Thursday, 6 July 2017

काल.. माझा मुलगा मला सांगत होता..
ऑफ पिरीयड मध्ये, त्यांचे एक शिक्षक त्यांना सांगत होते.

तुमच्या वयाचा असताना, मी जेंव्हा आय.टी.आय. मध्ये होतो. त्यावेळी, मधल्या सुट्टीत माझे काही मित्र, चोरून लपून सिगारेट प्यायला जायचे. त्यावेळी, ते मित्र मला सुद्धा सोबत घेऊन जायला पहायचे.
पण मी त्यांना निक्षून सांगायचो.,
मला जो काही धूर करायचा असेल. तो मी स्वतः कमवता झाल्यावरच करेन..!

तितक्यात.. वर्गातील पाठीमागे बसणारा एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला.

" सर.. मग आता तुम्ही सिगरेट ओढता का..? "

त्या विध्यार्थ्याच्या या प्रश्नावर, सगळा वर्ग खळखळून हसला.
आणि, तो मास्तर बिचारा खजील झाला.

आजच्या मुलांसमोर बोलताना, प्रत्येक शब्द अगदी तोलून मापून बोलावा लागतो.
हे त्या शिक्षकांच्या फार उशिरा ध्यानात आलं.

No comments:

Post a Comment