Monday, 6 June 2016

काशीमध्ये, भगवान विश्वनाथ यांचा निवास आहे.
आणि त्याचबरोबर, एक सुंदर आणि धार्मिक पवित्रस्थळ म्हणून सुद्धा हे ठिकाण जगभर मान्यता पावलेलं आहे.
त्याचप्रमाणे, हिमालय पर्वतातील कैलाश मानसरोवर यात्रा अत्यंत कठीण अशी असली. तरीही, या अक्राळविक्राळ पर्वतीय यात्रांना, हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे, ह्या यात्रा सुद्धा फार पूर्वीपासून जगद्विख्यात झाल्या आहेत.
भारतात, नास्तीकांची संख्या जरी भरमसाठ असली. तरीही, त्याची उणीव भरून काढण्यासाठी. आणि निव्वळ अध्यात्माच्या वेडापाई, कित्तेक फिरंगी लोकं आपली घरदार सोडून या धार्मिक मार्गावर आलेले आपणाला याठिकाणी पाहायला मिळतात.
त्यामुळे, प्रत्येक धार्मिक व्यक्तीला. कैलास नाही, तर किमान बद्रीनाथ यात्रा तरी नेहेमीच आकर्षित करत आली आहे.
वर्ष प्रतिवर्ष.. अंगातील सामर्थ्य, चिकाटी आणि संकटांचा सामना करत. देश विदेशातील असंख्य भक्तगण, हि यात्रा आवर्जून करत असतात. फार पूर्वीपासून, हिमालयातील हि यात्रा अतिशय कठीण अशी मानली गेली आहे. कारण, अशी मान्यता आहे. कि, बद्रीनाथाच्या चरण स्पर्शाने जीवन मरणाच्या फेऱ्यातून मनुष्य कायमचा मुक्त होऊन जातो.
" जो जाई बद्री, तो फिरून ना येई कोणाच्या उदरी "
भगवत गीतेमध्ये, प्रभू श्रीकृष्णाने त्यांचा जिवलग सखा उद्धवाला सुद्धा बद्रिका आश्रमी जाऊन हरी नारायणाची आराधना करण्याची आज्ञा केली होती. असा उल्लेख आढळतो. याचाच अर्थ असा होतो, कि प्राचीनकाळी सुद्धा हि यात्रा केली जात होती.
या यात्रेबद्धल अधिकतांशपणे नेहेमी हाच प्रश्न विचारला जातो.
कि.. चारधाम सारखी भयंकर कठीण असणारी यात्रा करून मनुष्याला नेमका काय लाभ होतो..?
माझ्यामते, ज्या व्यक्तीने हि यात्रा केली आहे. तोच या प्रश्नाचं समर्पक आणि साजेसं उत्तर देऊ शकतो. अध्यात्मिक लाभ, हा प्रत्येकाच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर निर्भर असतो.
हा विश्वास म्हणजे, जगण्याच्या ओढीने मनुष्य आत्मा ज्या पद्धतीने आपल्या शरीरात प्राणवायू ठासून भरत असतो. आणि त्यापुढे, जीवनातील बरेच कटू गोड अनुभव उराशी बाळगत पुढील जीवनक्रम व्यथित करत असतो. हे सगळं.. का, कसं, कोणासाठी आणि कशासाठी घडत असतं..? त्याला.. आजतागायत कोणताच ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाहीये. यालाच, " विश्वास " असं संबोधलं गेलं आहे.
प्रत्येक व्यक्तीला, पापापासून मुक्ती हवी असते. कारण पाप पुण्य या गोष्टी कोणालाच चुकल्या नाहीयेत. हि ठोस श्रद्धा मनाशी बाळगून, यात्रा करणारा प्रत्येक भाविक या वरदानास निश्चितच पात्र ठरत असतो. आणि पापमुक्त होत असतो..!
ह्या विषयवार अजून खूप काही लिहायचं आहे. चारधाम यात्रेचा पूर्ण लेखाजोखा तुम्हा सर्वांसमोर नक्कीच सादर असेल. तत्पूर्वी, थोड्या अवधीची मी तुम्हां सर्वांसमोर याचना करीत आहे..!
चारधाम भगवान कि जय हो..!!

No comments:

Post a Comment