बरोबर एकोणतीस वर्षांपूर्वी..
आजच्या दिवशी,मी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो होतो. मला स्वतःला उत्तीर्ण होण्याचा दांडगा विश्वास होता. कारण, प्रत्येक नापास होणाऱ्या विध्यार्थ्याला अगदी असाच आत्मविश्वास असतो.
पण.. हे आक्रीत कसं काय घडलं..? ते, देवच जाणो..! अशा संकट समयी सगळं काही, देवावर सोडून द्यायचं. म्हणजे, आपल्याला त्रास होत नाही. हा आपला पहिल्या पासूनचा फंडा आहे.

एक नाही दोन नाही.. तर तब्बल तीन विषयात मी नापास झालो होतो.
मराठी, इंग्रजी आणि बीजगणित..
निकाल हातामध्ये पडल्याबरोबर, माझ्या डोळ्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. घरी गेलो, घरचं सगळं वातावरण भयंकर गंभीर झालं होतं.
" शारीरिक मारापेक्षा, शाब्दिक मार फार जहाल असतो. "
त्याची प्रचीती, मला त्यादिवशी आली. आमच्या घरात, एकतर मी शेंडेफळ. आणि त्यात, मी अभ्यासात हुशार गणला गेलो होतो. त्यामुळे, घरच्यांना हा धक्का सहन होणारा नव्हता. दोन्ही गुढग्यात तोंड खुपसून, मी हमसू हमसून रडत होतो. तसा, माझा शालेय जीवनाचा गतकाळ माझ्या नजरेसमोर तरळत होता.

इयत्ता सातवी पर्यंत मी अत्यंत हुशार विध्यार्थी होतो. इतका हुशार, कि आमच्या दिवटे नामक एक बाई होत्या. त्या चाचणी परीक्षा झाल्यावर मला घेऊन प्रत्येक वर्गात फिरलेल्या मला आठवतंय. प्रत्येक वर्गात, मला दाखवून त्या म्हणायच्या.. याचा आदर्श घ्या, याचे मार्क कुठे कमी करावेत..? हा प्रश्न आम्हाला नेहेमी पडत असतो..!
नाही म्हणता, त्या फालतू हुशारीची हवा माझ्या डोक्यात शिरली होती. आणि नेमकं घडायचं तेच घडलं. इयत्ता आठवी नंतर, टुकार पोरांच्या संगतीने माझ्या हुशारपनाचा सगळा बट्ट्याबोळ उडाला होता. सहामाही प्रगतीपुस्तकावर, घरचे लोक सही सुद्धा करत नव्हते. इतका वाईट अनुभव त्यावेळी मी भोगत होतो. पण अक्कल काही येत नव्हती, उनाडपणा सुटत नव्हता. आणि शेवटी, त्याचं फलित दहावी नापास असा शिक्का बसून झालं.
त्यानंतर, रागाच्या भरात दोन तीन वेळा मी परीक्षेला बसलोच नाही. माझा उनाडपणा खूपच पराकोटीला गेला होता. एकदा तर, हाणामारीच्या प्रकरणात मला जेलची वारी घडता घडता राहिली.
आणि, तिथेच माझ्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.
आणि, तिथेच माझ्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.
हि दुनिया खूप जालीम आहे. इथे आपला निभाव लागणं कठीण आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे मी स्वतःच जाणून घेतलं. आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागलो. आणि नव्वद साली मी चांगल्या मार्काने दहावी उत्तीर्ण झालो.
हे सगळं सांगायचं उद्धिष्ट एकच आहे. कि, नापास हा शिक्का आपल्याला कायमचा चिटकून बसत नाही. माझ्यासारखा दहावीला मरठीत नापास असणारा विद्यार्थी, आज मराठी पेपरात मोठमोठे लेख लिहित आहे. मोठेमोठे, संकल्प सादर करत आहे. हे सगळं भाकीत, त्यावेळी कोणी केलं असतं. तर ते कोणाला खरं वाटलं असतं का..?
हल्ली, दहावीत नापासांची गळती फार कमी झाली आहे. तरी सुद्धा, काही पालकांची मुले चुकून नापास झाली असतील. तर, त्यांनी नाऊमेद होऊ नका. त्यांना.. पुन्हा एकदा आपल्या पंखांखाली घ्या. त्यांना, तुमच्या मायेची उब द्या. ते पुढील आयुष्यात नक्कीच उंच गगनभरारी मारतील, यात तसूभर शंका नाही.

देवाने, प्रत्येकाला चोच दिली आहे.
तशी, त्याच्या दाना पाण्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे.
तशी, त्याच्या दाना पाण्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे.
No comments:
Post a Comment