त्यामुळे, मला घरातून साडेपाचला निघावं लागायचं.
एके दिवशी सकाळी, मी पिंपरीहून दापोडी पर्यंत पोहोचलो. आणि अचानक, माझ्या बाईकचं मागील चाक पंक्चर झालं. जवळपास कुठे, पंक्चरचं दुकान सुद्धा नव्हतं. एवढ्या पहाटे, नवीन गाडी रोडवर लाऊन जायचं तरी कसं..? माझं काही धाडस होत नव्हतं.
शेवटी, मी बाईक ढकलत-ढकलत घोले रोडवरील आमच्या ऑफिस पर्यंत नेली. एवढ्या लांबचा प्रवास, गाडी ढकलून आणल्यामुळे. माझ्या अंगात बिलकुल त्राण राहिला नव्हता.
काम आटोपल्यावर, माझी बाईक पंक्चरच्या दुकानात घेऊन गेलो.
पंक्चर वाल्याने टायर खोलला, ट्यूब चेक केली. सगळ्या ट्युबची, अक्षरशः चाळण झाली होती. गाडी ढकलत आणल्यामुळे. टायर मध्ये असणारा खिळा, सतत ट्यूबला इथे तीथे टोचत होता. त्यामुळे, ट्युबची पक्की वाट लागली होती.
तेंव्हा मला समजलं, टायर पंक्चर झाला. कि, पहिलं टायरला चेक करून घ्यायचं. कि त्यामध्ये काही खिळा वगैरे घुसला आहे का..! आणि असेल तर, त्याला बाईकच्या चावीच्या सहाय्याने ताबडतोब काढून टाकायचा. आणि नंतर, गाडी पंक्चर च्या दुकानात घेऊन जायचं.
नंतर बरेचदा असा प्रसंग आल्यावर, मी वरील क्लुप्ती अमलात आणली. आणि, त्यात सफल सुद्धा झालो. पण, एकदा काय झालं..
माझी बाईक पंक्चर झाली. नेहेमीप्रमाणे, टायर मध्ये असणारा खिळा मी काढला. आणि, गाडी पंक्चर च्या दुकानापर्यंत ढकलत नेली.
झालं.. त्या व्यक्तीने टायर खोलला. ट्यूब चेक केली, तर त्यात सात आठ पंक्चर निघाले.
मी विचारात पडलो.. हे असं कसं काय झालं असेल..?
शेवटी, तो दुकानवाला म्हणाला..
साहेब.. आठ पंक्चर आहेत. त्यापेक्षा, तुम्ही नवीन ट्युबच टाकून घ्या..!
कारण, ट्युबच्या खर्चापेक्षा पंक्चर काढून घेणं मला महागात पडणार होतं.
नंतर असच एकदा, त्या पंक्चरच्या दुकानासमोरून मी जात असताना. आठवण आली म्हणून, सदर कथा मी माझ्या एका मित्राला सांगितली.
त्यावर, तो मित्र मला म्हणाला...
अरे, तुला माहित नाही का..? हा, त्या लोकांचा धंदा आहे.
गाडी पंक्चर काढण्याकरिता आली. कि टायर खोलताना, ते ट्यूबला आपल्या नकळत असे काही चिमटे देतात. कि ती ट्यूब, किमान पाच सहा ठिकाणी पंक्चर होते. पर्यायाने, आपल्याला नवीन ट्यूब घ्यावी लागते. आणि, ती ट्यूब सुद्धा काही ब्रांडेड नसते. पन्नास साठ रुपयाची ट्यूब, ते आपल्याला दीडशे रुपयाला खपवतात.
काय सांगावं राव, ऐकावं ते नवलच..
मध्यंतरी, काही पंक्चर व्यवसायिक बाईकच्या डिक्कीला होल पाडून. त्यातून चांभारी खिळे संपूर्ण रस्त्यावर त्यांच्या दुकाना पर्यंत पेरायचे. असं सुद्धा, माझ्या वाचनात आलं होतं.
रस्ते चांगले झालेत. त्यामुळे, हल्ली गाड्या सुद्धा सहसा पंक्चर होत नाहीयेत. शेवटी, त्या पंक्चर वाल्यांच्या पोटाचा सुद्धा प्रश्न आहे.
नेमकं चुकतंय कोणाचं..?
अचानक गाड्या पंक्चर झाल्याने, एखाद्याच्या धंद्यात बरकत येऊ शकते. तर दुसरीकडे, वेळेवर न पोहोचल्यामुळे एखाद्याच्या आयुष्याची भाकरी त्याची नोकरी सुद्धा हातची जाऊ शकते. किंवा, अन्य कोणत्याही घटना घडू शकतात.
आणि, अशा कित्तेक गोष्टी घडू शकतात. ज्यामुळे, होणारं नुकसान हे कधीही भरून येण्यासारखं नसतं.
सदर घटना, फार गंभीर आहे. यात, नेमकी चूक कोणाची...?
No comments:
Post a Comment