परवा काही मित्रांच्या समवेत, घसा ओला करण्यासाठी मी एका मोठ्या रेस्टॉरंट बार मध्ये बसलो होतो. तिथे चार-चार खुर्च्यांचं एक टेबल होतं. हॉटेलमधील जवळपास सगळी टेबलं मद्यपी लोकांनी भरून गेली होती. उबदार वातवरणात, प्रत्येक व्यक्ती मद्याचा आस्वाद घेत होता. रेस्टॉरंटमध्ये चालू असलेलं हळुवार संगीत सुरेख झिंग चढवत होतं. तितक्यात माझं समोरील बाजूस लक्ष गेलं.
समोरील टेबलवर.. माझ्या समोरासमोर बसलेली एक दाढीधारी व्यक्ती माझ्याकडे चोरून-चोरून पाहत होती. तो व्यक्ती नेमकं कुठलं पेय पीत होता. ते मला माहित नाही, पण बहुतेक तो सॉफ्ट ड्रिंक घेत असावा. बराच वेळ झाला.. आम्ही पेगवर पेग रिचवत होतो. काही वेळानंतर लघुशंका करून यावी म्हणून, मी टॉयलेट मध्ये गेलो. मी मोकळा होतच होतो, तितक्यात.. माझ्याकडे चोरून पाहणारा तो व्यक्ती सुद्धा तिथे आला. मी फ्रेश होऊन, बेसिनमध्ये हात धुवत होतो.
तो व्यक्ती सुद्धा हात धुवण्याच्या बहाण्याने तिथे आला. आणि मला म्हणाला..
तो व्यक्ती सुद्धा हात धुवण्याच्या बहाण्याने तिथे आला. आणि मला म्हणाला..
- क्यू मिया.. खुलेआम शराब पी रहे हो, किसीके देखनेका आपको डर नही लागता..?
मी ताबडतोब समजून गेलो.. हा बिचारा, मला मुस्लीम व्यक्ती समजून बसला आहे. मग आता, हे प्रकरण तसच पुढे रेटून न्यावं. म्हणून मी त्याला बोलता झालो..
क्या है मिया.. हम लोगोमे शराब को हराम समजा जाता है. लेकीन क्या करे, लत जो लग गयी है. छुटनेका नाम हि नही लेती. और रही बात किसीके देखनेकी..!
तो हमारे भाई लोग, शराब खानेमे तशरिफ नही लाते. इसलिये डरणेकि कोही बात नही.
तो हमारे भाई लोग, शराब खानेमे तशरिफ नही लाते. इसलिये डरणेकि कोही बात नही.
त्यावेळी.. एक मोठा सुस्कारा टाकत, तो भाईजान मला म्हणाला.
नही यार.. लेकीन ये गलत है..!
शेवटी मी सुद्धा वैतागलो आणि त्या व्यक्तीला म्हणालो..
भाईसाहब.. मी मुस्लीम व्यक्ती नाहीये. तुमची बोळवण करावी म्हणून मी तुमच्या होकारात होकार मिळवला. हे माझ्या हातावरील गोंदण बघा. आहे ना, ओम लिहिला आहे ना.
झालं आता तुमचं समाधान..!
शेवटी त्या व्यक्तीने सुद्धा माघार घेतली. आणि तो त्याच्या टेबलवर जाऊन बसला.

तसा काही हा खास विषय नव्हता, पण आपल्या बिरादरीतील व्यक्ती दारू पीत आहे हे पाहून, त्याने सगळी शहानिशा करून घेतली. हे मला फारच अद्भुत वाटलं.
आमचा वार्तालाप संपल्यावर, तो व्यक्ती त्याच्या टेबलवर जाऊन बसला. काही वेळात, त्याच्या मित्रांचा कार्यक्रम उरकला. त्यानंतर एक मजेदार गोष्ट घडली, बारच्या बाहेर जाताना.. तो व्यक्ती, गुपचूप नजरेनेच, मला " आदाब " करून निघून गेला..!

पण.. या विषयाला आता मी फार कंटाळलो आहे.
या सगळ्या त्रासाला वैतागून, आता.. मी, ती मुसलमानी दाढीच काढून टाकली आहे..!
या सगळ्या त्रासाला वैतागून, आता.. मी, ती मुसलमानी दाढीच काढून टाकली आहे..!
No comments:
Post a Comment