एखाद्या कार्यक्रमाला जाताना, भेटवस्तू काय न्यावी..? याबद्धल आपली कधीही एकवाक्यता होत नाही. आपलं मन नेहेमी द्विधा मनस्थितीत असतं.
माझा विषय सांगायचा झाला. तर, मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला जाताना भेटवस्तू नेत नसतो. कारण माझं म्हणनं असं आहे, त्या कार्यक्रमाकरिता वेळात वेळ काढून आपण गेलो आहोत. यापेक्षा मोठी भेटवस्तू ती काय असावी.? कारण कोणत्याही कार्यक्रमाला मित्र मंडळींची उपस्थिती हि फार महत्वाची असते. कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती नसेल. तर तो कार्यक्रम, कार्यक्रम उरत नाही.

काहीवेळा काय होतं, काही मंडळी भेटवस्तू म्हणून फुलांचा बुके घेऊन येतात. हा विषय तर माझ्या कधीच पचनी पडला नाही. दोन पाचशे रुपयांचे महागडे फुलांचे बुके घेऊन आपण नेमकं काय साध्य करत असतो.? दोन तीन दिवसानंतर नाईलाजाने त्या फुलाच्या बुकेला सुद्धा आपल्याला केराची टोपली दाखवावी लागते. हे त्या फुलाचं कि आपलं दुर्दैव आहे.? हेच समजायला मार्ग नसतो. विनाकारण पैशाची नासाडी होते.
ह्या बुकेवरून मला एक गोष्ट मला आठवली. स्वतःला नेते म्हणवणाऱ्या कित्तेक व्यक्तींना, कार्यक्रमात आलेले तेच बुके परत फिरवताना मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आणि वरून त्यांच्या तोंडून हे सुद्धा ऐकलं आहे.
असंच करायचं असतं. या वस्तू कधी विकत आणायच्या नसतात..!
एका अंशी मला त्यांचं म्हणनं सुद्धा पटून जातं. नको त्या विषयात वायफळ खर्च करण्यात काहीच हाशील नसतं.
असंच करायचं असतं. या वस्तू कधी विकत आणायच्या नसतात..!
एका अंशी मला त्यांचं म्हणनं सुद्धा पटून जातं. नको त्या विषयात वायफळ खर्च करण्यात काहीच हाशील नसतं.
त्यापेक्षा तुम्हाला एखाद्याला खरोखरच भेटवस्तू द्यावीशी वाटत असेल. तर लग्न समारंभात, समोरील व्यक्ती अगदी गरीब असेल. तर मनाचा मोठेपणा दाखवत, बंद पाकिटात तुम्ही हजार पाचशे रुपये द्यायला माझी काहीच हरकत नाहीये. आणि ते रीती रिवाजाला धरून सुद्धा आहे. मला खरोखरच कोणाला एखाद्या कार्यक्रमात भेटवस्तू द्यावीशी वाटली. तर फुलाच्या बुकेंना मी अगदी दुय्यम स्थान देत असतो. त्याठिकाणी छोटीशी आणि सुबक अशी एखादी गणेशाची गौतम बुद्धाची किंवा राधा कृष्णाची मूर्ती मी त्यांना भेट म्हणून देत असतो. अशा दिलेल्या वस्तू, समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात सुद्धा राहतात. आणि घरात असणाऱ्या त्या वस्तू पाहिल्यावर यजमानांना नकळत आपली आठवण सुद्धा येऊन जाते.
No comments:
Post a Comment