बरीच जुनी गोष्ट आहे,
पाच सहा किलोमीटरचं अंतर होतं. बसने, घरी निघालो होतो. बराच वेळ वाट पाहिल्यावर एकदाची बस आली. बस मध्ये चढलो, योगायोगाने त्या बस मधील कंडक्टर नेमका माझा मित्रच निघाला.
मी बसमध्ये बसलेल्या ठिकाणापासून, माझ्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या प्रवासासाठी बस भाडं फक्त तीन रुपये होतं.
मी बसमध्ये बसलेल्या ठिकाणापासून, माझ्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या प्रवासासाठी बस भाडं फक्त तीन रुपये होतं.
मी, सुट्टे तीन रुपये.. त्या कंडक्टर मित्रा समोर धरले. आणि, त्याला प्रवासाचं तिकीट मागितलं. तर.. तो मित्र म्हणाला,
राहूदे राव, कुठ लय लांब जायचय तुला. पुढचा थांबा गेल्यावर उतरून जा..!
तो मित्र काही ऐकेना.. माझा सुद्धा नाईलाज झाला. आणि मी, ते पैसे परत माझ्या खिशात ठेऊन दिले. पुढचा स्टॉप आला, काही प्रवासी बस मधून खाली उतरले. आणि त्याच सोबत काही चेकर लोकांनी बस मध्ये प्रवेश केला. त्यांनी सर्व प्रवाशांची तिकिटं पाहायला सुरवात केली. आणि, चेकिंग करत करत ते माझ्या पर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी तपासणीसाठी मलाही तिकीट मागितलं.
~ तिकीट बघू तुझं..!
~ तिकीट काढलं नाही अजून, मी मागच्याच स्टॉपला बसलो आहे. अजून कंडक्टर माझ्या पाशी आला नाही.
काहीतरी सांगायचं म्हणून मी माझी सफाई पेश केली होती. पण तो चेकर लैच बेरकी होता. मला म्हणाला,
~ शक्य आहे का राव...! गाडीत, फक्त दहा बाराच लोकं आहेत..!
वरील प्रकार घडत असताना, तो कंडक्टर मित्र तर माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हता. तो बिचारा जाम घाबरला होता. घडला प्रकार मी त्या चेकरला सांगितला असता, तर कदाचित त्याच्यावरच कारवाई झाली असती. मी तर तसं काहीच सांगणार नव्हतो. पण त्याच्या मनात भीती होती, कि हा.. चेकरला काय सांगतोय काय माहिती..?

मी चेकरला म्हणालो,
~ ठीक आहे, चुकी झाली माझ्याकडून मी तिकीट काढतो..!
~ नाही-नाही, तुझी तिकीट काढायची वेळ संपली आहे. आता तुला दंडच भरावा लागेल.
~ ठीक आहे, चुकी झाली माझ्याकडून मी तिकीट काढतो..!
~ नाही-नाही, तुझी तिकीट काढायची वेळ संपली आहे. आता तुला दंडच भरावा लागेल.
मला खूप राग आला होता. कारण, त्या तीन रुपयापायी. मला आता अकरा रुपये दंड भरावा लागणार होता. मी मनातच, त्या चेकरची आई माई काढून मोकळा झाला होतो. कंडक्टर मित्र, अजूनही माझ्याकडे पाहायला तयार नव्हता. जाऊदे म्हंटलं, शेवटी त्याच्या नोकरीचा प्रश्न होता.
मी चेकरला म्हणालो, करा पावती.
चेकर.. हा, सांग नाव सांग तुझं..!
मी.. लिहा, " राजीव गांधी "
चेकर.. काय...??
मी.. का, ऐकू आलं नाही का...??
चेकर.. हा, सांग नाव सांग तुझं..!
मी.. लिहा, " राजीव गांधी "
चेकर.. काय...??
मी.. का, ऐकू आलं नाही का...??
माझ्या या गुगली उत्तरावर त्याने रागाने मान हलवली.
चेकर.. हा, पत्ता सांग..!
मी.. नवी दिल्ली.
चेकर.. काय..?
मी.. हो, हो नवी दिल्लीच..!
चेकर.. हे तुझं खरं नाव आणि पत्ता आहे का...?
मी.. तुम्हाला त्याचं काय देणं घेणं आहे..? दंड मिळण्याशी मतलब ठेवा..!
चेकर.. लैच शहाणा दिसतोयेस रे तू...!
मी.. हो, मी अतिशहाणा आहे.

माझ्या या विनोदी संवादामुळे, बस मध्ये बराच हशा पिकला होता. आणि त्यामुळे तो चेकर सुद्धा खूप खजील झाला होता. पावती लिहून झाली होती, दंडाची अकरा रुपये रक्कम मी त्या चेकरकडे दिली. तोपर्यंत, माझा स्टॉप आला होता. चेकरकडे, रागाने पाहातच मी बसच्या खाली उतरलो.
त्याच्याकडे, रागाने पाहतच रस्त्याने मी पुढे चाललो होतो. तो हि, माझ्याकडे रागाने पाहत होता. आणि, अचानकपणे समोरून येणाऱ्या एका मुलीला मी धडकलो. माझी समाधी भंग पावली. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.
मी तिला, सॉरी म्हंटलो.
ती हि, ओके ओके म्हणत गालातल्या गालात हसून पुढे निघून गेली.
मी हि, हसलो, आणि..
त्या सुंदरीच्या प्रेमळ धडकेने... पैसे, गेल्याचं दुःख ही आता माझ्या मनात नव्हतं..!

No comments:
Post a Comment