Wednesday, 26 July 2017

माझ्या एका मित्राला, पूर्वीपासून काही गोष्टींची माहिती ठेवण्याची खूप आवड आहे.
उदा :- डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या, ताप, थंडी..
या आजारांवर, मेडिकल मधील कोणत्या गोळ्या कामी येतात. याची त्याच्याकडे इत्यंभूत माहिती असते. किंवा, वर्षातून एकदा पूर्ण बॉडी चेकप करून घेणे. या सगळ्या गोष्टी तो नियमित करत असतो. किंवा, छोट्या मोठ्या आजारांचा तो फार मोठा बाऊ सुद्धा करत असतो. थोडक्यात काय तर, तो आणि मी दोघेही आजार या विषयाचे फार मोठे भित्रे आहोत.
एके दिवशी, सहजच मी त्याच्या घरी गप्पागोष्टी करण्यासाठी गेलो होतो. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या, आणि थोड्यावेळाने, मला लघुशंका आली. मी ताबडतोब त्याच्या घरातील बाथरूममध्ये जाऊन शुचिर्भूत होऊन आलो. त्यादिवशी नेमका काय प्रकार झाला होता, ते मला माहिती नाही. पण एका तासाभरात, मी तब्बल चार ते पाच वेळा लघुशंकेला जाऊन आलो होतो. त्यावर.. माझा तो चिकित्सक मित्र मला म्हणाला.
पंड्या.. इतक्या वेळा काय रे बाथरूमला जायचं..?
एक काम कर राव.. तू तुझी ब्लड शुगर एकदा चेक करून घे...!
झालं.. या मित्राने माझ्या मनात शंका निर्माण करून दिली. भित्या पाठी ब्रह्मराक्षस, या उक्तीप्रमाणे.
दुसऱ्या दिवसापासून मला लघुशंकेचा वारंवार त्रास जाणवू लागला. आत्ता जाऊन आलो, कि पुन्हा लगेच इच्छा निर्माण व्हायची. अगदी उन्हाळी लागते ना, तशी अवस्था झाली होती. माझ्या शरीराने, आणि मनाने त्या मित्राच्या सल्ल्याचा चांगलाच धसका घेतला होता. आता शेवटचा पर्याय म्हणजे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार सुरु करणे. शेवटी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाने आणि रक्तातील शुगर चेक करून घेणे. या विषयावर आमचं एकमत झालं. मी ताबडतोब आमच्या येथील एका लॅबमध्ये गेलो, आणि माझ्या रक्तातील शुगर लेव्हल चेक करून घेतली. दुसऱ्या दिवशी सगळे रिपोर्ट मिळाले. ब्लड शुगरचा रिपोर्ट अणि सोबतच बाकीचे रिपोर्ट सुद्धा अगदी नॉर्मल आले होते. त्यामुळे, माझा जीव अगदी भांड्यात पडला होता.
आणि.. विशेष म्हणजे, रिपोर्ट मिळाल्या पासून माझी सारखी-सारखी होणारी लघुशंका देखील अचानक कमी काय, अगदी नाहीशी झाली होती.
काय असतं, कोणी आपल्या मनावर एखादी गोष्ट बिंबवली. कि, आपलं मन लगेच त्या बाजूने कार्य करायला सुरवात करतं. आणि, नको ते शारीरिक लोचे निर्माण होत असतात.
आता.. हे सगळं वाचून, तुम्ही कोणी माझ्या मनामध्ये नवीन शंका निर्माण करून देऊ नका, म्हणजे मिळवली.
आमच्या संपूर्ण खानदानात,
घरच्यांच्या मनाविरुद्ध, त्यांना न सांगता, प्रेमविवाह केलेला पहिला व्यक्ती म्हणजे मी.
त्यामुळे, हा प्रकार घडल्यानंतर साहजिकच आमच्या घरात वाद आणि गोंधळ निर्माण होणार होता. एकत्र कुटुंब असल्याने, त्यात नक्कीच भरीस भर पडणार होती.
पण कसंबसं आमच्या घरच्यांनी आमची चूक पोटात घातली. आणि मोठ्या मनाने आम्हा दोघांना त्यांनी माफ केलं.
पण म्हणतात ना.. चहा पेक्षा किटली जास्ती गरम असते..!
त्यातला काहीसा प्रकार मला त्यावेळी पाहायला मिळाला. आमच्या ओळखीतल्या काही व्यक्तींनी, माझ्या लग्नावर नाराजी व्यक्त करत, आमच्या घरच्या व्यक्तींसमोर त्यांना खाली दाखवत, टोमणा देत, मला उद्देशून त्या दोन व्यक्ती असं म्हणाल्या होत्या.
आम्हाला वाटलं नव्हतं, हा असलं काही करेल म्हणून..!
त्यांचे हे शब्द माझ्या फारच जिव्हारी लागले होते. अगदी, उकळत्या तेलासारखे ते माझ्या कानात पडत होते. आमच्या घरचे काही म्हणत नव्हते. पण त्यावेळी, बाहेरच्यांना खूप जोर आला होता.
पण लहान तोंडी मोठा घास कसा घ्यावा. म्हणून त्यावेळी हाताच्या मुठी आवळून मी गप्पं बसलो होतो.
पण कसं असतं, आपण लोकाकडे जेंव्हा एक बोट करत असतो. त्यावेळी उरलेली तीन बोटं आपल्याकडे अंगुलीनिर्देश करत असतात. हे आपण विसरून जात असतो.
बराच काळ लोटल्यानंतर..
त्या दोन्ही व्यक्तींच्या घरी सुद्धा अगदी असाच प्रकार घडला. त्यातील एका व्यक्तीच्या घरी, मास मच्छी असला विषय बिलकुल चालत नव्हता. त्याच्या मुलाने, उत्तर भारतातल्या एका मुलीशी लग्न केलं होतं. आणि तिच्या सवयीमुळे, तो सुद्धा आता खायला प्यायला लागला होता. आणि विशेष म्हणजे, एकुलता एक असून आई वडिलांना सांभाळत नव्हता.
तर दुसऱ्या केसमध्ये, सुरवातीला त्याच्या मुलीने प्रेमविवाह केला होता. आणि हे का कमी म्हणून, दोन चार वर्षातच, त्याच्या मुलाने सुद्धा बहिणीच्या पायावर पाय टाकला होता.
यथावकाश.. या दोन्ही घटना माझ्या कानावर आल्या. मी तर संधीची वाटच पाहत होतो.
आणि, एकदा पहिल्या क्रमांकाची व्यक्ती मला भेटली.
अशावेळी, मी कोणतीच भीडभाड ठेवत नसतो. आणि, समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करायला बिलकुल मागेपुढे पाहत नसतो. त्यावेळी मी त्या व्यक्तीला म्हणालो..
काय काका.. तुमच्या दीपेशने खूप डेंजर काम केलं हो. तुम्ही लोकं शुद्ध शाकाहारी मंडळी. आणि त्याने चक्क मांसाहार करणाऱ्या मुलीशी लग्नं केलं. आणि हल्ली तो, मांसाहारा सोबतच कधीतरी दारू सुद्धा पितो असं सुद्धा माझ्या ऐकण्यात आलं आहे. खरं आहे का हे..?
मी त्या व्यक्तीचं इतकं बेक्कार तोंड झोडल्यावर, गडी माझ्यापुढे कसला बोलतोय. मान खाली घालून गप्पं उभा होता. आणि शेवटी, त्याचा शालजोडीतला फटका मी त्याला मारलाच.
मला वाटलं नव्हतं, तो असं काही करेल म्हणून..!
असला जबरदस्त अपमान केल्यानंतर, तो पुन्हा फिरून मला कधीच भेटला नाही. एकदोनदा कार्यक्रमात दिसला होता, पण मला पाहून तोंड लपवत होता.
तर.. दुसऱ्या केसमध्ये, त्या व्यक्तीच्या मुलीने पळून जाऊन लग्नं केलं होतं. मुलीचा विषय होता, म्हणून सुरवातीला मी त्याला काही बोललो नाही. पण जेंव्हा त्याच्या मुलाने बापाच्या विरोधाला न जुमानता आपलं प्रेम तडीस नेलं. त्यावेळी एकदा मी त्याला सुद्धा गाठला. आणि म्हणालो,
आमच्या घरात तर, मी एकट्यानेच असं लग्नं केलं होतं. पण तुमच्या घरात, तुमच्या दोन्ही मुलांनी दिवे लावले. मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं कि दोघे असं काही करतील म्हणून..!
वरील दोन्ही प्रकरणात.. त्या दोन्ही व्यक्ती, माझे टोमणे ऐकत खाली मान घालून उभे होते.
पण त्या दोघांना मला उलट बोलायची हिम्मत काही होत नव्हती.
कारण, त्यावेळी माझ्याकडे एक बोट करताना. त्यांच्या हाताच्या तिन्ही बोटांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यामुळे, लोकांवर शिंतोडे उडवताना कधीही सावध असलं पाहिजे. वेळ काही सांगून येत नाही, आपल्या अंगावर कधी एखादी मोठी घाण पडेल. आणि, कधी एकदा आपण त्यात पुरते गुदमरून जाऊ ते सुद्धा सांगता येत नाही..!

Tuesday, 25 July 2017

सगळ्यांनी इकडे लक्ष द्या..!
पुण्या, मुंबईतील रस्त्यावर मर्यादेपेक्षा जास्ती प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्यामुळे, प्रत्येक वाहनचालक व्यक्ती रोजच्या रोज ट्राफिक जॅम मध्ये अडकून पडत असतात.
नेमका याच विषयाचा लाभ उचलत..
परराज्यातील.. काही स्त्रिया आणि पुरुष, सोबत तरुण आणि अल्पवयीन मुलं सुद्धा विविध प्रकारची खेळणी किंवा घरगुती वापरातील वस्तू सिग्नलवर विकत असताना आपल्याला आढळतात. 
उदा :- मोबाईल कव्हर, मोबाईल हँगर, मच्छर मारण्याच्या इलेक्ट्रिक बॅट, छत्र्या, खेळणी आदि वस्तू विकताना आपल्याला ते आढळत असतात.

या वस्तू दिसायला सुद्धा फार आकर्षक आणि किमतीच्या मानाने सुद्धा दुकानापेक्षा बऱ्याच स्वस्त असतात. त्यामुळे, आपण त्याकडे आकर्षित होऊन त्या वस्तू लगेच खरेदी करत असतो.
चांगलं आहे.. कोणीतरी कष्ट करून आपल्या उदरनिर्वाहा साठी पैसे कमवत आहे. त्यासाठी आपला हातभार निश्चितच असावा. पण या गोष्टी खरेदी करत असताना, त्या चीनी बनावटीच्या तरी नाहीत ना..? हे सुद्धा एकदा नक्की पडताळून पहा.
आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, आज माझ्यासमोर घडलेला प्रसंग.
हि सगळी विक्रेती मंडळी खरं तर माझ्या रोजच्या पाहण्यातील आहेत. पण काल एक वेगळाच, कोणीतरी नवीन मुलगा, सिग्नलवर छत्री विकत होता. शेवटी काय, हा व्यापार आहे. त्यात रोज नवनवीन लोकं येतच राहणार.
माझ्या समोर, दोन पाच गाड्या पुढील बाजूस असणाऱ्या एका कार मालकाने. त्या मुलाकडे असणारी, शेवटची छत्री खरेदी केली. त्यांचा किती रुपयात सौदा झाला होता, ते मला समजलं नाही. पण, त्या कार मालकाने. त्या तेरा चौदा वर्षाच्या मुलाला पाचशे रुपयांची करकरीत नोट दिली होती. उरलेले सुट्टे पैसे देण्याकरिता, त्या मुलाची हालचाल सुरु झाली. आणि अचानकपणे.. त्या मुलाने एक वेगळाच पवित्रा घेतला.
ती पाचशे रुपयांची नोट घेऊन तो धूम पळून गेला. हे सगळं अगदी क्षणार्धात घडलं, त्यामुळे त्या गाडी मालकाला सुद्धा काही समजेना कि आता नेमकं काय करावं..? गाडी सोडून त्याच्या मागे पळावं. तर तो मुलगा रोड क्रॉस करून पलीकडच्या बाजूला निघून गेला होता. पलीकडच्या बाजूचं ट्राफिक सुद्धा सुटलं होतं. सगळी लोकं फक्त पाहत होती, पण कोणालाच काहीच समजलं नव्हतं.
कारण जो तो आपल्या घाईत असतो, पण माझं बाकी पक्कं लक्ष होतं.
शेवटी.. सिग्नल सुटल्यावर तो कार मालक गुपचूप पुढे निघून गेला. कारण, त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यानंतर, पुढे जाऊन काय घडलं ते मला समजलं नाही.
त्यामुळे, एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेवा.
सहसा असं होत नाही, पण चुकून असं काही घडू नये म्हणून,अशा वस्तू खरेदी करत असताना. नेमके आणि सुट्टे पैसे देत चला. सुट्टे पैसे नसतील, तर ती वस्तू घेण्याचा मोह आवरता घ्या. नाहीतर, नको त्या प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागेल.

Monday, 24 July 2017

स्पीडब्रेकर किंवा गतिरोधक..
खरं पाहायला गेलं तर, जगभरातील रस्ते नियमात. गतिरोधक या विषयाला अगदी दुय्यम दर्जाचं स्थान दिलं गेलं आहे. पण आपल्या येथील वाहन चालकांची भारतीय मानसिकता काही ठीकशी नसल्याने. आपल्या इथे, हा दुय्यम दर्जाचा पर्याय सगळीकडे अगदी अग्रक्रमाने वापरला जातो. आणि, नाईलाजाने का होईना आपल्या सर्वांना मात्र तो स्वीकारावाच लागतो.
गाड्या चालवताना, लोकं आपली बुद्धी गहाण ठेवत असतील का..?
काही व्यक्तींच्या वाहन चालवण्याच्या लकबी पाहून अशी शंका माझ्या मनात नेहेमी येत असते.
काही वर्षांपूर्वी, आमच्या येथे मध्य वस्तीत एक सुसाट रोड असल्याने. वाहन चालक, मागचा पुढचा कोणताही विचार न करता. कर्कश्य हॉर्न वाजवत, वाहनं जोरात हाकत, त्या रस्त्याने सतत ये जा करत असायचे. पण चुकून.. एके दिवशी, त्या ठिकाणी एक भीषण अपघात झाला.
आणि, एका लहान मुलाला त्या अपघातात जबरी दुखापतीला सामोरं जावं लागलं. अर्थातच रस्ता सुसाट असल्याने, अपघातानंतर तो बाइकस्वार काही कोणाच्या हाती लागला नाही. त्यामुळे, त्यादिवशी तो जनक्षोभाच्या तावडीतून सहीसलामत निसटला.
पण त्यानंतर मात्र, त्या संभाव्य अपघाती ठिकाणी एक भला मोठा डांबरी गतिरोधक तयार करण्यात आला. आणि शेवटी, त्याचा नको तसा परिणाम आम्हाला पाहायला मिळाला.
तो गतिरोधक इतका उंच बनवला गेला होता. कि, त्या उंचवट्यावरून कायनेटिक सारख्या दुचाकी नेत असताना. त्या दुचाक्या गतीरोधकाच्या उंचवट्यावर अक्षरशः अडकून बसायच्या. किंवा..घाईमध्ये एखाद्याने त्यावरून दुचाकी नेलीच. तर.. खर्रर्र असा मोठा आवाज येऊन, त्या गाडीचं काहीनाकाही नुकसान तरी व्हायचं. ज्यावेळी नव्यानेच हा गतिरोधक तयार केला गेला होता. त्यावेळी, त्या गतिरोधकावरून दुचाकी जोरदार आपटल्याने. कित्तेक महिला, मुली, मुलं आणि पुरुषं दुचाकीवरून उडून जमिनीवर भुईसपाट झालेले मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. हे सगळं घडण्यामागे एकच कारण होतं. हा, त्यांचा रोजचा सराव होता ना.
कि.. हा रस्ता, अगदी मोकळा आणि सुसाट आहे..!
रात्रीच्या वेळी तर अंधार असल्याने, कित्तेक सिंगल सीट लोकं सुद्धा त्या गतिरोधकावरून जोरदार आपटली होती. नाही म्हणता, हि वार्ता कर्णोपकर्णी सगळीकडे पसरली. त्यांतर मात्र, त्या रस्त्याने जाताना, तो स्पीड ब्रेकर आला. कि बरेच दुचाकीस्वार त्या ठराविक ठिकाणी गाडी अगदी सावकाश करून, जमल्यास दुचाकीवरून उतरून गाडी सावकाशपणे हाताने ढकलत पुढे घेऊन जात असत. पण एक गोष्ट मात्र, कोणाच्याच ध्यानात येत नव्हती. कि हे सगळं का आणि कशामुळे घडलं आहे..? याचा जाब मात्र, कोणीच विचारायला तयार नव्हतं. या ठिकाणी पुन्हा एकदा आपली भारतीय मानसिकता आड आली.
रस्ता जरी मोकळा आणि सुसाट असला. तरी सुद्धा, आजूबाजूला लोकवस्ती आहे. किमान हि गोष्ट लक्षात ठेऊन लोकांनी वाहनं हाकली असती. तर, हा गतिरोधक तयार करण्याची वेळ आली असती का..? आणि, खरं पाहायला गेलं तर, गतिरोधक हा विषय काही चांगला आहे का..? किंवा सक्तीचा तरी आहे का..?
तुम्हा सर्वांना ठाऊक नसेल, पण मला मात्र समजलं आहे. कि, हा विषय किती भयंकर आहे..!
माझा.. एक दूरचा मेहुणा, मध्यंतरी किडनीच्या आजाराने त्रस्त होता. आणि त्यात.. एकदा, तो सरकारी बसने प्रवास करत त्याच्या घरी निघाला होता. त्यावेळी, तो बसमध्ये नेमका पाठीमागील बाजूस बसला होता. वाहन चालक बेदरकारपणे गाडी चालवत असताना. ते लाल रंगाचं अजस्त्र धूड एका भल्यामोठ्या स्पीड ब्रेकरवर जोरदार आदळलं. तसा माझा मेहुणा अगदी हवेतच उडाला. त्यामुळे, अगदी निवांत आणि बेसावधपणे बसलेल्या माझ्या मेहुण्याच्या कंबरड्याला आणि मानेला इतकी भयंकर मोठी इजा झाली. कि त्यानंतर.. तो किडनीच्या आजाराने कमी, परंतु या अनपेक्षितपणे घडलेल्या अपघातामुळे. जवळपास महिनाभर, एका पाण्याच्या गादीवर विव्हळत पडला. आणि शेवटी, या नको त्या दुखण्यातच त्याचा करून अंत झाला.
किती त्रास आहेत या विषयाचे.. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, या सगळ्या आजारांना या विषयामुळे फुकटचं आमंत्रण मिळत आहे. कारण, याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत. वाहन चालवताना प्रत्येक नियमांची अमलबजावणी हि झालीच पाहिजे.
मग ते नियम.. अधोरेखित असोत अथवा नसतो. आपल्या मनाला पटेल, आणि चांगला वाटेल, तो नियम प्रत्येकाने पाळायला सुरवात केली. तर असे, भलेमोठे गतिरोधक बनवण्याची वेळ सरकारवर येणार आहे का..?
आता नव्याने तयार केले गेलेले रेडीमेड गतिरोधक तर फारच भयंकर आहेत. त्यामुळे, आपल्या गाड्यांचं नुकसान तर होतच आहे. पण त्यावर दुचाक्या आपटून आपल्या शरीराचं होणारं नुकसान कधीही भरून न येण्यासारखं असतं.
चला तर मग, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवूयात. काही गोष्टींचं तारतम्य बाळगलं.
तर, हे जीवन नक्कीच सुंदर आहे..!

Saturday, 22 July 2017

दारू पिणारी मंडळी सुद्धा विविध प्रकारची असतात बरं का..!

म्हणजे.. त्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. 
कसं आहे पहा,
कोणी.. दिवसभर चोवीस तास किंवा बाराही महिने पिणारा असतो. तर कोणी, रोज संध्याकाळी एकवेळ पिणारा असतो. तर कोणी, दिवसाआड पिणारा असतो. तर कोणी, आठवड्यातून दोनदा पिणारा असतो. तर कोणी, महिन्यातून एकदा पिणारा असतो. तर कोणी.. दोन, चार, सहा महिन्यातून पिणारा असतो. तर कोणी.. 

" सिझनल पिणारा असतो..! "

सिझनल पिणारा म्हणजे काय..? पडला ना प्रश्न, तर तो विषय असा आहे..!

न्यू ईयर, वाढदिवस, होळी, मिरवणूक, दसरा, गटारी अमावास्या. इत्यादी..
अशा विविध दिवशी, ठरवून दारू पिणाऱ्यांना मी सिझनल पिवय्ये असं म्हणत असतो. 
हि सिझनल पिणारी मंडळी, 
वर्षभर, आपण यांना कितीही आग्रह केला. तरी, ते दारूला हात काही लावणार नाहीत. 
पण त्यांचा, ठराविक मौसम किंवा सिझन असल्यावर, ते.. कोणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाहीत. वेळप्रसंगी.. हि मंडळी लागेल तितका पैसा देऊन, काळ्या बाजारात सुद्धा त्या दिवशी दारू मिळवत असतात. तर मग, त्यावेळी किती पैसे खर्च होत आहेत. याकडे ते बिलकुल लक्ष देत नसतात.

काही मंडळींना मदिरा खूप आवडत असते. परंतु, मदिरा प्राशन केल्यावर घरामध्ये वाद होतात. म्हणून असे काही हौशी पिवय्ये, त्यांचा मूड झाल्यावर कामाला जातोय असं सांगून, रजा घेऊन ते दिवसभर स्वतःचा एन्जॉयमेंट करून घेतात. आणि रात्री, अगदी साळसूदपणे आपल्या घरी परत येतात. त्यामुळे, त्यांच्या घरच्यांना " त्यातील " काहीएक समजत नाही. 
आणि, हे आपल्या जीवाची मजा करून मोकळे होतात. खरं पाहायला गेलं तर, अशा मंडळी हौशी पिवय्यांमध्ये मोडत असतात. पण, घरच्या लोकांना घाबरून किंवा त्यांच्या कटकटीला वैतागून. 
ते. हि, आंबट मज्जा करणं टाळत असतात. आणि, आपल्या जीवावर दगड ठेवत असतात. 

पण चुकून.. 
अशा लोकांचा स्वतःवरील ताबा सुटला. तर मग बाकी काही खरं नसतं बरं का.

माझ्या ओळखीतल्या अशाच एका हौशी पिवय्या व्यक्तीची आज मला प्रकर्षाने आठवण झाली. 
तो व्यक्ती, जातीने जैन किंवा मारवाडी होता. 
पण त्याला, दारू पिण्याची खूप आवड होती. म्हणजे.. तो हौशी, सिझनल, शौकीन, पिवय्या होता.
 
आमच्या भागात.. ते कुटुंब नव्यानेच राहायला आलं होतं. 
तो राहत असणाऱ्या इमारतीतील लोकांनी मिळून. त्या दिवशी, आखाड पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात, ओघाने ओली पार्टी सुद्धा होतीच. 

या बाबाला तर, नेमकी संधी चालून आली होती. 

पण.. आपली जात काय..? आणि आपण करतोय काय..? समाजातील लोकं काय म्हणतील..? इथे, आपण नवीनच राहायला आलो आहोत. हि लोकं नंतर मला काय म्हणतील..? 

या भीतीने.. त्याच्या बायकोने त्याला या आखाड पार्टीला काही जाऊ दिलं नाही. याने, तिची खूप समजूत काढली. पण बाईसाहेब काही ऐकायलाच तयार नव्हत्या.
शेवटी वैतागून, हा तिला म्हणाला. 
खूप झाले तुझे लाड. मी वर्षातून कधीतरी मज्जा करत असतो. त्यात सुद्धा तुझी नेहेमीची आडकाठी असते. सगळे माझी वाट पाहत असतील. मी जातो खाली..!

या बाबाने असं म्हंटल्यावर, ती बाई त्याला म्हणाली. 
तू खाली जा तर खरा, 
मग.. मी बघ काय करून घेते..!

त्या व्यक्तीने.. बायकोचं बोलणं एवढं सिरीयसली घेतलं नाही. 
आणि.. तो खालच्या मजल्यावर असणाऱ्या फ्ल्याट मध्ये, मित्रांच्या महिफिलीत गेला. 
न जाणो का, त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि आल्या पावलीच तो वरच्या मजल्यावरील त्याच्या घरात गेला. आणि बघतो तर काय..

त्याची बायको.. आगीच्या लपेट्यात आली होती. 

या छोट्याशा कारणावरून, तिने चक्क स्वतःला जाळून घेतलं होतं. हे दृश्य पाहून, तो व्यक्ती खूप घाबरला. आणि, तिला विझवण्यासाठी त्याने तिला घट्ट मिठी मारली. आणि, तो तिला घेऊन जमिनीवर गडबडा लोळू लागला. आणि.. असं लोळता-लोळता, ते दोघेही जिन्यावरून गडगडत खाली आले. 
तोवर.. सोसायटी मध्ये हल्लकल्लोळ माजला होता. 
त्यांच्या अंगावर पाणी टाकून त्या दोघांना विझवण्यात आलं. त्या महिलेच्या अंगावरील सगळे कपडे जळून खाक झाले होते. तिच्या अंगावरील कातडी लोंबकळत होती. घाईघाईने त्या दोघांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. 

आणि दुसऱ्याच दिवशी, बरगड्यांना जबरी मार लागल्याने आणि भाजल्याने. सुरवातीला, तो व्यक्ती वारला. आणि, त्याच्या तिसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. 
खात्या पित्या घरचं सुखी कुटुंब. एका क्षणात, त्यांच्या दोन मुलांना अनाथ करून गेलं.
 
राग हा कधीही वाईटच, त्यावर योग्यवेळी योग्य तो आवर घालता आला पाहिजे. चुका ह्या होत असतात, पण त्या चुकांना योग्य दिशा दाखवता आली पाहिजे. अशा व्यक्तींना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करता आलं पाहिजे. शेवटी, वेळ काही सांगून येत नाही.

हे सगळं सांगून, मी.. दारू पिण्याचं मुळीच समर्थन करत नाहीये. 
तर.. यातून काहीतरी धडा घेऊन, सर्वांनी योग्य असं मार्गक्रमण करावं. हीच, या लेखा मागील एक प्रामाणिक इच्छा आणि हेतू आहे.  

Thursday, 20 July 2017

दुचाकीवर मागे बसणाऱ्या महिलांना, मुलींना आजवर मी बरेचदा पाहत आलो आहे.
प्रत्येक महिलेची, मुलीची दुचाकीवर बसण्याची लकब अगदी वेगवेगळी असते. या विषयावर, आजवर मी बरच काही लेखन केलं आहे.
माझी चौकसबुद्धी जसं काम करेल. तशी माझी निरीक्षण शक्ती जागृत होत असते. आणि त्याचं फलित म्हणून, माझ्या विचारांना चालना मिळून. काहीतरी नवीन विषय माझ्या हाती गवसत असतो.
हल्लीच माझ्या निरीक्षणात मला असं आढळून आलं.
कि, जी महिला.. मुलगी असताना, म्हणजे " आई " होण्याअगोदर..!
ती.. तिच्या भावाच्या, वडिलांच्या, प्रियकराच्या किंवा नवऱ्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसली असताना. तिच्या विशिष्ट कला आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्या सगळ्या लकबी तुम्हा मित्रांसमोर मी वेळोवेळी विशद सुद्धा केल्या आहेत.

खरं तर.. महिला, फक्त दिसायला नाजूक असतात. परंतु, त्या पुरुषांपेक्षा फारच सहनशील आणि ताकतवर असतात. प्रसूती वेदनेच्या कळा सहन करून, एका नवीन जीवाला जन्म देणाऱ्या महिला. खरोखर एक फार मोठ्या दिव्य शक्तीचा अविष्कार आपल्या समोर प्रदर्शित करत असतात. या आविष्कारा समोर, समस्त पुरुष वर्ग मला नेहेमीच लुळा पांगळा वाटत आला आहे.
ज्यावेळी.. ती मुलगी, जेंव्हा मातृत्व स्वीकारते. त्यावेळी, त्या मुलगी नामक महिलेला. किंवा, त्या बाळाच्या आईला दुचाकीवर बसताना तुम्ही आवर्जून पाहाच.
जेंव्हा.. ती महिला आपल्या बाळाला घेऊन दुचाकीवर बसलेली असते. त्यावेळी, दुचाकीवर अवघडत बसताना, तिने तिच्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलेलं असतं. आणि बाळाला सपोर्ट म्हणून, तिचे दोन्ही हात सुद्धा त्या बाळाच्या डोक्याच्या आणि पायाच्या बाजूकडे घट्ट आवळून धरलेले तुम्हाला दिसून येतील. त्या अवघडलेल्या बैठकीत सुद्धा, ती स्वतःसाठी खूपच निवांतपणा फील करत असते. आणि, एवढी सगळी कसरत करत असताना सुद्धा.
वेळोवेळी.. बाळूत्याआड दडलेल्या आपल्या बाळाला, बाळूतं सरकावून त्याची ख्याली खुशाली सुद्धा ती पाहत असते.
खरं पाहायला गेलं तर.. दुचाकीवर प्रवास करत असताना. आपल्यापैकी कोणीही कुठलाही आधार न घेता, दुचाकीवर बसत नाही. एकदा आठवून पहा, दुचाकी मागे बसलेला मनुष्य अथवा स्त्री, एकतर समोरील व्यक्तीला किंवा त्या दुचाकीला तरी धरून बसलेली असते. कारण समोरच्या वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या वेगावर आपल्याला बिलकुल विश्वास नसतो. त्यामुळे, एक सिक्युरिटी म्हणून आपण हे कृत्य करत असतो. खरं तर, हि एक नैसर्गिक क्रिया आहे.
पण त्या विपरीत.. एक महिला तिच्या बाळाला घेऊन दुचाकीवर बसताना. कोणताही आधार घेत नसते. ती फक्त आणि फक्त तिच्या चिमुकल्याला आधार देत असते. आणि तिच्या अंगच्या विशिष्ट कलेने ती कुठेही न धरता किंवा आधार न घेता, स्वतःला सावरत बसलेली असते. खरं पाहायला गेलं तर, हि महिलांना मिळालेली एकप्रकारची दैवी देणगीच असते. त्यावेळी, त्यांच्या अंगी कोणतं धाडस आलेलं असतं..? कधी विचार करून पहा.
यावर.. बऱ्याच महिला आपआपली मतं नोंदवू शकतात.
आणि, पुरुष मंडळींना कधी रस्त्यावर असा प्रसंग पाहायला मिळाला. तर, तुम्ही त्याची आवर्जून चाचपणी करायला विसरू नका..!

Tuesday, 18 July 2017

सुरवातीला.. पुणे महापालिकेत, मी कचऱ्याच्या गाडीवर सुद्धा ड्रायव्हर म्हणुन काम केलं आहे.
त्यावेळी.. एका रात्रीत घडलेल्या,
दोन " कामुक " घटना मी तुम्हाला सांगू इच्छितोय..
सायंकाळी पाचची वेळ होती. आणि, माझा मोबाईल खणखणला.
त्यावेळी, मोबाईल प्रकरण नवीन असल्याने एकतर कोणाचे फोन येत नसत. आणि चुकून एखादा फोन आल्यावर, त्याला घ्यायला कोणीच विलंब करत नव्हतं. त्यामुळे, मी सुद्धा तो फोन ताबडतोब उचलला.. तो नेमका, आमच्या साहेबांचा फोन होता.
कुंभार.. थोडं तातडीचं काम आहे, तुम्ही आज संध्याकाळी नऊ वाजता कामावर हजर राहा.
एकतर मी सकाळ पाळी करून आलो होतो. आता, साहेबांचा फोन असल्याने, पुढे बोलायचा काही विषयच नव्हता.
त्यावेळी.. झक मारली, आणि मोबाईल घेतला अशातली गत झाली होती. मी सुद्धा, साहेबांना येतो असं सांगितलं, आणि फोन कट झाला.
संध्याकाळी आठ वाजता मी बाईकला किक मारली, आणि कामावर पोहोचलो.
सलग दोन दिवस झाले होते, हॉटेलमध्ये उष्टं पडणारं अन्न उचलण्यासाठी जी गाडी जात असते. त्या गाडीचा ड्रायव्हर, गेल्या दोन दिवसापासून कामावर आला नव्हता.
त्यामुळे, त्या विशिष्ट परिसरातील हॉटेलचा बराच कचरा साठून राहिला होता. आणि, मदत म्हणून मला या कामासाठी बोलवण्यात आलं होतं.
साधारण रात्री साडेनऊ वाजता आम्ही कामाला सुरवात केली. बराच कचरा तुंबून राहिला होता. काम संपायला साधारणपणे रात्रीचे एक तरी नक्कीच वाजणार होते. रात्रपाळी करण्याची हि माझी पहिलीच वेळ होती. गाडी थांबल्यावर टाईम पास काय, म्हणून.. माझ्या शोधक नजरेला आज काय दिसतंय, याच्या शोधात मी होतो. आणि तितक्यात, एका चायनिस हॉटेल वजा ठेल्यापाशी माझी गाडी येऊन थांबली.
रात्रीचे साडेदहा वाजले होते, कॉलेजमधील बरीच मुलं मुली त्या चायनिस स्टॉलवर फास्टफूड खाण्यासाठी जमले होते. माझ्या गाडीवरील कर्मचारी, तेथील आजबाजूच्या हॉटेलमध्ये असणारा कचरा आणण्यासाठी निघून गेले होते. आणि, अचानक माझं लक्ष समोरच्या बाजूस गेलं,
एक.. वीस बावीस वर्षांची तरुण मुलगी, दारू पिऊन अगदी मदमस्त झाली होती. तिला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. तिच्या सोबत असणारी तीन मुलं तिला पडू नये म्हणून सांभाळत होती. बहुतेक, त्यांचं खानं पिणं उरकलं होतं. आणि ते, घरी जाण्याच्या तयारीत होते. पण नशेत धूत झालेली ती मुलगी त्या मुलांना काही ऐकत नव्हती. काही केल्या ती कारमध्ये बसत नव्हती.
ती मुलं तिला म्हणत होते.. अरे बस भी कर यार, चल अब घर चलते है.
तर ती मुलगी त्यांना साफ नकार द्यायची. आणि, हिंदीमध्ये काहीबाही बरळत सुद्धा होती.
शेवटी ती मुलं सुद्धा वैतागली, आणि त्यातील एकजण खडसावून तिला म्हणाला.
अभी जादा नाटक मत कर.. चुपचाप गाडीमे बैठ जा..!
त्या मुलाचा हा भयंकर पवित्रा पाहून, त्या मुलीने सुद्धा एक वेगळाच पवित्रा घेतला.
आणि, तिच्या अंगात असणाऱ्या शर्टला कॉलरच्या खालील बाजूस दोन्हीकडे धरत, सगळी बटणं ताडताड तोडत क्षणार्धात ती अर्धनग्न झाली. आणि तिच्यासोबत असणाऱ्या मुलांना ती म्हणू लागली.
" तुमको मुझे जो कुछ भी करणा है ना, वोह यहीपे करो..! "
गोरीपान ठसठशीत बांध्याची ती पोर, दिसायला सुद्धा अगदी कमाल होती. पण वाईट संगतीने तिची पक्की वाट लाऊन टाकली होती. भर चौकात घडणारा हा बिन पैशाचा तमाशा पहायचं कोण सोडणार आहे हो. चायनिस स्टॉलवर उभी असणारी मुलं चिकन लॉलीपॉप खात. तिला डोळे फाडून पाहत, आणि मनोमन तोंडी सुद्धा लावत होते. ती मुलगी देहभान विसरून, विचित्र चित्कारत इकडे तिकडे उधळत होती. बापरे.. फारच भयंकर प्रसंग.
शेवटी, हा तमाशा तिच्या सोबत असणाऱ्या त्या मुलांना काही सहन झाला नाही. आणि वैतागून त्या तिन्ही मुलांनी, तिच्या मुसक्या आवळल्या. आणि तिला उचलून त्यांनी मारुती कारमध्ये कोंबलं. आणि ती कार सुसाट वेगाने पुढे निघून गेली.
बापरे..माझ्यासाठी हे सगळं काही अगदी नवीन होतं. कारण, असे प्रसंग माझ्या कधीही पाहण्यात आले नव्हते. परंतु, माझ्या गाडीवर काम करणाऱ्या बिगारी लोकांनी. या प्रकाराकडे, ढुंकून सुद्धा पाहिलं नव्हतं. बहुतेक, त्यांच्यासाठी हा रोजचाच खेळ असावा.
आमचं त्या ठिकाणचं काम उरकलं. आणि आम्ही पुढील कामासाठी रवाना झालो. भयंकर कचरा साठला होता. माझ्या गाडीचा हौदा कचऱ्याने अगदी काठोकाठ भरला होता. शिळ्या अन्नाच्या आंबूस वासाने, माझ्या नासिका त्रस्त झाल्या होत्या.
आता, शेवटची पाच सहा हॉटेल्स शिल्लक राहिली होती. तेथील कचरा उचलला, कि आमचं काम संपणार होतं. रात्रीचे बारा वाजत आले होते.
एफ.सी. कॉलेजच्या समोरील बाजूस रोडला माझी गाडी थांबली होती. तिथे असणाऱ्या काही हॉटेल्सचा कचरा आणण्यासाठी आमचे कर्मचारी निघून गेले.
मी सकाळी लवकर उठलो असल्याने, माझा सुद्धा डोळा लागू पाहत होता. स्टेरिंगवर डोकं टेकवून थोडी डुलकी घ्यावी, अशा विचारात मी होतो. आणि तितक्यात, माझं लक्ष रोडच्या पलीकडील बाजूस गेलं. तिकडे कसली तरी हालचाल चालू होती. रस्त्यावर भिक मागणारी, आणि सिग्नलवर काही फुटकळ वस्तू विक्री करणारं एक कुटुंब स्ट्रीट लाईटच्या खांबाखाली भिंतीच्या आडोशाला निवांत झोपलं होतं.
झोपलं कुठं.. ते तर, आत्ताच कार्यरत झालं होतं..!
मोकळ्या वातावरणात, थंडीच्या दिवसात, ते वैवाहिक युगुल एकमेकांच्या बाहुपाशात घट्ट विसावलं होतं. आजूबाजूला त्यांची पिलावळ झोपली होती. काम करताना, आपल्याला कोणी पाहत असेल. याची त्यांना बिलकुल फिकर नव्हती. ते दोघेही आपल्याच मस्तीमधे चांदण्या रात्रीत शरीरसुखाची आग विझवण्यात रममाण झाले होते. रात्र पुढे सरू लागली होती, समोरचा प्रणय खूपच रंगात आला होता.
आणि तितक्यात, आमचे कर्मचारी हॉटेल मधील कचरा घेऊन आले.
आमचं काम संपलं होतं,
" पण, समोरली 'काम' अजूनही चालूच होतं..! "
शेवटी.. मी गाडीला स्टार्टर मारला, आणि आमच्या मुक्काम स्थळी येऊन पोहोचलो. काम संपलं होतं, दिवस भराच्या कामाने माझं अंग पक्कं आंबलं होतं. चेहेऱ्यावर पाण्याचे हबकारे मारून मी थोडा ताजातवाना झालो. आणि, बाईकला किक मारून घराच्या दिशेने निघालो.
परंतु..माझ्या मन पटलावर, मगाशी घडलेले दोन्ही प्रसंग पिंगा घालत होते.
एकीकडे, मस्तवाल जीवन जगणारी तरुणाई आणि त्यातील ती तरुण मुलगी. आपली, मदमस्त जवानी ओरबाडून घेण्यासाठी. छातीवरील गोलाईला समोर करत, कामातुर होऊन मुलांना चिथावणी देत होती. तर दुसरीकडे,
जगाची तमा न बाळगता. उघड्यावर कामक्रीडा साधणारं ते भिकारी जोडपं. वीर्याचा चिखल तुडवत, अविरत लोळत पडलं होतं.

Friday, 14 July 2017

गेल्या वर्षीच्या अखाडात, मी माझ्या मित्राबरोबर त्याच्या साडूच्या घरी आखाड साजरा करायला गेलो होतो..
आखाड म्हणजे, सगळीकडे अगदी धुव्वा असतो. पण, माझ्या मित्राचा साडू काही दारू वगैरे पीत नव्हता. पण त्याच्याकडे येणारे जे कोणी पाहुणे असतील. त्यात जे कोणी पीत खात असतील त्यांना तो अटकाव सुद्धा करत नव्हता. परंतु, त्याचे वडील मात्र हौशी पिवय्ये आहेत. त्यामुळे.. मित्राच्या साडू भावाने, ती सगळी जबाबदारी त्याच्या वडिलांवर सोपवली. आणि तो बिचारा त्याच्या कामाला निघून गेला.
तर, त्या दिवशी.. ते काका आम्हाला म्हणाले, चला वरच्या मजल्यावर जाऊयात. तुमच्या साडवाणे वर सगळी सोय करून ठेवली आहे. खरं सांगायला गेलं तर, आम्हा दोघांना सुद्धा त्यांच्याबरोबर कंपनी द्यायला अगदी जीवावर आलं होतं. पण शेवटी, साडूला काय वाटेल किंवा त्या काकांना काय वाटेल. कारण, पिणारी सगळी लोकं एकाच वयाची असतात. त्यात.. उच्च, नीच, गरीब, श्रीमंत असला भेदभाव नसतो.
तर.. थोडं लाजतच आम्ही दोघेजन, त्या काकांच्या पाठोपाठ दुसऱ्या मजल्यावर गेलो.
तिथे तर, सगळी अगदी जय्यत तयारी करून ठेवली होती.
एका बाजूला.. दोन गारेगार बियरच्या बाटल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला, आम्हाला हवी असणारी आमची विस्कीची मोठी बाटली ठेवली होती. सोडा, बर्फाचे खडे आणि थंड पाणी सुद्धा आणून ठेवलं होतं.
चाखाना म्हणून.. दोन वेगवेगळ्या डिशमध्ये, मासे फ्राय आणि कलेजी फ्राय कोथंबीर घालून मस्तपैकी सजवून ठेवली होती. सोबत तळलेले पापड सुद्धा होते. हा सगळा रंगारंग बेत पाहून, मला तर बिलकुल राहवत नव्हतं. कधी एकदा सुरवात करतोय असं मला झालं होतं.
आम्ही तिघेजण त्या बैठकीत बसलो. आणि तितक्यात.. माझ्या डोक्याची बत्ती पेटली.
कारण, आमच्यासमोर एकूण चार ग्लास ठेवले होते.
" आदमी तीन.. और ग्लास चार..! "
ये क्या भानगड है भाई. हा डायलॉग त्यावेळी मी माझ्या मनातल्या मनात म्हणालो. आणि पुढील वाढून ठेवलेल्या प्रसंगाला सामोरा झालो.
शेवटी माझा मित्र त्या काकांना म्हणाला.. काका, आपण तिघेच आहोत ना, तर मग हा चौथा ग्लास इथे कशासाठी ठेवला आहे..?
त्यावर.. धीरगंभीर आवाजात ते काका उत्तरले,
अहो.. आमची हि सुद्धा माझ्याबरोबर कधीकधी घेत असते..!
अरे देवा.. त्या काकांच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून. मी अगदीच अवाक झालो.
आणि तितक्यात.. लाकडी जिन्यावरून, वरील मजल्यावर कोणीतरी येण्याच्या पावलांचा मला आवाज आला.
हो.. काकीच होत्या त्या..!
त्या आल्या, आणि आमच्या बैठकीत बसल्या. आणि काकांकडे बघून म्हणाल्या..
का हो.. अजून भरायला सुरवात नाही केली का..!
हे ऐकून.. मी तर अगदी चाट झालो, त्यावर काका म्हणाले, अगं मी तुझीच वाट पाहत होतो. त्यानंतर, काकांनी गडबडीत आम्हाला व्हिस्कीचे आणि त्यांना बियरचे पेग भरले. आणि त्या रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून, त्या मदिरेचा त्यांच्या घरच्या जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला.
आजवर.. मित्रांसोबत मी बरेचदा बसलो आहे. पण त्यावेळी, मी कोणातरी माझ्या समवयस्क महिलेसोबत बसून चांगभलं केलं होतं. त्यावेळी, त्या उभयतांना पाहून माझ्या मनात एक विषय पटकन येऊन गेला.
तो म्हणजे, याला म्हणतात..
" महिलेला दिलेलं, खरं पन्नास टक्के आरक्षण..! " 

Thursday, 13 July 2017


एकोणीसशे एक्क्यान्नव सालातील हि घटना आहे..
माहेरची साडी या सिनेमाने,
त्यावेळी तिकीट बारी अगदी जाम करून टाकली होती. खूप दूर दुरहून लोकं हा सिनेमा पाहायला पुण्यात येत होते. काहीवेळेस तर, मुद्दाम पाहुण्यांकडे राहायला येऊन सुद्धा काही लोकांनी हा सिनेमा पाहिला होता. त्यावेळी या सिनेमाने, तब्बल सहा कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
हा सिनेमा म्हणजे, त्यावेळी सासुरवाशीण महिलांसाठी एकप्रकारची जत्राच ठरली होती.
आता.. असं काही असलं, 
कि या कामात आपण मागे राहता कामा नये. हे मी ठरवलं. आणि, आम्ही पाच सहा मित्रांनी. पुण्यातील, प्रभात सिनेमात हा चित्रपट पाहायला जायचं ठरवलं.
त्या दिवशी, दुपारचे सगळे शो हाऊसफुल झाले होते. शेवटी नाईलाजाने, आम्हाला रात्री नऊ ते बाराच्या शोची तिकिटं घ्यावी लागली.
तुम्हाला काय सांगू, त्या रात्री तो नाईट शो सुद्धा हाऊसफुल होता..! एवढी तुफान लोकप्रियता, या सिनेमाने त्याकाळी मिळवली होती.
एकदाचा सिनेमा सुरु झाला,
सिनेमा जसा रंगात येऊ लागला. तशा सासूरवास असणाऱ्या बाया बापड्या, विशिष्ट सीन पाहून हमसू हमसून रडत होत्या. स्वतःला त्या सीनमध्ये घालून हे आपलच दुखः दिसत आहे. असं समजून. त्या बिचार्या, त्यांच्या मनाची समजूत घालत होत्या.
रडताना..मिनटा, मिनिटाला त्यांच्या साडीच्या पदराचे काठ ओलेचिंब होत होते.
नाही म्हणता, या सिनेमात भाऊक प्रसंग आल्यावर माझ्या डोळ्याच्या कडा सुद्धा पाणावत होत्या.
आणि.. ती घटिका समीप आली..
शेवटचा सीन,
अलका कुबल मृत्यू शय्येवर पडलेली असते. आणि भाऊक होत, विक्रम गोखले दुक्खी अंतकरणाने पुढील डायलॉग बोलत असतात. आजवर कधीही न भेटलेला बाप, तिच्यासाठी मृत्यू शय्येवर माहेरची साडी घेऊन ( अंगावरील शाल ) आलेला असतो. सगळे प्रेक्षक, स्वतःला सिनेमामध्ये हरवून बसले होते. आणि नकळत, ते सुद्धा त्या सिनेमाचा एक हिस्सा झाले होते.
आणि तितक्यात..
आमच्या शेजारी बसलेला एक मनुष्य, डोळ्यातून आसवं गाळत.. त्याच्या खुर्चीवरून उठत एकदम कोपऱ्यात मोकळ्या जागेत गेला. हि त्याची अचानक झालेली क्रिया, मी त्याला पाहत होतो.
त्या शेवटच्या सीनमध्ये इतकी ताकत होती. कि, सिनेमागृहात आगदी भयाण शांतात पसरली होती. आणि अचानक, तो कोपऱ्यात गेलेला मनुष्य.
विक्रम गोखले यांना उद्देशून मोठ्याने ओरडला..
भाडखाव.. सगळं झाल्यावर आत्ता आलास व्हय तू..?
आणि काय सांगायचं.. सगळी लोकं त्या भाऊक प्रसंगात अगदी बुडून गेले असताना. या व्यक्तीचे हे बोल ऐकून,
लोकांच्या डोळ्यातील पाणी खाली जाऊ कि वर जाऊ अशा स्तिथीत आलं होतं. त्यांचा सगळा मूड ऑफ झाला होता. सिनेमातील गाभिर्य निघून गेलं होतं.
आणि त्यानंतर, डीसमूड झालेला एक प्रेक्षक रागा रागाने त्या व्यक्तीला म्हणाला..
तू पहिला बाहेर जा, नाहीतर लई मारीन बघ तुला..!
तेंव्हा कुठे, तो व्यक्ती सुद्धा शुद्धीत आला. आपण सिनेमा पाहत आहोत. याचं त्याला भान आलं. आणि, चिडलेल्या प्रेक्षकाच्या माराच्या भीतीने,
तो बिचारा सिनेमागृह सोडून ताबडतोब बाहेर निघून गेला..!
याला म्हणतात हाडाचा कलाकार, विक्रमजींना सलाम आहे..!

अजून.. किती दिवस, आपण हे दुखः झेलणार आहोत..?
त्यावेळी, पूर्वेकडे लक्ष दिलं गेलं नाही.
त्यामुळे आता, ते आम्हाला पुरायला निघाले आहेत. आपण आहोत कुठे.?
एकीकडे, या पाकिस्तानने आपल्या नाकात अगदी दम केला आहे. पाकिस्तान, हा एक नंबरचा भिकार देश आहे. भिक मागून जगतात, आणि जगात मोठेपणा मिरवतात.
ते का कमी म्हणून, आपली काश्मिरी जनता सुद्धा त्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे. मी सरसकट सर्वांना दोष नाहीये, पण शेवटी आहेत ना..?
गव्हासोबत किडे सुद्धा रगडले जाणारच कि. त्यात माझा दोष नाहीच. आणि, या सगळ्यावर कुरघोडी म्हणून. आपल्या देशात.. क्रिकेट साठी, त्या विदेशी खेळासाठी खेळला गेलेला सट्टा. आणि, पाकिस्तानी बुकी लोकांना त्यातून मिळालेली रक्कम. अतिरेकी लोकांमार्फत, त्या मूर्ख काश्मिरी अतिरेकी जनतेच्या हातात देऊन. आपल्या, काश्मिरी पोलिसांवर दगडफेक केली जात आहे.
अरे बेट्याहो, हे अतिरेकी तुम्हाला कुठवर पोसणार आहेत..? जे काश्मिरी व्यक्ती खरोखर न्युट्रल जीवन जगत आहेत. एकवेळ त्यांच्याकडे सुद्धा पाहा.
काश्मीर पाहायला जर पर्यटक यायचे बंद झाले. तर, तुम्ही साले अन्न-अन्न करून उपाशी मरताल. आणि त्या अपराध न करणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही जीवे मारताल.
आणि.. काहीच कारण नसताना, ते नालायक चीनी लोकं भारतीयांशी अगदी नको तसं वागत आहेत. चायना हा एक नंबरचा विस्तारवादी देश आहे. तसं पाहायला गेलं तर, हिंदुस्थानची सीमा अगदी हिंदुकुश पर्वता पर्यंत होती. त्यापुढे जाऊन, अगदी बाली सुमात्रा बेटा पर्यंत आपली हिंदू सरहद्द पसरली होती. आजही त्या भागात असणारी हिंदू मंदिरं त्याची साक्ष देत जशीच्या तशी उभी आहेत.
अरे नालायकांनो, विस्तार करून काय हाशील करताय, आपआपल्या घरात सुखी राहा ना..!
आपल्या देशात राहून, आपल्याच धार्मिक तीर्थ स्थळांना भेटी द्यायला आपण नाकाम ठरत आहोत. आपल्याकरिता हि फार मोठी शर्मनाक गोष्ट आहे.
गतवर्षी याच अतिरेकी लोकांनी, अमरनाथ यात्रा बंद पाडली. कित्तेक अबालवृद्ध लोकं, फार मोठी आशा घेऊन या यात्रेला गेले होते. आणि सरतेशेवटी, त्यांना देव दर्शन न घेताच माघारी फिरावं लागलं. का आणि कशासाठी होतंय हे सगळं..? आम्ही, अगदी नाकाम झालो आहोत का..?
आत्ता.. नुकतीच कुठे, मानस सरोवर यात्रा सुरु झाली आहे. या वर्षीच्या यात्रेचा भाविकांचा, जेमतेम पहिलाच जत्था चायनाच्या सरहद्दीवर पोहोचला. आणि, अचानक एक बातमी येऊन धडकली. कि.. खराब हवामानामुळे, त्या भाविकांना यात्रेसाठी पुढं सोडलं गेलं नाही.
पण.. खरी परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे मित्रांनो..!
चीनी लोकांनी, भारतीय नागरिकांना मानस सरोवर यात्रेसाठी सोडण्यासाठी मज्जाव केला आहे.
कधीकाळी, हिंदी चीनी भाई-भाई म्हणून नारा देणाऱ्या ह्या चिन्यांनी, त्यावेळी आपली लायकी दाखवत भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. हे आपण बिलकुल विसरता कामा नये.
तरी सुद्धा, आपण लोकं फार मायाळू. आजही.. आमचे कित्तेक व्यापारी, निव्वळ चार पैशाचा फायदा होतोय म्हणून चीन मध्ये तळ ठोकून बसले आहेत. तेथील उत्पादनं फार मोठ्या प्रमाणात भारतात कसे पसरवता येतील, या धडपडीत आहेत.
आणि, त्याचबरोबर भारतीय माल किती निकृष्ट दर्जाचा आहे. हे सुद्धा, ते आपल्या जनतेला अगदी लीलया पटवून देत आहेत. भले, आपले भारतीय उद्योजक नालायक असतील. पण त्यामुळे, ते चीनी लोकं आपले सक्खे होणारा आहेत का..?
खरं पाहायला गेलं तर, भारतात त्यांनी फार पूर्वीपासून विष पेरून ठेवलं आहे.
लहान मुलांच्या खेळण्यात, अति प्रमाणात शिशाचा वापर करून त्यांना अगदी चकचकीत केलं जातं. पण तीच खेळणी लहान मुलांनी तोंडात घातली कि, तो रासायनिक पदार्थ त्याच्या पोटात जाऊन त्याला विषबाधा होते. हल्लीच, मेंदीच्या कोनातून सुद्धा त्यांनी विष पसरवण सुरु केलं आहे. चायनिस मेहेंदीमुळे मुलींच्या हाताला फार मोठी सूज येत आहे. आणि त्यानंतर, संपूर्ण अंगात विष भिनल्यावर. त्या मुलीचा जीव वाचावा म्हणून, त्यांचे हात पाय कापावे लागत आहेत. दिवाळीच्या फटाक्यात सुद्धा, विशिष्ट प्रकारची शोभेची दारू वापरून जास्तीचं प्रदूषण कसं पसरवता येयील त्याकडे त्यांचं लक्ष असतं. आता पुढील महिन्यात चायनिस गणपती आणि त्यांच्या सजावटीच सामान सुद्धा भारतात येईल. कसं थोपवावं यांना..?
मित्रांनो, या चीनी भस्मासुराला आवरा रे.. नाहीतर, तो आपल्याला बेचिराख करून सोडेल.
काल.. त्यांनी भारतीय भाविकांना मानस सरोवराच्या यात्रेला जाण्यापासून रोखलं आहे. आपल्या सैन्याशी, त्यावर त्यांची हमरीतुमरी सुद्धा झाली. सीमेवर लढणारा प्रत्येक जवान, आपल्या रक्ता मासाचा नातवाईक नक्कीच नसतो. तरी सुद्धा, तो सीमेवर आपल्या अनामिक बांधवांसाठी अविरत झटत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर मग, त्यांच्या प्रेमापोठी आपण सुद्धा त्यांचं काही तरी देणं लागतोय कि नाही..?
एकतर.. जुन्या राजकारण्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वेकडे खास लक्ष दिलं नाही. त्यामुळे, मानस सरोवर आणि कैलाश पर्वत आपल्या हातातून गेला. आणि आज आपल्याला हे दिवस पहावे लागत आहेत. आज आपले शंभू महादेव तिथे बंधिस्त झाले आहेत. त्यांच्या भेटीसाठी आम्हाला आता पासपोर्ट आणि व्हिजा काढावा लागतोय. यापेक्षा मोठी, मानहानी ती कोणती..?
गुलामगिरी झटका, आणि खऱ्या अर्थाने चीनी मालाची होळी करा. आणि त्यावर बहिष्कार टाका. मित्रांनो, तुम्ही अशी काही धडाकेबाज कृत्य करा.
कि चीनची बाजारपेठ अगदी हादरून गेली पाहिजे. आणि हे काम खूप सोप्पं आहे मित्रांनो.
भारतीय बाजारपेठ, हल्ली त्यांच्या मालाला नकार देत आहेत. म्हणून तोच माल, ते दुसऱ्या देशातून आपल्या देशात निर्यात करत आहेत. त्यामुळे, हल्ली चायनिस वस्तूंच्या किमती सुद्धा थोड्या वाढल्या आहेत.
याचाच फायदा उचलत, भारतातील व्यापाऱ्यांनी, त्यांचा माल खरेदी करण्याचं टाळलं, तर फार मोठं गणित घडू शकतं.
चिनी मालाची खरेदीच झाली नाही, तर त्यांचे व्यापार फुलतीलच कसे..?
बघा मित्रांनो, आजवर या धगधगत्या विषयावर मी बरेच लेख लिहिले आहेत. त्यावर, तुम्ही सर्व मित्रांनी अंमलबजावणी सुद्धा केली आहे. आता पुन्हा एकदा हाती शस्त्र घेण्याची वेळ आली आहे.
मागे सरकू नका, कंबर कसून कामाला लागा.
फक्त आणि फक्त, आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी जागा..!
आज.. हा मधाचा विषय आठवायचं कारण म्हणजे,
काल माझ्या घरातील मध संपला होता. मध आणण्यासाठी, मी सातमहाच्या एका दुकानात गेलो होतो. तिथे विविध प्रकारचे अस्सल मध मिळतात. पण काल रविवार असल्याने, नेमकं ते दुकान बंद होतं.
माझ्यासारखी चोखंदळ मंडळी, काही गोष्टींच्या खरेदीमध्ये कोणतीच तडजोड करत नसतात.
गावरान तूप आणि मध या दोन्ही गोष्टीबाबत मी फारच जागरूक असतो.
काहीवेळा.. रस्त्याच्या कडेला काही लोकं एका मोठ्या पातेल्यात मधाची पोळी घेऊन मध विकत बसलेली असतात. त्या मधाच्या पोळ्यावर, झाडांचा हिरवा पाला टाकलेला असतो. हा त्यांच्या मार्केटिंगचा फ्रेश फंडा मानला जातो. त्यासोबत, दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये त्यांनी मध सुद्धा भरून ठेवलेला असतो.
हा मध म्हणजे.. निव्वळ गुळाचं जाडसर पाणी असतं. ती लोकं व्यापार करत आहेत. म्हणजे, नक्कीच त्यांना कोणीतरी खरेदीदार मिळत असणारच. त्याशिवाय का ती लोकं तिथे बसणार आहेत का..?
अगदी अशाच प्रकारची फसवणूक माझ्यासोबत हिमाचल प्रदेशात झाली होती.
कुलू - मनालीच्या पुढे.. रोहतांग पास येथे, काही विक्रेत्यांनी नकली केशर, हरीणमृग कस्तुरी आणि शिलाजित माझ्या गळ्यात मारलं होतं. त्या विशिष्ट वेळी, आपल्यावर फार मोठी भूल पडते. आणि सगळं काही माहिती असून सुद्धा, आपण त्या वस्तू खरेदी करतोच.
आपणा सर्वांना.. घरगुती आणि गावरान किंवा चुली वरचं. या विषयाची भलतीच आवड असते. त्यामुळे, बऱ्याच हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीचं जेवण खूप फेमस असतं. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरी सुद्धा करू शकत असतो. पण न जाणो का, आपण आपल्या डोळ्यांवर झापड लाऊन फिरत असतो. मधाच्या बाबतीत मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. उच्च प्रतीचा आणि शुद्ध असा मध बाजारात सहाशे रुपये किलो मिळत असतो. पण काहीवेळा काय होतं.
आपल्या सोसायटीच्या थंड अशा उंच ठिकाणी, काही मधमाशा आपलं मधाचं पोळ तिथे तयार करतात. कालांतराने, त्या पोळाचा फार मोठा विस्तार होतो. शेवटी कोणीतरी, मधाची पोळी काढणाऱ्या कातकरी लोकांना तिथे आमंत्रित करतात. आणि त्यांच्याकरवी ती मधाची पोळी काढून टाकतात. मधाची पोळी काढल्यावर, त्याच सोसायटी मध्ये राहत असणाऱ्या लोकांना ती कातकरी लोकं तो मध मोठ्या किमतीत विकून मोकळी होतात.
कारण, हा मध त्यांनी त्यांच्या समक्ष काढलेला असतो. त्यामुळे, त्या मधात भेसळ या विषयाचा प्रश्नच उद्भवत नाही. असं आपल्याला वाटतं. पण आपण नेमके इथेच फसले जातो.
या लोकांचा तो कायमचा व्यवसाय आहे. लोकांची फसवणूक करूनच ते त्यांचा व्यापार करत असतात. पण तोच व्यापार त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केला. तर त्यांना, नक्कीच मागणी सुद्धा वाढेल. आणि, त्यांना जास्तीचा नफा सुद्धा मिळू शकेल.
पण हि लोकं काय करतात.. यांचा फसवणूक करण्याचा फंडा फार निराळा असतो. तो सहजासहजी कोणाच्या ध्यानात येत नाही. ज्यावेळी, मधाची पोळी काढायला ती लोकं येतात. त्यावेळी, घरून येतानाच. ते त्यांच्या कडीच्या डब्ब्यात, दोन तीन किलो गुळाचं जाडसर पाणी घेऊनच येतात. त्या जर्मलच्या डब्ब्याला झाकण लावलेलं असतं.
आपण लोकं अगदी घाईत असतो. आपल्याला लवकरात लवकर मधमाशा पासून मुक्ती हवी असते. त्यामुळे, कसलीच विचारपूस किंवा चेकिंग न करता आपण त्यांना ह्या कामाला धाडतो.
बिल्डिंगमध्ये मधमाशांची पोळी असणाऱ्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर. ती मधाची पोळी, काढून त्यांच्याकडे असणाऱ्या झाकण लावलेल्या डब्ब्यात ठेवतात. आणि, त्या डब्ब्याला झाकण लाऊन ते पुन्हा खाली येतात. तोवर ते गुळाचं पाणी आणि मध एकजीव होऊन जातात.
खाली आल्यावर, मधाच्या सगळ्या पोळ्या ते व्यवस्थितपणे पिळून घेतात. मध वेगळा आणि मेन वेगळं केलं जातं. आणि तिथे जागेवरच ते तो मध तेथील लोकांना विकून मोकळे होतात.
शिवाय.. मधाचे पोळे काढायचे सुद्धा वेगळे पैसे त्यांना मिळतात. आणि मध विक्रीतून सुद्धा वेगळा नफा मिळतो. पण वृत्ती चांगली नसल्याने, त्या लोकांना कधीही बरकत मिळत नाही. हे माझ्या चांगलं पाहण्यात आहे. त्यामुळे, अशा वस्तू खरेदी करत असताना, नेहेमी अधिकृत दुकानातूनच खरेदी करत चला. खोट्या दिखाव्यावर कधीच भाळले जाऊ नका.
आणि, शेवटची सूचना.. रोज सकाळी, मोकळ्या पोटी ग्लासभर कोमट पाण्यात. एक चमचा मध, अर्धा चमचा हळद आणि एका लहान लिंबाचा रस. एकत्रित करून घेत चला. यापासून, शरीरातील बरेच रोग नष्ट होतात. 

२००३ सालची गोष्ट आहे..!
एका मित्राच्या दुकानात माझ्या काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी म्हणून मी गेलो होतो.
तर, तो मित्र.. त्याच्या दुकानात कसल्यातरी फायलींचा पसारा मांडून बसला होता. माझ्या चौकस स्वभावाप्रमाणे, मी सुद्धा त्याला हे काय आहे म्हणून विचारलं.
तर म्हणाला.. मी एका विमा कंपनीचं काम करत असतो. फक्त हजार रुपयात नऊ वर्षांकरिता एका व्यक्तीचा एक लाखाचा अपघाती विमा उतरवून मिळतो. आणि नऊ वर्षात, त्या व्यक्तीला काहीच झालं नाही. तर.. नऊ वर्षांनी, हि हजार रुपयाची रक्कम तीन पटीने, म्हणजे तीन हजार रुपये त्याला परत मिळणार..!
हा नक्कीच फार मोठा फायद्याचा सौदा होता.
एकतर.. मी ड्रायव्हिंग क्षेत्रात असल्याने, माझ्या सोबत काम करत असणाऱ्या काही गरजू ड्रायव्हर मंडळीना, आपण याचा लाभ मिळवून देऊ. असं माझ्या मनात आलं.
"मृत्यू हा कधीतरी येणारच आहे. पण, त्याचं सुद्धा योग्य नियोजन करता आलं. तर, आपल्या पाठीमागे असणाऱ्या मंडळीचं जीवन नक्कीच सुकर होतं. "
हे काम करण्यामागे माझा मुख्य हेतू किंवा त्यामागचा हा मूळ उद्देश होता.
तर.. मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता. माझ्या मनातील गोष्ट मी त्या मित्राला बोलून दाखवली. आणि, मला सुद्धा हि पॉलिसी काढायची आहे असं त्याला म्हणालो.
तर तो मित्र मला म्हणाला.. मग तू एक काम कर ना, तू स्वतःच हे काम का करत नाहीस..?
तुला, लोकांच कल्याण सुद्धा करता येईल. आणि, या माध्यमातून तुला जास्तीचे दोन पैसे सुद्धा मिळतील. चांगल्या कामात उशीर कशाला, त्यामुळे मी लागलीच त्या कंपनीत कामाला सुरवात केली. आणि.. हजार रुपयात, जमेल तितक्या लोकांना त्या विमा पॉलिसीचा लाभ मिळवून दिला.
वर्षभरात मी तब्बल दोन अडीच लाखाचा व्यवसाय केला होता. त्याचं मला योग्य ते कमिशन सुद्धा मिळालं होतं. माझ्या कामावर मी बिलकुल खुश होतो. पण एक वर्ष पूर्ण झाल्यावर मला समजलं. हि विमा पॉलिसी स्कीम म्हणजे, एक प्रकारची, " एम.एल.एम. " कंपनीच आहे.
अरे बापरे.. कारण, एक वर्ष झाल्यावर माझ्या मित्राने मला समजावून सांगितलं.
आता, तू तुझ्या हाताखाली पाच, दहा, पंधरा, वीस किती जमतील तितकी लोकं भरती करू शकतोस. आणि आता इथून पुढे त्यांनी केलेल्या व्यवसायावर, तुला अतिरिक्त कमिशन मिळेल. आता, तुला स्वतःला काम करावं लागणार नाहीये. आता फक्त तुला दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचं आहे.
खरं सांगायला गेलं तर, हि असली नको ती कामं मला काही जमणार नव्हती. कारण, पालिकेच्या कामात दिवसभर ड्रायव्हिंग करून मी पुरता वैतागून जायचो. आणि हा फुकटचा उद्योग, लोकांच्या पाठीमागे काम कर म्हणून कोण मागे लागत बसणार. आणि.. खरं सांगायला गेलं तर, हे एम.एल.एम. प्रकरण माझ्या डोक्यात एकदम फिट्ट बसलं होतं. त्यामुळे, माझा त्या विषयाकडे पाहायचा दृष्टीकोन सुद्धा म्हणावा इतका खास नव्हता.
जाऊदेत.. नाही म्हणता कसंबसं मी तिथे काम सुरु केलं. त्या कामाची खासियत अशी होती. कि, एकूण सोळा वर्षांचं ते करियर होतं. त्यात तुमची चैन व्यवस्थित चालली. तर पुढे चालून तुम्ही नक्कीच करोडपती होणार याची खात्री होती. पण त्याकरिता जिद्द, मेहेनत आणि चिकाटी सुद्धा तितकीच महत्वाची होती. आणि नेमका त्याच गोष्टीचा माझ्याकडे आभाव होता. आमच्या समोर सुटाबुटात टाय घालून फिरणारी सिनियर मंडळी आम्हाला खूप मोठमोठी स्वप्नं दाखवायची. मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये सेमिनार ठेवायचे. आणि माझ्यासारखी गरिबीने पिचलेली तरुण पिढी त्या स्वप्नाखाली पुरती चेंगरून जायची.
पहिल्या वर्षाचा व्यवसाय झाला, कि दुसरं वर्ष यायचं. आणि ते पूर्ण झालं, कि तिसऱ्या वर्षात गेल्याबरोबर. त्या ठराविक एजंट मुलाला, ते सिनियर लोकं एक सेकंड हॅन्ड कार विकत घ्यायलाच लावायचेच. आणि मिटींगमध्ये सांगायचे,
बघा.. आज हे साहेब, तिसऱ्या वर्षात गेल्याबरोबर. त्यांनी हि स्वतःची कार घेतली आहे..!
आपल्या कंपनीत खूप फायदे आहेत हो, तुम्ही फक्त जोरदार काम करा. एक दिवस, तुम्ही सुद्धा असेच कारमध्ये फिरू शकता.
मग, सर्वांसमोर त्यानेच विकत घेतलेल्या त्या जुन्या कारची चावी त्यालाच दिली जायची.
आणि त्याच एजंट मुलाला, तीच सिनियर मंडळी पुढील चौथ्या वर्षी अगदी जबरदस्तीने नवीन कार घ्यायलाच लावायचे. कारण, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात काम करणाऱ्या एजंटला. नाही म्हंटल तरी, मासिक दहाएक हजार कमिशन मिळून जायचं. त्यावेळी, हि फार मोठी रक्कम होती बरं का. या कमिशनच्या नादापायी कित्तेक लोकांनी त्यांच्या कायमच्या नोकऱ्या सुद्धा सोडून दिल्या होत्या. त्यानंतर..त्यातील काही सक्सेस झाले, तर काही देशोधडीला मिळाले.
तर.. माझ्या दुसऱ्या वर्षाचं काम सुरु असताना,
अचानक मला पोटाचा त्रास जाणवू लागला. पोटात जोरात कळ मारून मला लूज मोशन व्हायचे. ते माझ्या आयुष्यातले फार वाईट दिवस होते. बरेच उपचार केले, पण माझा आजार काही बरा होत नव्हता. आणि आजारी असल्याने, माझं या नवीन कामात लक्ष सुद्धा लागत नव्हतं. असेच दोनचार महिने निघून गेले, पण माझ्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती.
दिवसा कामावर जाऊन आल्यावर, संध्याकाळी मी नेमकं जेवायला बसलो. कि माझा सिनियर एजंट मित्र माझ्या घरात धडकायचा. आणि माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु करायचा.
कुंभार साहेब.. या आठवड्यात काही काम झालं कि नाही..? किती लोकं भरती केली आहेत..? किती लोकांच्या तुम्ही फॉलो मध्ये आहात..?
एकतर.. पोटाच्या दुखण्याने माझा जीव मला नकोसा झाला होता. आणि त्यात, हा मित्र म्हणजे मला एक पीडाच वाटायची. मी कसातरी वेळ मारून न्यायचो. पण तो काही माझा पिच्छा सोडत नव्हता. शेवटी एकदा वैतागून मी त्याला म्हणालो..
अरे बाबा, माझा इथं जीव चाललाय. आणि तू का मला त्रास द्यायला लागला आहेस..?
अहो कुंभार साहेब.. तुम्ही जरा ऐका ना..!
त्यावेळी मी तर भयंकर चिडलो होतो. आणि रागाच्या भरात मी त्या मित्राला म्हणालो.
अरे, ते साहेब बियेब गेलं गाडवाच्या गांडीत. तू माझ्या घरी परत येऊ नकोस..!
मी असा सज्जड दम भरल्यावर, पुन्हा फिरून तो मित्र काही माझ्या घरी आला नाही.
माझ्या लूज मोशन्स काही केल्या कमी होत नव्हत्या.
त्यावेळी, मी नव्यानेच पुणे पालिकेत कायम झालो असल्याने. मला सुट्ट्या सुद्धा घेता येत नव्हत्या. तब्बल आठ महिने.. मी, हा त्रास अंगावर काढला.
माझ्या पोटातील अग्नीच विझला होता. त्यावेळी या आजाराकरिता माझे जवळपास तीस हजार रुपये खर्च झाले होते. त्यावेळी माझं अगदी हातावरच पोट होतं. तीस हजार म्हणजे, त्यावेळी सोनं फक्त सहा हजार रुपये तोळा होतं. पण म्हणतात ना, जान बची और लाखो पाये. अगदी तशातली गत झाली होती. एलोपथी औषधी उपचार काही कामी येत नव्हते.
शेवटी महत्प्रयासाने.. योग साधना आणि प्राणायम करून मी कसाबसा ठीक झालो. त्यानंतर, मी त्या कामाकडे कधीही डोकावून पाहिलं नाही. पण त्यांची कामं मात्र अविरत चालू होती.
नवीन मुलं भरती करायची. त्यांना भुलभुलैय्या दाखवून चौथ्या वर्षात चारचाकी गाडी घ्यायला लावायची. हल्लीच.. काहीतरी गडबड झाल्याने. ती कंपनी बंद पडली आहे. असं माझ्या ऐकण्यात आलं. बऱ्याच लोकांचे पैसे त्यात अडकून पडले आहेत. ती कंपनी तशी चांगली होती. पण नेमका काय घोटाळा झाला आहे. ते मला माहित नाही, पण आता लोकांचे परतावे त्यांना परत मिळत नाहीयेत. असं माझ्या ऐकण्यात आलं आहे.
माझ्या नशिबाने, मी त्यावेळी जितक्या लोकांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या. त्या सर्वांना, अगदी वेळेतच त्याचा योग्य तो परतावा मिळाला. त्यामुळे, मी अगदी निश्चिंत झालो.
कारण.. मोठ्या रकमेच्या पॉलिसी काढतेवेळी, मी स्वतः लोकांना असं आश्वासन देत होतो.
जर का हि कंपनी बुडाली. तर, मी स्वतः तुम्हाला तूची मुद्दल रक्कम परत देईल..!
पण माझं नशीब बलवत्तर असल्याने, तसं काहीएक घडलं नाही.
पण याठिकाणी, मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटतेय..
त्या कंपनीच्या.. तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात चारचाकी गाडी घेण्याचा बर्याच एजंटला त्याचा फार मोठा आर्थिक आधार आणि फायदा सुद्धा झाला.
आज त्यातील काही लोकं, त्याच कारला टुरिस्ट कार बनवून ओला किंवा उबर सारख्या कंपनीत गाडी चालवून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत..!
मी शाळेत असताना,
माझ्या वर्गात असणारे माझे काही गरीब आणि स्लम एरियात राहणारे मित्र. पहाटे पाच वाजता उठून, आमच्या इथे असणाऱ्या एका बेकरीमधून. ताजे.. पाव, बनपाव, खारी, टोस्ट, हे पदार्थ ट्रेमध्ये डोक्यावर घेऊन घरोघरी विकत फिरत असायचे..
ए sssss पाव, बनपाव, खारी, टोस्ट वाले. त्यांना पाहून मला खरोखर त्यांची फार कीव यायची. पण करता काय, गरिबी खूप वाईट हो.
त्याकाळी..आमची म्हणावी इतकी गरिब परिस्थिती नव्हती. पण, गरिबी भोगताना नेमका काय त्रास होतो. ते पाहण्यासाठी म्हणून. आठवी नववीत असताना, मी.. एक अनुभव म्हणून महिन्याला फक्त शंभर रुपयावारी घरोघरी फिरून वर्तमानपत्र सुद्धा टाकली आहेत.
त्यावेळी.. स्वतःला उच्चभ्रू आणि अतिशहाणे म्हणवणाऱ्या लोकांची विविध विकृत रूपं मला पाहायला मिळाली. मी सुद्धा पहाटे साडेपाच वाजता, मला टाकायचे असणारे पेपर, ( त्यात मोठ्या प्रमाणात सकाळ पेपर असायचे. ) माझ्या ताब्यात घ्यायचो. आणि सकाळी दहा वाजेपर्यंत, पंधरा एक किलोमीटर सायकल चालवून हे काम मी संपवायचो.
त्यावेळी, मला चुकून सुद्धा वाटलं नव्हतं. कि याच #सकाळ पेपरमध्ये कधीकाळी माझं सुद्धा आर्टिकल छापून येईल.
तर.. पेपर टाकायला गेल्यावर त्या लोकांचे फार नखरे असायचे.
पेपर आमच्या दाराच्या कडीला लाऊन जात जाऊ नकोस. दार वाजवून आम्ही येईपर्यंत वाट पाहत जा. कडीला लावलेला पेपर कोणीतरी चोरून नेतं. समजलं का तुला..?
ए बाबा.. तो पेपर तू तिसऱ्या मजल्यावर स्वतः घेऊन येत जा. तू तो पेपर खालूनच वर फेकतोस, पावसाळ्यात आमचा पेपर भिजतो रे बाबा. आणि, तुला नसेल जमत तर उद्यापासून बंद कर.
एकदा तर.. एक बाई मला म्हणाली होती. काल पेपर टाकायला आल्यावर आमच्या दरवाजातील चप्पल तू घेऊन गेला आहेस.
एक नाही, शंभर लफडी..
पण माझ्या अंगातील चिकित्सक वृत्ती मला गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे मी असले उपद्व्याप नेहेमी करायचो.
आता, माझ्या घरी सुद्धा पेपर येत असतो. आणि, मी सुद्धा नेमका दुसऱ्या मजल्यावर राहायला आहे. साहजिकच माझ्याकडे पेपर टाकायला येणाऱ्या मुलाला त्याचा त्रास होत होता.
तो बिचारा.. रोज सकाळी, दोन जिने चढून वरती यायचा. आणि आमच्या घराच्या कडीला पेपर लाऊन निघून जायचा. नंतर, तो सुद्धा थकला. आणि त्याने माझा पेपर माझ्या पार्किंग मध्ये टाकायला सुरवात केली. साहजिक आहे, पार्किंग मध्ये पेपर पडल्याने, कधी तो ओला व्हायचा, तर कधी मोकाट कुत्रे त्याला फाडून टाकायचे. याबद्धल, मी त्या मुलाला कधीच टोकलं नाही. कारण, या सगळ्या चक्रातून मी स्वतः सुद्धा गेलेलो आहे.यावर काहीतरी उपाययोजना आणावी. असं मला वाटू लागलं. आणि..
त्यावेळी हि सुपीक कल्पना माझ्या डोक्यात आली.
शीतपेयाच्या दोन लिटरच्या प्लास्टिकच्या बाटलीला चित्रात दाखवल्याप्रमाणे कापून घेऊन. मी ती माझ्या बिल्डींगच्या गेटला लाऊन टाकली. आता तो मुलगा माझा पेपर या बाटलीत ठेवत असतो.
असा त्रास तुम्हाला होत असेल, तर तुम्ही सुद्धा अशी एक बाटली, तुमच्या बिल्डिंगच्या गेटला लाऊन टाका. तो पेपर टाकणारा मुलगा आपला पेपर या बाटलीत टाकून जाईल. यामुळे, पेपर सुद्धा खराब होणार नाहीत. आणि त्याला होणारा त्रास सुद्धा वाचेल. कारण, त्याला सुद्धा शेकडो पेपर वाटायचे असतात हो.
हि उपाययोजना अमलात आणल्यास, कोणाचा तरी त्रास कमी केल्याचं. मानसिक समाधान सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभेल.

दारू, मदिरा, वारुणी किंवा इंग्रजी वाईन..!
हि..खरोखर वाईट नाहीये हो. तुम्ही आम्ही तिला विनाकारण बदनाम केलं आहे..!
ज्यावेळी.. समुद्रमंथन झालं, तेंव्हा त्या मंथनात इतर चौदा महा रत्नांबरोबरच नवव्या चरणात मदिरा सुद्धा प्राप्त झाली होती. मंथन केल्यानंतर, ज्या वस्तू प्राप्त होतात. त्या निश्चितच अमुल्य असतात. यात कोणाचंच दुमत नसावं.
त्यामुळे, अमृत सहजासहजी प्राप्त होत नसल्याने. काही व्यक्तींनी मदिराक्षीला आपल्या जवळ केलं.
परंतु कसं आहे, प्रत्येक विषय हा अगदी हिशोबात व्हायला हवा. आणि, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला. कि त्याला व्यसनाचं स्वरूप हे प्राप्त होतच. हे अपना सर्वांना माहितीच आहे.
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, हे सुद्धा कधीकाळी मदिरेचे खूप शौकीन होते. हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल, किंवा असेल सुद्धा. पण, त्यांनी गायलेली सर्वच गीतं अजरामर झाली आहेत. आणि, त्यातील कितीतरी गीतं त्यांनी चक्क मदिरा प्राशन करून म्हंटलेली आहेत. काही लोकांना हि फार मोठी अतिशयोक्ती वाटेल. पण, हे सगळं खरं आहे.
मृत्युंजयकार शिवाजी सावंत, हे सुद्धा वारुणीचे खूप शौकीन होते.
माझ्या सोबत कामाला असणाऱ्या एका मित्राने एकदा मला सांगितलं होतं. पुण्यात असताना, एकदा त्यांना मदिरेचा अतिरिक्त डोस झाला होता. त्यावेळी, त्यांना घरी सोडण्याच, त्याला सौभाग्य मिळालं होतं.
योग लाख चांगला आहे.
पण.. पुण्यातील योगमहर्षी अयंगार सर योग विद्या शिकून आणि इतरांना त्याची शिकवन देऊन, वयाच्या शहाण्णव्या वर्षापर्यंत जीवित राहिले होते. आणि त्याच ठिकाणी.. पद्मविभूषण प्राप्त नामांकित पत्रकार, कादंबरीकार आणि राजकारणी श्री. खुशवंत सिंग हे रोजच्या रोज काही प्रमाणात मदिरा प्राशन करून वयाच्या नव्व्यानव्या वर्षी स्वर्गवासी झाले.
आता.. हि तर झाली फार मोठी उदाहरणं.
आणि अजून असे कित्तेक लोकं असतील. ज्यांनी वारुनी पिऊन खूप चांगल्या आणि मोठमोठ्या कामगिऱ्या सुद्धा बजावल्या असतील.
" माझ्या सांगण्याचा हा मुळीच उद्देश नाहीये. असं काही चांगलं होत असल्याने, सर्वांनी दारू प्यावी आणि हवा तसा धुडगूस घालावा..! "
शेवटी नाण्याला दोन बाजू असतातच, या दारूपायी कितीतरी मोठमोठे सिनेअभिनेते आणि अभिनेत्र्या नशेच्या गर्तेत जाऊन देशोधडीला मिळाले आहेत.
पण विनाकारण, कारण नसताना कोणत्याही गोष्टीला नावं ठेऊ नये. दारूच्या आहारी जाणारी लोकं निव्वळ नालायक असतात. माणूस बेवडा का होतो..?
या प्रश्नाचं आजही मला उत्तर सापडलं नाहीये. कधी कधी डॉक्टर मंडळी सुद्धा काही उपचारासाठी त्यांच्या रुग्णांना मदिरा प्राशन करायला सांगतात. त्याचं कारण म्हणजे, त्यात काहीतरी औषधी गुणधर्म असेलच ना. शेवटी काय आहे, अति तिथे माती हा विषय सर्वश्रुत आहे.
काही अतीहुशार लोकं तर, तिला.. द्राक्षासव किंवा टोनिक म्हणून सुद्धा खुलेआम पीत असतात. अशा लोकांना सुद्धा तुम्ही नक्की टार्गेट करा.
तुमच्या माहितीकरीता म्हणून सांगतो. आजवर, खूप मोठ्या आशयाचे आणि विषयाचे मी शेकोडो लेख लिहिले आहेत. त्यातील बऱ्याच लेखांना या माध्यमात फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. माझे काही निवडक लेख तर, अगदी वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात सुद्धा छापून आले आहेत.
परंतु..त्यातील कित्तेक लेख, हे मी मदिरा प्राशन करून लिहिले आहेत. हे कोणालाही सांगून सुद्धा पटणार नाही. मागे वळून पाहताना, कधी कधी मला सुद्धा काही प्रश्न पडतात. कि इतक्या उच्च कोटीचे ते लेख मीच लिहिले आहेत का..?
पण न जाणो का, त्या विषयात एक वेगळीच कशीश आहे. मदिरा या विषयाला वाईट म्हणून पाहू नका. आणि तिचा वापर करताना अतिरेक सुद्धा करू नका. अल्प प्रमाणात मदिरा प्राशन केल्याने, तिच्या औषधी गुणधर्मामुळे, मनाची कवाडं उघडली जातात. मनुष्याचा अतिरिक्त ताण नाहीसा होतो. मनुष्य एका वेगळ्याच विश्वात संचार करतो. पण हे सगळं काही अल्प प्रमाणात असेल तरच. नाहीतर, अति प्रमाणात मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं आणि त्याच्या कुटुंबियाचं जीवन अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. अति लाड सुद्धा, कधी कधी महागात पडतात..!
मित्रहो, खरोखर राग माणू नका..
जे आहे, ते अगदी खरं आहे. आणि खऱ्याला कधीही मरण नसतं.!
काय तर म्हणे..
पुण्यात फार मोठं आय टी सेक्टर झालंय..
अरे मी तर म्हणतोय.. ती ब्याद पुण्यात आलीच कशाला..?
एकतर.. आम्ही पुणेकर आहे त्यात खूप सुखी समाधानी होतो, आणि आहोत. अर्ध्या भाकरीत, आम्ही तेवढीच मज्जा करतो. जेवढी, काही लोकं चिकन तंदुरी खाऊन करत असतात.
पुण्यात आय टी सेक्टर आलं काय, आणि आमच्या सांस्कृतिक आणि दर्जेदार पुण्याचा भाव वाढला काय..!
वाढूदेत, भाव तर वाढलेच पाहिजे..! पण त्याचा प्रत्यक्ष लाभ कोण घेतय..?
आम्ही लोकं, पूर्वीपासून अगदी सरळसोट जगणारी माणसं. मग आमची मुलं आमच्याच पावलावर पावूल टाकणार ना. त्यात त्यांची तरी काय चूक..?
मोठमोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये,
शर्मा, रेड्डी,तिवारी, नायर, पांडे हि काही मोजकी नावं झाली. अजून सुद्धा बरीच नावं आहेत.
परंतु ती मुख्य प्रवाहात नाहीयेत.
मग आमची.. पाटील, कांबळे, शिंदे, जाधव कुठे गेले..?
तेच सांगतोय.. आमच्या इथे शिकलेली काही मराठी मुलं, त्या परप्रांतीयांच्या हाताखाली काम करण्यात समाधान मानतात. कारण.. पर्याय नाहीये ना.
नॉर्थ, साऊथ आणि कोलकाता या भागातील हाय फाय मुलांना इथे सर्वात पाहिलं प्राधान्य मिळत असतं. मित्रहो, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. हा अशातला भाग नाहीये बर का. हे सगळं पाहतोय मी.
मला तर माझ्या मातृभूमीत स्वतःचं घर सुद्धा घेत येत नव्हतं. इतक्या भयंकर किमती झाल्या आहेत. पण झालं कसंतरी..
पण आजच्या शिकलेल्या पोरांची तरी कंडीशन काय आहे हो..?
भारतात राहून, विदेशी लोकांची चाकरी करून त्यांना मजबूत पगार मिळतोय.
पण.. त्या पगाराचं बर्डन किती आहे..!
मला तर, त्यातील एकही मुलगा किंवा मुलगी सुखी वाटत नाहीये. पैसा मिळतोय म्हणून काम करतायेत. आणि, स्ट्रेस घालवण्यासाठी दारू, सिगारेट सारख्या व्यसनांना जवळ करत आहेत. पैसा एके पैसा असं त्यांचं लाईफ झालं आहे.
नवरा फर्स्ट शिपला तर बायको सेकंड किंवा नाईट शिफ्टला असते. त्यामुळे, अगदी योगायोगाने त्यांचं मिलन होतं. आणि झालंच तर, स्ट्रेस मुळे त्यांच्यात शाब्दिक चकमकी घडत असतात. आणि खरं प्रेम शोधण्यासाठी ते झगडत राहतात.
मग अशावेळी.. त्यांना सुख देणारा किंवा देणारी कोणीतरी मिळून जाते. पण तो मुलगा किंवा ती मुलगी कोणत्या सोसायटीची असते. याचं कोणालाच भान राहत नाही.
कितीतरी आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलींना, निव्वळ उपभोग मिळतोय म्हणून स्लम मध्ये राहत असणाऱ्या टापटीप मुलांबरोबर मज्जा मारताना मी स्वतः पाहिलं आहे. आणि त्यानंतर, त्या मुलांनी त्यांची केलेली पिळवणूक सुद्धा पहिली आहे.
नाही राव.. हे सगळं काही, किमान माझ्या तरी डोक्या बाहेरचं आहे. पूर्वी पुणे हे सायकलींचं शहर होतं. तेच खूप भारी होतं. आता तेच पुणं, डूकाटीचं पुणं म्हणून ओळखलं जातंय.
पण त्या डूकाटी पुणेकर किंवा माझा महाराष्ट्रीयन नाही, तर कोणीतरी भलतंच उडवतय.
हे पाहून सुद्धा, माझ्या मनाची बरीच घालमेल होत आहे..!
सामाजिक बांधिलकी हा विषय मला खूप लवकर समजला.
इयत्ता अकरावी मध्ये असताना, पुण्यातील एका अंध शाळेत. आम्ही पाचसहा मित्र, सातवी आठवीच्या अंध मित्रांचे रायटर म्हणून त्यांना पेपर लिहायला मदत करायला जायचो.
त्यावेळी, आम्ही सगळे मित्र स्वतःची पदरमोड करून हे कार्य करण्यासाठी जात असुत. सलग तीन वर्ष, एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे काम केलं. त्यानंतर, शिक्षण आणि कामाच्या व्यापाने हे काम करण्याचा योग पुन्हा काही आला नाही.
त्यावेळी.. एक पेपर लिहिण्याकरिता, आम्हाला सरकार कडून काहीतरी चार रुपये मिळायचे. असे सात पेपरचे मिळून आम्हाला काहीतरी तीसेक रुपये मिळायचे. आणि त्यात कळस म्हणजे, सगळे पेपर लिहून झाल्यावर, ते अंध विद्यार्थी सुद्धा, आम्हाला वीसेक रुपये बक्षीस म्हणून देऊ करायचे. कितीही नाही म्हंटलं, तरी ते काही ऐकायचे नाही.
त्या अंध मित्रांनी, हे पैसे देण्यामागचं कारण म्हणजे. परीक्षेत, त्यांना येत नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लिहायचो. त्यामुळे खुश होऊन, ती अंध मुलं आम्हाला हि लाच देऊ करायचे. त्यात त्यांची सुद्धा काही चूक नव्हती. त्या शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांनीच असा पायंडा पाडला होता. आणि हि मुलं सुद्धा त्यांच्या पायावर पाय देत. अगदी तसच वागत होते.
पण आम्ही मित्र काय करायचो, शाळेतून रायटर म्हणून मिळालेले पैसे, आणि या मुलांनी देऊ केलेले पैसे एकत्र जमा करायचो. आणि त्या पैश्यातून त्या शाळेला काहीतरी भेटवस्तू द्यायचो. हि मुलं अंध असल्याने त्यांना या गोष्टीचा पत्ता लागायचा नाही. पण आम्ही आमचं काम करून मोकळे व्हायचो. आणि, आम्ही पैसे घेतल्याने त्या मुलांना सुद्धा समाधान वाटायचं.
हल्लीच दोनचार महिन्यापूर्वी, माझे फेसबुक मित्र Prashant KulkarniAnand A KulkarniRoopali Parkhe Deshingkar यांनी सुद्धा काही अंध मित्रांचे पेपर लिहिण्यासाठी रायटर म्हणून मदत केली होती. हि निश्चितच चांगली आणि आनंदाची गोष्ट होती. त्यावेळी, या तिघांचं मला विशेष कौतुक वाटलं होतं. कारण आजच्या धावपळीच्या युगात. अंध व्यक्तीला रस्ता पार करून द्यायला सुद्धा कोणी पुढे सरसावत नाहीत. तर मग, त्यांच्या करिता वेळ वाया घालवून त्यांचे पेपर लिहायला कोण जाईल..?
त्यामुळे, या भरीव योगदानाबद्धल तुम्हा सर्व मित्रांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो.
सर्वसाधारणपणे, रायटर मंडळी अंध मित्रांना पेपर लिहायला "मदत" करतातच. म्हणजे, आपल्याला त्या समोरील विषयातील जितकं येईल तितकं लिहित राहायचं. असं करण्यामागे, आपलं सुद्धा एक चांगलंच उद्धिष्ट असतं. एकतर या सगळ्या जन्मजात पिडीत व्यक्ती. आपल्या हातून कोणाचं तरी भलं व्हावं. हा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला. तर त्याचं जीवनमान नक्कीच उंचावेल. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल, तो सुद्धा मुख्य प्रवाहात येईल. हाच आपला त्यामागचा मूळ उद्देश असतो.
पण मित्रहो.. काहीवेळा,
स्पर्धा परीक्षा दरम्यान, हि "मदत" म्हणजे, फार मोठं पातक सुद्धा ठरू शकतं..!
परवा.. अंधांना सहाय्य करणारा एक अंधमित्र मला भेटला. आणि अगदी खेदाने मला तो म्हणाला, पंडित भाऊ, शिक्षणाचा सगळा बाजार झालाय हो. आणि त्यात, आपली अंध लोकं तर खूप हुशार. तो काय म्हणतोय ते मला काही समजेना.
म्हणून मी, त्याला काय झालं विचारलं असता. त्याने मला जे काही सांगितलं, ते ऐकून मी अगदी सुन्न झालो.
तो म्हणाला..काही हुशार रायटर मंडळी, अंध मित्रांच्या नोकरी लागण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षाचे पेपर लिहायला जातात. ती मुलं, अगदी उच्चशिक्षित बेकार मंडळी असतात. आणि या अंध मुलांना ते शंभर टक्के पेपर लिहून देण्याचं आश्वासन देतात. आणि त्याच्या बदल्यात, परीक्षा पास होऊन, या अंध बांधवाला नोकरी लागल्यावर. काही ठराविक रक्कम, ते त्या अंध व्यक्ती कडून घेतात.
आपण या गोष्टीचा कधी विचार सुद्धा करू शकत नाही. पण ऐकावं ते खरोखर नवल आहे कि नाही.
शेवटी.. त्या आरक्षित जागेवर, कोणीतरी अंध व्यक्तीच कामाला लागणार असतो. पण ज्या अंध विध्यार्थ्याने खरोखर जीव तोडून अभ्यास केला असेल. तो अंध विध्यार्थी, या विकाऊ आणि डोळस रायटर विध्यार्थ्या समोर अगदी कुचकामी ठरणार हे नक्की. आणि हाती आलेली नोकरी गमावून बसणार. आणि त्या ठिकाणी दुसराच कोणीतरी कामाला लागणार. हे सुद्धा तितकच खरं आहे. खरं तर असं व्हायला नकोय, यासाठी काही निकष म्हणून, फक्त लिहिता वाचता येणाऱ्या ( उच्चशिक्षित नाही ) विध्यार्थ्यांनाच यांचे रायटर म्हणून नेमलं गेलं पाहिजे. त्यामुळे, ज्याचा शेर त्याला मिळेल.
आणि यामुळे, आपल्या हातून एखादं मोठं पातक होण्यापासून सुद्धा आपण बचावू शकतो.
काही तरुण मुलं,
कोण्या एखाद्या धनाढ्य किंवा सक्सेसफुल व्यक्तीला आपला आयडॉल मानून.
स्वतःच्या करीयरच्या इतके मागे लागतात.
कि, त्या अतिश्रीमंतीच्या एकमेव ध्यासाने ते अगदी झपाटले जातात.
त्यांना, करियर नावाचं एकप्रकारचं व्यसनच लागून जातं. फक्त काम एके काम, किंवा करियर एके करियर. एवढाच विषय त्यांच्या डोक्यात घोंगावत असतो.
आणि..महत्प्रयासाने, त्यांच्या जीवनात शेवटी तो दिवस उजाडतो..!
आज, त्यांच्यासमोर सगळी सुखं अगदी हात जोडून उभी असतात. मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, भलामोठा बँक बॅलन्स असतो. परंतु मागे वळून पाहत असताना, त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे,
हे सगळं भौतिक सुख मिळवत असताना..
आपलं वय बरच पुढे निघून गेलं आहे. चेहर्यावरील तेज थोडं कमी झालं आहे, केस सुद्धा कपाळाच्या बरेच मागे जाऊ लागले आहेत. त्यातील काही केसांनी तर, अगदी चंदेरी रंग सुद्धा धारण केला आहे. पण, त्या करियर करण्याच्या नादात ते अगदी बेभान झालेले असतात. त्यावेळी यांच्या मनात दुसरा कोणताच विचार येत नसतो.
परंतु.. आता मात्र तो हवाहवासा शारीरिक आणि मानसिक विचार त्यांच्या नजरेसमोर अगदी पिंगा घालू लागलेला असतो.
त्यांच्या इतर मित्र मैत्रिणींची लग्न झालेली असतात. त्यांच्या घरात बच्चेकंपनी गोंधळ घालत असतात. त्यावेळी भानावर येऊन, हि लोकं सुद्धा मुख्य प्रवाहात येऊ पाहत असतात. पण त्यावेळी, खरोखर वेळ निघून गेलेली असते. मग काय, सगळीकडे एकच धावपळ सुरु होते.
मुलगा उपवर झाला आहे / कि, मुलगा वयस्कर झाला आहे..?
आजच्या जमान्यात, माल आहे तर ताल आहे.
आणि, अशा अतिरिक्त मालदार लोकांना तर लग्न बाजारात प्रचंड मागणी असते. मग काय, सगळीकडच्या नातेवाईकांना फक्त हे एकमेव लग्न जुळवायचे वेद लागलेले असतात. आता, या मुलाच्या अपेक्षा सुद्धा अगदी अव्वाच्या सव्वा असतात.
यांना अगदी कोवळ्या वयाची मुलगी हवी असते. अगदी मॉडर्न, चारचौघांत उठून दिसणारी, ठसठशीत बांध्याची मुलगी यांना सहचरणी म्हणून हवी असते. आणि, त्या लक्ष्मी पुत्रासमोर या सगळ्या गोष्टी अगदी हात जोडून आणि लोटांगण घालत येत असतात.
हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर, एकदाचा तो विवाह संपन्न होतो. नव्याची नवलाई संपते. पण काही काळानंतर, या व्यक्तीच्या मानगुटीवर एक नवीनच भूत सवार होतं. याच्या वाढत्या वयाची त्याला जाणीव होऊ लागलेली असते. आणि, नको त्या विचाराने तो पक्का ग्रासला जातो.
" माझी सुंदर बायको, कोण्या दुसऱ्या व्यक्तीवर लट्टू झाली तर..? "
कारण, याच्या आणि तिच्या वयामध्ये बरच अंतर असतं. ती अगदी कोवळी काकडी, तर हा म्हणजे अगदी जाडजूड आणि पिकलेला भोपळा झालेला असतो.
याला घरातून बाहेर कामावर जाताना टेन्शन, कुठे फिरायला जाताना टेन्शन. अशा व्यक्ती, ज्यावेळी बायकोला सोबत घेऊन बाईकवरून फिरायला जात असतात.
त्यावेळी, सिग्नलवर उभे असताना यांचं लक्ष अगदी चारी बाजूला असतं. माझ्या बायकोकडे कोणी पाहत तर नाही ना..? तिच्यावर, कोणी युवक लाईन तर मारत नाही ना..? या आणि इतर बऱ्याच प्रश्नांनी तो पुरता भंडावून गेलेला असतो.
त्याकरिता..योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. मनाला हवा तसा योग्य निर्णय न घेता, खरोखर फार मोठं करियर करून. या, आणि अशाच प्रकारच्या इतर यातना जर भोगाव्या लागणार असतील.
तर, एवढ्या मोठ्या हिकमतीने कमवलेल्या त्या करियरला काय काडी लावायची आहे का..?
मनुष्य जन्म पुन्हा नाही, गेला दिवस परत येणार नाही, आज कमावलेली संपत्ती उद्या कामाला येईलच, याची सुद्धा शश्वती देता येत नाही. आज असणारं सौंदर्य, उद्या असेलच असं कोणालाही छातीठोकपणे सांगता येणार नाही. जीवनात, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिका.
जीवन, खरोखर खूप सुंदर होईल..!