ज्या गावामध्ये किंवा शहरामध्ये आपल्या पोटापाण्याची सोय होत असते. त्या गावाचेच आपण गोडवे गायला हवेत. असं माझं स्पष्ट मत आहे.
वीतभर पोटासाठी आपली गावं सोडून काही लोकं जेंव्हा शहराकडे कूच करत असतात. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनाशी एक खुणगाठ बांधलेली असते. कि ह्या गावात मी माझा एक नवा ठसा उमटवेन इथल्या मातीशी मी एकरूप होऊन जाईल. परंतु.. पोट भरल्यावर माणसाला धर्म आठवतो. ह्या उक्तीप्रमाणे, स्थिरस्थावर झाल्यावर त्या बाहेर गावातील व्यक्तीला आपल्या गावची फारच आठवण येऊ लागते. आणि ती भूक भागवण्यासाठी तो आपल्या प्रांतातील लोकांचा एक समूह स्थापना करतो. त्यांना एकमेकांना भेटून आपल्या गावात असल्याचा आनंद मिळतो. कालांतराने, हीच लोकं एक वेगळा गट निर्माण करू लागतात. आणि त्यावेळी, हि गोष्ट तेथील भूमिपुत्रांच्या नजरेतून सुटेल तर ते नवलच म्हणावं लागेल.
इथून पुढे खर्या संघर्षाला सुरवात होते. गटबाजीचा प्रयत्न करत असताना. काही लोकं राजकारणाशी जवळीक साधताना आढळतात. स्थानिक लोकांना हे काही रुचत नाही. आणि तिथून पुढे मूळ मुद्दा गाववाले आणि बाहेर गावचे असे गट निर्माण होऊ लागतात.
मी स्वतः, ह्या गोष्टीच्या पूर्ण विरोधात आहे..!
पोटासाठी आलोय, तर तिथले होऊन राहा. आणि त्यांच्यात मिसळूनच आपलं नावलौकिक निर्माण करा. त्याला नक्कीच सर्वांचा दुजोरा मिळतो.
मध्यंतरी असंच एका मित्राच्या आग्रहाखातर महाराष्ट्रातील त्या विशिष्ट भागातील ग्राम मेळाव्यात मी सहभागी झालो होतो. सुरवातीचा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पडला. आणि काही वेळाने त्यातील एका व्यक्तीने तिथे व्यासपीठावर गरळ ओकायला सुरवात केली.
" ह्या पुण्यात 'आपल्या' भागातील पाच नगरसेवक निवडून आले आहेत. तर, ते पाचाचे पंचवीस कसे होतील. याकडे अपना सर्वांचं लक्ष असणं जरुरी आहे..! "
हे वाक्य ऐकून, त्यावेळी माझी सुद्धा सटकली होती.
हेच वाक्य.. जर, त्याठिकाणी असणाऱ्या एखाद्या स्थानिक व्यक्तीने ऐकली असती.
तर, त्याची तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार आहे का..?
जिथे आलोय तिथलेच होऊन राहण्यात फार मोठं हित दडलेलं असतं..!!
हेच वाक्य.. जर, त्याठिकाणी असणाऱ्या एखाद्या स्थानिक व्यक्तीने ऐकली असती.
तर, त्याची तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार आहे का..?
जिथे आलोय तिथलेच होऊन राहण्यात फार मोठं हित दडलेलं असतं..!!
No comments:
Post a Comment